मैत्री कविता – चारोळ्या मराठी | Marathi poem on friendship | marathi maitri charolya | marathi kavita on friendship

तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.

मैत्रीवर कविता-चारोळ्या मराठी  | Marathi poem – charolya on friendship | friendship status in Marathi

Poem on Friendship in Marathi – मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला मैत्रीवरील काही उत्कृष्ट हिंदी कवितांचा संग्रह मी तयार करून दिलेला आहे. मैत्रीवरच्या या कविता लोकप्रिय कवींनी लिहिल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण या जगात येतो, तेव्हा काही नाती इथे आधीच बनलेली असतात. जसे कि, आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काका इ. पण मैत्रीचं नातं आपणच बनवतो. या नात्याला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. हे एक अतिशय मौल्यवान नाते आहे.
मैत्री हे असेच एक नाते आहे. ज्यामध्ये आपण आपल्या सर्व गोष्टी आपल्या मित्राला सहज सांगतो. जे आपण आपल्या आई-वडील, भाऊ-बहिणींसोबतही शेअर करत नाही, ते आपल्या मित्रांसोबत शेअर करतो. Poem on Friendship in Marathi, Marathi Poem on Dosti,  मैत्री वर कविता, Poem for Best Friend in Marathi, Maitri Poem in Marathi.
आजच्या काळात चांगला मित्र बनणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. तो एक चांगला मित्र तो असतो जो तुम्ही वाईट काळातून जात असताना तुम्हाला साथ देतो. तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तेही नि:स्वार्थपणे.
मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये खाली Poem on Friendship in Marathi दिलेल्या आहेत, त्या नक्की वाचा. आम्हाला आशा आहे की Marathi Poem on Dosti तुम्हाला आवडतील. मैत्रीवरची ही कविता तुमच्या मित्रांनाही शेअर नक्की करा.

 

मैत्री-चारोळ्या कविता संग्रह मराठी |  Maitri kavita -charolya sangrah marathi.

Maitri kavita -charolya sangrah marathi.

 

विज्ञापन ADVERTISEMENT

पानांवर साठलेल्या थेंबासारखे

रंग मैत्रीचे,

रोजरोज भांडुण घट्ट होणारे

विज्ञापन ADVERTISEMENT

हे बंध मैत्रीचे..

 

या हजारोंच्या गर्दीत

विज्ञापन ADVERTISEMENT

असा एक मित्र हवा….

खांद्यावर हात ठेवून म्हणेल

 घाबरु नको भावा.

 

मैत्रिण असावी तुझ्यासारखी

आपलेपणाने सतावणारी…

रागावलास का? विचारुन,

तरीही परत परत चिडवणारी.

 

असे नाते बनवा की, त्याचा

अंत केव्हाच नसावा…

प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश

शेवटपर्यंत असावा.

Maitri kavita -charolya sangrah marathi.

 

मैत्रीचं हे नातं

सगळ्या नात्यात श्रेष्ठं

हे नातं टिकवण्यासाठी

नकोत खुप सारे कष्ट..

 

मैत्रीच्या सहवासात

श्रम सारे विसरता येतात

पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी

काहीदा कितीतरी पावसाळे जातात.

 

न क्षणांची ओळख

दोन क्षणांची मैत्री

मला का वाटली

कोणीतरी सोबत असल्याची खात्री.

 

तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

 

तुझी सोबत, तुझी संगत,

आयुष्य भर असावी..

नाही विसरणार मैत्री तुझी

तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी.

 

एक तरी मैत्रीण असावी

बाईकवर मागे बसावी

जुनी हीरो होंडा सुद्धा मग

करिझ्माहून झकास दिसावी.

Maitri kavita -charolya sangrah marathi.

 

मैत्री म्हणजे 

रखरखत्या उन्हात मायेची सावली 

सुखाच्या दवात भिजून 

चिंब चिंब नाहली.

 

मैत्री म्हणजे,

कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग

मैत्री म्हणजे,

कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग.

 

Marathi suvichar sangrah 

 

तू साथ दिल्यावर 

मला मैत्रीचं नातं कळलं..

म्हणूनच तुझ्यापाशी 

माझं मन छान जुळलं.

 

तुझ्या मनाला माझ्या मनाचा 

रस्ता छान कळू दे..

मैत्रीच्या नात्याने दोघांचीही मग 

ओंझळ पूर्ण भरू दे.

