नवरीसाठी नवीन मराठी उखाणे / Navari sathi Marathi ukhane ????
आकाशाच्या अंगणात सूर्य-चंद्राचा
दिवा
….रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा.
सर्वांन पुढे नमस्कारासाठी जोडते दोन हात
……..रावांचे नाव घेते
आता सोडा माझी वाट..
नाचत नाचत वाजत गाजत
आली आमची वरात…
रावांचे नाव घेते….
च्या दारात
दही,दूध,तूप,लोणी
………….रावांचे नाव घेते मी त्यांची राणी.
उंबरठ्यावरील माप देते ,
सुखी संसाराची चाहूल
………….. च्या जीवनात टाकले मी आज
पहिले पाउल.
काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत ……
राव गेले कामाला म्हणून
मला नाही करमत.
अभिमान नाही संपत्तीचा
गर्व नाही रूपाचा
…………..रावांना घास भरवते
वरण भात तुपाचा.
दुधाचा केला चहा चहाबरोबर
होती खारी …….राव हे जगात
लयभारी.
नवरीसाठी गृहप्रवेश उखाणे/ gruh pravesh ukhane navari sathi
नाव घ्या नाव घ्या असा घालू नका
वाद…………….
रावांच नाव घेऊन मिळविन
सगळ्यांची दाद..
हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट…….
च नाव घेतो, आता सोडा
माझी वाट..
सुवर्णाची अंगठी रुपयांचे पैंजण
………….रावांचे नाव घेते ऐका सर्वजण.
जरतारी पैठणीवर शोभे
कोल्हापुरी साज ,
………….चं नाव घेऊन
गृहप्रवेश करते आज.
कामाची सुरुवात होते
श्रीगणेशापासून
…………..रावांचे नाव घ्याला सुरुवात
केली आजपासून.
तळहातावर रचली मेहंदी त्यावर तेलही
शिंपडले
तळहातावर रचली मेहंदी त्यावर तेलही
शिंपडले
………….रावांचे मन मी केव्हाच जिंकले.
तुळशी माते तुळशी माते वंदन करते
तुला…
…….रावांचे नाव घेते
अखंड सौभाग्यवती राहू दे मला…
मोह नाही ,माया नाही
नाही रागलोभ……….
रावांचे नाव घेते नीट लक्षात ठेवा.
छन-छन बांगड्या
छुम-छुम पैंजण
………..रावांचे नाव घेते ऐका सर्व जण.
बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड गोड
……………रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोडं.
marathi ukhane for Marriage
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा
युक्तीने
……… रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.
सुखी संसाराची करतोय,
आम्ही आता सुरुवात …………..
वर ठेवा कायम
तुमचा प्रेमळ मायेचा हात.
संसाररुपी पुस्तकाचे उघडले पहिले
पान ……………….रावांचे नाव घेते
सर्वांचा राखून मान.
हिरव्या हिरव्या जंगलात झाडी
घन दाट
……….रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.
गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब
रांगा………..रावांचे नाव घ्याला मला
कधीही सांगा.
माहेरी साठवले मायेचे मोती
………रावांचे नाव घेऊन
जोडते नवी नाती.
जीवनरुपी काव्य दोघांनी वाचावी
……………… रावांची साथ जन्मोजन्मी हवी.
ईन मिन साडेतीन ,ईन मिन साडेतीन
………माझे राजा आणि मी त्यांची Queen.
हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
…………………. रावांचे नाव घेते
शालू नेसून भरजरी.
गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरल
…………………. रावांचं नाव हृदयात कोरलं.
लावीत होते कुंकू त्यात पडले मोती
लावीत होते कुंकू त्यात पडले मोती
………..रावांसारखे मिळाले पती भाग्य
मानू किती.
साडी नेसते फॅशन ची पदर घेते साधा
…………माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा.
Funny marathi ukhana
फेसबुक वर ओळख झाली
व्हाट्सअप्प वर प्रेम जुळले
……राव आहेत खरंच बिनकामी
हे लग्नानंतरच कळले.
चांदीचे जोडावे पतीची खुण
चांदीचे जोडावे पतीची खुण
…. ……………. रावांचे नाव घेते
……………… ची सून.
सोन्याचे मंगळसुत्र सोनाराने
घडविले,……..रावांचे नाव
घ्यायला सगळ्यांनी अडविले
नव्या नव्या आयुष्याची नवी
नवी गाणी
……………माझा राजा आणि
मी त्यांची राणी.
केसात माळते मी रोज गुलाबाचे फुल
केसात माळते मी रोज गुलाबाचे फुल
……..माफ करतात माझी प्रत्येक भूल.
पूर्णा नदीच्या काठावर कृष्णा
वाजवितो बासरी
पूर्णा नदीच्या काठावर कृष्णा
वाजवितो बासरी
…………..रावांसोबत मी आले सासरी.
Smart marathi ukhane
राजा-राणीच्या या खेळात त्यांनी
केलय मला चेकमेट…
रावांच नाव घेते.. ……..कारण ते
आहेतच खूप ग्रेट..
english मध्ये चंद्राला म्हणतात moon
मी आहे पाटलाची सून
सांगते सासूबाईमुळे राहिले आमचे
हनिमून.????
