Horror Story in Marathi | Bhutachya Goshti | Bhoot Katha in Marathi
या कथेतून मी अंधश्रधेला बढावा देत नाही किवा कुणाच्या भावनांसोबत खेळत नाही हा एक मला आलेला अनुभव मी कथन करत आहे.
मी त्या वेळी अग्री डिप्लोमा साठी गिरवी येथे शिकत होतो. सकाळी 9 वाजता 10-11 किमी सायकल वरून तालुक्याच्या ठिकाणी जायचो. व तेथून बसने कॉलेज वर. 5 वाजता कॉलेज सुटल्यावर 7 वाजेपर्यंत घरी. तसा हा प्रवास रोजचाच.
कॉलेजमध्ये आमचा 7-8 जणांचा ग्रुप होता. आम्ही म्हणजे एकदम आगाऊ कारटी होतो. नेहमी पैजा लावणे व एखाद्याला सर्वांचे बिल भरायला लावणे. असे आमचे उदयोग. तिथल्या सरांना त्रास देणे वगैरे रोजचेच.
एकदा असाच मित्रांबरोबर बसलेलो असताना पैज लागली की बघू कोण आज ऊशीरा पर्यंत कोण थांबतय. सर्वजन थांबले खरे पण हळू हळू एक एक जन काढता पाय घेऊ लागला. मग शेवटी मी आणि अजून तिघे जन उरलो. मग शेवटी आम्ही पण म्हंटलं चला आता निघायला हवे 7 वाजत आले होते.पावसल्याचे दिवस होते व आभाळ ही भरून आले होते.
पूर्ण अंधार पडला होता. मग तेथून मी मित्राच्याच गाडीवर स्टँड पर्यंत आलो सायकल घेतली. व घराकडे निघालो पण पाऊस सुरू झाला होता. पण अजून थांबून जमनार नव्हते. त्यावेळी मोबाइल ही नव्हता माझ्याकडे त्यामुळे घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता. घरी येताना रस्त्यात खूप दाट झाडी होती. मी भर पाऊसात सायकल चालवत होतो. मी ज्यावेळी त्या दाट झाडीत आलो व अचानक वीज कडाडली व माझ्यासमोर तीन बायका चालत येताना दिसल्या.रंगाने खूप गोर्याच होत्या त्या एवढ्या रात्रीच्या कुठे गेल्या असतील असा विचार येऊन गेला मनात, पण जस जसे मी जवळ जाऊ लागलो तसे एका बाईने माझ्या थोबाडीत मारण्यासाठि हात उचलला पण मी तो हुकवला व पुढे जाऊन मागे बघण्यासाठी थांबलो तर मागे कुणीच नव्हते. मी खूप घाबरलो होतो. व जास्त वेळ तिथे न थांबता तडक घरी निघून आलो. घरी येईपर्यंत 8:30 वाजले घरी आल्यावर घरच्यांची खूप बोलणी बसली. म्हणून काही सांगितले ही नाही की काय घडले माझ्या सोबत, मग तसच जेवण केल व झोपलो. सकाळी जाग आली ती खूप उशिरा जरा ताप ही वाटत होता अंगात. हळू हळू ताप जास्तच वाढू लागला. मग संध्याकाळी दवाखान्यात वडलांबरोबर गेलो व गोळ्या इंजेक्शन दिले. घरी आलो पण ताप कमी झाला नाही. रात्री जरा उठलो व बाहेर आलो जरा अंगणाच्या पुढे जाऊन थांबलो तर समोरच्या रानात कोणीतरी उभे असलेले दिसले पण मनात म्हणले की पानी चालू असेल रानात व परत येऊन झोपलो.
पण पावसाळ्यात कशाला पाण्याची गरज नसते हे नंतर लक्षात आले. सकाळपर्यंत ताप खूप वाढला होता. वडील तर खूप शिव्या द्यायचचे की कधीच आजारी न पडणारा पोरगा एवढा कस काय आजारी पडला. डॉक्टरांचा ही काही फरक पडत नव्हता. मग शेवटी आई च्या सांगण्यावरून वडील गावातील एका जुन्या जाणकार बाईकडे गेले. ती बाई सर्वांचे सांगायची तसे वडील तिज्याकडे गेले व सांगितले की दोन दिवस आजारी पडलाय मूलगा डॉक्टर कडे पण न्हेलता पण काही फरक पडला नाही. मग त्यांनीच पुढचे सांगितले की याला चिन्ह दिसले होते त्या ठिकाणी त्यासाठी 21 कडधान्याचा पुतळा करून वाहत्या पाण्यात सोडून द्या.
त्यानंतर वडील घरी आले व 21 कडधान्य शोधू लागले व त्याचे पिट करून पुतळा तयार केला व तो फाट्यात सोडून दिला.जसा पुतळा सोडला तस त्यांना पाण्यात एक लहान मुलगा दिसल्याचा भास झाला. व ते तिथून लगेच माघारी फिरले व घरी आले. मग माझा ताप हळू हळू कमी झाला. व मी त्यानंतर बरा झालो. मग त्यानंतर मी कधी जास्त उशिर केला नाही घरी यायला.
Bhutachya Goshti Marathi madhe
आज बऱ्याच दिवसांनी ऑफिसमध्ये गेलो होतो. पूर्वी रोज जायचो पण आताशा बाहेरील कामामुळे रोज रोज जाणे नाही होत. बऱ्याच दिवसांनी गेल्यामुळे ऑफिस मधील बरीच कामे पेंडिंग पडली होती ती संपवता संपवता कधी ऑफिस बंद करायची वेळ झाली ते समजलेच नाही. स्टाफ निघून गेला आणि माझ्याकडे पण ऑफिसची चावी असल्याने मी थांबून राहिलो. आज सगळी कामे संपवूनच जायचे म्हणून आपला कॉम्प्युटरवर काम करत होतो. माझ्या ऑफिसच्या बाहेर निलगिरीची 3-4 झाडे आहेत. त्याकडे कधी असं फारसं लक्ष जात नाही पण आज सारखं त्या झाडांचं अस्तित्व जाणवत होतं. का कुणास ठाऊक पण ती झाडे तेथे आहेत हे आज जेवढं जाणवत होतं तेवढी जाणीव गेल्या 10 वर्षात कशी काय झाली नाही कुणास ठाऊक? थोड्या थोड्या वेळाने असा काही वारा यायचा की त्या पानांची सळसळ पार माझ्या मेंदूला स्पर्श करून जायची. वेळ जात होता तशी ही सळसळ जरा जास्तच वाढली. एवढी की जणू काही मी एखाद्या भयाण अरण्यात आहे आणि जोराचे वादळ सुटलेय. एवढ्यात जिन्यात कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला.
आता एवढ्या रात्री कोण कस्टमर आला म्हणून जरा आश्चर्य तर वाटले पण मनातून जरा खुश पण झालो की आज ऑफिसला उशिरापर्यंत थांबल्याचा फायदा झाला बहुतेक. पावलांचा आवाज आता जवळ येत गेला. अगदी दाराशी आला तसा मी दरवाज्याकडे पाहिले तर दरवाज्यात माझ्या मित्राची आई! मी विचार केला की एवढ्या रात्री ह्या इथे कशा? पण हा विचार चालू असतानाच त्या एकदम आत आल्या आणि माझ्या अगदी समोर बसल्या. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो कारण मित्राची आई म्हणजे जवळपास माझ्याच आईच्या वयाची… पण काय मेंटेन केलंय राव. मी लहानपणी त्यांच्या घरी जायचो तेंव्हा मला चॉकलेट देणाऱ्या ह्याच त्या. आख्या घरातलं काम उरकून बाहेर कामाला जायच्या. कामावरून आल्यावर परत घरातला पसारा आवरून स्वयंपाक करायला लागायच्या. केवढि ती एनर्जी. लहानपणी तेवढं कळायचं नाही पण आता जाणवत की एवढं काम करणं म्हणजे तोंडाच्या गप्पा नाहीत. आणि त्याच मित्राचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता की आई फार थकलीय आता. काम होत नाही, जास्त चालवत नाही. एका जागेवर बसून असते वगैरे वगैरे. पण आता त्यांच्याकडे पाहून अस काही मला तर वाटलं नाही. 25 वर्षांपूर्वी जशा होत्या अगदी तशाच होत्या त्या. ‘पप्या आलाय का तुझ्याकडे’ हा प्रश्न कानावर पडताच मी माझ्या विचारातून जागा झालो.
पप्या मला गेल्या 3 वर्षात भेटला नाही हे त्यांना सांगायचे होते पण माझ्या तोंडातून काहीच शब्द बाहेर पडले नाहीत. पण त्यांना बहुतेक कळले असावे मला काय म्हणायचंय ते. त्या ताडकन उठल्या आणि निघाल्या. जिन्यातून हळू जा म्हणायला मी दारात गेलो तर त्या तिथे दिसल्याच नाहीत. काय स्पीडने पायऱ्या उतरल्या असतील त्यांनाच माहीत. मला राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की पप्याने आई थकलीय, तिला चालवत नाही असे कसे मला सांगितले? मी आज माझ्या डोळ्यांनी बघितले त्यांना तर 25 वर्ष्यापूर्वी जशा होत्या तशाच होत्या त्या. मनातले विचार तसेच ठेवत मी माझा डबा घेतला आणि निघणार तेवढ्यात डबा थोडा जड लागला म्हणून डबा उघडून बघितले तर लक्षात आले की आज आपण जेवलोच नाहीय. पोटात भूक लागलीय हे मला जाणवले. 2 घास खाऊन मग निघू असा विचार करून परत बसलो. आणि डब्यातील मेनू बघून डोकेच फिरले. डब्यात तूप, साखर, पोळीचे 2 छोटे रोल दिले होते. लहानपणी आई द्यायची डब्यात तसे. पण आता मी काय लहान राहिलोय का असा रोल खायला? बायको पण राव अँटिकच पीस आहे. हे 2 रोल पोटाच्या कुठच्या कोपऱ्यात जाऊन पडतील तेही कळणार नाही. माझी मुलगी एका घासात संपवेल हे. आणि मला दिवसभराचा डबा म्हणून हे दिलंय. डबा बंद केला आणि घरी जाऊनच जेवू असा विचार करत ऑफिस बंद केले आणि निघालो.
खाली उतरलो तर समोर ऑफिसचा वाचमन दिसला. त्याला सहजच काय चाललंय विचारावे म्हणाले तर तोच आपणहून म्हणाला, पप्पा नाही आले का आज? मी मनात विचार केला ह्याचे बहुतेक डोके फिरलेय. आज एवढ्या वर्षात माझे वडील कधी ऑफिसला आले नाहीत आणि याला बरी आज त्यांची आठवण आली. त्याच्याकडे पाहून मी नुसता कसनुसा हसलो आणि कारकडे निघालो. कार काढली आणि घराच्या दिशेने निघालो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गाडी तर मी नीटच चालवत होतो पण शेजारून जाणारा प्रत्येक जण अगदी आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता. मी ठरवले की सगळ्यांचे डोके फिरलेय बहुतेक. आपण कुणाकडे लक्षच द्यायचं नाही. पण पुढच्या सिग्नलवर एका पोलिसाने अडविलेच. त्याला लायसन्स दाखवायला पाकिटात हात घातला तेंव्हा लक्षात आले की आज पाकीट घरीच विसरून आलोय. तेवढ्यात तो पोलिसच म्हणाला बाळा, सोबत कोणी नसताना अशी एकट्याने गाडी चालवणे चांगले नाही. खरं तर मला त्याचा खूप राग आला होता. साला हा माझ्याच वयाचा किंवा 1/2 वर्षांनी लहान पण असेल आणि मीच बाळा? पण जाऊ दे, चूक आपलीच आहे. आपणच पाकीट नव्हते विसरायला पाहिजे होतं. मी काही न बोलता निघालो.
गेटवरून गाडी माझ्या बिल्डींगपाशी आणली आणि माझ्या नेहमीच्या जागेवर पार्क केली. गाडीतून उतरलो तेवढ्यात एक जोडपं वॉक करायला निघालं होत. मी त्यांना क्रॉस करून पुढे आलो तोच त्यांची कुजबुज माझ्या कानावर पडली, आईबापांना कळलं पाहिजे ना की मुलांच्या हातात एवढी मोठी गाडी कशी द्यावी. त्यांना सूनवायची खूप इच्छा होती पण मन आवरले आणि लिफ्टकडे वळलो. लिफ्टने घराबाहेर आलो आणि बेल वाजवली. बायकोने दार उघडले आणि लगेच बंद केले. अरेच्चा हे काय? असा विचार करत मी तसाच जिन्यात बसलो. एवढ्या वर्षात हिने मला बघून कधी दार बंद नाही केले आज असे काय झाले असा विचार मी करत असतानाच माझा मोबाईल वाजला. तर बायकोचाच फोन होता. तिला आता झापायचेच ठरवून जरा रागातच फोन उचलला. तर तिकडून बायको घाबऱ्या आवाजात सांगत होती की अहो, रात्रीचे 2 वाजलेत आणि कोणीतरी 8-10 वर्षाचा मुलगा आपल्या दारात उभा राहून बेल वाजवतोय. आता मात्र माझे डोकेच फिरले. फोन कट करून मी लिफ्टकडे वळलो. लिफ्ट आली आणि मी लिफ्टमध्ये गेलो. लिफ्टमधील आरशात सहज नजर गेली आणि माझ्या हातातील डब्याची पिशवी व मोबाईल खालीच गळुन पडला. कारण आरश्यात मी नव्हतोच. बायकोने वर्णन केलेला तो 8-10 वर्षाचा मुलगा माझ्याकडेच पहात उभा होता.
Mahabaleshwar horror story in marathi
महाबळेश्वर म्हणजे निसर्गाची किमया! रम्य वातावरण. काळे कभिन्न खडक, हिरवा निसर्ग, आणि मनमोहक दृश्य. उन्हाळा आणि पावसाळा या मधल्या कालावधीत तर पृथ्वीवर अवतरलेला स्वर्गच!
आणि वीकएंड ला जायची मजाच वेगळी! हे असं असल्यावर कोणाची इच्छा होणार नाही जायची?
त्याप्रमाणेच निशा,राहुल,निधी,आणि राकेश हे चौघेही निघाले होते महाबळेश्वरला. राहुलच्या गाडीने। शुक्रवारी रात्री निघायचा प्लॅन ठरला. सगळे गाडीत बसले. राहुल गाडी चालवत होता. निधी त्याच्या बाजूच्या सीटवर बसली होती. आणि बॅकसीट्सवर राकेश आणि निशा बसले होते. मग सुरू झाली ती गडबड, मस्ती,मजा आणि एकमेकांची खेचणे. राहुल आणि निधी च्या रीलेशनशिप बद्दल निशा आणि राकेश ला माहिती होती.फक्त ह्याबाबतीत घरचे अंधारात होते. असो……
तर आता काही वेळातच सगळे महाबळेश्वरला पोहोचणार होते.तिथे पोहोचल्यावर राहायला जागा शोधणे भाग होते. शोधत शोधत ते मोडक सदन जवळ आले. सगळ्यानी आत प्रवेश केला. त्यांना काहीच वेगळे जाणवले नाही.फक्त आत गेल्यावर एक थंड वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून गेली.आत गेल्यावर कोणाची तरी चाहूल लागली.आणि काही वेळच गेला असेल तोच एक 30-35 वर्षाची बाई दृष्टीस पडली.”कोण आपण?” ह्या बंगल्याची मालकीण.वसुधा.
ओह. नमस्कार मी ओळख करून देतो. मी राहुल, ही निधी आणि हे दोघे निशा आणि राकेश. हम्मम छान वाटले भेटून.तुम्ही फ्रेश व्हा मी जेवण बनवून तुम्हाला बोलावते. be comfortable. सगळे फ्रेश होऊन येतात.जेवण सर्व्ह केलेले पाहून सगळेच डायनिंग टेबल वर ताव मारला. सगळे दमले असल्याने थोडी झोप घेऊन मग फिरायला जाऊ असे ठरले. काही वेळ आराम करून सगळे सुसाईड पॉईंट वर फिरायला गेले.
सुसाईड पॉईंट असूनही सर्वांचे चित्त वेधले जाईल अशी सौंदर्यता पाहून चौघेही आ वासून पाहू लागले. आणि इतरांप्रमाणे तेही मोहून गेले. निधी ला उगाच मनात शंका येऊन गेली. कोणीतरी आपल्यालाच रोखून पाहत आहे. पण ती तेव्हढ्यापुरतीच. सगळे बंगल्यावर आले. बंगला पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि भीतीही. बंगला एवढा जुना का? आपण आलो तेव्हा renovate वाटत होता. जाऊदे असेल काहीतरी. चला आत जाऊ. आत जाताच चौघांची बोबडी वळते. आत फक्त कोळाष्टके आणि पालापाचोळा. चौघेही अख्खा बंगला फिरतात. कुठेच कोणताही कुणीही राहत असल्याचा पुरावा दिसत नाही. ना वसुधा ना स्वयंपाकघरात काही अन्न शिजवल्याचा पुरावा. सगळ्यांची जरा टरकलीच.पण जरा सावरून सगळ्यानी पूर्ण बंगल्याची झडती घेतली. पण कुठं काहीच सापडले नाही. सगळी शोधाशोध झाली. पण कुठेच काही नाही. सगळे थकल्यामुळे झोपी गेले. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि सोसाट्याचा वारा देखील वाहत होता. निधी ला विव्हळण्याच्या आवाजाने जाग आली. तिला तो आवाज खालून येत होता. तिने हिम्मत करून बेडरूम बाहेर पाउल टाकले.आणि घाबरतच खालच्या दिशेने पाहिले. तिची पाचावर धारण बसली. तीने जोरात किंचाळी फोडली. पण तोंडातून आवाज बाहेर येईना. तिने जे दृश्य पाहिले ते अती भयानक होते.
सकाळी जाग आली तेव्हा ती तिच्या रूम मध्ये होती. आणि तिच्या डोक्याशी राहुल बसला होता.व निशा आणि राकेश तिच्या समोर उभे होते. ती अजूनही भीतीने कापत होती.ती थोडी सावरल्यावर तिने घडलेली हकीगत सांगायला सुरुवात केली.”काल रात्री मला विव्हळण्याचा आवाज आला.म्हणून मी खोली बाहेर गेले. आणि खालच्या दिशेने पाहिले. आणि माझी बोबडीच वळली.खाली वसुधा आंटी होत्या. आपण या घरात जेव्हा आलो होतो तेव्हा हे घर जसे maintain होते तसेच होते. वसुधा आंटी ने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच घर आता आहे तसे झाले आणि वसुधा आंटी नाहीश्या झाल्या.आणि पुन्हा पहाते तर एक साडी फाटलेली डोक्यातून रक्त आलेली आणि त्यामुळे चेहऱ्याला केस चिकटलेली बाई तिच्या बुबुळे नसलेल्या डोळ्यातून एकटक माझ्याकडे बघत दात विचकत होती.आणि क्षणार्धात नाहीशी झाली.”सकाळ झाली. दिनचर्या आटपून सगळे जण रात्रीची वाट पाहत होते. शेवटी रात्र झाली. सगळे आज हॉल मधेच एकमेकांचा हात पकडून होते. आणि “ती” आली. पण ती आज खूपच सुंदर दिसत होती. जरीकाठाची साडी, नाकात नथ, पायात जोडवी,मंगळसूत्र, आणि कपाळाला चंद्रकोर.
अतिशय लाघवी भासत होती. सगळ्यानी हात जोडले,”हे बघ बाई आम्ही तुला ओळखत नाही. पण आम्हाला तुमची मदत करायला आवडेल. तुम्ही काळजी करू नका.” “मला मदत नको न्याय हवाय.तेवढा द्या” एवढेच म्हणून ती तिच्या त्या भयंकर रुपात आली आणि नाहीशी झाली. न्याय पण का?काय घडलंय तिच्या सोबत अस की ती न्याय मागतेय? त्यासाठी आज रात्री परत तिला आव्हान द्यावे लागेल. असे म्हणत राकेशने चहाचा घोट घेतला. पण कसा ? हाताशी चाळे करत निधी म्हणाली. आपल्याला तिची वाट पाहावी लागेल रात्री. रात्र झाली.सगळे हॉल मधेच बसून होते. “ती” आली. सगळ्यांचा थरकाप उडाला. अंगात कापरे भरले.ती तीच होती.वसुधा…..
तिने घडली घटना सांगायला सुरुवात केली.
“काही वर्षांपूर्वीची गोष्ट,सगळे सुरळीत चालले होते. माझे नाव सौ. वसुधा मोडक मी आणि माझे पती श्री. महेश मोडक आम्हीही इतरांप्रमाणे सुसाईड पॉईंट वर फिरायला गेलो होतो. आमचा लाडका मुलगा पार्थ सोबत. त्या दिवशी माझ्या आणि ह्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. खूप खुश होतो आम्ही. पण………
पण अचानक आमच्या सुखावर विर्जण पडले माझे आणि मिस्टरांचे जोरदार भांडण झाले.आणि……. आणि त्यांनी मला गाडी खाली ढकलून दिले आणि मला तिथे रक्ताच्या थारोळ्यात ठेऊन निघून गेले. आजपर्यंत मी न्यायासाठी तडफडतेय. पण……..