 

किती भांडणं झाली तरी 

तुझी माझी साथ सुटत नाही..

अनमोल हाच धागा बघ 

कितीही ताणला तरी तुटत नाही.

 

तुझी नि माझी मैत्री 

जगाहून न्यारी आहे..

सगळे समजतात प्रेम 

मला प्रेमाहून प्यारी आहे.

Maitri kavita -charolya sangrah marathi.

 

कधी जन्माचे,

कधी जीवनाचे

पण जगण्याचे

ते बंध मैत्रीचे.

 

मैत्रीचे बंध

कधीच नसतात तुटणारे

जुन्या आठवणींना उजाळा देऊन

गालातल्या गालात हसणारे.

 

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो, 

सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो, 

जो विश्वासाने मैत्री जपतो 

तोच खरा मैत्रीचा मोती असतो.

 

असे कितीतरी बंध

जुळले असतील तुझ्या आयुष्यात…

एक बंध माझ्याही मैत्रीचे

जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…

 

कधी न संपणारे स्वप्न असावे,

न बोलता येतील असे शब्द असावे,

ग्रिष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत,

न मागता साथ देतील असे मिञ असावेत.

 

maitri marathi kavita

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं..

शेवटी काय घेऊन जाणार आहोत ?

म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावं.

Maitri kavita -charolya sangrah marathi.

 

मैत्री म्हंटली की,

आठवतं ते बालपणं 

आणि मैत्रीतून मिळालेलं ते 

खरंखुरं शहाणपण.

 

श्रावणसरीही मित्रा आता

परक्यासारख्या वागतात

ऊनपावसाच्या मतलबी खेळात

आपल्याच डोळ्यातून धावतात

 

तो असेल माझ्यासाठी 

मैत्रीचे स्वस्तिक 

प्रेमातील नास्तिक मी 

होऊन जाईन आस्तिक.

 

एक तरी मैत्रीण असावी

चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात

मित्रांचे दिवे मावळले म्हणजे

चालावं पुढे तिच्याच प्रकाशात.

 

तुझ्या माझ्या प्रेमाची,

लोकांमध्ये चर्चा असते…

निव्वळ मैत्रीलाही हे जग,

नाव प्रेमाचेच का लावते?

 

Best friend poem in marathi

मैत्रीमध्ये जरुरी नाही 

दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी 

संवाद असता थेट.

 

तुझी न माझी मैत्री 

दिवसेंदिवस फुलू दे 

एकमेकांच्या आठवणीमध्ये 

एक एक क्षण हा हरवू दे.

 

कागदाची नाव होती, 

पाण्याचा किनारा होता,

खेळण्याची मस्ती होती,

 मित्रांचा सहारा होता.

 

मैत्रीचा हा धागा

रेश्मापेक्षाही मऊ सूत

मैत्रीच्या कुशीतच शमते

मायेची ती सूप्त भूक.

 

आयुष्य असं उधळू नकोस

जरी एकरुप तु माझ्याशी

मलाही वेळ चांगला घालवायचा आहे

मैत्री करून मनापासून तुझ्याशी.

 

आपली पहिली भेट अशी

त्रिखंडात दुमदुमत राहील

आपल्या मैत्रीचा डंखा

अखेरपर्यंत घुमत राहील.

friends poem in marathi

Maitri kavita -charolya sangrah marathi.

 

‘तुझ्या माझ्या’ “मैत्रीत” काय “गुपित” लपलंय

तुझ्या माझ्या “मैत्रीने” फक्त आपलेपण जपलंय

“नात्यांचे” स्नेह बंध कोण शोधत बसलंय

“जीवा” पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय..

 

कोणी कितीही बोललं तरी

कोणाचं काही ऐकायचं नाही

कधीही पकडले गेलो तरी

मित्रांची नावं सांगायची नाही.

 

मैत्रीची हि ज्योत 

अशीच तेवत राहू दे 

मना मनामध्ये आपल्या 

आपुलकीची भावना वाढू दे .

 

मैत्रीचा सहवास असाच 

निरंतर राहू दे..

मनामनातील विसंगती 

क्षणात दूर होऊ दे.

 

आमची मैत्री 

समजायला वेळ लागेल… 

पण जेव्हा समजेल 

तेव्हा वेड लागेल.

 

बंधन तुझे माझे 

सतत असेच राहू दे..