कपाळाला कुंकू जसा चांदण्याचा
ठसा
…..रावांचे नाव घेते आता खाली बसा.
बागेत बाग राणीचा बाग
अनं …….रावांचा राग म्हणजे
धगधगनारी आग.????
कोरोनाचा धुमाकूळ आणि अवकाळी
पावसाचा कहर ………
रावांचे नाव घेते ऐका सारे जण…
खमंग चिवड्यात घालतात
खोबऱ्याचे काप
………………चे नाव घेऊन
ओलांडते मी माप.
…………ची लेक झाली,
……………ची सून
………..चं नाव घेते
गृहप्रवेश करून.
जमले आहेत सगळे
…………….च्या दारात
…………..रावांचे नाव घेते,
येऊ द्या ना घरात.
आमचे दोघांचे स्वभाव
आहेत complimetnry
……………….च नाव घेऊन करते
घरात पटकन Entry.
मंगळसुत्रातील दोन वाट्या एक संसार
आणि दुसरे माहेर.. ………….
रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली
मी सुबक मेंदी
………….. चे नाव घेण्याची
वारंवार संधी.
गार गार माठामधले पाणी
ताजे ताजे ………..
राव माझ्या मनाचे झाले राजे.
सासरचे निरंजन माहेरची फुलवतात,
……………..रावांचे नाव घेण्यास
करते मी सुरुवात.
सोन्याची घागर अमृताने भरावी
……………रावांची सेवा
आयुष्यभर करावी.
नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची
चांदणी तुमच्याच आशीर्वादाणे
बाग फुलवीत …………..च्या अंगणी.
माझ्या गुणीला ……….ला पहा सगळ्यांनी
निरखुन
जणू कोहिनूर हिरा आणलाय आम्ही पारखून.
नवे घर ,नवे लोक, नवी नवी नाती
संसार होईल मस्त
…………….. राव असता सोबती.
आला आला तीळ संक्रातीचा सण हा
मोठा …………..
राव सोबत असतांना नाही आनंदाला तोटा.
लाल लाल मेहंदी हिरवागार चुडा,
………….रावांमुळे पडला जीवनात
प्रेमाचा सडा.
काही शब्द येतात ओठातून
…………………..चं नाव येतं मात्र हृदयातुन.
कोल्हापूरला आहे लक्ष्मीचा वास
मी भरवते …………….रावांना जिलेबीचा घास.
नव्या नव्या संसाराचा
नाजूक गोड अनुभवही नवा
…………..राव व माझ्या संसाराला तुमचा
अखंड आशिर्वाद हवा.
रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्ण म्हणतो हास
………………..नाव घेते तुमच्यासाठी खास.
पिवळा पितांबर श्री कृष्णांचा
अंगावर घातला ……………..
रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला.
काव्य आणि कविता सागर आणि सरिता
…………..चे नाव घेते तुमच्याकरिता.
marathi ukhane for satya narayan puja
गणपतीच्या देवळात कीर्तन
चालते मजेत
……………….रावांचे नाव घेते
सत्यनारायणाच्या पूजेत.
आकाशात उडतोय पक्षांचा थवा……..
च नाव घ्यायला उखाणा
कशाला हवा..
रात राणीचा सुगंध त्यात मंद वारा
रात राणीचा सुगंध त्यात मंद वारा
…………..रावांचा नावाचा भरला
हिरवा चुडा.
रुपयाच्या ताट त्यावर सोन्याचे ठसे
………रावांना पाहून चंद्र ,सूर्य हसे.
नदीच्या काठावर कृष्ण वाजीवतो
बासरी
…………रावांसोबत आले मी सासरी.
आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे
पडसाद…………चे नाव घेते तुम्हा
सर्वाचा आशिर्वाद.
विज्ञापन ADVERTISEMENT
Marathi long ukhane
पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागली चाहूल
पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागली चाहूल
………रावांच्या जीवनात टाकले पहिले पाऊल.
आला वारा गेला वारा बंद झाली lite
तू माझा husband आणि मी तुझी wife
कायम आपण सोबत राहू हीच आपली life.
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र
………..चे नाव घेऊन आयुष्याचे
सुरू झाले नवे सत्र.
चंदेरी चळिला सोनेरी
बटन
………..रावांना आवडते तंदूरी
चिकन.
मंगळदेवी मंगळमाते वंदन करते तुला
………रावांचे नाव नेते अखंड
सौभाग्य दे मला.
यमुना जलावर पडली ताजमहालची सावली
यमुना जलावर पडली ताजमहालची सावली
………रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
अथांग वाहे सागर संथ चालते होडी
परमेश्वर सुखी ठेवो
…….नी माझी जोडी
गुलाबाचे फुल वाऱ्यावर लागले डुलू
………..रावांचे दिवसभर चालू असते गुलू- गुलू.
पावसाचे पाणी नदीमध्ये साठले.
………रावांच्या नावचे मंगळसूत्र आज मी घातले!