मला न्याय हवाय…..
आम्ही मिळवून देऊ तुम्हाला न्याय. माझा नवरा गावी निघून गेलाय.पळसगाव चौघीनी तिथे लागलीच कूच केले. मि. मोडकांना पकडले. आणि पार्थ ची जवाबदारी स्वतःवर घेतली आणि पुन्हा त्या बंगल्याला भेट दिली. आईचे वात्सल्य पार्थ ला जाणवत होते. परत सगळ्यांना वसुधा मूळ रुपात दिसून ती मोक्षप्राप्तीच्या मार्गाला लागली.
Bhoot Story in Marathi
“तु फक्त माझा वापर केलास आणि आता तुझी गरज संपल्यावर माझ्या पासुन लांब होतोस…
पण मि हे होउ देणार नाही संजय…
आता तु बघच… मी काय करु शकते ते
जस्ट वेट अॅंण्ड वोट्च प्रिया रागाने पेटली होती
“काय करणार आहेस तु ???
“दाखवच करुन…मि पण बघतो तु कशी आणि काय करु शकतेस ते …!
तुझाशी माझा आता काहिच संबंध राहिला नाही.
संजय आणी प्रियात झटापटी होउ लागली
वाद विकोपाला गेला
संजय प्रियाला शिवीगाळ करत मारहाण करु लागला..
संजय ने प्रिया एका निर्मनुष्य जागी बाईक ने आणले होते आजु बाजुला जंगल होते. जवळच एक जुन धरण होत.
संजयच प्रियाशी कडाक्याच भांडण चालु होत.
आजु बाजुला कोणिच नव्हत.
अशातच संजय चा राग अनावर झाला. त्याने आपल्या हेलमेट ने प्रियाच्या डोक्यावर आघात केला तिच्या डोक्यावर जोरात हेलमेट लागल्याने प्रिया जागिच खाली बसली आणि विव्हळु लागली. तिच्या डोक्यातुन आता रक्त वाहु लागले पण अशातही ति संजय ला खरि खोटी सुनावत होती.
सजय ने ठरवले आता हि अशी एकणारी नाही
त्याने लागलीच तिला जमिनिवर ढकलुन तिचा गळा आवळला.
रागाच्या भरात त्याने दोन तिन मिनिट तसाच तिच्या नरडिचा घोट घेतला … प्रिया अक्षरछा तडफडत होती. शेवटी तिची मृत्युशी झुंझ संपली आणी तिचा देह निश्प्राण पडला.
संजय रागाने लालबुंद झाला होता. त्याचा श्वासोश्वास वाढला होता. त्याने प्रियाला हलवले. तिची हालचाल होत नव्हती.
संजय थोडा घाबरला
प्रिया प्रिया करत तिच्या गालावर थापटत तिला जाग करण्याचा प्रयत्न करत होता.
पण आता सरव खेळ संपला होता
प्रिया मरण पावली आहे याची त्याला पुर्ण कल्पना आली
थोडावेळ संजय शांत बसला आणी मग उठुन उभाराहिला आणी अचानक जोर जोरात हसु लागला.
“आता कर जे तुला करायचय ते..
बोलत संजय ने प्रियाच्या मृतदेहाला लातेने ढकलले. संजय आता प्रिया पासुन कायमचा सुटला होता.
संजय ने प्रियाचा देह फरफटत नेला आणी जवळच असलेल्या धरणाच्या पायथ्या लगतच्या नदिच्या वाहत्या पाण्यात सोडला.
पावसाचे दिवस होते.
धरण भरुन वाहत होत बघता बघता प्रिया पाण्याशी एक झाली आणि त्या पाण्यात तिचा देह दिसेनासा झाला
संजय न लागलीच घटणास्थळातुन पलायन केले.
कित्येक महिने लोटले
प्रियाला बेपत्ता म्हणुन घोषित केले.
प्रियाचा देह जंगलात त्या वाहत्या नदिच्या पात्रात कुठेतरी गडप झाला.
दिवसेंदिवस लोटले संजय मात्र आता यातुन सहिसलामत सुटला होता.
संजय च आता एक नविन अफेअर चालु झाल. परत त्याने आपल्या प्रेमाचा खेळ मांडला.
लग्नाची खोटी वचने आणि स्वप्ने दाखवत आजुन एका मुलीला त्याने आपल्या जाळ्यात अोढल होते.
कर्म धर्म संयोगाने संजय परत त्याच जागी त्या मुलीला एकांतात घेउन आला.
“मेघा माझ तुजावर खुप प्रेम आहे… मला तु खुप आवडतेस… i love you खर तर माझी हिम्मत होत नव्हती म्हणुन तुला मि ईथे आणलय या बहाण्याने आता मि तुला बिंदास बोलु शकतो. माझी फिलींग तुला मि सांगितली.
आता तु बोल तुजा मनात माझ्या साठी तस काही आहे का ?
मेघाने हसत संजय च्या डोळ्यात पाहिल…
खर सांगु… संजय
थोडावेळ शांतता पसरली
I love you too
बोलत मेघाने संजयच्या प्रेमाला होकार दिला आणी एक हलकीशी स्माईल देत तिने संजयला मिठि मारली.
संजय ही मनोमन खुश झाला एक अजुन मासळी जाळ्यात आली त्याचा मार्ग आता मोकळाझाला.
छान जाग आहे थंड हवा हलका पाउस हिरवगार जंगल नदि किनारा … फक्त तु अाणी मी आणि हा ऐकांत
तु अगोदर हि ईथे आला होतास का …? मेघाने संजयला विचारल
हो म्हणजे…नाहि….. म्हणजे हो… ते….मी….
अरे असा काय गोंधळतोयस हा कि नाही सिंपल उत्तर दे येवडा काय लोड घेतोयस.
संजय ला प्रिया सोबतचा फ्लॅशबॅक झाला संजय जरा अस्वस्थ झाला.
आपण त्याच जागी परत आलो जिथे एक अफेअरचा शेवट केला होता. संजय विचारातच होता. ईतक्यात मेघाने संजयचा हात पकडला
संजय भानावर आला.
त्याने मेघाकडे पाहिल
कुठे हरवलात साहेब लग्नाची स्वप्न पाहत आहात का?
मेघा हसु लागली.
संजयने मेघाला जवळ घेतल तिची चुंबन घेउ लागला
मेघाने त्याला रोखल
अहं..हे सर्व लग्ना नंतर
चलना आपऩ त्या नदिवर जाउ मला ते धरण बघायच आहे…
तिथे काय आहे ??? नको उगाच खुप पाणी आहे आपण दुसर्या जागी जाउ कुठे तरी.
नाहि प्लिज मला तिथेच जायचय चलना … संजय प्लिज..
शेवटी संजय तयार झाला त्याच्या मनात प्रिया सोबत चा प्रसंग आता ताजा होऊ लागला.
मनात अनामिक भिती वाटु लागली तरिही मेघाच्या हट्टासाठी तो पुडे सरकत होता त्याच्या डोळ्यासमोर प्रियाचा रक्ताने माखलेला मृतदेह येत होता.
चालत चालत ते नदिकाठी पोचले त्याच जागी जिथे संजय ने ते प्रेत ठिकाणी लावल होत.
ति अजुन तिथे असेल का?! तिच प्रेत अजुन असेल का असे नको नकोते विचार संजय च्या डोक्यात फिरायला लागले.
त्याच डोक जड झाले खांदे भारी झाले अस वाटु लागल कि काहि वजन त्याच्यावर आहे.
बोलत बोलत ते नदिकाठी उभे होते.
मेघाने संजय चा हात पकडला होता.
किति छान वाटतय ना… नदि किनारा तु आणी मी
माझ्या नव्या आयुष्याची सुरवात करतेय ते पण या रोमॅंटिक जागी
मला खुप आनंद आहे की मला तुजा सारखा जिवनसाथी मिळाला.
संजय काहिच बोलत नव्हता.
ईतक्यात संजय च लक्ष नदिच्या पाण्यात गेल त्याला स्वताच प्रतिबिंब दिसल आणी मेघाच्या जागी प्रिया दिसली.
प्रिया एकटक संजय ला बघत होती.
येवड्यात संजय च्या काळजात धस्स झाल त्यान लागलीच मेघाचा हात झटकला.
माझा तुझ्याशी काहीच संबंध नाही…
मेघा अचानक संजयच्या अशा बोलण्याने बुचकळ्यात पडली
हे काय बोलत आहेस तु संजय…
ठिक तर आहेस ना???? संजय….
मेघा संजय जवळ आली संजय घामाघुम झाला होता.
संजय आता घाबरला होता.
जमिनिवर बसुन धापा टाकत होता मेघाचीही त्याला भिती वाटात होती.
” चल ईथुन आधी निघु आपण
अरे काय झाल सांगशील का ? संजय काहि एकायच्या तयारित नव्हता तो आपल्या बाईक च्या दिशेन धावु लागला.. मेघा मागुन धावतच त्याच्या मागे येउ लागली ईतक्यात अचानक पाय घसरुन संजय जमिनिवरच्या दगडावर आपटला.
डोक्यातुन भळाभळा रक्त वाहु लागल.
मेघा आपल्या अोढणीने संजयच्या जखमेला ढाकते संजय काय होतय तुला ????
मेघा आता रडु लागते संजय वेदनेने कळवळत असताना
अचानक मेघाचे रंग बदलतात. डोऴे पांढरे होतात आणि त्वेशाने अंगात संचारल्या सारखी मेघा तिच अोढणी संजयच्या गळ्यात घालुन संजय चा गळा आवळु लागते.
मेघाची अंगात ईतकी शक्ती येते की संजय हि तिचा प्रतिकार करायला अक्षम ठरतो. संजयचा देह श्वासोश्वास घेण्यासाठी तडफडु लागतो जसा प्रियाचा तडफडत होता.
संजयच्या डोक्यालाहि तशीच जखमहोते जशी प्रियाला झाली होती मेघा त्वेशाने सर्व शक्तिनिशी जनावरा सारखी गुरगुरत होती. संजयवर जराही दया दाखवली नाही…संजय तडफडुन मरणाच्या दारात उभा होता
ईतक्यात शेवटचे शब्द मेघाच्या तोंडातुन आले
“ईथे परत येउन चुक केलीस
“बोललेले ना तुला सोडणार नाही ….बघ मी काय करु शकते….
संजय मरता मरता मेघाच्या डोळ्यात प्रियाला पाहात होता हिंस्त्र आवाजात तिने संजय चा फास आवऴुन संजय चा श्वास बंद केला…
मेघा थोड्याच वेऴात बेशुद्ध झाली.
तो प्रियाचा आत्मा होता जो त्याजागी कित्येक महिने आपल्या प्रतिशोधासाठी घुटमऴत होता
प्रियाच्या आत्माने आता तिचा बदला पुर्ण केला होता संजय मरण पावताच प्रियाने मेघाच शरिर सोडल …
आणी संजयला आपल्या सोबत आपल्या दुनियेत नेल… कायमच..
समाप्त ????
Bhutachi Gosht
तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणी साधीसुधी कथा नाही तर एक रहस्यमय अशी भयकथा आहे. मुळात ही कथा नसून आम्हाला आलेला एक अनुभव आहे जो तुम्हालाही विस्मयचकीत करून जाईल. “विस्मयचकीत” हा शब्द जर चुकला असेल तर तसे सांगा हा. कारण असा अनुभव या आधी आयुष्यात कधी आम्हाला आला नव्हता ना, तर नक्की काय म्हणतात हे ठाऊक नाही. आता तुम्ही म्हणाल आम्हाला म्हणजे कोणाला? तर आम्ही म्हणजे मुंबईच्या द.ग.डु. अका दयाराम गजानन डुगडुगकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला असलेल्या आणि वर्गाच्या अंतिम बाकावर बसणार्या सात-आठ टवाळ पोरांचे टोळके. आमची अभियांत्रिकीची चार वर्षे आम्ही एकही गटांगळी न खाता कशी पूर्ण केली यावर एक वेगळी कथा बनेल, पण ती पुन्हा कधीतरी. पण हे अंतिम वर्षही तसेच सुटणार याची खात्री असल्याने शेवटचा पेपर झाला तसे आम्ही दरवर्षीप्रमाणे मौजभ्रमंतीचा म्हणजे पिकनिकचा बेत आखायच्या तयारीला लागलो. आता आमच्या ग्रूपमध्ये चार पोरे गरीबाघरची असल्याने उरलेल्या चार खात्यापित्या घरच्या पोरांना यांच्या खाण्यापिण्याचा खर्चही मैत्रीखात्यात उचलावा लागत असल्याने आमची सहल शिमला-कुल्लू-मनाली सारख्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते. आणि तसेही हे शेवटचे वर्ष असल्याने परीक्षा पास होण्यासाठी जी सेटींग की काय लावावी लागली होती तिचाही खर्च अंदाजापेक्षा जास्त झाला होता. त्यामुळे पिकनिकचे बजेट तंगच होते. पण म्हणतात ना, “हिंमते मर्दा तो मदते खुदा..” हो ना करता कशीबशी जुळवाजुळव करून आमचा गोव्याला जायचा बेत ठरला.
त्याचे झाले असे, आपल्या बंड्याचे गाव कोकणात दूरवर कुठेतरी होते. गोव्यापासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर. “मौजे येडगाव”, गावाचे नावही कधी ऐकले नव्हते. पण गावाला समुद्रकिनारा मात्र भला मोठा लाभला होता. म्हणजे मौजे येडगावला मुक्काम केला तर तिथून गोव्याला ये-जा करणेही परवडले असते आणि त्याचाही वैताग आला असता तर गावच्या समुद्रकिनारीच धमाल करता आली असती. तर या बंड्याचे चुलत चुलत काका जे सध्या मुंबईतच राहत होते, त्यांनी तिथे एक घर बांधून ठेवले होते. पण ते घर त्यांना मानवले नव्हते म्हणून सध्या तसेच खाली पडून होते. ज्याचा आता पुढचे चार दिवस आम्ही ताबा घेणार होतो.
कोकणकन्या एक्सप्रेस मुंबई छत्रपती टर्मिनसवरून रात्री दहाला सुटणार होती. आम्ही सारे मात्र नऊलाच जमलो होतो. आठ-दहा तासांचा प्रवास म्हणजे जागा पकडणे जरूरी होते. तसा आमचा झोपायचा काही प्लॅन नव्हता. उलट पक्या आणि बाबू सारखी अतरंग कार्टी बरोबर असताना आजूबाजूच्या लोकांनाही झोपायला देऊ की नाही ही शंका होती. पक्याच्या पोटात दोन पेग टाकले आणि त्याला चावी दिली की रात्रभर मनोरंजनाची हमी. कोणी ढोलकीवर थाप मारायचा अवकाश की याची भजन-गाणी सुरूच म्हणून समजा. आजही काही वेगळे चित्र नव्हते. गाडीमध्ये मदिरापान निषिद्ध असल्याने तो आधीच बंड्याच्या जोडीने एकेक खंबा मारून आला होता. रात्री तीन वाजेपर्यंत गाण्यांची मैफिल रंगली. जे पिणारे नव्हते त्यांनाही एक प्रकारची झिंग चढली होती. मित्रांच्या सोबत अश्या रात्री रोज रोज थोडी येतात. आज कोणाचाही झोपायचा मूड दिसत नव्हता. गाणी गाऊन थकलो तशी गप्पांची मैफिल सुरू झाली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर बंड्यानेच विषय काढला, “उद्या आपण जिथे मुक्कामाला जाणार आहोत तो भाग ‘भुताची वाडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. “आईच्या गावात..”, पक्याची सर्वप्रथम प्रतिक्रिया. पाठोपाठ एक कचकचीत शिवी. बंड्याच्या एका वाक्याने पक्याची सारी नशा उतरली होती. पक्या घाबरला तसा त्याचा जोडीदार बाबूही घाबरला. पण आम्ही सारे मात्र यामागचा इतिहास जाणून घेण्यास उत्सुकता दाखवली. आजच्या जमान्यात कोणीही भुताच्या गोष्टी सांगाव्यात आणि आम्ही त्यावर सहज विश्वास ठेवावा एवढे पण काही आम्ही हे नव्हतो. कसेबसे काठावर पास होणारे का असेना, द.ग.डु.ची पोरे होतो.
बंड्याने सांगायला सुरूवात केली, अगदीच काही तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट नव्हती. पण बंड्याच्या खापरपणजोबांच्या काळातील होती. बंड्याचे खापरपणजोबा म्हणजे त्या गावचे जमीनदारच म्हणा ना.. कै. विष्णूपंत मोरोजी राणे, सहा फूटांच्या वर धिप्पाड शरीरयष्टी, करारी मुद्रा, त्याला साजेश्या अश्या पिळदार मिश्या.. जमीनदाराला शोभेलसा पेहेराव, कडक इस्त्रीचा कोट आणि पांढरे धोतर. हातात काठी पण आधारासाठी नाही तर एखाद्यावर उगारायला घेतली आहे असे वाटावे. बंड्या त्यांच्या तैलचित्रावरून त्यांचे वर्णन सांगत होता आणि आमच्या डोळ्यांसमोर त्यांची प्रतिमा उभी राहत होती. खरी खोटी देव जाणे पण गावात त्यांचा भला मोठा वाडा होता. नाही, नाही.. त्या वाड्यात मुक्काम करणे आमच्या नशिबी नव्हते. तो तर केव्हाच बंद करून टाकला होता, कडीकुलुपे लाऊन.. विष्णूपंतांच्या आकस्मिक मृत्युनंतर.. कोणी म्हणतात की पाय घसरून पडले तर कोणी म्हणतात की ढकलून दिले. पण त्यांच्या मृत्युनंतर सार्या गावाला अवकळा आली. विस्मयकारकरीत्या एकेवर्षी पूर तर एके वर्षी दुष्काळ, असा सलग दोन वर्षे फटका बसला. गावावर उपासमारीची वेळ आली. परीणामी गावातल्या पोरीबाळींची लग्ने ठरेनाशी झाली. मोठ्या मुश्किलीने गावच्या सरपंचाने आपल्या मुलाचे लग्न जमवले. वरात वाड्यावरूनच निघणार होती, आणि तिथेच घात झाला. बघता बघता वाड्याच्या प्रांगणात बांधलेल्या मंडपाने पेट घेतला. काय झाले, कसे झाले, कोणालाही समजले नाही, आणि ते सांगायला त्या सार्यांपैकी एकही जण जिवीत उरला नाही हे ही एक कोडेच होते. बस्स.. त्या नंतर एकेकाने हळूहळू गाव सोडायला सुरूवात केली. बघता बघता सारा परीसर निर्जन झाला. काही वर्षे उलटली. लोकांची भिती चेपली. मधल्या काळात फारसे अघटीत असे काही घडले नाही. परत एकदा गाव वसायला सुरूवात झाली. पण त्या वाड्याच्या वाटेला जायची आजतागायत कोणाची हिंमत झाली नव्हती. आता याला धाडस म्हणा की मुर्खपणा पण आम्ही तोच करायला चाललो होतो. बंड्या ज्या घराची चावी घेऊन आला होता ते घर वाड्याच्या अगदी समोर बांधलेले होते. बंड्या कितीही म्हणत असला की नुसत्या अफवांनी तो वाडा कुप्रसिद्ध झाला आहे तरी त्या वाड्यासमोरच्या घरात राहणार्या लोकांना काहीतरी वेडावाकडा अनुभव आला असणार जे आता तिथे कोणी राहायला तयार नव्हते. बंड्यावर चिडावे की रडावे ते कळत नव्हते. परत मुंबईला फिरावे तर हसे झाले असते. थेट गोवा गाठावा किंवा कुठेतरी खाजगी विश्रामगृहात मुक्काम करावा तर तेवढे पैसे बरोबर नव्हते. हो ना करता कशीबशी मनाची समजूत काढली. काहीजण अजूनच पिल्यातच होते त्यांनी आमच्या हो ला हो मिळवली. आणि सरते शेवटी आम्ही भुताच्या वाड्यावर स्वारी करायला सज्ज झालो.
कोकणरेल्वेच्या कुडाळ स्टेशनवर आम्ही उतरलो. मौजे येडगावला जाण्याचे हे सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन होते. ते ही सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर. सात-आठ जण आणि सोबत सामान, बसपेक्षा रिक्षाचाच पर्याय सोयीस्कर होता. स्टेशनच्या बाहेर पडल्यापडल्या रिक्षांची भली मोठी रांग समोर दिसली पण एक रिक्षा मिळेल तर शप्पथ.. ज्याला विचारावे तो त्या गावाचे नाव ऐकून नकारार्थी मुंडी तर हलवायचाच वर उलट आम्ही कुठून आलो आहोत याची अशी काही चौकशी करायचा की आमचे काही बरे वाईट झाले तर तो आमच्या घरी निरोप पोहोचवणार होता. आतापासूनच सारे संकेत असे मिळत होते जे आमचे खच्चीकरण करत होते. पण हे सारे आमच्या भल्यासाठीच होते हे समजायची अक्कल त्या दिवशी आम्ही गहाण टाकली होती. शेवटी एका रिक्षावाल्याचा सांगण्यानुसार आम्ही स्टेशनपासून रिक्षाने बसस्टॅंडपर्यंत जायचे ठरवले. आणि तिथून मग पुढचा प्रवास एस.टी. च्या लाल डब्यातून होणार होता.
