वेळेचे महत्व | Time Importance in Marathi | Importance of time Essay in Marathi

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

वेळेचे महत्व | Time Importance in Marathi | Importance of time Essay in Marathi

अजूनही खूप वेळ बाकी आहे नंतर जाऊन अभ्यास करेल, पुढे जाऊन विचार कराल की आत्ता पर्यंत काही केलं नाहीये तर आता काय होणार आहे? आता तर माझ्याकडे वेळच शिल्लक नाहीये. आपली सर्वात मोठी चूक आहे की आपण हा विचार करतो की आपल्याकडे खूप वेळ आहे आणि त्याहूनही मोठी चुक आहे की आपल्याकडे वेळ नाहीये.

 वेळ तुम्ही वापरू शकता परंतु तुम्ही वेळ विकत घेऊ शकत नाही, त्याचे मालक बनू शकत नाही, तिला साठवून ठेऊ शकत नाही. फ्री मध्ये जेव्हा काही गोष्ट भेटते असेल तर मनुष्य त्याची काही कदर करत नाही. आणि हीच गोष्ट घडते वेळेच्या बाबतीत! भारतीय माणसाचे सरासरी वय हे 68 वर्ष असते आणि त्यातील 20 वर्ष तर झोपण्यात जातात आणि 8 वर्ष मित्रांसोबत गप्पा मारण्यात, मोबाईल वर वेळ वाया घालवण्यात जातात. विचार करा की तुमच्या जीवनातील 8 वर्षे ही वाया जात आहेत. जीवनात 8 वर्षे वाया घालवल्यानंतर मग मनुष्य रडत बसतो की वेळ नाहीये त्याच्याकडे! थोडं थोडं मिळून खूप वेळ नकळत वाया जातो आहे, दररोज थोडा थोडा वाया जाणार वेळ हा पुढे जाऊन वर्षे बनत असतो! एक वेळ येईल जेव्हा तुम्हाला आराम करायला भेटेल, जीवनात तुम्ही स्थिर व्हाल , तुमच्याकडे सर्व काही असेल. सध्या तुमच्याकडे काही नाहीये, वेळ आहे मेहनत करा, अभ्यास करा, जीवनात काहीतरी मिळवा.

विज्ञापन ADVERTISEMENT

Time Importance in Marathi

जीवनाचा एक नियम समजावतो, मनुष्याला जीवनात कधी न कधी पूर्णपणे झोकून देऊन मेहनत करावी लागते. एकतर सुरुवातीला मेहनत करा आणि संपूर्ण जीवनभर आराम करा किंवा सुरुवातीला आराम करा आणि आयुष्यभर सतत मेहनत करत रहा, कोणाची तरी नोकरी करत रहा, कोणाची तरी गुलामी करत रहा! काहीही मोल नसलेल आयुष्य जगत रहा, स्वतःला दोष देत रहा की मी त्यावेळी मेहनत घ्यायला हवी होती. ही मोटिव्हेशनल व्हिडीओ नाहीये, मी भविष्यातून आलेलो आहे तुम्हाला समजवण्यासाठी, मी तुम्हाला रडताना बघितले आहे, हे म्हणताना बघितले आहे की त्यावेळी मेहनत करायला हवी होती… अभ्यास करायला हवा होता..!

 आज मी तुम्हाला सांगतो आहे की आज अशी वेळ आहे त्याची किंमत तुम्हाला पुढे जाऊन 10 वर्षाने कळणार आहे. मित्रांनो हे जर सत्य असेल तर मी सांगतोय ते ऐकनार का? निर्णय तुमच्या हातात आहे… जर काही बघायचे असेल किंवा ऐकायचे असेल तर अशा गोष्टी बघा आणि ऐका ज्यांच्यामधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. जसे की 2 मिनीटचा हा व्हिडीओ तुम्ही बघितला आणि तुमच्या आयुष्यातील 2 मिनिट गेले, परंतु या व्हिडीओ मधून काहीतरी शिकून तुम्ही येणारे दोन तास किंवा दोन दिवस हे सत्कारणी लावाल. जर तुम्ही या व्हिडीओ मधून काहीच शिकला नसाल तर तूमचे हे 2 मिनिट खरंच वाया गेले आहेत. त्यामुळे कायम चांगले बघा आणि चांगलेच ऐका!

Read more ????????????

विज्ञापन ADVERTISEMENT

Andhra Pradesh VS Telangana State Comparison

Self Motivation Importance in Marathi

How to Motivate Yourself

विज्ञापन ADVERTISEMENT

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.