Marathi Love Story | Marathi Prem Katha | Marathi Romantic Stories

Marathi Love Story | Marathi Prem Katha | Marathi Romantic Stories 

Marathi Love Story: प्रेम ही एक अतिशय आनंददायी भावना आहे जी फक्त खऱ्या प्रियकरालाच अनुभवता येते. प्रेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे. प्रेमात एक  वेगळी शक्ती असते जी  माणसाला आनंदी राहण्याचे कारण देते. आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत Marathi Prem Katha. या लेखातील प्रत्येक कथेतून तुम्हाला तुम्हाला प्रेमाबद्दल वेगळ्या प्रकारे काहीतरी शिकायला भेटेल. 


या Marathi Romantic Stories मधून तुम्हाला प्रेमाबद्दल आणि खऱ्या प्रियकराबद्दल अधिक माहिती मिळेल. तुम्हाला सर्व कथा वास्तवाशी जुळलेल्या दिसतील. यात तुम्हाला कल्पनेवर आधारित काही गोष्टीही दिसतील, पण ते वाचून तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्हाला काही प्रेरणादायी Prem Katha देखील मिळतील ज्या तुम्हाला खऱ्या प्रेमासाठी प्रेरित करतील.

 

 

समंजस जोडीदार | Samanjas Jodidar Marathi Love Story

Samanjas Jodidar Marathi Love Story

 

आयुष्यात प्रत्येकाला समंजस जोडीदार लाभावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते????”. हे जर आपण गृहीत धरले तर ढोबळ मानाने त्या जोडीदारामध्ये हवी असलेली काही वैशिष्ट्ये:

 १. समजूतदार,

२. स्वतः नेहमी आनंदी असणारा,

३. सर्वांशी प्रेमाने वागणारा,

४. तुम्हाला नेहमी खुश ठेवणारा,

५. तुमचा राग सहन करणारा,

६. तुमच्या मित्र परिवाराशी आपुलकीने वागणारा,

७. तुमच्या आवडी निवडी जोपासणारा,

८. तुमच्यावर अतोनात प्रेम करणारा

इत्यादी…

(टीप: वरील यादी अपूर्ण असण्याची पूर्ण शक्यता आहे आणि या यादीशी सर्वच सहमत असतील असे नाही.)

 

आता ही झाली समंजस जोडीदाराची वैशिष्ट्ये. थोडक्यात सांगायचं झालं तर अतिशय हेवा वाटावा असं त्या जोडीदाराचं व्यक्तिमत्व असावं. पण हीच अपेक्षा प्रत्येकाची असल्यामुळे हाच नियम आपल्यालाही लागू पडायला हवा. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्तीही कदाचित हिच अपेक्षा करत असेल. मग आपण का नाही स्वतःचे व्यक्तिमत्त्व हेवा वाटेल असे बनवू शकत.  “Nothing is Impossible”.

 

अधुरी एक प्रेम कहाणी, कधी ही पूर्ण न होऊ शकणारी | Marathi Prem Katha

Marathi Prem Katha

 

एक मुलगी होती साधी सरळ थोडीशी खट्याळ. नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली आणि एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला. अशीच दोघांची एकदा ओळख झाली आणि त्यांची छान मैत्री झाली. त्यातूनच त्यांचे फोन call आणि sms चालू झाले. ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची. जर तिने एखाद्या दिवशी call किंवा sms केला नाही तर तो तिच्यावर रागवायचा आणि तिला विचारायचा “काल तू फोन का नाही केलास, मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची “. मग ती त्याला म्हणायची की, ” नाही sorry काल नाही जमलं फोन करायला ” तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा.  

         रोज त्यांचे फोन आणि sms चालू असायचे. त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे. तिने किती ही ठरवलं की आपण त्याला जास्त sms नाही करायचं.. तरी ही त्याला sms केल्याशिवाय तिला करमत नसे. ती त्याला sms करायची. त्यांचे एकमेकांशी सवांद वाढू लागले होते. ती एकटी असली की त्याच्या विचारात गुंतायची. किती ही ठरवलं की नाही त्याचा विचार करायचा, तरीही ती अधिका-अधिक त्याच्यात गुंतत जात होती. कारण ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्याच्या विचारात असताना त्याला आठवून गालातल्या गालात हसायची. गाणं गुणगुणायची. 

 

” पाहिले न मी तुला,  

तू मला न पाहिले,  

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले ” 

 

आता तिला त्याची सवय झाली होती. तिला सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं. हळू हळू ती त्याच सगळं काही ओळखू लागली होती. 