लाल डबा कसला, कळकट मळकट, धुळीने माखलेला काळाकुट्ट लोखंडी सांगाडा होता तो. दिवसभरात एकच बस होती जी वर्सोली फाट्यावरून डाव्या हाताला वळून पंधरा किलोमीटर आत वसलेल्या मौजे येडगावपर्यंत जायची. आणि का नसावी, कारण गाव येईयेईपर्यंत तिच्यात फक्त आम्हीच शिल्लक राहिलो होतो. तसे नाही म्हणायला एक धोतरवाले मामा होते, पण ते कुठल्या गावाला उतरणार याची काही कल्पना नव्हती. पुढे रस्ता खराब असल्याचे कारण सांगत बस गावच्या वेशीवरच येऊन थांबली. खाली उतरून पाहिले तर रस्ता तसा थोडाफार खडबडीत होता पण बसची हालत पाहता नक्कीच त्यामानाने चांगला होता. तरी वाद घालण्यात अर्थ नव्हता. इथून पुढे कसे जायचे याची कल्पना नव्हती. म्हणून विष्णूपंतांनाच विचारायचे ठरवले. अरे हो, विष्णूपंत म्हणजे बंड्याचे खापरपणजोबा नाही बरे का, तर मगासचे ते गाडीतले आजोबा. त्यांचा पेहराव पाहता एव्हाना आम्ही त्यांचे विष्णूपंत असे नामकरण करून त्यावरून बंड्याला चिडवून झाले होते. आम्ही त्यांना विचारणार त्या आधी त्यांनीच आम्हाला भुवया ताणून इशार्यानेच “कुठे?” असे विचारले. “भुतांची वाडी”, बंड्या उत्तरला. “बरं बरं..”, सकाळपासून मौजे येडगाव आणि भुताची वाडी ही नावे ऐकल्यावर ही पहिली थंड प्रतिक्रिया होती. जरासे हायसे वाटले. जर या आजोबांनीही डोळे वटारले असते तर इथूनच परतलो असतो अश्या मनस्थितीला येऊन पोहोचलो होतो. पण आता मात्र त्यांनीच दाखवलेल्या रस्त्याने जायचे ठरवले.
रस्ता खूप सोपा होता. झर्याच्या काठाकाठाने अर्धा पाऊण तास चालत जायचे होते, ते ग्रामदेवतेचे मंदीर येईपर्यंत. तिथून पुढे उजव्या हाताला एक पायवाट जी थेट भुताच्या वाडीला जाते. पावसाळा सुरू व्हायला अजून अवकाश होता तरी झरा मात्र आपल्याच नादात खळखळाट करत होता. पायातले बूट काढून त्या थंड पाण्यात उतरलो तसे दिवसभराचा क्षीण गेल्यासारखे वाटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदांची जाळी पसरली होती. बंड्याने लगेच पानांचे द्रोण बनवले आणि त्यात करवंदे भरून घेतली. एवढे रसाळ फळ आजवर कधी चाखले नव्हते. मे महिन्याची दुपार, डोक्यावर आलेले उन, रात्रभराच्या ट्रेनच्या प्रवासाने आणि जागरणीने थकलेले शरीर, पाठीवर सामानाचे ओझे आणि तरीही आम्ही मस्त शीळ घालत चाललो होतो. खरेच या परीसरात एक प्रकारची जादू होती. उगाच लोकांनी बदनाम करून ठेवले होते या जागेला. ग्रामदेवतेचे मंदीर तर पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होते. भिंती भंगल्या होत्या पण खांबांवरची नक्षी त्या काळच्या अप्रतिम कारागिरीची साक्ष देत होती. त्यावर पसरलेल्या वेलबुट्ट्या त्याच्या सौंदर्यात नकळत भर टाकत होत्या. मंदीराच्या आवारात पसरलेला हिरवागार गालिचा, मधोमध असलेले तुळशी वृंदावन, कुंपणापलीकडे चरणार्या गाई आणि सोबतीला पक्ष्यांच्या किलबिलाटाचे पार्श्वसंगीत. अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारे वातावरण. निसर्गाचे हेच रूप टिपण्यासाठी तर आम्ही कॅमेरे बरोबर आणले होते याची आम्हाला अचानक जाणीव झाली आणि पुढचा अर्धा पाऊण तास छायाचित्रणातच गेला. अश्या पवित्र आणि मंतरलेल्या परीसरात भूत काय भुताची सावली देखील असणे शक्य नव्हते. ग्रामदेवतेसोबत असलेल्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. आता आम्ही पुन्हा एकदा सहलीच्या मूडमध्ये आलो होतो. मगाशी ज्यांचा उच्चार करायलाही घाबरत होतो त्या भुतांच्या नावाने आता आमची थट्टामस्करी चालू झाली होती. गप्पांच्या नादात कधी पोहोचलो समजलेच नाही. पहिलेच दर्शन झाले ते पंतांच्या एकमजली वाड्याचे. जळाल्याच्या खुणा अंगावर मिरवत दिमाखाने आमच्याकडे पाहत उभा होता. त्याच्यासमोर आमचे मुक्कामाचे घर एखाद्या पर्णकुटीसमान भासत होते. वाड्याचे मुख्य फाटक टाळे लाऊन बंद केले होते. तरी कुंपणाच्या भिंतीची मात्र जागोजागी पडझड झाली होती. एखादे कुत्रेही आरामात त्यावरून तंगडे टाकून जाऊ शकत होते. तरीही वाड्याच्या आसपास एकाही जनावराचा लवलेश दिसत नव्हता, ना मगासची पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. एक प्रकारची नीरव शांतता होती या भागात. तरी तिला भयाण म्हणता आले नसते. अजून रात्र होणे बाकी होते, पण आता तरी आम्हाला त्या वाड्याने भुरळ घातली होती. आम्ही सारे एकमेकांकडे सूचकतेने पाहू लागलो तसे बंड्या ओरडला, “कोणीही जादा हुशारी करायची गरज नाही, पुढचे चार-पाच दिवस आपण या वाड्यापासून दूरच राहणार आहोत.” बस, आमच्यासाठी हा विषय इथेच संपला. आमच्यापैकी कोणीही दिवसा किंवा रात्री त्या वाड्याच्या जवळपासही फिरकणार नाही हा ठराव एकमताने पास झाला. कारण कोणी कबूल नाही केले तरी एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात होतीच.
बंड्याच्या काकांचे घर बरेच दिवसांपासून बंद असावे. घरभर पसरलेल्या जळमटांवरून हे समजत होते. तरी घरातील भांडीकुंडी मात्र इतरस्त्र पडली होती. कदाचित अधूनमधून कोणी इथे राहायला येत असावे. काही का असेना, आम्हाला त्या घराची साफसफाई आणि आवराआवर करण्यात जराही रस नव्हता. होस्टेलवर राहायची सवय असल्याने आम्हाला त्या पसार्यात राहण्यात जराही अडचण नव्हती. घरही दोन खोल्यांचेच होते. एक बाहेरची मोठी खोली, आणि आतले स्वयंपाकघर, ज्याच्या कोपर्यातच एक मोरी बनवली होती. अंगावरचे ओझे काढून ठेवले तसे दिवसभरात पहिल्यांदा भुकेची जाणीव झाली. पण त्यासाठीही हातपाय झाडणे गरजेचे होते. बरोबर काही कडधान्ये, तांदूळ, अंडी आणि नूडल्सची पाकिटे घेऊन आलो होतो. सद्य परिस्थितीत झटपट बनेल असे नूडल्सच होते. बंड्याने कोपर्यातील अडगळीतून स्टोव्ह आणि एक-दोन टोप शोधून काढले आणि सर्वांसाठी एकत्रच मॅगी बनवायला घेतली. जेवण झाले तसे सारे जण जागीच लुडकलो. डोळ्यांवर झापड होतीच. बघता बघता सार्यांचा डोळा लागला. वेळ काय झालीय याचे कोणालाही भान नव्हते, ना कोणाला पर्वा होती. उठलो तेव्हा सगळीकडे अंधार पसरला होता. संध्याकाळ उलटून गेली असावी. एकाला जाग आली तसे एकेक करून सारे उठले. जे अजूनही सुस्तावून पडले होते त्यांनाही लाथा घालून उठवले. बंड्यानेच मग लाईट लावली. स्विचबोर्डजवळ दोन पाली नजरेस पडल्या तसा दचकून मागे सरकला. घरभर नजर फिरवली असता दिसून आले की इथे तर पालींचे साम्राज्य पसरले होते. पालीही कसल्या, तर त्यांचा आकार पाहता भिंतीवरचे सरडे वाटावेत. एक बरे होते की सार्याजणी निपचित पडून होत्या. आम्हीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले. निदान या परीसरात आपण सोडून आणखीही कोणी सजीव प्राणी वास करून आहे यातच समाधान मानले.
पक्याने सर्वांसाठी चहा टाकला. जेवायला मिळो न मिळो, पण सकाळ संध्याकाळ दोन वेळ तल्लफ आली की चहा हा हवाच या हिशोबाने आठवडाभर पुरेल इतकी चहा आणि दूधपावडर बरोबर घेतली होती. पण सध्या त्यापेक्षाही जास्त गरज वाटत होती ती आंघोळ करण्याची. त्याशिवाय प्रवासाचा शीण काही गेला नसता. मोरीमध्ये पाण्याने भरलेला पिंप होता पण त्यावरती पसरलेला धुळीचा जाडसर पापुद्रा पाहता ते पाणी कधीचे असावे याची कल्पना येत होती. तशी पाण्याची काही चिंता नव्हती. घराजवळच एक विहीर होती. अंगणात लावलेल्या बल्बच्या दिव्याचा प्रकाश तिथवर पोहोचत होता. आंघोळीचा कार्यक्रम आम्ही विहीरीच्या काठावरच उरकायचे ठरवले. पाणी काहीतरीच थंडगार होते. प्रत्येकाने कसेबसे दोन तांबे अंगावर ओतून आटोपले. खरे तर आधीची मूळ विहीर वाड्याच्या आतल्या बाजूला होती. पण बंड्याच्या काकांनी ती बुजवून ही बाहेरच्या बाजूला बांधली होती. वाड्याचा जेव्हा जेव्हा विषय निघायचा तेव्हा तेव्हा एक कुतूहल निर्माण व्हायचे पण एक अनामिक भितीही मनात दाटून यायची. सर्वांच्या आंघोळी उरकल्यावर अर्धेजण जेवायच्या तयारीला लागले तर आम्ही तीन-चार जण तिथेच बसून राहिलो. पुरेशी झोप झाल्याने बर्यापैकी फ्रेश वाटत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पक्याने सिगारेट शिलगावली. दोन-चार वेळा धूर आतबाहेर केला तसे जरा तरतरी आली. वातावरणातही एक वेगळीच धुंदी जाणवत होती. थंडावा हळूहळू वाढत होता. पण गप्पाही रंगात आल्या होत्या, त्यामुळे कोणी परतायचे नाव घेत नव्हते. गप्पांच्या ओघातच विष्णूपंतांचा विषय निघाला. “थेरडा मेला आणि सारा गाव बदनाम करून गेला”, पक्या सहज म्हणाला तसे एका बोक्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. आजूबाजूला पाहिले तर वाड्याच्या कुंपणाच्या भिंतीवर एक पांढर्या रंगाचा, पण मानेभोवती गडद राखाडी रंगाचा पट्टा असलेला बोका आमच्यावरच नजर लाऊन होता. रात्रीच्या अंधारात त्याच्या मानेच्या काळपट रंगामुळे त्याचे शीर आणि धड एकमेकांपासून वेगवेगळे असल्याचा भास होत होता. गुरगुरण्याची वेळही त्याने अशी साधली होती की नाही म्हणालो तरी सारे थोडे चरकलोच. तरी पक्या हिंमत करून म्हणाला, “या विष्णूपंत या, तुम्हीही दोन झुरके मारा आमच्याबरोबर.” पक्याचा हेतू जराशी गंमत करून वातावरणातील ताण हलका करण्याचा असला तरी त्यानंतर बोक्याचे गुरगुरणे जास्तच वाढले. त्याला ‘शुकशुक’ करून हाकलायचा निष्फळ प्रयत्न केला पण त्याचे लाल होत जाणारे डोळे आम्हालाच तिथून शहाणपणाने जाण्याचा सल्ला देत होते. “चल मरू दे त्याला, जाउया, खूप भूक लागली आहे”, बाबू म्हणाला तसे सारे जण पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिथून निघालो.
आम्हाला खाली हात परतलेले पाहून बंड्याने आंघोळीच्या बादल्या बरोबर घेऊन नाहीत का आला याची चौकशी केली. तसे आम्ही पुन्हा चरकलो. डोळ्यासमोर परत तोच बोका आला. तिथे आता परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. काहीतरी उडवाउडवीचे उत्तर देऊन विषयाला बगल देऊ लागलो तसे बंड्याही काय ते समजला. त्यानेही मग विषय ताणून धरला नाही. जेवण तयार झाले होते. टोपावरचे झाकण बाजूला सारले तसे दालखिचडीचा खमंग वास नाकात शिरला. बरोबर उकडलेली अंडी आणि बंड्याने घरून आणलेले लोणचे होते. दिवसभराचा थकवा म्हणा किंवा गावच्या वातावरणाची जादू म्हणा, सारे जण अधाश्यासारखे जेवणावर तुटून पडलो. जेवण झाल्यावर बंड्याने सर्वांसाठी लिंबू सरबत केले. एवढे लिंबू कुठून आले याची विचारणा केली तर म्हणाला की स्वयंपाकघरातील फडताळावर सापडले. “एवढे जुने असूनही रस चांगला निघाला रे”, बाबूने सहज शंका उपस्थित केली. तसे सारेजण चपापले. खरेच विचार करण्यासारखी गोष्ट होती. घराची अवस्था पाहता गेले काही महिने तरी इथे कोणी फिरकले असावे असे वाटत नव्हते. साधे दरवाजा उघडतानाही कुलुपावरची धूळ झटकावी लागली होती. तरीही कधीचे ते लिंबू मात्र अजून सुकले नव्हते. अर्धे सरबत पोटात ढकलून झाले होते, उरलेले तसेच मोरीत ओतले. यावर कोणीही पुढे काही चर्चा केली नाही. सारे जणू काही एका अलिखित नियमाचे पालन करत होते की अश्या कोणत्याही संशयास्पद गोष्टीवर चर्चा करून मनात वेडेवाकडे विचार येऊ द्यायचे नाहीत. रात्री दिवे मालवायच्या आधी घरभर एक नजर फिरवली. संध्याकाळच्या सार्या पाली तशाच आपापल्या जागी निपचित पडून होत्या. अंधार झाल्यावर मात्र सार्या घरभर फिरत आहेत असा भास होत होता. पण उठून दिवा लावायची हिम्मत काही झाली नाही.
सकाळ झाली ती मांजरीच्या आवाजानेच. उठून पाहिले तर बर्यापैकी उजाडले होते. स्वयंपाकघरातील खिडकीवाटे तीन-चार मांजरींनी घरात प्रवेश केला होता. पुन्हा तो कालचाच बोका आठवला. पण या मात्र फार सौम्य वाटल्या. उलट डोक्यावरून हात फिरवून कुरवाळाव्यात अश्या गोजिरवाण्या होत्या. ज्यांना कालच्या बोक्याचा अनुभव नव्हता ते त्यांच्याशी मस्त खेळतही होते. पक्याने मात्र संधी मिळताच एकेकीला अलगद उचलून घराबाहेर काढले.
सर्वांची आंघोळ नाश्ता उरकेपर्यंत अकरा वाजले होते. त्यामुळे आजचा गोव्याला जायचा बेत रद्द झाल्यातच जमा होता. कारण या गावातून बाहेर पडायला एकच काय ती एस.टी. होती जी एव्हाना गेली असावी. तसेही ती एस.टी. पकडण्यासाठी गावच्या वेशीपर्यंत पाऊण-एक तास तंगडतोड करत जाणे भाग होते. आणि एवढे करून जर तिची आणि आमची चुकामुक झाली असती तर तेवढीच परतीची पायपीट. म्हणून आता उद्याच पहाटे उठून वेळेच्या आधी निघायचे ठरवले. आज दिवसभर जो काही धुमाकुळ घालायचा होता तो गावातच घालुया म्हणून तयारीनिशी बाहेर पडलो. नक्की कुठे जायचे याची काही कल्पना नव्हती. आणि कोणी मार्गदर्शकदेखील सोबतीला नव्हता. पण पश्चिम दिशेला, वाड्याच्या उजव्या हाताने सरळ चालत गेलो तर पंधरा-वीस मिनिटात समुद्रकिनारा लागेल एवढी टीप बंड्या आपल्या काकांकडून घेऊन आला होता. तसा वाड्याच्या डाव्या बाजूनेही एक रस्ता थेट समुद्रकिनारी जात होता, पण तो चुकूनही न वापरण्याची सक्त ताकीद मिळाली होती. कदाचित काकांनी शॉर्टकट सुचवला असेल असा निष्कर्ष काढून जास्त विचारमंथन न करता आम्ही उजव्या रस्त्याला वळलो. रस्ता म्हणजे एक रुंदशी पायवाट होती. दोन्ही बाजूंनी झाडीझुडपे आणि त्यापलीकडे लपलेली, गेरूच्या लाल रंगात माखलेली, कोकणातील टिपिकल कौलारू घरे. त्या समोर शेणाने सारवलेले आंगण, छोटेसे तुळशी वृंदावन.. सारी घरे याच पठडीतील आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत होती. दोन घरांच्या मध्ये असलेले बांबूंच्या काटक्यांचे कुंपण ते काय त्यांना वेगळे करत होते. पण या सार्यातही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून येत होती आणि ती म्हणजे सारी घरे ओस पडली होती. अंगणात सुकत घातलेले कपडे, भांडीकुंडी, एखाददुसरी बाज हे सारे तिथे वस्ती असल्याची चिन्हे दर्शवित होते पण त्यात जिवंतपणा असल्यासारखे काही वाटत नव्हते. आणि याचे कारण म्हणजे आतापावेतो एकही मनुष्य नजरेस पडला नव्हता. काही घरांची दारे सताड उघडी होती तर काही पर्णकुट्या दाराशिवायच होत्या, तरी त्यांच्या आत कोणी दिसत नव्हते. तसे पाहता काल वेशीवर भेटलेल्या आजोबांनंतर मनुष्यप्राणी बघून आम्हाला तब्बल चोवीस तास उलटून गेले होते. एखादी नरभक्षक आदिवासींची जमात जर इथे राहायला आली तर उपासमारीने मरेन अशी सारी परिस्थिती होती. अर्ध्या तासाच्या पायपीटीनंतर आम्ही सरते शेवटी समुद्रकिनारी पोहोचलो. खरे तर त्या एकसारख्या दिसणार्या रस्त्यावर जागीच चालत आहोत आणि हा रस्ता कधीच संपणार नाही असे वाटत होते. पण अचानक रस्त्याने एक वळण घेतले आणि नजरेस पडला तो अथांग महासागर. फेसाळणार्या पांढर्याशुभ्र लाटा आणि सुर्यप्रकाशात चकाकणार्या वाळूचा किनारा. मौजे येडगावला निसर्गाची एवढी मोठी देणगी लाभली होती याचा क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. खरेच एक शापित गाव होते हे..
किती वेळ पाण्यात डुंबून होतो ठाऊक नाही, पण कोणालाही तहानभुकेची, वेळकाळाची जाणीव नव्हती एवढे मात्र नक्की. क्रिकेट आणि फूटबॉल खेळण्यासाठी म्हणून बरोबर बॅट-बॉल वगैरे घेऊन आलो होतो. पण कोणाचीही पाण्यातून बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. शेवटी बंड्यानेच आवाज देऊन सार्यांना बाहेर काढले. बाहेर येऊन किनार्यावर नजर टाकता लक्षात आले की खेळायच्या नादात किनार्याच्या बर्याच डाव्या बाजूला आलो होतो. कदाचित हवेच्या आणि लाटांच्या वाहण्याच्या दिशेमुळे ओढले गेलो असावो. वरच्या बाजूने नजर टाकली तर इथूनही एक वाट दिसत होती जी वर शिखरावर असलेल्या वाड्याकडे जात होती. कदाचित वाड्याच्या डाव्या बाजूने जाणारा रस्ता हाच असावा. आणि हा तुलनेने छोटा वाटत होता. तसेही आम्हाला परत त्या कंटाळवाण्या रस्त्याने जाण्यात जराही रस नव्हता. म्हणून सामानासोबत असलेल्या दोघाजणांना इथेच बोलावले.