तुझे डोळे माझ्या नयनी

मैत्री सतत पाहू दे.

 

जीवनात कोणी ना कोणी

सोबतीला असावं,

या सोबतीच नावच

ही मैत्री असावं.

maitri poem in marathi

Maitri kavita -charolya sangrah marathi.

 

एक मित्र असावा तुमच्यासारखा

सतत हवाहवासा वाटणारा,

सतत बोलत राहावस वाटणारा

सतत स्वप्नात मस्ती करणारा.

 

उगाच माझी मैत्रीण रुसते

रूसली नसली तरी रुसल्याच नाटक करते,

उगाच माझी मैत्रीण रूसते

आणि माझ्या अश्रूनां बोलावून जाते.

 

सतत जीवनात तुझी आणि माझी

मैत्री अशीच सतत फुलू दे,

कधीकाळी काही दोष माझा तरी

त्यात तुझ्या मायेचा गोडवा राहू दे.

 

पंख नाहीत मला पण 

उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. 

कमी असलं आयुष्य 

तरी भरभरून जगतो.

 

एके दिवशी मज आठवला 

बालपणीचे गाव 

सवंगड्यांचे पुसटसे चेहेरे 

अन काहींचे नाव.

 

तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन

आपल्या मैत्रीच त्याला पाणी घालीन

जगलं तर ठिक नाहीतर 

मी वाळवंटाला सुद्धा आग लावीन.

 

वेड्या मित्राची प्रीत कधी 

कळलीच नाही तुला 

तुझ्या प्रीतीची छाया कधी

मिळालीच नाही मला.

 

जिव्हाळा माझा मनातला

केव्हाच कळला होता मला

मैत्री अबाधित राहावी

म्हणून आवरले मी मला.

 

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,

पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,

तुझ्यासाठी मित्र खूप असतील

पण माझ्यासाठी फक्त तू आहे.

 

तुझी मैत्री नक्षत्रासारखी 

नेहमी न दिसणारी..

पण नेहमीच असणारी 

माझे जीवन फुलवणारी.

 

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,

हळव्या मनाला आसवांची साथ,

उधाण आनंदाला हास्यांची साथ,

तशीच माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.

 

कळत नकळतच ते मित्र होतात, 

कळत नकळतच प्रेम जुळते,

तो काहीच बोलत नाही, तरीही,

शब्दा वाचून तिला, सगळं काही कळते.

 

friends kavita in marathi

Maitri kavita -charolya sangrah marathi.

 

खुप काहि सांगायचं होतं तुला पण

मनातलं मनातच राहून गेलं..  

सुखाचं घरटं बांधण्या आधीच 

पाखरु रानातलं उडून गेलं !

 

दोन्ही हात पसरुन मागतोय ,

देवा एक वर दे …

संकटांशी या लढण्याचे ,

हातात तेवढे बळ दे .

 

मैत्री कधी संपत नसते,

आशेविना इच्छा पूरी होत नसते,

तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,

कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.

 

निर्सगाला रंग हवा असतो.

फुलांना गंध हवा असतो.

माणुस हा एकटा कसा राहणार, कारण…….

त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

 

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही

तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…

मैत्री मधल्या सावलीचा अर्थ

कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.

 

पावसासोबत १ जाणीव पाठवत आहे,

Sms सोबत १ भावना पाठवत आहे

वेळ मिळाल तर स्वीकार करून घे

एक मैत्रीण तुझी मनापासून आठवण काढत आहे.

 

मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहूदे ,

खऱ्या मैत्रीवर विश्वास राहूदे ,

असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे 

जवळ असला तरी आठवणीत राहू दे.

 

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा, 

मैत्री एक अनमोल भेट जीवनाची, 

मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा, 

मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.

 

मैञी हाच जिवनातील

आनंदाचा ठेवा असतो

आयुष्याच्या दुःखावर मैञीच्या 

अमृताचा एक थेंब ही पुरेसा असतो.

 

रक्ताची नाती जन्माने मिळतात.

मानलेली नाती मनाने जुळतात. 

पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, 

त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

 

तुझी आणि माझी  

मैत्री अशी असावी,,,

काटा तुला लागला 

तर कळ मला यावी.

 

कृष्ण-सुदाम्यासारखी

मैत्री असावी निखळ

स्वार्थाला नसावा थारा

प्रेमाने गाठावा तळ.

poem for friend in marathi

Maitri kavita -charolya sangrah marathi.

