इतिहास घडवायचा आहे | Itihas Ghadvacha aahe Marathi Motivation

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

इतिहास घडवायचा आहे

मनुष्याला सर्वात जास्त त्रास हा त्रासाचा आहे, टॉपर बनायचे आहे परंतु अभ्यास करायला त्रास होतो, बॉडी बनवायची आहे परंतु जिम मध्ये जायला त्रास होतो, मोठा जॉब हवा आहे परंतु मेहनत करायला त्रास होतो, लिस्ट खूप मोठी आहे या त्रासाची आणि समस्यांची… आणि निर्बुद्ध माणसाचे जीवन हे फक्त त्रासानी भरलेले असते, त्यापासून तो फक्त आणि फक्त पळ काढत असतो. अरे पळ काढायची इतकी हौस आहे तर स्वप्न बघणेच सोडून द्या ना? फक्त तारखेच्या बहाण्याने पुढील वर्षांपासून हे सुरू करेल, पुढील महिन्यापासून हे सुरू करेल, पुढील आठवड्यापासून हे काम करायला सुरुवात करेल ! ज्यांना जीवनात काहीतरी करायचे असते ना, ते कॅलेंडर मध्ये तारखा बघत नाहीत. ज्यां काहीतरी बनायचे असते ना ते जीवनात त्रास होतोय याकडे लक्ष देत नाहीत. 

 

तुम्हाला काय वाटते की 2-4 मिनिटांचे मोटिव्हेशन ऐकून तुमचे जीवन बदलून जाईल? तुम्हाला काय वाटत लोकांना कारणे देऊन तुमचे आयुष्य चांगले होईल? मिळत त्यालाच असते जो त्रास सहन करत असतो. समस्या तर प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात परंतु जिंकत तो नाही जो समस्या बघून बसून घेतो, तो तर पराभूत होत असतो. अरे जर घरातून बाहेर पडून बघा तुम्हाला असे काही त्रास बघायला मिळतील की स्वतःचे त्रास तुम्ही विसरून जाल… कोणीतरी चालू इच्छित असतो परंतु त्याच्याकडे पाय नसतात, कोणी बघू इच्छित असतो परंतु त्याच्याकडे डोळे नाहीत, कोणाला तरी भूक लागली आहे परंतु त्याच्याकडे ते अन्न खरेदी करण्यासाठी देखील पैसे नाहीयेत. कोणाच्या डोक्यावर छत नसेल तर काय ते मेलेत? नाही ! परंतु जे त्या परिस्थितीत हार मानून घेतील ते तसेच राहतील. परंतु त्यांच्यातील ज्याने संकल्प केला त्या परिस्थितीला बदलण्याचा तो आपल्या आयुष्यात पुढे जाईल. तुम्हाला परमेश्वराने सर्व काही दिले आहे, चांगले शरीर दिले आहे, चांगला परिवार दिलेला आहे तर मग कोणत्या गोष्टीसाठी रडताय? हे रडगाणे काही नाहीये फक्त एक कारण आहे जे करून तुम्ही जगाला उल्लू बनवत आहात. परंतु लक्षात ठेवा की तुम्ही जगाला नाही तर स्वतःला फसवत आहात आणि तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. 

विज्ञापन ADVERTISEMENT

 

तुमचे हाल तर त्या मनुष्यपेक्षा ही वाईट आहेत जो रात्री रस्त्यावर घर नसल्याने झोपतो आहे. तुमच्याकडे तर झोपण्यासाठी घर आहे, अरे रात्रभर झोपल्यानंतर दिवसभर स्वतःवर काम का नाही करत? मेहनत का करत नाहीत स्वतःला निखारण्यासाठी? स्वतःच भविष्य उज्वल करण्यासाठी? कारण तुम्ही संकटांपासून दूर पळत आहात. तुम्हाला वाटते की कोणीतरी येईल तुमची मदत करण्यासाठी, काहीतरी जादू होईल काहीतरी चमत्कार होईल… जर तुम्ही अशी आशा लावून बसला असाल की तुमचे भाग्य एक दिवशी उजळून जाईल, तुम्ही रात्रीतून करोडपती बनाल, तुमच्या सर्व समस्या संपून जातील तर तुम्ही सर्वात मोठ्या भ्रमात आहात. चमत्कार होत नाहीत तर केले जातात, कोणीही परमेश्वराचा अवतार तुमचे अश्रू पुसायला येणार नाही, कोणी तुम्हाला बोट धरून यशापर्यंत घेऊन जाणार नाहीये. 

 

विज्ञापन ADVERTISEMENT

जर कोणी मनुष्य तुमची मदत करू शकत असेल तर ते तुम्ही स्वतः आहात… कारण तुम्हीच ते मनुष्य आहात जे तुम्हाला योग्य प्रकारे जाणून आहात. स्वतःला मरु देऊ नका, बघा तुमचे ध्येय तुमची वाट बघत आहे. आणि लक्षात ठेवा की कोणतीही समस्या इतकी मोठी नसते की ज्यामुळे तुम्ही आयुष्य छोटे करताय. 

 

अरे एक मनुष्य जो न बोलू शकतो न चालू शकतो, तो व्यक्ती तयाच्या विचारांनी जग हदरवू शकतो. तर तुम्ही का नाहीत? तर सकारात्मक विचारांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा.  

विज्ञापन ADVERTISEMENT

हे देखील वाचा

New Born Baby Care Unique Tips In Marathi


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.