“त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?” ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.

तो तिला विचारायचा… 

 

“अगं तुला कसं कळलं कि माझा मूड खराब आहे ते…?.” 

ती त्याला म्हणायची  

“मैत्री केली आहे थोडं फार तरी कळू शकतं “.. 

 

अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली. त्याच्याशिवाय तिच्या मनात कोणी नसे.. तिला त्याच्याबद्दल सगळं माहित होतं. 

तो कसा आहे..?  

त्याचा स्वभाव कसा आहे..?  

त्याचं दिनक्रमच तिला माहित झाल होता.. 

तो कधी जेवतो…. 

घरी किती वेळ असतो… 

मित्रांबरोबर किती वेळ असतो… 

कधी झोपतो कधी उठतो.. 

 

तिला ही वाटत होतं की तो तिच्यावर प्रेम करत आहे. पण तसं काही नव्हते, असचं एकदा तिने त्याला फोन केला. दोघांच्या पण गप्पा छान रंगल्या होत्या, आता तिला त्याच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं…. पण काही केल्या तिला ते जमत नव्हते. मग त्यानेच तिला विचारले ” तू लग्न कधी करतेस ?”.त्यावर ती चटकन त्याला म्हणाली…” छे ! एवढ्या लवकर नाही अजून वेळ आहे बघू , “तू कधी करतोस लग्न”… तेव्हा तो तिला म्हणाला ” मी लग्न करणार नाही.  मी एकटाच बरा आहे..”. मग त्याच्या या उत्तरावर ती खूप दुखी होते. काही क्षण तिला काहीच सुचत नाही. हा असा का बोलत आहे. पण स्वतःला सावरून ती परत त्याला विचारते. ” तू असा का बोलत आहे. तुझ्या आयुष्यात काही घडलं आहे का?” तो अपसेट होऊन तिला म्हणतो ” होय, आणि आता मला कोणीच नको मी एकटाच बरा आहे खूप सुखी आहे”. त्याच्या आयुष्यात खूप काही घडलं आहे हे कळल्यावर ती विषय बदलते आणि ते दोघे दुसऱ्या विषयावर बोलू लागतात आणि ती त्याचा कोमजलेला चेहरा परत फुलवते.. 

 

     ” सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला! रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?” तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत असे. तो नकळत तिला बोलून जातो. “तू खूप चांगली आहेस… तुझ चांगलच होईल…” पण ती मनातल्या मनात म्हणत असे, “माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील” कारण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती. त्याला कळलं नव्हतं की ती निष्पाप त्याच्यावर प्रेम करायची. तिच्या मनात एक आशा होती कधी तरी तो तिचा विचार करेल. कधी तरी त्याला तिच्या भावना समजतील. तिला नेहमी वाटायचं आज न उद्या त्याला माझं प्रेम कळेल आणि मी माझं प्रेम व्यक्त करेल. असेच २-३ वर्ष निघून जातात. ती अजूनही त्याला तशीच call – sms करत होती. ती त्याची वाट पाहत होती, तिच्या मनात कुठेतरी आशा होती. की तो पण तिच्यावर प्रेम करेल. गणेशोत्सव चालू होते. ७ दिवसाचे बाप्पा त्यांच्या गावी निघाले होते. ती आनंदात गणपती विसर्जनाला निघाली होती. तिच्या मोबाईलवर सारखे call येत होते. समुद्रावर पोहचल्यावर परत तिला एक call आला तिने तो call receive केला आणि ऐकलं,

 

“असलं कसलं तुझं आंधळ प्रेम तू फसलीस तुला फसवलं “

ती पुर्णपणे घाबरली होती “का काय झालं ?”

 

“अगं तू ज्याच्यावर प्रेम करतेस तो married आहे….” हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती स्तब्ध होते. एका आडोश्याला होताना तिच्या पायात काच रुतते पायातून रक्त वाहते आणि हे तिला माहितच पडल नाही. ती तशीच स्तब्ध होती. तेवढ्यात तिचे मित्र आणि आई शोधत येतात. तिच्या पायाला पाहून तिची आई ओरडते “अगं पायात काच गेली आहे आणि तुझं लक्ष कुठे आहे” आई मग पायातून काच काढते. पण तिचं हृदय त्या काचे प्रमाणेच तुटल होत तशीच जाऊन ती समुद्राच्या काठी बसते कोणाला डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून त्या पाण्यात भिजून आपले अश्रू लपविते. त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती त्याला call करते डोळ्यातले अश्रू गिळून ती त्याला बोलते.  