 

मैत्रीच्या या नात्या बद्दल 

लिहिण्यासारखे खूप आहे

खरे नात्याला नसले तरी

मैत्रिला एक रूप आहे.

 

मधुर वाणी गोड स्वभाव

विचारांची देवाणघेवाण ही व्हावी

आपली मैञी अशीच

दिगंत चालावी.

 

कुठे असेल ती जरा लवकर गवसावी,

तिची प्रफुल्लीत बहर लवकर बरसावी;

माझ्या शुभ्र आयुष्याला तिचीच रंगत असावी;

आयुष्यात स्वतःची एक मैत्रीण असावी.

 

मैत्रीच्या सहवासात

अवघं आयुष्य सफ़ल होतं

देवाच्या चरणी पडून जसं

फ़ुलांचही निर्माल्य होतं.

 

तु फ़क्त सोबत रहा मित्रा

हे आयुष्य असचं जगुन घेईल…

मागितलंस कधी तर

सारं जगही जिंकुन तुला देईल.

 

शब्दांशी मैत्रि असावी

म्हणजे हवं तसं जगता येतं

जग रडत असलं बाहेर

तरी एकट्याला हसता येतं.

 

दोन शब्द बोल मित्रा

इतर काही मागत नाही…

तुझी मैत्री असल्यावर

आयुष्य जगायला दुसरं काही लागत नाही.

 

तुझी मैत्री आहे म्हणुन

या मृगजळासही अस्तित्वाचा भास

एरवी मात्र….

एका अनोळखी वाटेने नुसता अखंड प्रवास.

 

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा 

फ़ायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत हा 

मैत्रीचा पहिला कायदा आहे..

 

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…

तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…

रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली…

तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली.

 

जगाला हेवा वाटण्यासारखी

ही आपली मैत्री घडवुया,

दोन नात्यातंल आपुलेपण

सार्‍या जगाला दाखवुया.

 

मैत्रिला कधी गंध नसतो 

मैत्रीचा फक्त छंद असतो

मैत्री सर्वांनी करावी 

त्यात खरा आनंद असतो.

 

एक प्रवास सहवासाचा

जणु अलगद पडणाऱ्या गारांचा

न बोलताही बरच काही सांगणारा

अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा.

 

मैत्रीमध्ये जरुरी नसते 

दररोजची भेट..

येथे ह्रदयाचा 

ह्रदयाशी संवाद असतो थेट.

 

मैत्रीची वाट जरा कठिण आहे 

पण तितकीच छान सुद्धा आहे,

कारण आयुष्याच्या घडीचा 

एक मैत्रीच तर प्राण आहे.

 

मैत्री बरोबर असतेस ना,

तर वाट सुद्धा सोपी वाटते.. 

नाहीतर वाट शोधणे सुद्धा, 

फार कठीण वाटते.

Dosti kavita marathi

मोत्यांना काय माहित,  

शिंपल्यानी त्यांना किती जपलयं,

मोत्यांच्या केवळ नाजुकपणासाठी  

त्यांनी आपलं आयुष्य वेचलयं.

 

हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची

अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची

तितकीच मैञी कर माझ्याशी

पण ओढ असुदे सात जन्माची.

 

best friend kavita in marathi

प्रेमाचा हा निरोप आता,

आले तुझ्या आठवांनी भरुन..

मैत्री-प्रेमानी भिजले मन,

डोळे गेले अश्रुधाराने भरुन..

 

दु:खा मध्ये असलो मी

तर पाठीशी तु राहावे

आपल्या मैञीचे स्नेह

हे असेच चालावे.

 

एकदा तरी आठवण माझी

आठवड्यातुन तुला यावी

अशीच मैञी आपली

नकळत चालावी.

 

तर मित्रांनो मला अशा आहे आजच्या Marathi poem on friendship च्या लेखामधील marathi maitri charolya, marathi kavita on friendship, Maitri kavita -charolya sangrah marathi, Best friend poem in marathi, friends poem in marathi, maitri poem in marathi तुम्हाला आवडल्या असतील. 

तुमच्या कडे सुद्धा काही असेच Marathi poem on friendship असतील तर कंमेंट मध्ये नक्की शेअर करा आम्ही आमच्या लेखाच्या माध्यमातून Marathi friendship kavita इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

Single status Marathi

single boy quotes


तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.