हा रस्ता आधीच्या रस्त्यापेक्षा अगदीच वेगळा होता. आतापर्यंत डोळ्याला सतत सुखावणारा हिरवेगारपणा कुठेतरी लुप्त झाला होता. कोकण सोडून कुठल्याश्या भलत्याच रुक्ष प्रदेशात आल्यासारखे वाटत होते. पायाखाली वाळू पसरली असल्याने पाऊलेही मोठ्या मुश्कीलने उचलत होती. थोड्याच वेळात दमायला झाले. तरी मध्ये कुठे क्षणभर विश्रांती घ्यावी अशी सोय नव्हती. शिखरावरचा वाडा अजून तेवढाच दूर दिसत होता जेवढा की सुरूवातीला. चालता चालता एका मोकळ्या जागी येऊन पोहोचलो. दुपारची वेळ असूनही हा भाग काहीसा अंधारून आल्यासारखा वाटत होता, पण खरे तर सुर्याच्या किरणांना जमिनीवर पोहोचण्यास रोखायला फारशी झाडेही या परिसरात नव्हती. तरीही इथे मानववस्तीच्या खुणा होत्या. नुसत्या खुणा नाही तर चक्क माणसेही होती. आम्हाला पाहिले तसे एकेक जण आपापल्या घरातून बाहेर पडू लागला. सारे जण आमच्याकडे संशयास्पदरीत्या बघत होते. खरे तर मनातून थोडेसे चरकलोच, तरीही भुतांपेक्षा माणसे परवडली असा विचार करून त्यांच्याशी संवाद साधायला सुरूवात केली. आम्ही मुंबईहून खास त्यांच्या गावाला फिरायला म्हणून आलो आहोत हे त्यांना समजले तसे सारे आमच्याशी मोकळे झाले. त्यांच्या या दुर्लक्षिल्या गेलेल्या गावाला भेट द्यायला एवढ्या दूरून ते ही मुंबईसारख्या शहरातून कोणीतरी येते आणि त्यांच्या गावाच्या परीसराची तारीफ करते ही गोष्ट नक्कीच त्यांना सुखावणारी होती. फणसासारख्या बाहेरून सख्त आणि आतून गोड असणार्या कोकणी माणसांच्या पाहुणचाराबद्दल ऐकले होते पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. तशी त्यांची आर्थिक स्थिती जेमतेम वाटत होती तरी आम्ही त्यांच्या घरचे पाहुणे असल्यागत जेवायचा आग्रह करत होते. आम्ही नकार दिला तरी आंबे, काजू, फणसाचे गरे आणि त्यापासून बनवलेले विविध पदार्थ आणून आमच्या समोर ठेवले. सारेच पदार्थ रुचकर होते. जरी आम्ही जेवणाला नकार दिला असला तरी भूक मात्र प्रत्येकाला सडकून लागली होती. प्रत्येकाने पोट भरेपर्यंत ताव मारला. त्यानंतर त्यांनी ताडीने भरलेले मडके आमच्यासमोर धरले. आतापर्यंत चाखलेल्या पदार्थांची चव पाहता ही देखील सोमरसापेक्षा कमी नसणार याची प्रत्येकाला खात्री होती, तरी बंड्याने इशारा केला तसे सावधगिरी म्हणून आम्ही तिची चवही घेणे टाळले. त्यांचा निरोप आणि दुसर्या दिवशीचे जेवणाचे आमंत्रण घेऊन आम्ही तिथून निघालो.
मुक्कामाच्या जागेवर पोहोचेपर्यंत अंधारून आले होते. गेल्या गेल्या दिवा लावला. कालच्या सार्या पाली तश्याच आपापली जागा पकडून स्थितप्रज्ञासारख्या बसल्या होत्या. त्यांना मनातल्या मनात नमस्कार करून आम्ही जेवायच्या तयारीला लागलो. उद्या गोव्याला जायचे होते म्हणून आज दारूचा उरलासुरला स्टॉक संपवून टाकायचे ठरवले. नेहमीचा शेव-फरसाणचा चकणा होताच, जोडीला सुके बोंबीलही भाजले. जेवणात अंड्याचे कालवण आणि भात केला होता. सारेच मटणमच्छी खाणारे असल्याने काही प्रश्नच नव्हता. आज कोणाला भूक जास्त नव्हती तरी लवकर उरकून घेतले. उद्या सकाळी गोव्याला जाण्यासाठी लवकर उठायचे होते ना.. घरातले पाणी संपले होते. रात्रीचे बाथरूमला वापरायला म्हणून थोडेतरी पाणी हवेच या हिशोबाने विहीरीवर गेलो. अर्थात तिघे चौघे मिळूनच. पक्या आणि बाबू होतेच. तेवढाच त्यांना सिगारेटी ओढायचा मौका. गेल्या गेल्या पहिला सभोवताली नजर फिरवली. एक नजर वाड्याच्या कुंपनावरही टाकली. कालचा बोका कुठेच दिसला नाही. पक्याने मग सिगारेटचे पाकीट बाहेर काढले. बाबूने हंडा विहीरीत सोडला आणि माचिस काढून सिगारेट शिलगावली. दोन झुरके मारून सिगारेट पक्याच्या हातात दिली आणि हंडा वर खेचायला घेतला. वजन जरा जास्तच भासले. जणू काही आत दगडे भरली असावीत. कसाबसा खेचून वर आणला तसा क्षणार्धात हलका झाला. उपडा करून पाहतो तर पाण्याचे दोन थेंब काय ते ओघळले. चक्रावून परत आत टाकला. आम्ही काय झाले विचारले तर काही बोलला नाही. परत दुसर्या खेपेलाही तेच. हंडा वर खेचायला नेहमीपेक्षा जास्त ताकद लावावी लागत होती. पण बाहेर काढला तो परत एकदा रिकामाच. आम्हाला वाटले, बाबूची काहीतरी गडबड होत आहे, म्हणून पुढच्या खेपेस पक्याने स्वता हंडा आत सोडला. यावेळी तर खेचायला आम्हा दोघांना ताकद खर्च करावी लागली. वर येईपर्यंत दोर हातातून सटकतो की काय नाहीतर आम्हालाच आत खेचून नेतो की काय असे वाटू लागले. एक शेवटचा जोरदार हिसका देऊन खेचला तसे हंडा दोरीतून सुटून तीनताड उडाला. टण टण टण आवाज करत वाड्याच्या कुंपणावरून आत जाऊन पडला. आतमध्ये जाऊन हंडा आणायचा विचारही कोणाच्या मनाला शिवला नाही. तरी हंड्याचे नक्की काय झाले हे बघण्याची उत्सुकता आम्हाला कुंपणापर्यंत घेऊन गेली. टाचा वर करून आत डोकावून पाहिले पण आत पुरेसा प्रकाश पोहोचत नसल्याने काही दिसायला मार्ग नव्हता. एकाएकी आत काहीतरी हालचाल झाल्यासारखी जाणवले. आवाजाच्या दिशेने पाहिले तसे काही समजायच्या आत एक पांढरी आकृती वीजेच्या वेगाने आमच्या अंगावर झेपावली. तिने पक्याच्या मस्तकाचा वेध घेतला तसे त्याने झटका बसल्यासारखे तिला पकडून दूर भिरकावून दिले. हवेतून अलगद जवळच्या झाडीत पडताना जाणवले की तो कालचाच बोका होता. झाडीत कुठे गडप झाला समजले नाही. एकटक त्याच दिशेने बघत राहिलो तसे हळूहळू अंधारात दोन लाल-पांढरे डोळे चमकू लागले. बघता बघता दोनाचे चार, चाराचे आठ… आकडा वाढतच होता. नक्की किती श्वापदे तिथे दडली होती देव जाणे.. त्यानी एकसाथ आमच्यावर हल्ला केला तर काय होईल याची कल्पनाही करवत नव्हती. दहा-बारा बोक्यांशी एकवेळ झुंजलोही असतो, पण जर यामागे एखादी अमानवीय शक्ती असेल तर तिच्यापुढे आमचा काय निभाव लागणार होता. अचानक झालेल्या प्रकाराने तिघेही पुरते हादरून गेलो होतो. कसेबसे अंगातले त्राण एकवटून तिथून पळ काढला. घरापर्यंतचे पन्नास पावलांचे अंतर पन्नास मैलांचे भासले. सतत पाठीमागे कोणीतरी लागले आहे असा भास होत होता. धापा टाकतच आत शिरलो. दोनच मिनिटात सार्या शरीराला पाणी सुटले होते. काही न विचारताच बंड्याने सर्वप्रथम आतली कडी लाऊन घेतली. कोणालाही आमचा अनुभव खरा खोटा करायचा नव्हता की त्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता. दुसर्या दिवशीच इथून निघायचे असे सर्वांनी एकमताने ठरवले. जमल्यास गोव्याला जायचे किंवा थेट मुंबई गाठायची. फक्त आजची रात्र निर्विघ्नपणे पार पडू दे आणि पडल्यापडल्याच झोप लागू दे अशी प्रार्थना करून आम्ही दिवा मालवला.
सकाळी उजाडले तसे आम्ही आवरायला घेतले. रात्रभर कोणाचा डोळ्याला डोळा लागला असेल असे वाटत नव्हते. तरीही सारे आळस झटकून निघायच्या तयारीला लागले होते. आजची बस चुकता कामा नये हे सार्यांना ठाऊक होते. चालताना सर्वांच्याच डोक्यावर एक प्रकारचा ताण होता. येताना याच रस्त्याने आलो होतो पण आता मात्र तेव्हासारखे सभोवतालच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटणे जमत नव्हते. पक्यानेच मग सर्वांचा ताण हलका करायला एक शीळ घातली आणि गोव्याच्या समुद्रकिनार्यावर वीतभर कपड्यात बागडनार्या ललनांचा विषय काढला. तसा अचानक सार्यांचा नूर पालटला. ही देखील एक निसर्गाचीच किमया होती. वेशीपर्यंत तर पोहोचलो पण बस आली की गेली की कधी येणार हे समजायला काही मार्ग नव्हता. वाट पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. तेवढ्यात तिथे विष्णूपंत अवतरले. म्हणजे ते पहिल्या दिवशी दिसलेले धोतरवाले आजोबा आले. त्यांच्याकडून समजले की आज बस काही येत नाही. काल रात्री बसच्या रस्त्यात असलेल्या नदीवरील पूल तुटला होता. म्हणजे आता पुढचे चार-पाच दिवस तरी बस किंवा कोणतेही वाहन इथे फिरकणार नव्हते. या गावातून बाहेर पडायला दुसरा कोणता मार्ग आहे का म्हणून त्यांच्याकडे चौकशी केली तसे त्यांनी वर आकाशाकडे बोट दाखवले. त्यांच्या या कृतीचा काहीच अर्थ लागला नाही. आणि लावण्याचा भानगडीतही आम्ही पडलो नाही. परत मागे फिरण्याशिवाय दुसरा काही इलाज नव्हता. आता फक्त एकच आशेचा अंधुकसा किरण दिसत होता आणि ते म्हणजे काल भेटलेले गावकरी.
महादेवाला नमस्कार करून आम्ही परत घरच्या दिशेला फिरलो. गावाकडे जाणारा रस्ता परत त्या विहीरीसमोरूनच जात होता. दिवसाची वेळ होती तरी एकमेकांचा हात धरून साखळी करूनच चालत होतो. कालचे झाडीमागून लुकलुकणारे डोळे, गुरगुरण्याचा आवाज, अजूनही आम्ही विसरलो नव्हतो. गावात पोहोचलो पण गावकर्यांचा कुठे पत्ता नव्हता. दिवसा हे सारे गावकरी जातात कुठे हा प्रश्नच होता. निदान बाईमाणसे तरी घरी असावीत, तर ती ही कुठे दिसत नव्हती. सारी वाडी निर्मनुष्य पडली होती. कदाचित यावरूनच भुतांची वाडी हे नाव पडले असावे. दिवस उतरू लागला तसे सारे कासावीस होऊ लागलो. सकाळपासून फारसे काही खाल्ले नव्हते. पण चिंता भूकेची नव्हती तर इथून सुटका कशी करून घ्यायची याची होती. आणि हे दिवस मावळायच्या आधीच शक्य होते. चारच्या सुमारास समुद्रकिनार्याच्या दिशेहून सारे गावकरी परतताना दिसले. चौकशी करता समजले की दर शुक्रवारी त्यांच्यात दर्यावर जाऊन मासेमारी करून किनार्यावर शिजवून खायची प्रथा होती. सारे काही अजबच होते पण आमची जेवणाची सोय मात्र झाली होती. त्यांचे बर्यापैकी जेवण उरले होते जे आम्हाला पुरेसे होते. गावातून बाहेर पडायला आणखी एक मार्ग होता. गावच्या दक्षिणेला असलेल्या वडाच्या पारावरही दिवसाला एक एस.टी. यायची पण ती दुपारी बाराची असल्याने आता आम्हाला आणखी एक दिवस मुक्काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सकाळी आम्हाला कोणी आणखी एक रात्र थांबण्याबद्दल सांगितले असते तर आम्ही तो सल्ला तेव्हाच धुडकावून लावला असता. पण आता गावकर्यांच्या दिलाश्याने थोडीफार हिंमत आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सारे आमच्या मनाचे खेळ होते. आम्ही आधीच या गावाची अपकिर्ती ऐकून इथे आलो होतो. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे संशयाच्या नजरेनेच बघत होतो. खालच्या वाडीतील माणसे चार दिवस जत्रेला गेली होती म्हणून आम्हाला काल त्यांची घरे खाली दिसली होती, ज्याचा आम्ही वेगळाच अर्थ काढला होता. येथील हवामान देखील बरेच लहरी होते. कधी थंडी पडते तर कधी उकडायला लागते. तर कधी अचानक जोरदार वारे वाहायला लागतात. उन-सावलीचा खेळ तर चालूच असतो. या सार्यालाही आम्ही भुताटकी समजत होतो. गावच्या ठिकाणी बोके आणि रानमांजरे असणे काही विशेष गोष्ट नव्हती. हातात एक काठी घेतली असती किंवा त्यांच्या दिशेने एक दगड भिरकावला असता तरी कधी आमच्या वाटेला गेली नसती. इतकेच नाही तर त्यांच्यामते काल विहीरीवर घडलेल्या प्रसंगामागेही मांजरीच होत्या ज्या रात्रीच्या पाणी प्यायला विहीरीत उतरतात आणि पाणी उपसायला कोणी हंडा टाकला की त्याला धरून वर यायचा प्रयत्न करतात. त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला असे वाटू लागले की गेले दोन दिवस आम्ही आमची तर्कबुद्धी गहाण टाकली होती की काय.. सर्वांनी अजून एक नाही तर गावकर्यांच्या आग्रहाखातर अजून दोन-चार दिवस राहायचा निर्धार करून कोलंबीचा रस्सा आणि तळलेल्या बांगड्यांवर ताव मारायला सुरूवात केली.
गावकर्यांचा निरोप घेऊन निघालो. वाटेत पुन्हा विहीर लागली. नाही म्हणाले तरी मनावर थोडेफार दडपण होतेच. रात्री परत विहीरीवर यायची हिम्मत होईल ना होईल, आणि झालीच हिम्मत तरी का विषाची परीक्षा घ्या. त्यापेक्षा अंधार पडायच्या आतच आम्ही पाणी भरून घ्यायचे ठरवले. आजचा सारा दिवस फुकटच गेला होता. काही न करता उगाच दमछाक झाली होती. त्यात सकाळी लवकर उठलो होतो, म्हणून लवकर झोपायचे ठरवले. तेवढीच रात्रही छोटी झाली असती. घरी परतलो आणि पाहिले तर अंगणातील बल्ब फुटून त्याच्या काचा दारापाशी विखुरल्या होत्या. आता हे आणि कोणाचे काम असावे मांजरीचेच की आणखी एखादे जनावर, की अचानक वाहणार्या जोरदार वार्याने झाले असावे. आणखी किती गोष्टींचा तर्क लावावा लागणार होते देव जाणे. एवढा वेळ आणलेले उसने अवसान गळून पडते की काय असे वाटायला लागले. घरात शिरलो तर अंदाजाप्रमाने पाली आधीच बस्तान मांडून बसल्या होत्या. यांच्याबद्दल मगाशी गावकर्यांना विचारायचे राहिलेच. या अश्याच गावभर पसरलेल्या होत्या की आमच्याच नशीबी होत्या. पण खरे तर या पालींची आम्हाला भिती वाटण्याऐवजी सोबतच वाटू लागली होती.
गावकर्यांसोबत पोटभर जेवण झाले होते, त्यामुळे आता रात्रीच्या जेवणाची चिंता नव्हती. दारूचा स्टॉक संपला होता पण शेव-फरसाण बर्यापैकी बाकी होते. भूक लागलीच तर झटपट मॅगी नूडल्स करता येणे शक्य होते. आतासे कुठे आठ वाजत होते. मुंबईच्या पोरांनी आदल्या रात्री कितीही जागरण केले असले, दिवसभरात कितीही थकले असले तरी त्यांना आठ-नऊ वाजता झोप येणे शक्य नव्हते. म्हणून मग पत्त्यांचा डाव रंगला. पत्ते खेळताना आम्हाला कोणाला स्थळकाळाचे भान उरायचे नाही. परीक्षेचा अभ्यास करायचा बहाणा करून होस्टेलमधील एखाद्या मित्राच्या रूमवर सारे पत्ते कुटत बसायचो. आताही तसाच माहौल तयार झाला होता. रात्र चढू लागली तसे एकेक जण पेंगू लागला. शेवटी आम्ही नेहमीचे तीनचार हौशी कलाकार उरलो. पण अचानक वातावरणात एक प्रकारची शांतता जाणवू लागल्याने आम्हीही आता झोपणेच शहाणपणाचे समजले. लाईट काढून किती वेळ पडून होतो माहीत नाही पण झोप लागत नव्हती. मनात उलटसुलट विचार येत होते. अजूनही बर्याच गोष्टी पटल्या नव्हत्या. लहान असताना रामसे बंधूंच्या भयपटात असेच सारे पाहून खूप घाबरायचो. प्रत्येक वेळी सिनेमा बघताना नकळत स्वताला त्या कलाकारांच्या जागी ठेऊन हे असेच आपल्याशी घडले तर काय होईल असा विचार मनात आल्याने ही भिती वाटायची. नंतर जसेजसे मोठे झालो तसे हे सारे खोटे असते, प्रत्यक्षात असे काही घडत नाही असा विश्वास आल्याने अश्या सिनेमांनी घाबरवायचे बंद केले. कालांतराने ते कंटाळवाणे किंवा विनोदी वाटू लागले. आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. जोपर्यंत हे सारे झूठ आहे, निव्वळ मनाचेच खेळ आहेत हा विश्वास येणार नव्हता तोपर्यंत मन घाबरणारच होते. उद्या कदाचित आम्हीच या सार्या प्रकारावर हसत असू. पण अजून तो उद्या उजाडायचा होता. त्या उद्याचीच आतुरतेने वाट बघत असल्याने झोप येत नव्हती.
छतावर काहीतरी वाजल्याचा आवाज झाला. कदाचित वार्याने झाडाची फांदी वगैरे तुटून पडली असावी. थोडावेळ अंदाज घेऊन डोळे मिटले तसे पुन्हा कौले वाजली. यावेळी आवाज जरा मोठा होता. कोणीतरी दणकन उडी मारल्यासारखा. चपापून आम्ही दोघेतिघे एकमेकांकडे बघू लागलो. आता हे काय नवीन संकट उभे ठाकलेय याचीच चिंता सार्यांच्या डोळ्यात दिसत होती. टपटप करून आवाज वाढू लागला. जणू काही माकडांची एखादी टोळी कौलावर चढली होती. कोकणात माकडे असणे अशक्य नसले तरी मुंबईहून निघाल्यापासून अख्ख्या प्रवासात आम्हाला एकाही माकडाने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे अचानक त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने हजेरी लावणे “तर्कात” बसत नव्हते. एव्हाना आवाजाने सारे उठून बसले होते. बंड्याने नेहमीसारखे घरमालकाच्या हक्काने पहिला उठून दिवा लावला. नक्की काय गोंधळ चालू असावा काही कल्पना येत नव्हती. दार उघडून बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. पाच-दहा मिनिटांनी आवाज थांबला. पण तो केवळ जाहीरातींचा ब्रेक घेतल्यासारखा. थोड्याच वेळाने पुन्हा टपटप सुरू झाली. मध्येच आवाज काही काळासाठी थांबायचा आणि आता पुन्हा येणार नाही असा विश्वास येताच परत सुरू व्हायचा. येथील हवामान कितीही लहरी असले तरी मे महिन्यात इथे गारा नक्कीच पडणार नव्हत्या. आणि खरोखरच पडत असल्या तरी अशी आवाजाची उघडझाप करत पडल्या नसत्या. दार उघडून बघायचीही सोय नव्हती. बाहेरचा दिवाही फुटला असल्याने अंधारच नजरेस पडला असता. नाही म्हणायला एक टॉर्च जवळ होता पण त्याचा प्रकाशही जेमतेम दहा पावलांवर जाऊन थांबेल एवढाच होता. दुष्काळात तेरावा महिना, आगीतून फोफाट्यात या आशयाच्या सार्या म्हणी एकाच वेळी आठवल्या जेव्हा बाबूने सांगितले की त्याच्या पोटात कळ मारतेय आणि त्याला त्वरीत परसाकडे जाणे गरजेचे आहे. थोड्याच वेळात सार्यांचे नाक चुरचुरले तसे जाणवले की तो सांगतोय त्यात खरेच तथ्य आहे. आता खरी पंचाईत झाली. बाथरूमला जायची सोय आत होती पण संडास मात्र बाहेर होता. बाबूनेही धमकी दिली की जर काही मार्ग नाही काढला तर तो आत मोरीतच करेन. आणि हे आम्हाला परवडण्यासारखे नव्हते. बाबूला आता भुताच्या बापाचेही काही पडले नव्हते. त्याच्यासाठी कोणत्याही परीस्थितीत हलके होणे गरजेचे होते.