 

“ह्या पुढे मला कोणत्या ही प्रकारचा contact करू नकोस” 

तो खूप गोंधळून गेला होता ही अचानक अशी काय बोलते म्हणून 

“अगं काय झालं ”  

ती ” तू खूप काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेस”  

त्याला तिच्या बोलण्याचा अर्थ कळतो परत ती त्याला बोलते ” तुला माहित आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करते”  

तो म्हणतो ” हो मला माहित आहे ”  

ती shock होते “काय” 

 

तो ” हो मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतेस आणि मी ही तुझ्यावर प्रेम करतो.. पण ते कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि कधी व्यक्त ही. मला तुला फसवायचं नव्हतं आणि मला तसं करता नाही आलं असतं. म्हणून मी तुला काही बोललो नाही. मी पण तुझ्यावर खरं प्रेम केलं मला ही तुला बोलायचं होतं पण मी घाबरत होतो की कदाचित हे सगळं समजल्या नंतर तू माझी मैत्री ही तोडशील म्हणून मी तुला काही बोलत नव्हतो. मला निदान तुझ्याशी निव्वळ मैत्री तरी ठेवायची होती. मी तुला कधी मिळवू शकत नव्हतो. पण मला तुला गमवायचं पण नव्हतं. म्हणून मी गप्प होतो. नशीब पण कसे आहे बघ ना जेव्हा वेळ होती तेव्हा माझ्यासोबत प्रेम नव्हतं आणि जेव्हा प्रेम आहे तेव्हा माझ्यासोबत वेळ नाही. पण मी देवाकडे एकच प्रार्थना करतो तुझा पुढचा जन्म फक्त माझ्यासाठी असू दे” आणि तो शांत होतो. तिला हसावे कि रडावे तेच कळतं नव्हते शेवटी ती त्याला बोलते.” आज मी हारून पण जिंकली आहे “आणि call ठेवते आजही ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात फरक एवढाच की ते प्रेम फक्त त्यांच्या स्वतः पुरत असतं. तिने आता त्याला call – sms करणे सोडले आहे. पण तो महिन्यातून – पंधरादिवसातून १-२ call करून तिची विचारपूस करतो… 

 


मराठी

Marathi Katha | Marathi Goshta | Marathi Story | Stories in Marathi | marathi goshti

Marathi Katha | Marathi Goshta | Marathi Story | Stories in Marathi | Marathi goshti

Stories in Marathi: मी आजच्या या लेखामध्ये लहान मुलांसाठी Marathi Katha घेऊन आलो आहे. या सर्व कथा लहान मुलांना जीवनाचे धडे शिकवायला मदत करतील. 

मुलांच्या वाढ आणि विकासात Marathi Katha महत्त्वाची भूमिका बजावतात. लहान मुलांच्या भाषेत नवीन शब्द आणि कल्पना मांडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे Marathi Goshti. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगण्यामुळे मुलांना आकार, स्थान, रंग, वर, संख्या आणि वस्तूंची नावे यासारख्या संकल्पना शिकण्यास मदत होते. कथा वाचून, मुले अधिक जटिल कल्पना सोप्या पद्धतीने शिकतात. Stories in Marathi च्या आजच्या या लेखात मुलांसाठी मजेदार, शैक्षणिक आणि विशेष कथांचा संग्रह आहे आणि प्रत्येक कथेमध्ये एक लपलेला संदेश आहे जो मुलांसाठी उपयुक्त आहे.

शापित राजपुत्र | Shapit Rajputra Marathi Katha

Shapit Rajputra Marathi Katha

 

विजय नगरीत एक राजा राज्य करीत होता. त्याला मूलबाळ नव्हते. त्याने पुष्कळ जप-तप केले, पण मूल काही झाले नाही. त्यामुळे राजा-राणी दोघे नेहमी उदास असत. एकदा एक जादूगार साधूचा वेष घेऊन आला आणि राजाला म्हणाला, ‘जर तुम्ही मला वचन देत असाल, तर मी तुम्हाला दोन मुलगे देईन.’ राजा म्हणाला, ‘मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन.’ मग साधू म्हणाला, ‘तुम्हाला दोन मुलगे लवकरच होतील, पण ते दहा वर्षांचे झाल्यावर तुम्ही मला दिले पाहिजेत.’ राजाने विचार केला की, दहा वर्षे म्हणजे पुष्कळ अवकाश आहे आणि त्याने साधूला दहा वर्षांनी मुलगे देण्याचे वचन दिले.  साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले. मुलगे देखणे आणि हुशार होते. दहा वर्षे केव्हा निघून गेली ते राजा-राणीला कळलेही नाही. आणि एक दिवस तो साधू राजवाड्यात आला आणि मुलगे मागू मागला. राजाने मुलगे देण्याचे नाकारले, पण साधूने मायेच्या बळाने त्यांना खेचून नेले. त्याने मुलांना रानात नेले. त्याने थोरल्या मुलाला राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगाराची. 

