बुद्धी सर्वात मोठे हत्यार | Motivational Story in Marathi
मित्रांनो तुमच्या बुद्धिपेक्षा मोठा कोणता मित्र नसतो, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याने हि गोष्ट सिद्ध होईल.
एकेकाळी एक वृद्ध व्यक्ती रेल्वेने जात होता, तेव्हाच त्या रेल्वेत काही 5 – 6 मुले चढली. खूप खोडकर होती ती मुले. त्यातील एकाने रेल्वेची चैन ओढली, आणि त्यामुळे रेल्वे थांबली. तेव्हा तिथे रेल्वे तिकीट कलेकटर आला आणि त्याने विचारले चैन कोणी ओढली?
त्या मुलांनी त्या वृद्ध व्यक्तीचे नाव सांगितले. तो वृद्ध व्यक्ती खूप घाबरला, त्याने मनातच विचार केला की मी या मुलांचे काय वाईट केले होते? का या मुलांनी मला या संकटात टाकले?
परंतु घाबरून न जाता तो वृद्ध व्यक्ती खूप समजूतदार होता, त्याने त्या तिकीट कलेकटर ला उत्तर दिले की साहेब या पाचही मुलांनी मिळून माझे पैसे चोरले आहेत. ही गोष्ट ऐकून ते पाचही मुले अचंबित झाली. जेव्हा ती मुले रेल्वेत चढत होते तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीने बघितले होते की त्यांच्या खिशात 1000 रुपये होते.
वृद्ध व्यक्तीने तिकीट कलेकटर ला सांगितले की याच्याकडे माझे 1000 रुपये आहेत नंतर त्या वृद्ध व्यक्तीला ते 1000 रुपये मिळालेच आणि त्या पाचही मुलांना पकडून रेल्वेतून खाली उतरवण्यात आले.
त्यामुळे मित्रांनो कितीही कठीण आणि न विचार केलेली परिस्थिती जरी आली ना किव्हा कोणी तुम्हाला कितीही वाईट पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला तरी शांतपणे विचार करा, बुद्धीचा वापर कराल तर त्या परिस्थितून तुम्ही सहज बाहेर पडाल.
Also, Read
Indian Army Agniveer Recruitment Rally 2022