कौलांवरचा आवाज गेले पाच-दहा मिनिटे थांबला होता. तरी कोणत्याही क्षणी पुन्हा सुरू होईल याची खात्री नव्हती. त्या आवाजापेक्षाही याची भिती होती की आम्ही दार उघडायची वाट बघत बाहेर कोणी दबा धरून तर बसला नसेल. शेवटी तयारीनिशी बाहेर पडायचे ठरवले. बंड्या हातात टॉर्च घेऊन सर्वात पुढे होता. पाठीमागे दोघे तिघे काठ्या घेऊन. सार्यांनी प्रत्येकाकडे देवाचे चिन्ह असलेली एखादी चैन, अंगठी यासारखी वस्तू जवळ असल्याची खात्री करून घेतली. बंड्याने दरवाजा उघडून पहिला चारही दिशेने टॉर्चचा प्रकाश फेकून जवळपास काही संशयास्पद तर दिसत नाही ना हे बघितले. बंड्याचे खरेच कौतुक वाटत होते. तसा तो मुळातच धाडसी होता, पण इथे आपल्यामुळे बाकीचे सारे संकटात सापडले आहेत तर सोडवणेही आपलेच कर्तव्य आहे याची जाण ठेऊन तो प्रत्येक वेळी पुढाकार घ्यायचा. बंड्याने ग्रीन सिग्नल दिला तसा एकेक करून साखळी बनवूनच आम्ही बाहेर पडलो. प्रत्येकाने आपला मोबाईल बरोबर घेतला होता. त्याचा जेमतेम प्रकाश एकेमेकांचे चेहरे तरी दाखवत होता. छताकडे बघायची कोणाची हिंमत नव्हती. तसाही तिथे अंधारच पसरला होता. टॉर्चचा प्रकाश कदाचित तिथे थोडाबहुत पोहोचला असता पण बंड्याने तो संडासाच्या दिशेनेच रोखला होता. अर्थात तेच आमचे लक्ष्य होते. तोच एक गड काबीज करायचा होता आणि परत फिरायचे होते. बाबू आत शिरला. अर्थात दरवाजा उघडाच ठेवला होता. तो आत जीव मुठीत धरून बसला होता आणि आम्ही सारे बाहेर नाक मुठीत धरून उभे होतो. कोणाला काय बोलावे सुचत नव्हते पण शांतता जास्त भयप्रद वाटत असल्याने मध्येच कोणीतरी उगाच एखादे वाक्य फेकून तिचा भंग करायचा प्रयत्न करत होता. एकेक क्षण युगासारखा भासणे म्हणजे नक्की काय याची प्रचिती येत होती. अश्याच काही सहस्त्र क्षणांनंतर बाबूचे कार्य आटोपले तशी आणखी एकदोघांना हुक्की आली. मनात खरे तर लाखो शिव्या येत होत्या पण नकार द्यायचीही सोय नव्हती. एकदा घरात परतलो तर पुन्हा बाहेर यायची हिंमत होणार नव्हती. त्यापेक्षा एकदाच काय ते सार्यांचे उरकून जाऊ दे असा विचार केला. सारा वेळ मनात धाकधूक होतीच की आता परत आवाज सुरू होईल, आता कोणीतरी अंधारातून अंगावर झेपावेल. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. जसे शिस्तीत आम्ही बाहेर आलो तसेच परत आत गेलो. दाराची कडी लावली ती आता थेट सकाळी उघडण्यासाठीच.
पण अजून रात्र संपणे बाकी होते. थोडावेळ डोळा लागतो न लागतो तोच पुन्हा दारावर थपथपवण्याच्या आवाजानेच. फार मोठा आवाज नव्हता पण शांततेचा भंग करून आमच्या मनात धडकी भरवण्याइतपत पुरेसा होता. पुन्हा एकदा बंड्यानेच धीर एकवटून “कोण आहे?”, म्हणून आवाज दिला. पण काहीच प्रत्युत्तर नाही आले. परत काही विचारायची आमची हिंमत झाली नाही आणि पुन्हा तो आवाजही नाही आला. पानांची सळसळ मात्र बराच वेळ ऐकू येत होती. आता पुन्हा डोळा लागणे कठीण होते. तसेही तीन वाजले होते. उरलेली रात्र आम्ही तशीच पडल्यापडल्या जागून काढली.
उजाडल्या उजाडल्या सर्वात पहिले दरवाजा उघडून छतावर नजर टाकली. सारी कौले जागच्या जागी होती. त्यावर साधे पानही पडले नव्हते. रात्री नक्की काय चालू होते माहीत नाही पण जे काही होते त्याची एकही निशाणी दिसत नव्हती. आता आणखी या गावात राहण्यात काही अर्थ नव्हता. गेल्या तीन दिवसात मौजमजा कमी आणि भितीचेच अनुभव जास्त घेतले होते. काल गावकर्यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी बाराची एस.टी. होती. पण ती जिथून पकडायची होती तिथवर जायला किती वेळ लागतो हे माहीत नव्हते. बरे गावकरी देखील दिवसा जागेवर सापडतील की नाही याची खात्री नव्हती. फारसा विचार न करता पटापट आवरून गावच्या दिशेने निघालो. सारे सामान बरोबरच घेतले होते. परतायची सोय झाली तर तिथूनच परस्पर निघायचे ठरवले. सुदैवाने गावकरी भेटले. त्या क्षणाला ते आम्हाला खरेच देवदूतासमान भासत होते कारण आता तेच आम्हाला या भुताच्या वाडीतून बाहेर काढू शकत होते. कालचा सारा वृत्तांत त्यांना सांगितला तरी अजून त्यांचे हेच म्हणने होते की आम्ही आणखी चार दिवस इथे राहावे. काल जे आमच्या छतावर नाचत होते ती गावातीलच माकडे होती ज्यांना अधूनमधून असा दंगा करायची लहर येते, तरी आजपर्यंत त्यांनी कोणाला त्रास दिल्याचे ऐकीवात नव्हते. पण दारावर थाप कोणी मारली असावी याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. तरीही आम्ही आमचा विचार बदलावा म्हणून गावकरी सातत्याने मनधरणी करत होते. आम्ही मात्र आमचे मन बनवून आलो होतो. त्यांचा आग्रह केवळ औपचारीकता म्हणून ऐकून घेत होतो. त्यांच्या जागी ते योग्यच होते. आम्ही असा इथून पळ काढणे म्हणजे त्यांच्या गावावर बसलेला बदनामीचा शिक्का आणखी गहिरा होणार होता. पण आमच्या दृष्टीने विचार करता, आता कोणत्याही किमतीत या “भुताच्या गावात राहून बाराच्या भावात जाण्यापेक्षा” इथून पळ काढण्यातच सार्यांचे भले होते. सार्यांबरोबर आठवण म्हणून एक फोटो काढायची इच्छा होती, पण त्यांनी नाराज होऊन यास नकार दिला. म्हणाले की पुढच्या वर्षी परत याल तेव्हा नक्की काढू. वाद घालण्यात किंवा हट्ट करण्यात अर्थ नव्हता आणि पुढच्या वर्षी परत येण्याचा प्रश्नच नव्हता.
सात-आठ गावकरी बरोबर घेऊन आणि बाकी सार्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. इथून आता परत बरेच चालावे लागणार असे वाटले होते. पण एक छोटेसे टेकाड ओलांडले आणि दहा मिनिटातच इच्छित जागी पोहोचलो. एक भलामोठा वटवृक्ष आडवाउभा पसरला होता, ज्याच्या बुंध्याशी आम्ही उभे होतो. वर शेंड्याला शेकडो वटवाघुळे लटकली होती. बरेच जुने खोड दिसत होते. कदाचित विष्णूपंतांच्या काळातील असावे. जाताजाताही विष्णूपंतांची आठवण यावी… कधी एकदा बस येते आणि या गावापासून आणि त्याच्या विचारांपासून दूर जातोय असे वाटू लागले. गावकर्यांनी पुन्हा एकदा विचारणा केली.. शेवटचीच.. पण आमचाही निर्धार ठाम होता. इतक्यात बस आली. हिरमुसलेल्या गावकर्यांना शेवटचा रामराम करून आम्ही बसमध्ये चढलो. बस सुटली तरी आमची नजर गावकर्यांवरच लागली होती. मागच्या खिडकीतून आम्ही त्यांना हात दाखवू लागलो तशी एक “विस्मयकारक” घटना घडली. झूप.. झूप.. झूप.. करून सारे गावकरी आम्हाला हात दाखवतच हवेत उडाले. आणि बघता बघता त्यांची वाघुळे बनून झाडाला लटकली. आमचा क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना. गेले दोन दिवस आम्ही यांच्याबरोबर राहिलो, यांच्याकडचे खाणे खाल्ले, यांच्या आग्रहाखातर एक ज्यादा दिवस थांबलो, आणि तरी समजू शकलो नाही. या आपल्या मुर्खपणावर रडावे की एवढे होऊनही आपण मुंबईला सुखरूप जात आहोत याबद्दल देवाचे आभार मानावेत हे समजेनासे झाले. पण थांबा… अजून तरी आम्ही कशावरून सुखरूप होतो. बसमध्ये एक नजर फिरवली तर सार्या नजरा आमच्याकडेच लागल्या होत्या. कंडक्टर मात्र आपल्याच नादात पुढे बसला होता. अजूनही तो आमच्याजवळ तिकीटाची विचारणा करायला आला नव्हता. पुढचा मागचा विचार न करता आम्ही सरळ बेल वाजवली आणि गाडी थांबली तसे सरळ खाली उतरलो. शेवटचा मुलगा उतरला तशी बस आपल्या मार्गाने निघून गेली. आम्हीही त्याच वाटेने पुढे चालू लागलो. मागे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पंधरा-वीस मिनिटांनी एक बसस्टॅंड दिसला. चौकशी करता समजले की अर्धा-पाऊण तास झाला पण या वाटेवरून एकही बस गेली नाही. आता आमची बस कुठे गेली असावी याचा अंदाज लावणे आमच्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. ती सुद्धा अशीच झाडाला लटकली असावी किंवा पाताळात शिरली असावी. आम्हाला आता त्याची फिकीर नव्हती. सरतेशेवटी आम्ही आपल्या माणसात म्हणजे मनुष्यप्राण्यात आलो होतो. जे काही आम्ही अनुभवले त्याची या अनोळखी लोकांत वाच्यता करून आम्हाला आमचे हसे करून घ्यायचे नव्हते, ना आम्हाला त्यांच्या सहानुभुतीची गरज होती. गोव्याला जायचा बेत कधीच रद्द झाला होता. सर्वांना मुंबईचे वेध लागले होते.
तर मित्रांनो, गोव्याला आम्ही गेलो असतो तर तिथे काय धमाल केली असती यावर पुढच्या वेळी नक्कीच एखादी काल्पनिक कथा लिहेन, पण या सत्यघटनेवर मात्र आपला विश्वास बसला असेल अशी अपेक्षा करतो. बाकी ज्यांचा नसेल बसला ते स्वता भुताच्या वाडीला भेट देऊन याची खात्री करू शकतात. आणि हो, जमल्यास गावकर्यांबरोबर एखादा फोटो काढायला विसरू नका, आमचा जरा राहिलाच… चला तर मग, जगला वाचलात तर भेटू इथेच.. राम राम..!!
एका भुताची खरी गोष्ट | Ghost stories in marathi
Ghost stories in marathi |
स्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घर हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक येते)
काळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ
वेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची…. ह्ही:ह्हा…
चला……..सगळी पूर्व तयारी तर ठीक झाली अता आपण शरीराची त्वचा,….त्वचाच म्हणतात ना तीला? स्वारी… त्याला?…अं…अं…हं….तर त्वचा थरथरे पर्यंत त्या वातावरणात राहू.चला तर मग त्या ऐतीहासीक पडवीत,,पडवीच्या मागे १ ‘आड’ आहे,त्यामागे वाडी…आज कुणाचं तरी वर्षश्राद्ध झालेलं आहे आणी वाडीचा नैवेद्य कुत्र्यानी वगैरे खाल्लेला नसून तो आपोआप गायब झाल्याची वदंता आहे,,,या पार्श्व-भूमीवर काही स्त्रीया गुप्त खलबंतं केल्याप्रमाणे पडल्या/पडल्या सुरू होतात…
स्त्री १-काय गं झोप लागत्ये?
स्त्री २- नाय बा,,,लागेल कशी?तुला कळ्ळ नाय?
स्त्री१- (दबक्या आवाजात) का$$$$य? ते पान ना? त्यात काय कळायचय मेलं? अत्रुप्ती हो…दुसरं काही नाय
स्त्री२-मला वाट्टं,पलीकडचे मामा
स्त्री१- कोण? गेल्या आषाढात गेले ते?
स्त्री२-नाय तं काय? इतका अत्रुप्त दुसरा होता का तरी कोणी गावात?
स्त्री१-हो बाई,ती पलीकडची कुमुद आहे ना,ती म्हणत होती दुपारी शेणकीत शेण टाकायला आली तेंव्हा तीला हे आपण वाडीला ठेवलेलं पान हलताना दिसलं म्हणे…
स्त्री२-होय की काय? आणी गं म ?
स्त्री१- तिचं तेच म्हणण हो,,,मामांचं त्यांच्या पोरांनी काही मंजे का…ही केलन नाई ना,त्याचा परिणाम
स्त्री२-जळो मेलं,तरीच मी म्हण्ट्ये…स्वतःचा चहा ढोसल्यावर सुधा,दुसय्राच्या कपावर मेल्याची भारी नजर असायची,,,माणसं जगतात ती जगतात आणी मेल्यावर सुद्धा स्वभाव जरा देखिल बदलत नाही हो…
एवढ्यात स्त्री क्रमांक-१ चा दिवटा (वय-साधारण-८/९) ”आई पोटात मळमळतय…” म्हणुन रडत उठतो..
स्त्री१- जरा मेलं निजल्ये नाई त आली ही ब्याद …पोराला – काय रे मेल्या,काय झाल?वावडींग घातलवतं ना संध्याकाळी तूला?
पोरगा-आई,,उलटी होत्ये…वळचणीचा लाइट लाव ना..आणी तू पण ये…हो… मला भीती वाट्टे एकट्याला…स्त्री१ पोराच्या पाठीत धपाटा घालत…’चल हो पुढे’….बाहेर जाऊन पोर बकाबका ओकतं….आणी स्त्री१ला धक्का बसतो….
स्त्री१-(मोठ्यांदी ओरडते)काय कार्ट आहे मेलं
स्त्री२-(लगबगीनं बाहेर येउन)- काय गं आता उलटी झाली त पोरावर चिडत्येस कसली?
स्त्री१-अगो…काल पासून पोट दुखत होत म्हणून लंघन करायला भाग पाडल ना याला,,,आणी उलटी मधे हे भरड्याच्या वड्याचे भरा भरा खाताना अर्धे चावलेले तुकडे पडलेत…अगो ते पान दुसय्रा कुणी खाल्लन नाइ…हाच आमचा मेला भस्म्या…अता गोठ्यात डांबते…आणी चांगलं २/४ दिवस ठेवते हो उपाशी…..वगैरे वगैरे…..
देन चिंटू, ट्येल मी,,,व्हाट इज दी मॉराल आफ श्टोरी…?—
खय्रा गोष्टी जो पर्यंत उजेडात येत नाहीत तोपर्यंत खोट्या गोष्टीच खय्रा असतात.
एका बाईचा विद्रुप झालेला चेहरा | Real horror story in marathi
Real horror story in marathi |
गाव मंजरी, आमच्या गावामध्ये एक माने नावाचेकुटूबं राहत होते. ते गावातील सरपंच होते पण एक दिवशी त्याचा ह्रदय विकाराने मृत्यू झाला.. त्यानंतर त्याचा मुलगा विजय ला सरपंच पद देण्यात आले..पंचायत मध्ये बसलेला असतानच त्याला एक सुंदर मुलगी दिसली.. तो तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला. थोड्या कालावधीने त्यांचे लग्न झाले. त्यानंतर विजय आपल पंचायतच काम संपवुन येण्यास त्याला रात्र होत असे किवा तो पंचायतच्या कामासाठी बाहेर जात असे.एक दिवशी विजय आपले काम संपवुन येत असताना त्याला काही माणसांनी सांगितले कि दर अमावस्याला व पौर्णिमेला तुझ्या घरातुन भयंकर आवज येतात व तिथे एक बाईचे विचित्र सावल्या दिसतात त्याला खुप जणांनी सांगितलेमग त्याने एक दिवशी आपल्या बायकोला सांगितले की, मी काहि कामासाठी बाहेर चालोय आणि येण्यास रात्र होईल असे म्हणून तो घरातुन निघाला.
काहि अतंरावर तो गेल्यावर त्याने आपला सामान तिथेच सोडून तो घरी आला व त्याने जे द्रुश्य तेथे बघितले त्याला झटकाच बसला कारण त्याच्या घरात एक बाई विद्रुप झालेला चेहरा आपल्या बाळाला घेऊन नाचत होती. त्याला ते पाहून झटकाच बसला त्याने गावतल्या एका देवदुश्याला हि सर्व घटना सांगितली त्या देवदुश्याने त्याला सांगितले की ती एक चुडेल आहे.
त्याने विचारले ह्याचा काही उपाय नाही का?. देवदुश्याने सांगितले अमावस्याला जेव्हा ती तिच्या खर्या रुपा मध्ये येणार तेव्हा तिच्या साडीचे ‘गोंडे’ कापून ते जाळून टाक त्यामध्ये तिची शक्ती आहे.काही दिवस गेल्यावर अमावस्याची रात्र आली. रात्रीच बारा वाजणार होते ती तिच्या रुपात येणार होती तो पर्यंत विजय तिथे आला. ती त्याला पाहून एकदमच दचकली. तीने आपला चेहरा लपवला आणि ती म्हणाली माझी तब्येत काही बरी वाटत नाही तुम्ही डॉक्टरला आणा.
विजय डॉक्टरला आणायला घरातुन निघाला बारा वाजता ती तीच्या रुपात आली आणि आपल्या बाळाला घेऊननाचु लागली. तिथे विजय अचानक पणे आला आणि तिच्या साडीचे गोंडे त्याने घट्ट धरुन ठेवले. जस-जसे तो गोंडे धरत तस-तसे ती जोरात रडत होती.. ते गोंडे कापले ती जोरात ओरडू लागली. मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. तेवढ्यात विजय ने ते गोंडे चुलीत टाकून दिले आणि ती नष्ट झाली.टिप – हि कथा खोटी वाटत असल्यास कोणी हि या कथेची चौकशी करावी आणि त्या चुडेल चा मुलगा आज चाळीस वर्षाचा आहे व तो मंजरीच्या एका प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतो.
Marathi bhaykatha
नमस्कार माझ्या प्रिय वाचकांनो, मी हनुमंत, मी आज तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करत आहे……………
माझा एक मित्र आहे “सोनु”. सुमारे २ वर्षांपुर्वी त्याच्यासोबत हि घटना घडलेली आहे. मित्रांनो, खरतर रात्री तळलेले पदार्थ खाऊन शहराच्या बाहेर गेल्यावर काय अनुभव येतो त्याबद्दल हे एक उत्तम दाखला आहे………
सोनु आणि त्याचा एक मित्र दुसर्या गावी गेले होते. त्या रात्री परत आपल्या घरी येण्यासाठी निघण्याअगोदर त्यांनी तळलेले समोसे खाल्ले होते. त्या गावी सोनु चे मामा राहत होते. खुप दिवसांपासून ते एकमेकांना भेटले नव्हते आणि सोनुलाही त्याना भेटायचे होते म्हणून ते त्या गावी गेले होते. ते गाव लातुर पासून सुमारे ३० किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे ते दोघेही तिथे बाईकवरुन गेले होते. तिथे गेल्यावर त्यांनी सोनुच्या मामासोबत गप्पागोष्टी केल्या आणि रात्रीचे जेवणही उरकून घेतले.