इकडे राजा-राणी मुलांना शोधत हिंडू लागले. योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला. राजा-राणीने त्याला ‘तू आमच्या बरोबर चल’ असे म्हटले. मुलाच्या मनातसुध्दा त्यांच्याबरोबर जायचे होते, पण साधूने त्यांच्यावर कडक नजर ठेवली होती. त्याच्या नजरेतून राजा-राणी आणि मुलांची ही भेट सुटली नाही. तो अतिशय संतापला. त्याने त्यांना शिव्या देऊन हाकलून लावले. पण आता दुसर्‍या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगर होण्यापेक्षा मोठा राजा व्हावे ही आकांक्षा दृढ झाली. त्याला ती स्वस्थ बसू देईना. तेव्हा एका रात्री त्याने घोड्याचे रूप घेतले आणि तिथून पळ काढला. तो आपल्या राज्यात परत आला. तो राजा-राणीला म्हणाला, ‘आई-बाबा, मी काय सांगतो ते नीट ऐका. माझा लगाम कधी कुणाला देऊ नका.’ 

दुसर्‍या दिवशी राजा-राणी थोरल्या राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले. राजाने पाचशे सुवर्णमुद्रा देऊन घोडा खरेदी केला, पण राजा-राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले. रात्री राजकुमार आपल्या आई-वडिलांकडे परत आला. त्यांना पैसे मिळाले आणि घोडादेखील मिळाला. 

तो साधू मुलाच्या शोधातच होता. त्याला घोड्याबद्दल कळले. तो राजा-राणीकडे गेला आणि त्याला पाचशे सुवर्ण मोहरा देऊन तो लगाम मागितला. त्यांनी लगाम साधूला दिला. तो घेऊन साधू निघून गेला. घोड्याला सारे कळले. मग लगामाच्या मालकाच्या मागोमाग त्याला जाणेच प्राप्त होते. त्याला घेऊन साधू नदीवर गेला. त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते. नदीवर गेल्यावर घोड्याने माशाचे रूप घेतले आणि पाण्यात उडी घेतली. साधूने तो मासा पकडला. इतक्यात एका घारीने झडप घालून तो मासा उचलून नेला. त्याबरोबर साधू ससाणा होऊन घारीच्या मागे लागला. तेव्हा घारीने भयाने तो मासा खाली टाकून दिला. 

तो मासा सुदैवाने एका राजकन्येच्या बागेत पडला. राजकन्या खिडकीत बसली होती. त्या माशाचा राजपुत्र झाला. राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली. राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकन्येचे त्याच्यावर प्रेम बसले. तिने त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर तो राजपुत्र मोत्यांची माळ झाला. राजकन्या सदैव ती माळ आपल्या गळय़ात घालून असायची. 

साधू एक दिवस त्या राजवाड्यात आला आणि त्याने तर्‍हेतर्‍हेचे डोंबार्‍याचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले. राजाने मांडव घातला. खेळ बघायला लोकांची गर्दी जमली. खेळ खरोखरीच अप्रतिम झाले. ते पाहून राजा संतुष्ट झाला आणि त्याने साधूला ‘तुला काय हवे?’ असे विचारले. साधू म्हणाला, ‘राजा, तुझी मुलगी जी मोत्यांची माळ घालते ती मला दे.’ राजकन्येने माळ देण्याचे नाकारले, पण मागाहून वडिलांनी सांगितले तेव्हा तिने ती माळ जमिनीवर टाकली. त्याबरोबर माळ तुटली आणि मोती विखुरले. 

मोती विखुरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गिळणार इतक्यात त्या मोत्यांनी मांजराचे रूप घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले. त्याबरोबर तो राजपुत्र आपल्या खर्‍या स्वरूपात प्रगट झाला. तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाला. त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले.