त्या रात्री सोनुला तिथेच रहायचे होते पण, त्याच्या घरावर एक छोटेसे संकट आल्यामुळे त्या रात्री ११ वाजता त्यांना परत निघावे लागले. निघण्याअगोदर त्यांनी पुरी भाजी आणी समोसे खाल्ले होती. त्याच्या मित्राने त्याला सांगितले की, आपण इथेच राहुयात. सकाळ झाल्यावर आपण घराकडे निघुयात. पण सोनुच्या हट्टी स्वभावामुळे ते दोघे रात्रीच निघाले. ज्या रस्त्यावरुन ते निघाले होते तो रस्ता अतिशय खराब होता. त्यामुळे सोनु बाईक हळुवार चालवत होता. तिथून निघाल्यावर १८ किलोमीटर अंतरावर त्यांना एक पुल लागला. त्या पुलावर त्यांची बाईक येताच अचानक बंद पडली. त्यांनी बाईक स्टॅंडवर लावली आणि नेमके बाईकला काय झाले ते बघण्यासाठी खाली उतरले. ते आजुबाजुला काही मदत मिळते का हे पाहतच होते, इतक्यात त्यांना त्या पुलाखाली एक बाई झोका घेताना दिसली. त्यांना तो काय प्रकार आहे ते काही कळले नाही. ते परत आपल्या बाईकजवळ आले आणि बाईक सुरु करण्याचा प्रयत्न करु लागले. ते प्रयत्न करतच होते की, इतक्यात अचानक ती बाई त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली आणि त्यांच्याशी वेगळ्या भाषेत बोलू लागली. त्यांनी तिच्याकडे पाहिले तर त्यांना धक्काच बसला. त्या बाईच्या एका हाताचा सापळा बनला होता, तिच्या डोक्याची कवटी दिसत होती आणि तिचे डोळे पांढरे झाले होते. तिच्या डोळ्यातून रक्त येत होते आणि त्या बाईचे पाय उलटे होते. ते पाहून तर त्यांचे अवसानच गळून पडले. त्यांनी लगेच तिथून पळ काढला.
त्यांना पळताना बघताच ती बाईही त्यांच्या मागे पळू लागली. ते दोघेही जिवाच्या आकांताने पळत होते. पळता-पळता त्यांना एका शेतात एक छोटस मोडकळीस आलेली झोपडी दिसली, ते दोघे मदतीसाठी त्या झोपडीकडे धावली ते दोघे जोरजोराने दरवाजा ठोठावत होती शेवटी एका म्हतार्या आजीने दरवाजा उघडला आणी त्यांना आत घेतल् तेव्हा त्यांनी घडलेली घटना त्या आजीबाईला सांगीतल. मग त्या आजीबाईने त्यांना देवाचा अंगारा लावला आणी झोपु घातल. सकाळी जेव्हा ते दोघे परत त्या मार्गाने घरी जायला निघाले तेव्हा त्यांनी पाहील की त्या पुलाखाली गर्दी जमलेली होती. ती गर्दी कशामुळे जमलीये हे पाहण्यासाठी ते दोघे जेव्हा त्या पुलाखाली गेले तेव्हा त्याना समोरील दृश्य पाहुन आश्चर्याचा धक्काच बसला. की ही तीच स्ञी होती जी काल राञी पुलाखाली झोका खेळत होती………
भूत बंगला | Marathi bhay katha
Marathi bhay katha |
हा प्रसंग लहान आहे. पण माझ्यासाठी जीवनातला अतिशय अविस्मरणीय प्रसंग आहे. माझ्या पणजीच्या बाराव्याची गोष्ट आहे. मी आणि माझ्या आईकडचे सगळे नातेवाईक कोकणच्या संगमेश्वर गावी गेलो होतो. मी तेव्हा पाचवीला होतो. माझ्यासोबत तेव्हा माझ्यापेक्षा एक वर्ष मोठा माझा मावस भाऊ होता. तो नेहमी मला घाबरवत असे.
आजीचे सगळे विधी उरकले होते. आम्ही मुंबईला निघणारच होतो. आजीचं घर जुन्या मांडणीच होतं. स्वयपाक घरामध्ये मागे एक दरवाजा होता, जो थेट घराच्या मागच्या बाजूला उघडत असे. तिथे बरीच झाडी होती. थोडेसे जंगलंच म्हणा!
मी आणि माझा भाऊ शू साठी तिथे गेलो. रात्रीचे साधारण साडेनऊ दहा झाले होते. माझा भाऊ माझ्या खोड्या काढत मला घाबरवत होता. आम्हाला झाडावर काहीतरी उद्या दिसले. ते जंगल होते. साहजिकपणे मला वाटले कि कोणी माकड असेल. दादाने दगडी उचलल्या, आणि मारायला लागला.
इतक्यात त्याच्यासमोर चारपाच फूट उंच एक काळाकभिन्न खाडी उडी मारून येउन उभा ठाकला. त्याचं रूप अतिशय भयानक होतं. काळाकुट्ट, बुटका, अतिशय कुरुप. डोळे वेगळ्या रंगाचे होते. आणि विवस्त्र होत. मी त्याला कधीही विसरू शकणार नाही. तो एकदमच समोर आला होता. आम्हाला पाळता भुई थोडी झाली. माझा भौतर मला मागे खेचून टाकून पळाला. आम्ही कसेबसे घरात पोचलो. दार आतून लाऊन घेतले. आम्हाला आधीच सांगितले होते, कि मागच्या बजुला जाऊ नका. तरीही आम्ही गेलो होतो.
आम्ही मोठ्यांचा ओरडा बसू नये, म्हणून शांत बसून राहिलो. कोणाला काहीच सांगितले नाही. पण ते समजल्याशिवाय राहिलेही नाही. त्याच रात्री आम्ही खूप आजारी पडलो. आम्ही घाबरलो आहोत हे सर्वांच्या लक्षात आलं. सर्वांनी खोडून खोडून विचारलं. आम्हाला खरं बोलावं लागलं.
तेव्हा आम्हाला असं सांगितलं, कि तो तिथल्या जागेचा यक्ष होता. रक्षक देवतेला जुने लोक जागेवाला म्हणत असत. त्याच्या जागी शु केली आणि दगडं मारली म्हणून तिने आम्हाला घाबरवलं. तो जागेवाला रागावला होता. असो… पुन्हा असं नाही झालं . खोटं वाटू शकतं… पण जे झालं ते असं झालं. . . . असो…”
*****************************
तो यक्ष असावा. यक्ष हा एखादा पाणवठा, जंगल, किवा डोंगरी अशा वेगवेगळ्या भौगोलिक पर्यावासाशी बांधली गेलेली देवताच असते. यक्षाकडे त्या जागेचे अधिकार असतात. तिथे त्याचा वावर असतो. ते क्रूर नसतात.
आणि सहसा कोणाला कधी इजाही नाही ह्या यक्षांना देवता म्हणता येण्याइतपत ते शक्तिशाली असतात कि नाही, हे माहित नाही; पण यक्ष शापित देवता असतात असे आमची आजी आम्हाला सांगत असे. ह्या गोष्टी ऐकायला आजही तेवढीच उत्सुकता जाणवते.
haykatha in marathi
माझ नाव अवि पाटील माझ मुळ गाव परभणी . आणि मी अनुभव केलेल्या एक विचित्र घटने बद्दल तुम्हाला आज सांगणार आहे मी तेव्हा नुकतीच बारावीची परीक्षा पास केली होती . गुण थोडे कमी होते म्हणून तालुक्याच्या गावी Admission घ्यावे लागले . त्यामुळे मला तिथेच कॉलेज जवळ एखादी राहण्याची खोली भाड्याने शोधावी लागली . आणि नशिबाने मला अशी रूम सापडली माझ्या सोबत माझे ३ मित्रसुद्धा होते रूम शेअर करायला .
आमची रूम एका दुमजली इमारतीत होती. आणि एक मस्त हवेशीर मोकळ टेरेस सुधा होत तिला . एके दिवशी आमचा रूम पार्टनर असलेल्या निलेश ने सांगितलं कि हि इमारत ज्या ठिकाणी उभी आहे तिथे आधी मसनवटा म्हणजे स्मशान होत . आणि ते खरच होत कारण आमच्या इमारतीच्या बाजूला सुमारे ५० मीटर अंतरावर हिंदू श्मशान भूमी होती आम्ही कधी कधी जेव्हा टेरेस वर जायचो तेव्हा . जळणाऱ्या चितेचा धूर आणि अग्नी दिसत असे. पण आम्हाला कधीच या गोष्टीची भीती वाटली नाही .
माझा रोज रात्रीचा एक प्रोग्राम फिक्स होता . जेवण झाल कि मी टेरेस वर जाऊन माझ्या गर्लफ्रेंड शी जिच नाव गुड्डी होत रात्री उशिरा पर्यंत फोन वर गप्पा मारत बसायचो . आणि मी तसा निडर होतो आणि भूत प्रेतांवर विश्वास सुधा नव्हता . आणि भिण्याच कारण नव्हत कारण मी जेव्हा फोन वर बोलायचो तेव्हा आमच्या इमारतीला चिटकून असलेल्या दुसर्या इमारतील राहणाऱ्या कुटुंबातील एक बाई रोज जेवणानंतर . शतपावली साठी तिथे येत असायची .
पण एक दिवस झाल अस कि ती बाई २ ते ३ दिवस शतपावली साठी येत नव्हती पण माझा आपल रोजच फोने वर बोलण चालूच होत. असाच एका रात्री बोलता बोलता १२ वाजले . मी आपल्या धुंदीत होतो . अचानक बाजूच्या इमारतीच्या टेरेस चा दरवाजा उघडला आधी मी विचार केला कि ती बाजूची बाई असेल . पण लक्षात आल कि रात्रीचे १२ वाजले आहेत आणि या वेळेला ती शतपावली कशी काय वर येवू शकते कारण रोज तर ती १० पर्यंत तिची शतपावली आटोपून निघून जायची. पण वाटल कि २ ते ३ दिवस ती आली नव्हती आणि आज उशीर झाला असेल जेवणाला म्हणून आली असेल . म्हणून मी आपला टेरेस च्या भिंतीला चिटकून खाली बसलो आणि फोन वर बोलू लागलो .
५ मिनिट झाले असतील अचानक मला बाजूच्या टेरेस वर कोपर्यात कोणी तरी लोखंडी सळीने काही तरी ठोकतय असा आवाज झाला . मी उठलो आणि पहिले पण टेरेस वर कोणीच नव्हते आणि आवाजही होत नव्हता . मला वाटल गेली असेल ती म्हणून मी पुन्हा खाली बसून बोलू लागलो . जसा मी खाली बसलो तसा तो आवाज पुन्हा येवू लागला . मी परत उठून पाहिलं म्पण सगळ शांत म्हणून मी त्यांच्या टेरेस जवळ गेलो . जसा मी टेरेस जवळ गेलो तसा तो आवाज पुन्हा येवू लागला आणि यावेळी तो जोरात कोणीतरी लोखंडी सळीने जमिनीवर वार करण्याचा आवाज येत होतो मी आवाज दिला .
वाहिनी तुम्ही आहात का तिथे . जसा मी आवाज दिला तसा येणारा आवाज शांत झाला पण काही उत्तर नाही आले . आणि २ मिनिटात पुन्हा तोच आवाज येवू लागला आवाज टेरेस च्या एका कोपर्यातून येत होता . अंधार असल्यामुळे मला निट दिसत नव्हते. मी विचार केला कि जाऊन पाहूया . म्हणून मी आमच्या टेरेस च्या कॉमन भिंतीवर चढलो आणि त्यांच्या टेरेस मध्ये उडी मारली . आणि हळूच त्या कोपर्याजवळ गेलो आणि तिथल दृश्य पाहून घामच फुटला कारण तिथे कोणीच नव्हते फक्त एक लोखंडी सळी आपोआप जमिनीवर आपटत होती . मी तसाच धावत पळत त्या टेरेस वरून आमच्या टेरेस वर उडी मारली आणि अंगातील सगळी शक्ती एकवटून मी माझ्या रूम मध्ये पळालो आणि सरळ जाऊन अंगावर चादर घेऊन झोपलो .
सकाळी उठल्यावर झालेली हकीकत सांगितली मला ताप सुधा आला होता . निलेश कडून कळले कि बाजू वाले तर अजून आलेच नाही आहेत . भीती अजून भर पडली कि रात्री दरवाजा कोणी उघडला . मी वडिलांना फोन करून सगळ सांगितलं त्यांनी ताबडतोब मला तिथून घेऊन गेले आणि माझ Admission पुण्याच्या एका कॉलेज मध्ये केले .
मित्रानो कधी कधी अदृश्य गोष्टी हि मनात एक भीती निर्माण करून जातात . त्या जर खरच दिसू लागल्या तर आपली हालत काय होईल याचा विचारही करू शकत नाही .
गुढ रहस्य
कधी कधी माणसाच्या जीवनात काही भयानक आणि विचित्र घटना घडतात. त्या घटनेचा प्रभाव माणसाच्या मनावर खोल कुठेतरी पडतो. तो त्यातुन बाहेर निघतोही पण,जी काळी शक्ती असते ती त्याला पुन्हा स्वतःकडे ओढून घेते. असच काही घडले होते ते माझी मैत्रीण दिप्ती हिचा चुलतभाऊ चेतनसोबत. त्याला जो अनुभव आला तो अनपेक्षित व मानवी मनाला विचलित करणारा आहे. ही कथा विस्तृत स्वरुपात न सांगता महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. चेतन , देवगड येथे शाळेत दहावीला शिकत होता.
एके दिवशी नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला.संध्याकाळचे ६.०० वाजले होते तरी तो घरी आला नव्हता. सर्वत्र शोधाशोध सुरु केल्यावर घरातल्यांना तो हनुमानाच्या मंदिरासमोर बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याचा चेहरा काळवडंलेला होता आणि हातातून रक्त वाहतहोते. त्याला ताबडतोब घरी आणले. गावातील एका वैद्यालाबोलवून औषधपाणी केल्यावर त्याला शुद्ध आली. शुद्धीवरआल्यावर तो काहीच बोलत नव्हता. त्याच्या डोळ्यात अनामिक भिती होती. चार-पाच दिवसानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली होती. घरातले जबरदस्तीने त्याला खायला भरवत होते. आई व आजीने त्याच्यासाठी पुजापाठ केलेतरी काही होईना. एक महिन्यानंतर दिप्तीच्या वडिलांनी हवापालट म्हणून चेतनला मुबंईला आणले. तिच्या वडिलांच्या जवळच्या मित्राने एका नामांकित समोहंन तज्ञाचे नाव सुचवले.मग चेतनला तिथे घेऊन गेल्यावर त्याच्यावर उपचारकरण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्याने उपचाराना प्रतिसाद दिला व हळूहळू प्रकृतीत सुधारणा झाली. तज्ञांनी त्याच्या मनातील भीती काढून टाकली. सर्वांनाप्रश्न पडला होता की चेतनबरोबर असे काय घडले होते.
त्या प्रश्नांची उत्तर उपचारादरम्यान सापडली. उपचाराच्यावेळी त्याने सांगितले की, त्यादिवशी चेतन शाळा सुटल्यावर मित्रासोबत मजामस्ती करत घरी येत होता. त्याचा मित्र त्याच्या घराच्या वाटेने निघून गेला. गाणे गुणगुणत तो जंगलातुन जाणा-या वाटेने घरी येत होता की त्याला ‘शुऽऽक शुऽऽक’ असा हाक मारल्याचा आवाज आला. त्याने मागेपुढे पाहिले परंतु कोणीच दिसले नाही. मग आवाज आला कुठून? थोड्या वेळाने ‘अरे वर बघ जरा’ असे कोणीतरी बोलले. वर पाहिले तर तिथेच जवळच असलेल्या चिँचेच्या झाडावर म्हातारीबसली होती आणि ती चिँच खात होती. तिला पाहून त्याला हसुच आले. तो तिला मजेत म्हणाला,”ये म्हातारे चिँच चवीला कशी आहेत गं?” ती म्हणाली,”तुला हवी असतीलतर ये वर आणि घे चव या आंबटगोड चिँचाची.” “नको मला लवकर घरी यचे आहे. उशीर झाला तर आई ओरडेल.” “मी तुझ्या आजीसारखीच आहे असे समज आणि घे आस्वाद चिंचाचा.”
आंबटगोड चिँच कोणाला आवडत नाहीत,त्यालाही आवडत होती. तशी त्याला भुक लागलीच होती. तो घरी जायच विसरला आणि झाडावर चढून त्या म्हातारीच्या शेजारी जाऊन बसला. “घे बाळ खा पोटभरुन चिँच. तुला आवडत असतीलच.” “हो आवडतात ना. आम्ही सर्व मित्र शाळेच्या जवळ असलेल्या झाडावरुन चिंच तोडून खातो. पण आज नाही खाल्ली.” “मग खा आता. घे लवकर.” तिच्या हातातुन त्याने चिँच घेतली आणि तो खाऊ लागला. तो खाण्यात गुंग होता की अचानक त्या म्हातारीने त्याचा हात पकडला आणि ती जोरात चावू लागली. आता ती खुपच विद्रुप दिसत होती. तिला पाहून तो घाबरलाच. तिचे मोठे सुळ्यासारखे दात त्याच्या हातात घुसले होते आणि ती त्याचे रक्त पित होती. त्याला असंख्य वेदना होत होत्या पण, तो काही करु शकत नव्हता कारण तिने घट्ट् पकडून ठेवले होते. थोडेसे रक्त पिल्यावर ती म्हणाली,”आज मला रक्त मिळाले.
चार-पाच महिन्यापुर्वी माझ्या नव-याने मला मारुन ह्या झाडाखाली पुरले होते. तेव्हापासुन माझा आत्मा अद्रुश्य रुपात ह्या झाडावर असतो.मला रक्ताची गरज होती व त्यासाठी शरीर हवे होते. एक म्हातारी येथुन जात होती. तिला मारुन तिच्या शरीरात प्रवेश घेतला. रोज तुला येथुन जाताना पाहते. आज ठरवलेच तुला जाळ्यात फसवायचे व तु फसलास. आता तुझी सुटका नाही.तुझे रक्त पिऊन मी माझा आत्मा तृप्त करेन.” येवढे म्हटल्यावर तिने परत आपले सुळ्यासारखे दात त्याच्या हातात घुसवले व रक्त पिऊ लागली.
चेतनला कळुन चुकले होते की आपण फसलोय.येथुन सुटका करुन घेणे गरजेचे आहे. त्याने जास्त विचार न करता तिच्या हाताला जोरात हिसका दिला व त्याने सरळ त्या झाडावरुन खाली उडी टाकली. झाडावरुन पडल्यामुळे त्याला जबरदसत मार बसला पण, त्याने सारी शक्ती एकवटली आणि तो जिवांच्या आंकाताने जी वाट दिसेल त्या वाटेने सैरावैरा पळत सुटला. त्याच्या शरीरातील शक्ती संपत चालली होती पण, पळत राहणे हाच एकमेव मार्ग होता. धडपडत तो हनुमानाच्या मंदिरासमोर आला. ‘देवा मला वाचव. माझे रक्षण कर’ हे तो पुटपुटला आणि भोवळ येऊन तो तिथेच पडला.
राधाकाकी
साधारण 1983-84 चा काळ ! मी 6वी-7वीत असेन तेव्हा. आमचं गाव खेडचं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या. आम्ही मुलं-मुलं जमून वाड्यात खेळत बसलो होतो.दूपारचं रणरणतं ऊन असल्यामुळे बाहेर जायची सोयचं नव्हती. वाडा चौसापी असल्यामुळे माझे मीञ हमखास माझ्याकडे दुपारी खेळायला यायचे. आम्ही खेळत बसलो होतो, एवढ्यात एक किँकाळी ऐकू आली. काय झालं म्हणून सगळे धडपडून उठलो. घरात वामकुक्षी घेणारी मोठी माणसे, माझी ताई, आई, बाबा धावतच बाहेर आले आणि दरवाज्यातून बाहेर धावले,आम्हीही त्यांच्या पाठीमागे गेलो. शेजारच्या राधाकाकीच्या घरातून खूप धूर येत होता,जणू काही घरचं पेटलय असच वाटत होतं, आजुबाजुच्या लोकांनी काही क्षणात दरवाजा फोडला आणि धुराच्या, आगीच्या लोटाबरोबर बाहेर पडल्या त्या राधाकाकी. किँचाळत ओरडत त्या आंधळ्यासारख्या इकडे- तिकडे पळत होत्या. पडत होत्या, उठत होत्या. त्यांना आगीने पुर्ण वढून टाकलं होत. ते दृश्य बघुन आईने आम्हाला घरात ढकलल आणी बाहेरुन कडी लावली. मग मी माळवदावर जावून पाहु लागलो, लोकांनी बादलीने पाणी आणुन राधाकाकीच्या अंगावर ओतले. आग तर विझली पण काकी धाडकन जमीनीवर बेशुद्ध पडल्या.
तीला दवाखान्यात नेण्यात आले, 2 तासानी बातमी आली की राधाकाकी गेल्या. संध्याकाळी त्यांना घरी आणले व सर्व सोपस्कार पुर्ण करुन त्यांना स्मशानात नेले.त्या दिवशी सर्व गाव आमच्या वाड्यासमोर लोटलं होतं. राधाबाई थोडीसी वेडसर पण कामाला वाघ असलेली बाई होती. वेड्याच्या भरात तीने पेटवुन घेतल होत म्हणे. तिचा नवरा कामाला आणि मुलं रानात गेली होती, त्या वेळेस तिने पेटवून घेतलं होतं. दोन दिवस असेच शांत गेले, चौथ्या दिवशी कोळीकाकानी ( राधाकाकीचा नवरा ) आईला आवाज दिला,’मालकीणबाई येवू का जरा ? ये की रे दत्तू ! विचारायच काय त्यात. कोळीकाका वाड्यात आले ढाळजेत खाली मान घालून बसुन राहीले. आईने त्यांना पाणी दिले अन म्हणाली,” जे झालं ते वाईट झाल दत्तू. आता मुलांकडे लक्ष द्यायला हवे. मन घट्ट कर.”कोळीकाकांनी मान वर केली अन म्हणाले,” ती आली होती राञी.” कोण ? आईने सहज विचारले. तीच ! राधा !! कोळीकाका भयाण स्वरात म्हणाले. ” राधा ? ” “हो! रात्री मला अचानक जाग आली. वाटत होत कोणीतरी फिरतय आसपास. उठलो आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात बघितलं तर कोप-यात कोणीतरी खाली मान घालून बसलं होतं. मोकळे केस, हिरवी साडी कोणतरी बाई बसली आहे हे जाणवत होतं, मला वाटल स्वप्न बघतोय, पुन्हा झोपणार एवढ्यात लक्षात आलं की तीची हलचाल होतीय.
तीची मान हळूहळू वर होत होती, राधा होती ती. खोल दरीतुन आवाज यावा तसा आवाज आला,’ घाबरु नका धनी, मी काय नाय करणार, मुलांचा ओढीने आलेय मी.’
राञभर राधा मुलांच्या भोवती फिरत होती त्यांना थोपटत होती. नवल म्हणजे मुलंही शांत झोपली होती.
मी माञ राञभर जागाच होतो. पहाटे कधीतरी ती निघुन गेली. माझ्या आईला धक्काच बसला, ऐकलेल सर्व अविस्वासनीय वाटत होत.आई म्हणाली, घर बदल दत्तू, मी शब्द टाकते तुझ्यासाठी. दिस पुरे व्हायचेत तीचे. दिस घातल्याबीगर कसा घर सोडू मालकिणबाई?
यावर आईला पण काही उपाय सुचला नाही. थोडा वेळ बसुन दत्तूकाका निघून गेले.
दहा दिवस झाले.
राधाकाकीच दहावं झालं आणि त्याच दिवशी दत्तूकाकांनी गाव सोडलं, जाताना घरी आले, म्हणाले, ‘ रोज राञी येत होती अन पहाटे जायची, आता इथे रहाणे शक्य नाही त्यामुळे गाव सोडतोय. एवढं बोलून ते निघून गेले
दोन दिवस असेच गेले. रोज राञी आम्ही अंगणात झोपायचो. दुसरे दिवशी राञी आम्ही सर्वजण झोपी गेलो. राञी मला अचानक जाग आली, कोणीतरी आईच्या नावाने हाक मारत होत. आई उठून बसली होती आणि भयचकित नजरेने दरवाजाकडे पहात होती.
पुन्हा आवाज आला, “काकी ओ काकी… जरा बाहेर या की.” ( गावात बरेच जण माझ्या आईला काकी म्हणुन ओळखतात. )
मी आईला विचारले, कोण आहे ग ? आईने ओठावर बोट ठेवत हळु आवाजात सांगीतले, गप्प बैस ! राधा आहे ती. माझ्या अंगावर सरसरुन काटा आला. अन माझ्याही नकळत आई अरे अरे म्हणेपर्यंत मी दरवाज्याकडे झेपावलो. जुन्या काळच्या वाड्यात दरवाजाला कोण आलय हे बघण्यासाठी होल असायचे त्यातून मी बाहेर बघीतले.
बाहेर ‘ती’ होती. वाड्याच्या तीन पाय-यांच्या खाली ती इकडुन तीकडे फिरत होती. सरपटत, पाय ओढत घासत पुढे सरकत होती. पुटपुटत होती, कुठं गेली माझी मुल ? धनी बी दिसत नाहीत. मधुनच आवाज देत होती, काकी ओ काकी जरा बाहेर या हो. माझी मुलं दिसत नाहीत कुठच.
तीला कदाचीत माझी जाणीव झाली असावी, अचानक ती दरवाजासमोर थांबली अन गर्रकन वळुन माझ्याकडे पाहु लागली, थेट माझ्याकडेच पहात होती ती.
तीच्या चेह-यावर चंद्राचा प्रकाश पडला होता. अर्धवट जळालेला चेहरा, जळालेले केस, कपडे आणि पाढंरीशुभ्र नजर. मनाला आरपार भेदून जाणारी, पकड घेणारी नजर.
धाकले मालक मला आत घ्या की ! ये म्हणा मला. माझ्या डोक्यात घणाचे घाव घालावेत तसे पुन्हा पुन्हा शब्द कोसळत होते, मनात घुमत होते. माझा हात माझ्या मनाविरुद्ध कडीकडे तसूतसूनी सरकत होता, मनावर भितीचा अंधार अधिकच गडद होत होता.
माझी ही अवस्था कदाचीत आईच्या लक्षात आली असावी, तीने खसकन मला मागे ओढले, अन एक धपाटा मारला. मी भानावर आलो. पुन्हा अंथरुणावर जावून बसलो. अंगात चांगलेच कापरे भरले होते, मी आईला सांगीतले ती मला घरात बोलवा म्हणत होती. आई म्हणाली, ‘ मग बोलवायच की, ये म्हणायच ! आणि ती आली असती तर ? आई हसली, म्हणाली ” अरे महेश आपल्या घरात स्वयंभू गणेशाची 300 वर्षापुर्वीची मुर्ती आहे ढाळजेत, त्याचे अधिष्ठान आहे आपल्या घरात. दर वर्षी आपल्या घरात भागवत सप्ताह होतो, ज्या जागेत भागवत सप्ता होतो त्या जागेत 12 वर्षे अमानवी काहीही येवू शकत नाही.
मुख्य म्हणजे आपले कुलदैवत जगदंबा माता आहे. येईल का ती घरात ?
माझी मान नकारार्थी हलत होती. आईने मला झोपायला सांगीतले. ती राञ अशीच घालमेलीत गेली.
त्यानंतर एक दोन राञी असेच आवाज यायचे, आम्ही दुर्लक्ष करायला लागलो नंतर आवाज येणे बंद झाले.
लहान मुलांच मन पाण्यासारख असतं, काहीही मनात रहात नाही. मी ही घटना विसरुन गेलो.
…
दोन वर्षानंतर…
एका संध्याकाळी…
एकदा विटिदांडू खेळताना मी मारलेली विटी राधाकाकीच्या घरात जावून पडली. त्या घरात कोणीच जात नसे, त्यामुळे मीच विटी आणायला गेलो. घर अर्धवट पडलेले. छत, भिंती ढासळलेल्या, दरवाजा उखडलेला.
मी घरात शिरलो. समोरच पडलेली विटी उचलली अन मागे वळलो. थांबलो. दरवाजाच्या कोप-यात ती बसलेली दिसत होती. हिरवी साडी, हातभर बांगड्या, मळवट भरलेला जळका चेहरा आणि आरपार जाणारी नजर. तीची पाढंरीशुभ्र नजर माझा वेध घेत होती, मान कलली होती, ती उठत होती अन माझ्याकडे झेपावत होती. क्षणात ती कोप-यात होती, क्षणात तीचा चेहरा माझ्यापासून 1 फुटावर होता.
तीच्या अंगातुन काळे धुराचे लोट बाहेर पडत होते, मला वेढुन टाकत होते, मला श्वास घ्यायला ञास होवू लागला कोणीतरी आपला जीव खेचुन बाहेर काढतय याची जाणिव होवू लागली, त्याच वेळेस मला एक भयानक, जिवघेणी किंकाळी ऐकू आली. माझ्याभोवतीचे धुराचे पडदे नाहीसे झाले, तीच्या अमानवी शरीरातुन आगीच्या ज्वाळा निघत होत्या, जळत होती ती. माझ्या मानेभोवती आग जाणवतेय अस वाटल्यामुळे मी माझ्या गळ्यात पाहिले तर माझ्या गळ्यात असलेली तुळजाभवानीची माळ लखलखत होती, तीचा प्रकाश तीला वेढुन टाकत होता. ती क्षणभरातच नाहीशी झाली. मी कसाबसा घराबाहेर आलो आणि बेशुद्ध पडलो.
!! समाप्त !!
अंधार
मित्रांनो ही एक सत्य घटने वरती आधारित कथा आहे.
ही कथा आहे कळंदी नागपूर जवळील गावातील पिंट्या पांडेची शाळेत कधीच न गेलेला मुलगा. त्या सोबत घडलेली ही खरी घटना आहे.पिंट्या त्याच्या आजोबासोबत राहत होता घरात फक्त त्याचे आजोबा आणि तो त्याच्या आजोबांकडे 3 एकर जमीन होती. दोघेही शेतात एकसाथ मजुरी करत होते. एकदा सकाळी पिंट्या आजोबास घेऊन तालुक्यास गेला होता. आणि ते रात्री शेवटच्या बसने गावात परतले. गावात तेव्हा रस्त्यावरती दिवे कमीत कमी होते. अंधारातून वाट काढत ते दोघे जात होते. पण तेवढ्यात आजोबा थांबले. आणि एक टक समोरील चिंचेच्या झाडाकडे पाहू लागले. त्यांना काहीतरी दिसले हे मात्र नक्की होते. पिंट्या ने विचारले काय आहे आजोबा तिकडे. पण आजोबांनी पिंट्यास काही सांगितले नाही आणि ते सरळ पिंट्यास घेऊन घरी घाईघाईत आले.. आजोबांनी काहीच संगितले नाही पिंट्या आणि आजोबा झोपी गेले.
दुसर्या दिवशी पिंट्या आपल्या मित्रासोबत कामास निघाला आणि परत घरी येताच तो पार चकरावला. कारण त्याच्या आजोबांनी गळफास घेतला होता. पिंट्याचा आधार देवाने त्याच्याकडून हिरकावून घेतला होता… पिंट्या खूप दुखी झाला होता.
त्याने अतोनात विचार केला की का आजोबांनी आत्महत्या केली असावी अशी काय परेशानी झाली त्यांना की त्यांना एवढा मोठा पाय उचलावा लागला… … पिंट्या रडून रडून हिरमुसला गेला होता… त्याला आई वडील देखील नव्हते ते देखील वारले होते…त्याला त्याच्या आजोबांनीच लहानचे मोठे केले होते… आपल्या नशिबाला दोष देत पिंट्या घरातून बाहेर पडला… त्याच मन आता फक्त दारूकडे वळू लागले होते…. तो काही दिवस दारू ढोसून रडत बसायचा… पण नंतर काही..दिवसांनी तो कामास परत लागला…पण रात्री तो दारू पिऊन घरी परतू लागला वाटेत त्याला तेच चिंचेचे झाड दिसले,… तो तेथून तसाच जाऊ लागला.. की त्या अंधारातून त्यास कोणीतरी हाका मारू लागले….. एवढ्या अंधारात आपल्याला कोणीतरी हाक मारताय हे पाहून पिंट्या बघण्यासाठी पुढे सरसावला… तेथे दिव्याचा एक खांबावरील दिवा बंद चालू बंद चालू होत होता..त्यातच पिंट्या पाहण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला जे दिसले ते पाहून पिंत्याची पूर्णपणे दारू उतरली….पूर्ण पणे नग्न असलेला एक माणूस तेथे झाडाखाली बसला होता पूर्ण अंग पांढरे राखडलेले… त्याचे तोंड पूर्ण पणे रक्ताने भरलेलं होत… त्याच्या पुढ्यात एक कुत्रे मेलेले पडले होते तो माणूस त्या कुत्र्याचे लचके तोडत तोडत पिंट्या कडे पाहत हसत होता.. पिंट्यास काही समजेना झाले होते..
तो त्या माणसाकडे एकटक बघत उभा होता… त्याला काही कळेनसे झाले होते.. असे वाटत होते की एकवेळ मला झटका येऊन मी बेशुद्ध व्हावे.. की हा समोरून नाहीसा व्हावा अथवा याने एकदाचा आपला जीव घ्यावा… पण ती भीती काशी तरी जावी हीच प्रार्थणा पिंट्या देवाकडे करत होता… पण कसे बसे उरले सुरले आवसान घेऊन पिंट्या जोरात ओरडला आणि ओरडत ओरडत पळत सुटला… आणि थेट घेरी आला..तो गावात आला आणि भीतीने ओरडू ओरडू त्याने गावकर्यांना संगितले…. गावकरी त्याचे बोलणे ऐकून बिथरले… काही धीट लोक त्याच्या सोबत गेले हातात काठी लाठ्या घेऊन… ते सर्व गेले तेथे एका कुत्र्याचा मृतदेह अर्धांग दिसले गाववाले थोडे समजून चुकले की इथे काही तरी झालय… पण ते सर्व परत आले… सकाळी पिंट्या भीत भीतच कामावर् गेला… तेव्हा त्याचे शेतात.. एका आंब्याच्या झाडाखाली त्याला एक माणूस गांजा पित बसलेला दिसला.. जेव्हा पिंट्या त्या माणसाकडे गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा तोच माणूस होता ज्याला तिने रात्री पाहिले होते कुत्र्यास खाताना..
पण या वेळी तो साध्या वेशात होता आणि लुंगी गुंडाळून चिलम पित होता… पिंट्याने भित भीत बाजूचा मोठा दगड उचलला.. तेवढ्यात तो माणूस त्याला म्हणाला “ऐसी गलती करने की सोचना भी मत वरना कयामत आ जायेगी ” पिंट्या थांबला आणि दगड हातात ठेवूनच बोलला… “भोसडीच्या कोण आहेस तू साल्या रात्री कुत्रं खात होतास ना मी तुला आज चांगलाच धडा शिकवतो” तेवढ्यात तो माणूस म्हणाला तेरा दादा तुझसे बहोत प्यार करता है पिंट्या मेरा नाम कालबाबा .. .. बस उसिने मुझे भेजा है मेरी बात समझ मै यहा तुझे आने वाली मुसीबत से बचाने आया हू..” पिंट्या पूर्ण गोंधळून जाऊ लागला होता… पिंट्या ने त्यास गालिच्छ भाषेत शिव्या घातल्या…. त्याच्या बोलण्याने तो बाबा निघून गेला…आणि पिंट्या वैतागून कामास लागला.. त्या घडलेल्या घटनेने त्याने पुन्हा पिण्यास सुरुवात केली… असाच एकदा पिंट्या दारू ढोसून.. घरी जात होता जाता जाता त्याला असे वाटू लागले की आपल्या डोक्यावरी कसला तरी पक्षी उडत आहे.
त्याने वरती पाहिले तर पांढरीशुभ्र साडी आणि तिचा पदर फड फड आवाज करत होता.. ती साडी वारा वागेरे काही नसताना हवेत तरंगत होती.. काही क्षणातच ती त्याच्या समोर येऊन पडली… पिंट्या नशेत असल्याने त्याने ते दुर्लक्ष केले.. आणि घरी गेला दुसर्या दिवशी पण तसेच झाले रोज रोज त्याच्या समोर ती रस्त्यात साडी उडत येऊन पडू लागली..
एकदा तो घरी आला त्याला घरात काहीतरी असल्याची चाहूल लागली… त्याने पूर्ण घर पाहिले पण घरात कोणीच नव्हते… तो घरात आला आणि झोपला पण त्याला अचानक दरवाजा धाड करून तुटण्याचा आवाज आला… तो सावध होऊन बाहेर आला पण बाहेर काहीच नव्हते.. आणि दरवाजा जसच्या तसा होता.. दरवाज्या समोर एक स्त्री होती जी पिंट्या कडे पाहत रडत होती…. आणि पिंटू फार घाबरला ,..,
त्याला काही कळेना त्याने दारातूनच आवाज दिला कोण आहे तिकडे की समोरून त्यास एक आवाज आला तुझ मरण …पिंट्या पुढचा शब्द बाहेर काढणार तेवढ्यात त्याच्या मानेवरती कसला तरी धारदार सुळयांचा वार जाणवला तो त्या वेदनेने विव्हळला…. त्याच्या बाजूला एक प्रेत उभे होते जे त्याच्या मानेत आपले सुळे खुपसून त्याने रक्त पित होते… की तेवढ्यात दारात कालबाबा आला.. आणि त्याने जवळील अंगारा त्या प्रेताच्या अंगावरती फेकला… की ते प्रेत दूर फेकले गेले… तरी ही त्या प्रेताने पिंट्या वरती दूसरा वार केला… तेवढ्यात कालबाबा ही काही करू शकला नाही… ते प्रेत पिंट्याचे रक्त पिऊ लागले…. की कालबाबाने पिंट्याकडे एक तलवार घरंघळत फेकून दिली… आणि ओरडून त्यास सांगू लागला .. पिंट्या ले तेरे भगवान का नाम और कर इज शैतानी रूह के दो टुकडे ते प्रेत ..
पिंट्याचा जीव घेतच होत की.. पिंट्याने भवानी मातेच नाव घेतले आणि उरल्या अवसानने ती तलवार प्रेताच्या शरीरावरून फिरवली…. की तिचे क्ष्ंनार्धात दोन टुकडे झाले…आणि भयानक किंचाळी करत ते प्रेत नाहीसे झाले पण पिंट्याची मान देखील कापली गेली होती.. त्या प्रेतामुळे… त्याच्या चावामुळे तेव्हा कालबाबा पुढे आला आणि त्यास बोलू लागला “मुझे माफ करदेना पिंटू मे तुझे बचा नाही सका ” वो रूह एक वैषया की थी जिसका तेरा बाप दीवाना था उसने पैसे की वजह से तेरे बाप को पुरे गाव के सामने बदनाम किया उसीका बदला लेणे तेरे बापने उसे जिंदा जमीन मे गाड दिया था . और उसिने तेरे मा बाप को फिर ..आत्मा बनकर मार डाला.. तेरे दादाजी तुझे वहासे यहा इस गाव लाये तकि तू उससे बचा रह… लेकीन वो आत्मा यहा पार आ ही गयी उसे तूम सबकी मौत से ही मुक्ति मिल सक्ती थी… जाब एकदिन तू और तेरे दादा बाहर से गाव मे आ रहे थे तभी तेरे दादा ने उसे पेड पे देखलीया था लेकीन उसने तू घर मे नही था तब उसने तेरे दादा को मार डाला उससे पेहले तेरे दादाने मुझसे मदद मांगी थी.,,, मै तो सिर्फ एक तांत्रिक अघोरी हू… मै ना तुझे बचा सका ना तेरे दादा को…मै तेरा गुन्हेगार हू बच्चे… पिंट्या रडत रडत त्या कालबाबा चे आभार मानू लागला… आणि हसत हसत त्याने प्राण सोडून दिला…
खविस
मी रोहित रामचंद्र भामरे आज मी तुम्हाला खविस बद्दल सांगणार आहे स म्हणतात की हा खविस जर कधी आपल्याला दिसला तर तो आपल्याला त्याच्यासोबत मुष्ठीयुद्ध खेळायला लावतो. जर आपण जिंकलो तर तो नेहमी आपला गुलाम होऊन राहतो किंवा आपली कोणतीही इच्छा पूर्ण करतो . पण जर आपण त्यात हरलो तर आपल्याला तो मारून टाकतो . गावच्या ठिकाणी खाविसाचा वावर जास्त दिसून येतो . पण कधी कधी जरी आपण जिंकलो तरीही तो माणसाला मारून टाकतो . अशीच एक घटना नाशिक मध्ये फार वर्षापूर्वी घडली होती . कोंडाजी पहिलवान हे नाशिकमधले नावाजलेले पहिलवान समजले जात . त्यांनी मोठ मोठ्या पहिलवानांना कुस्तीत धुळ चारली होती . त्यामुळे त्यांचा एक दबदबा कायम झाला होता . ते लवकर कधीच कोणाची मदत घेत नसत , गर्वाने नाही तर हिम्मत आणि जिद्दीच्या जोरावर आणि याच जोरावर त्यांनी लहानपणापासुन कसरत करुन स्वत:च्या कतृत्वाच नाव या शहरात अजरामर केल. त्यांना एक लहान मुलगी होती आणि तिच्यावर ते जीवापाड प्रेम करत असत . तर झाल अस कि 1 एके दिवशी ते रात्री कोणा नातेवाईकांकडे गेले होते . आता पुर्वी काही गाडी वगैरे नव्हती आणि पुर्वी ज्या माणसाकडे सायकल असायची तो माणुस श्रीमंत मानला जाई . पण आता एकढे मोठे कोंडाजी पहिलवान सायकलला त्यांचा भार पेलला गेला नसता म्हणुन ते नातेवाईकांकडे पाई पाई चालत गेले . जेवण वगैरे झाल , ते म्हणाले चला आता निघतो मी जेम तेम 8 वाजले असतील आता निघालो तर 10-10.30 पर्यंत घरी पोहचेन या हिशोबाने त्यांनी निघायची तयारी केली . नातेवाईक म्हणाले दादा थांबा उद्या जावा रात्र झालीय आणि रस्ता खराब आहे , पण त्यांना कोणी अडऊ शकल नाही .