 

देव कसा दिसतो | Dev Kasa Disato Marathi Goshta

Dev Kasa Disato Marathi Goshta

 

लहानगा माधव प्राथमिक शाळेत शिकत होता. एके दिवशी शाळेत वर्गशिक्षिकेने मुलांना ध्रुव बाळाची गोष्‍ट सांगितली. ध्रुव बाळाला रानात देव भेटला हे त्याला उमगले. माधवने बाईंना विचारले, ”ध्रुव किती मोठा होता?” बाई उत्तरल्या, ”तुमच्या वयाचा होता.” 

माधवचे विचारचक्र सुरू झाले. मला देव दिसेल कां? पण रान कसे असते? शाळेतील एका मोठ्या मुलाने सांगितले रानात खूप मोठी झाडे असतात. दुसर्‍या मुलाकडून समजले गावाजवळ एक मोठा पार्क आहे, तेथे खूप झाडे आहेत. माधवने गृहित धरले तेथे नक्कीच देव भेटेल. 

एका रविवारी मित्रा बरोबर पार्कमध्ये सहलीला जातो असे घरी सांगितले. आईने एका पिशवीत लाडू व सरबताची बाटली दिली. 

माधव एकटाच चालत चालत गावाबाहेरील पार्क मध्ये पोहोचला. चालून थकल्यामुळे एका झाडाखाली बसला. भूक लागल्यामुळे लाडू खाण्याकरीता पिशवी उघडू लागला. तितक्यात समोरच्या झाडाखाली त्याला एक वृद्ध गृहस्थ ‍‍दिसला. खूप भूकेला वाटत होता. माधवने एक लाडू त्याला नेऊन दिला. वृद्धाने लाडू घेतला व माधवकडे बघून स्मित हास्य केले. माधवला हे हास्य खूप सुंदर दिसले. 

हे हास्य परत बघण्याची त्याला इच्‍छा झाली. त्याने वृद्धाला सरबत नेऊन दिले. यावेळी वृद्ध अधिकच सुंदर हसला. संध्याकाळ होईपर्यंत माधव वृ्धाला लाडू, सरबत देत होता. वृद्धाच्या चेहर्‍यावरील हास्य अधिकच खुलत होते. अंधार पडू लागल्यामुळे माधव घरी जाण्यास निघाला. वृद्धाने त्याला प्रेमाने पोटाशी घेतले. माधव खूपच आंनदीत झाला. 

घरी पोहचताच आईने त्याची आनंदी मुद्रा बघून विचारले, सहल छान झाली वाटते. 

माधव उत्तरला, की आज देवा बरोबर फराळ केला. किती छान हसत होता तो. असे हास्य मी आजवर कधीच बघितले नव्हते. 

पार्क मधील वृद्ध देखील आनंदात घरी गेला. मुलाने विचारले, ‘बाबा तुम्ही आज एवढे आनंदी कसे?’ 

मराठी

Moral stories in marathi | Bodh katha marathi | stories with moral in marathi

Moral stories in Marathi | Bodh Katha Marathi | Stories with moral in Marathi

Moral stories in Marathi: आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला Marathi Moral Stories सांगणार आहोत. लहानपणी तुम्ही आजी-आजोबांकडून या गोष्टी ऐकल्या असतील. या कथा अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आहेत. या Marathi  Bodh Katha मधून तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी करू शकता.
या मराठी बोधकथा खूप रंजक आहेत. जे वाचून तुम्हाला आणि तुमच्या मुलांना खूप मजा येईल. यामध्ये New moral short stories in Marathi 2022 मधील काही नवीन नैतिक लघुकथा दिल्या आहेत. जेणेकरून तुम्हाला नवीन वाटेल. जुन्या कथा वाचून कंटाळा आला असेल तर, येथे आम्ही तुम्हाला 30 Moral stories in Marathi for kids दिल्या आहेत.

गरुड आणि घुबड | Eagle and Owl moral story in Marathi

Eagle and Owl moral story in Marathi

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.

घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’

घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला!

आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.

तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’

तात्पर्य – स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास ो.

 

मूर्ख डोमकावळा | Murkh Domkavala Marathi Katha

Murkh Domkavala Marathi Katha

एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले.

‘गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.

त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली.

तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,”बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो” यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,” या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.”

तात्‍पर्य: काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्‍याची प्रचंड सवय असते. यामध्‍ये त्‍यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्‍यांची पात्रता जाणून असतात.

मराठी