पहिलवान निघाले गावाच्या वेशीपासुन थोड लांब एक जंगल आहे जंगलाच्या जवळ आले जरा लघुशंका केली चालु लागले तेवढ्यात त्यांना मागुन आवाज आला काय वस्ताद कुठे निघाले त्यांनी मागे वळुन बघितल तर एक भला मोठा माणुस त्याँच्या जवळ येताना दिसला . हा नक्की काहितरी विचित्र प्रकार दिसतोय . ते म्हटले कोण तुम्ही ? समोरुन आवाज आला कुस्ती खेळणार काय ? जर जिंकलास तर आयुष्यभर चाकरी करेन तुझी . कोंडाजी पहिलवानांना आव्हान दिल ते भडकले आणि लगेच तयार झाले . दोघांमध्ये चांगली कुस्ती रंगली . पहिलवानाला माहित नव्हते कि आपण ज्या गोष्टीचा सामना करतोय ती मानवीय नाही आहे . तरी पण ते लढत राहिले आणि आणि शेवटी त्यांनी त्या खाविसाला ह त्यावर खाविसाने पहिलवानांना शाबाशकी दिली आणि म्हणाला पठ्या. इथे वाचलास पण अजून हि लढाई संपली नाही आहे . एका खाविसाला हरवणे सोप्पे नसते तेव्हा पाहिल्वानाच्या अंगातून एक शिरशिरी उठली आणि त्यांना कळून चुकले हा माणूस नसून खाविस आहे .
खाविस त्यांना बघून हसला आणि त्याने पेहलवानाला एक अट घातली की जर घरी जाताना किंवा घरात पोहोचायच्या आत कोणत्याही परिस्थितीत मागे वळुन पाहिल तर तुला प्राण गमवावे लागेल .पहिलवान निघाले कितीही मोठे पहिलवान असले तरी मनात एक छोटी भिती होतीच गावात पोहोचले थोडी भिती कमी झाली , घरापर्यंत गेले अजुन भिती कमी झाली दरवाजा उघडला जीवात जीव आला.
त्याने घराचा दरवाजा उघडला आणि पाय टाकणार तेवढ्यात त्याला मागून त्याच्या मुलीचा जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायचा . तिचा जोरात रडण्याचा आणि हाक मारण्याचा आवाज आला . आणि क्षणाचा हि विलंब न करता त्यांनी मागे वळून पहिले . आणि जसा तो पेहलवान मागे वळला जागीच मुंडकी धडापासुन वेगळी होउन जमीनीवर कोसळली. कारण मुलीच्या आवाजात खाविसानेच आवाज दिला होता आणि अट पूर्ण नाही केली म्हणून पेह्ल्वानाला मृत्यू आला .
अस म्हणतात खविस जेव्हा एखाद्याला झपाटतो त्या आधी तो त् लक्ष ठेवून असतो . तो त्यांच्या कुटुंबातील माणसांचे आवाज आत्मसात करतो . आणि हाक देताना सुद्धा कुटुंबातील सदस्याचा आवाज तो काढतो जेणेकरून . आपण मागे वळून पाहावे . जर असा कधी अनुभव आला तर एक सावध गिरी बाळगा कि एक तर रात्रीच्या वेळी आवाजाला साद देवू नका मागे वळून पाहू नका . तो तुमच्या पुढे कधीच येणार नाही जो पर्यंत तुम्ही मागे वळत नाही .
आणि जरी अश्या शक्तीशी सामना झाला ता सुर्योदय पर्यंत स्वताला सावरून ठेवा आणि लढत राहा . कारण सूर्योदयाच्या वेळी तो निघून जातो आणि माणसाला आशीर्वाद सुधा देतो. धन्यवाद.
हाक
नमस्कार मित्रानो, कालच माझे काका आजोबा गाव वरून आले . मी स्टोरी लिहत बसलो होतो . ते माझ्या रूम मध्ये आले आणि विचारलं कि काय करतोयस रे मी सांगितलं कि मी भूत प्रेतांच्या कथा लिहतो . लोकांनी सांगितलेले अनुभव लिहतो. ते हसले म्हणाले तू गोष्टी लिहतोस तेव्हा तुला भीती वाटते कारे , मी म्हणालो वाटते कधी कधी पण मजा येते वाचायला .
तेव्हा ते गंभीर झाले आणि म्हणाले तू जी मजा वाचून घेतोस न ती एखादा व्यक्ती जेव्हा अनुभवतो तेव्हा त् हालत होते ते तुला माहित नाही. त्यांच्या या बोलण्यावर मी सुधा गंभीर झालो पण कुतुहला पोटी मी त्यांना विचारले काय हो आजोबा तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का . ते पुन्हा हसले आणि म्हणाले मी मनुष्य गणाचा आहे आणि असे अनुभव येणे स्वाभाविक आहे. मग मला राहवले नाही मी त्यांना बोललो आजोबा तुमच्या सो घडलेली एखादी भयानक घटना असेल तर सांगा ना . तेव्हा त्यांनी मला त्यांच्या सोबत घडलेला भयानक आणि अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितला . आणि तो मी माझ्या शब्दात खालील प्रमाणे लिहिला . ते म्हणतात तेव्हा मी २५ वर्षांचा होतो . अंगाने पण असा भरलेला गडी आणि त्या वेळी मला भ नाद होता . अगदी रात्री अपरात्री जरी कुठे भजन असेल मी उठून जायचो . माझ्या कडे तेव्हा एक सायकल होती . तिच्यानेच मी बाजूच्या वाडीत तर कधी दुसर्या गावात भजनाला जात असे . असेच एके दिवशी बाजूच्या गावाला भजनाची बारी होती. मी निघालो माझ्या सोबत जो येणार होता त्याला अचानक ताप आला म्हणून त्याने येणे टाळले . मी आपला एकटाच माझ्या सायकल वरून निघालो १० वाजले होते तिथे पोहचायला मला १ तास लागला भजन सुरु झाले . बारी एकदम भन्नाट रंगली सुमारे ३ तासाने भजनाचा कार्यक्रम आटोपला. सगळे निघाले माझ्या वाडीतून मी एकटाच होतो रात्रीचे २ वाजले होते .
मला तशी भीती नाही वाटायची कारण या आधी सुधा मी अनेक वेळा असा एकटा आलो होतो . मी निघालो गावच्या दिशेने १५ मिनिट झाले असतील . अचानक हवेत एक गारवा आला . आणि सायकल च्या वेगा मुळे तो अजूनच जाणवत होता . मी आपला भजन पुटपुटत जात होतो .
अचानक मला मागून कोणी तरी हाक मारली . मी दचकलो पण दुर्लक्ष केल मला वाटल भास झाला असेल . आणि परत आपल्या मार्गाला निघालो परत मागून मला हाक आली . या वेळी फार जवळून ऐकायला आली . मला माहित होत कि रात्रीच हाकेला साद द्यायची नसते मी जर जोरात सायकल चालवू लागलो . तशी पुन्हा साद अल्ली ये हरी अरे थांब कि मागे तर बघ मी तसाच वेगाने निघालो . मागे पहिले नाही समोर गावाची सीमा होती आणि बाजूलाच वादाचे झाड होते , मी सीमा ओलांडली आणि मागे वळून पहिले आणि भीतीने कापायला लागलो . समोरच्या वादाच्या झाडावर एक माणसाने स्वताला फास लावून घेतला होता . . मी विचार केला कोण मेल आहे हा अचानक त्या लटक्त्या शरीराचे डोळे उघडले आणि मला कापरी भरली . तो फासावर लटकलेला माणूस मला पाहून हसत होता .
आणि अचानक बोलला वाचलास आणि अदृश्य झाला . मी घरी आलो मला ताप भरला होता . तेव्हा पासून मी परत एकता कधीच गेलो नाही आणि तुला पण सांगतो कधीच रात्रीच्या हाकेला ओ देऊ नकोस .
पिशाच्च | horror story in marathi reading
horror story in marathi reading |
माझ नाव रुपाली – मी मुंबईत राहते – आणि इथे जास्त भुतांच्या गोष्टी ऐकायला सुधा मिळत नाहीत किवा आपण हि कधीतरीच असे विषय काढतो . शहरी भागात भूत आता फक्त पुस्तक आणि आणि आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टीन मधेच उरली आहेत . पण याहून हि एक वेगळे जग आहे . भूत आहेत आणि माझा त्यांच्या वर विश्वास आहे . कारण जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती . माझ्या साबोत घडली आहे जेव्हा मी ८ वीला शिकत होति. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या कि मजा करण्यासाठी माझ्या आईच्या गावी म्ह माझ्या आजोळी मालवण ला जायचो . आज्जीचे घर तसे जुन्या काळातलेच होते. खूप मोठे , समोर छोटीशी बाग , आणि बाजूला गुरांचा वाडा. आणि त्यात भरपूर गाई आणि बैल होते. आम्ही मुंबईचे म्हटल्यावर मुलांची मजा दिवस भर बागेत खेळायचो , मामाने गाईचे दुध काढायला शिकवले . आणि खूप दंगा मस्ती सुधा करायचो . त्यावर्षी हि आम्ही उन्हाळ्यात तिथे गेलो होतो . पण यावेळी आम्हाला घरच्या मोठ्या माणसांनी गु जाऊ नको असा कडक आदेशच दिला होता . तिथे लहान मुलांना जाण्यास बंदी केली होती. म्हणून मी आजीला त्या बद्दल विचारले तर तिने सांगितले कि गेल्या ६ महिन्यापासून जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो . २ दिवसात मरतो . आणि त्यामुळे गाई सारख्या हंबरत असतात आणि माणूस तिथे गेला कि त्याला शिंगणे मारायला येतात . म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका . तेव्हाही वाड्यात २० गाई होत्या . आणि त्या दिवशी अजून एक बछडा जन्माला आला . आम्ही मुल आनंदी झालो पण तो आनंद फार काळ टिकला नाही .
कारण सकाळी तो बछडा मृत अवस्थेत वाड्यात पडला होता. आता सहन शक्ती संपली होती मामाने आजीला सांगितलं कि हे काही साध सुध नाही आहे . नक्कीच काहीतारी भयानक आणि अमानवीय घडतंय आपण मांत्रिकाला बोलावून पूजा करून घेवूयात . मांत्रिक आला आणि जसा त्याने त्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश केला तसा त्याला विचित्र अनुभव आला .
तो लगेच बाहेर पडला आणि म्हणाला उद्या बुधवार आहे उद्या सकाळी सकाळी मी इथे येती आणि काय करायचं ते बघतो . दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता तो मांत्रिक आला . मी हि जागीच होते कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे हे मला सुधा जाणून घ्यायचे होते . तो आधी गुरांच्या गोठ्यात , मग बागेत आणि नंतर विहरी जवळ गेला त्याच्या हातात एक काठी होती . विहरी जवळून तो पुन्हा गोठ्यात आला . थोडा वेळ तो त्या गोठ्यात तसाच डोळे बंद करून उभा राहिला . आणि नंतर घरी आला आणि आजीला सांगितले . हे प्रकार साधेसुधे नाहीत बछडे मारत आहेत कारण तुमच्या गुरांच्या गोठया शेजारी जे झाड आहे त्यावर एक भयानक पिशाच्च आहे आणि त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत . तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारले मग गाई का मरत नाहीत फक्त बछडे का मरतायत . त्वः तो म्हणाला प्रत्येक पिशाच्च नवीन जीवनाला तरसलेल असत . त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्यानचे तो प्राण घेतोय . तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक पूजा घातली कि सगळ ठीक होईल . त्यामुळे ते पिशाच्च तिथून निघून जाईल .
त्याने सांगितलं कि पूजा आता चालू कृत पूजा संपायला २ दिवस लागतील . त्याने पूजेच्या सामानाची लिस्ट मामाकडे दिली . थोड्याच वेळात मामा ते समान घेऊन परत आला . मांत्रिकाने ९ वाजता पूजा सुरु केली तो कसले तरी विचित्र मंत्र म्हणत होता . ते सुधा जोरात जेव्हा त्याने मंत्र बोलण्यास सुरवात केली तेव्हा ज्या घटना झाल्या त्या कधी प सुधा केला नव्हता . अचानक आमच्या घरावर लहान लहान दगड येवून पडू लागले आणि लगेच थांबले सुधा .
आम्हाला वाटल कि कोणी तरी मस्ती करत असेल. पण ५ मिनिटांनी परत पुन्हा तेच झाल लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव होऊ लागला . मामा धावत जाऊन घरावर चढला पण तिथे कोणीच नव्हत . पण तरु सुधा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान लहान खडे पडताच होते ते कुठून येत होते ते कळतच नव्हत .
हे तर काहीच नव्हत कारण जसा मांत्रिक मंत्र पुटपुटत होता तसा आता दगडांचा वर्षाव थांबला सगळे घरात येवून पूजेला बसले . पण अचानक घरावर थाप थाप असा आवाज झाला आणि घाण वास सुधा येवू लागला मामाने बाहेर जावून पहिले आणि तो चक्रावला कारण आता घरावर चक्क मानवी मल ( संडास ) येवून पडत होता आणि खूप दुर्गंधी पसरत होती . हे सगळ दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने १२ वाजता थांबवली . मांत्रिकाने सांगितलं जे काही घडतंय ते तो पिशाच्च करतोय पूजेत विघ्न आणण्यासाठी. कोणीही बाहेर पडू नका . मी उद्या येईन परत . त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण खडे आणि वाळू यांचा मधून मधून वर्षाव होतच होता. पण मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव रात्री नाही झाला . दुसरा दिवशी त्याने पूजा सुरु केली आणि पुन्हा तेच होऊ लागले . आम्ही मांत्रिकाला सांगितले कि यावर काही उपाय करा . तेव्हा तो बोलला हे थांबवू शकत नाही ते चालूच राहणार . आणि सांगितले कि त्याच्या खूप दुखतंय जस कोणीतरी काठीने त्याला मारतय असा वाटत होत . पण त्याने पूजा चालूच ठेवली आता दगड मातीचा वर्षाव थांबला होता .
पण मांत्रिकाच्या डोळ्यातून पाणी येत होत जस कोणी तरी त्याला खूपच मारतय . ३ वाजता त्याने पूजा आटोपली आणि ३ मंतरलेले खिळे घेतले आणि उठून गोठ्याजवळ गेला आणि एक गोठ्याला आणि दुसरा झाडाला ठोकला . आणि उरलेला १ खिळा त्याने घरच्या उंबरठ्याला ठोकला . आणि तिथेच पडला लोकांनी त्याला उचलले आणि पाणी दिले तो म्हणाला आता ते पिशाच्च तुम्हाला त्रास देणार नाही .
त्याने घातलेली बनियन काढली आणि आम्ही पाहून थक्क झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क काठीने खूप मारल्याचे वळ उठले होते . त्याला मामाने उचलून त्याच्या घरी नेले आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते घेतले नाहीत . तो म्हणाला पैशांचा मोह नसलेला बरा . त्या दिवशी पासून त्या घटना बंद झाल्या आणि काही दिवसातच गाई ने परत बछड्या ला जन्म दिला आणि आम्ही सुखावलो . आणि त्याला काही झाल सुधा नाही.
भय नि विश्वास | Horror Stories in Marathi
Horror Stories in Marathi |
एक माणूस एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी अन एका भूताचे राज्य होते. दोघेही आपापल्या राज्याच्या वेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते.
वाट चुकलेल्या माणसाला बघून परी म्हणाली अरे मी ओळखते ह्याला! लहान पणी मी ह्याच्या स्वप्नात जायचे, हा खूप खूप आनंदून जायचा मला बघून! मग आम्ही खूप खूप खेळायचो, नाचायचो खूप खूप भटकायचो. हा तर अगदी हट्टच करायचा तू जाउ नकोस म्हणून.
मला आठवतंय सगळं त्यालाही आठवेल! तो ओळखेल मला नक्कीच! मला वाटतं माझ्याच शोधात आलाय तो इथे. मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील. त्याला माझ्या राज्यात नेईल, त्याला छान सगळीकडे फिरवील. मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. आम्ही खूप खूप मज्जा करू. भूत म्हणले, मी ही ओळखतो ह्याला. मी ही जायचो ह्याच्या लहानपणी ह्याच्या स्वप्नात. तेव्हा हा खूप घाबरायचा मला, अगदी थरथर कापायचा, मला बघून ह्याला भर थंडीतही दरदरून घाम फुटायचा ह्याला कधी कधी तर दचकून झोपेतून उठायचा, मग पांघरुण ओढून गुडुप झोपायचा प्रयत्न करायचा. परी म्हणाली, तुझं असंच रे तूला सगळेच घाबरतात, तो काही केल्या तुझ्या जवळ यायचा नाही. भूत म्हणाले, नाही! तसं होणारच नाही. तो माझ्या राज्यातून पुढे जाऊच शकणार नाही . परी म्हणाली, नाही! नाही तो नक्कीच येईल तू बघच. त्याला खूप खूप आवडायची रे मी! भूत म्हणाले, ती फार जुनी गोष्टं तेव्हा तो फार लहान होता. आता तर त्याला तू आठवणार ही नाहीस. परी म्हणाली, आठवेल आठवेल त्याला सगळं! किती किती गोड होतं ते सगळं! ते रम्य बालपण! त्या गोष्टी विसरतो काय कुणी? भूत म्हणाले, तुला वाईट वाटेल पण तो तुला विसरलाय हे नक्की.
आता तर तो तुझ्यावर विश्वास सुद्धा ठेवणार नाही. परी म्हणाली, मग तो तुझ्या राज्यात काय म्हणून येईल तो तुलाही विसरला असणार ना? तो काय म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवील? भूत म्हणले, तसं होत नाही कधीच तो मला नक्कीच ओळखेल तो मला विसरणार नाही कधीच. परी म्हणाली, तो मला ही विसरणार नाही, बघ तू आता कशी आठवण करून देते त्याला तू बघच. माझा निर्माता आहे विश्वास. विश्वास कधीच खोटा ठरायचा नाही! तू बघच तो मला नक्कीच ओळखेल, लावतोस पैज! भूत म्हणाले, पैज नको लाउस कारण मला चांगला अनुभव आहे तू नक्कीच हारशील.
परी म्हणाली, नाही माझा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही, तूच घाबरतो आहेस पराभवाला! म्हणून टाळतो आहेस ना? भूत म्हणाले, ठीक आहे बघ प्रयत्न करून. परी म्हणाली, सांग मी जिंकली तर काय देशील? भूत हसले आणि म्हणले, जर तू जिंकलीस तर मी तुला माझे पूर्ण राज्य देऊन टाकील, अन मी कायमचा ह्या जगातून निघुन जाईल. बघ हं! परी म्हणाली, वेळेवर शब्द फिरवायचा नाही. नाही फिरवणार! भूत म्हणाले.
मग परी ने विश्वासाची आराधना केली, अन तिने गोड आवाजात गाणे म्हणणे सुरु केले, पक्षी ही आपल्या गोड गळ्याने तिला सुरात साथ देऊ लागले. परी ने मग हळू हळू नाचायला सुरवात केली. वारा मंद मंद शीळ वाजवून तिला साथ देऊ लागला, पानांची सळसळ सुरु झाली. आनंदानी झाडे अन वेली ही डोलू लागली. फुलांनी आपल्या पाकळ्या पसरायला सुरवात केली.वातावरण प्रसन्न होऊ लागले माणूस ही आनंदी होऊ लागला. परी ने मग मनातल्या मनात दुप्पट जोमानी विश्वासाची आळवणी केली, आता सूर्याने वनावर आपली किरणे फेकली त्या किरणात माणसाला परी चे सोनेरी केस तिचे सुंदर डोळे दिसू लागले, हळूहळू त्याला तीची पूर्ण आकृती दिसू लागली.
परी आनंदून गेली तिने त्याच्या स्वागता साठी हात पसरले. माणसाला स्वता:च्या डोळ्या वर विश्वासच बसेना. भ! भ! भूत!! त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले. अचानक आकाशात ढग भरून येऊ लागले, विजांचा कडकडाट सुरु झाला, सूर्य ढगांच्या आड लपून गेला, अंधारून येऊ लागले, सोसाट्याचा वारा सुरु झाला, झाडे कडाकडा मोडून पडू लागली, माणूस भयानी घामाघूम झाला, त्याची दातखीळ बसली अन तो कोसळून गतप्राण झाला. सर्व काही शांत झाले. परी धावतच माणसा जवळ गेली अन रडू लागली. ती भूताला म्हणाली, तूच जिंकलास. नेहमी तूच का रे जिंकतोस. मला सगळे का विसरून जातात? भूत ही खिन्न झाले, त्यानी परीच्या खांद्या वर थोपटले.
ते म्हणाले हे असंच होतं.नेहमीच! तुझा निर्माता आहे विश्वास, माझा निर्माता आहे भय. विश्वास काय अन भय काय हे ह्याच्याच डोक्यातून जन्म घेतात. हाच आपला मुळ निर्माता आहे, आपले वेगळे अस्तित्व नाही. पण! पण! पण काय? परी म्हणाली. हा मोठा झाला होता. अन जसा जसा माणूस मोठा होत जातो ना तसा तसा त्याचा विश्वास कमी होत जातो, पण! पण भय मात्र वाढत जातं. म्हणूनच मी जिंकतो. पण तू उदास नको होऊस, माझा शब्द अजून कायम आहे जेव्हा ही विश्वासाचा विजय होईल ना त्या दिवशी मी खरंच हे जग नेहमी साठी सोडून जाईल. भूत म्हणले.
हे देखील वाचा