Marathi Love Story | Marathi Prem Katha | Marathi Romantic Stories
Marathi Love Story: प्रेम ही एक अतिशय आनंददायी भावना आहे जी फक्त खऱ्या प्रियकरालाच अनुभवता येते. प्रेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे. प्रेमात एक वेगळी शक्ती असते जी माणसाला आनंदी राहण्याचे कारण देते. आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहोत Marathi Prem Katha. या लेखातील प्रत्येक कथेतून तुम्हाला तुम्हाला प्रेमाबद्दल वेगळ्या प्रकारे काहीतरी शिकायला भेटेल.
या Marathi Romantic Stories मधून तुम्हाला प्रेमाबद्दल आणि खऱ्या प्रियकराबद्दल अधिक माहिती मिळेल. तुम्हाला सर्व कथा वास्तवाशी जुळलेल्या दिसतील. यात तुम्हाला कल्पनेवर आधारित काही गोष्टीही दिसतील, पण ते वाचून तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्हाला काही प्रेरणादायी Prem Katha देखील मिळतील ज्या तुम्हाला खऱ्या प्रेमासाठी प्रेरित करतील.
समंजस जोडीदार | Samanjas Jodidar Marathi Love Story
आयुष्यात प्रत्येकाला समंजस जोडीदार लाभावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते????”. हे जर आपण गृहीत धरले तर ढोबळ मानाने त्या जोडीदारामध्ये हवी असलेली काही वैशिष्ट्ये:
१. समजूतदार,
२. स्वतः नेहमी आनंदी असणारा,
३. सर्वांशी प्रेमाने वागणारा,
४. तुम्हाला नेहमी खुश ठेवणारा,
५. तुमचा राग सहन करणारा,
६. तुमच्या मित्र परिवाराशी आपुलकीने वागणारा,
७. तुमच्या आवडी निवडी जोपासणारा,
८. तुमच्यावर अतोनात प्रेम करणारा
इत्यादी…
(टीप: वरील यादी अपूर्ण असण्याची पूर्ण शक्यता आहे आणि या यादीशी सर्वच सहमत असतील असे नाही.)
आता ही झाली समंजस जोडीदाराची वैशिष्ट्ये. थोडक्यात सांगायचं झालं तर अतिशय हेवा वाटावा असं त्या जोडीदाराचं व्यक्तिमत्व असावं. पण हीच अपेक्षा प्रत्येकाची असल्यामुळे हाच नियम आपल्यालाही लागू पडायला हवा. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्तीही कदाचित हिच अपेक्षा करत असेल. मग आपण का नाही स्वतःचे व्यक्तिमत्त्व हेवा वाटेल असे बनवू शकत. “Nothing is Impossible”.
अधुरी एक प्रेम कहाणी, कधी ही पूर्ण न होऊ शकणारी | Marathi Prem Katha
Marathi Prem Katha |
एक मुलगी होती साधी सरळ थोडीशी खट्याळ. नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली आणि एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये गुंतलेला. अशीच दोघांची एकदा ओळख झाली आणि त्यांची छान मैत्री झाली. त्यातूनच त्यांचे फोन call आणि sms चालू झाले. ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची. जर तिने एखाद्या दिवशी call किंवा sms केला नाही तर तो तिच्यावर रागवायचा आणि तिला विचारायचा “काल तू फोन का नाही केलास, मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची “. मग ती त्याला म्हणायची की, ” नाही sorry काल नाही जमलं फोन करायला ” तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा.
रोज त्यांचे फोन आणि sms चालू असायचे. त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे. तिने किती ही ठरवलं की आपण त्याला जास्त sms नाही करायचं.. तरी ही त्याला sms केल्याशिवाय तिला करमत नसे. ती त्याला sms करायची. त्यांचे एकमेकांशी सवांद वाढू लागले होते. ती एकटी असली की त्याच्या विचारात गुंतायची. किती ही ठरवलं की नाही त्याचा विचार करायचा, तरीही ती अधिका-अधिक त्याच्यात गुंतत जात होती. कारण ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्याच्या विचारात असताना त्याला आठवून गालातल्या गालात हसायची. गाणं गुणगुणायची.
” पाहिले न मी तुला,
तू मला न पाहिले,
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले ”
आता तिला त्याची सवय झाली होती. तिला सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं. हळू हळू ती त्याच सगळं काही ओळखू लागली होती.
“त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?” ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा…
“अगं तुला कसं कळलं कि माझा मूड खराब आहे ते…?.”
ती त्याला म्हणायची
“मैत्री केली आहे थोडं फार तरी कळू शकतं “..
अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली. त्याच्याशिवाय तिच्या मनात कोणी नसे.. तिला त्याच्याबद्दल सगळं माहित होतं.
तो कसा आहे..?
त्याचा स्वभाव कसा आहे..?
त्याचं दिनक्रमच तिला माहित झाल होता..
तो कधी जेवतो….
घरी किती वेळ असतो…
मित्रांबरोबर किती वेळ असतो…
कधी झोपतो कधी उठतो..
तिला ही वाटत होतं की तो तिच्यावर प्रेम करत आहे. पण तसं काही नव्हते, असचं एकदा तिने त्याला फोन केला. दोघांच्या पण गप्पा छान रंगल्या होत्या, आता तिला त्याच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं…. पण काही केल्या तिला ते जमत नव्हते. मग त्यानेच तिला विचारले ” तू लग्न कधी करतेस ?”.त्यावर ती चटकन त्याला म्हणाली…” छे ! एवढ्या लवकर नाही अजून वेळ आहे बघू , “तू कधी करतोस लग्न”… तेव्हा तो तिला म्हणाला ” मी लग्न करणार नाही. मी एकटाच बरा आहे..”. मग त्याच्या या उत्तरावर ती खूप दुखी होते. काही क्षण तिला काहीच सुचत नाही. हा असा का बोलत आहे. पण स्वतःला सावरून ती परत त्याला विचारते. ” तू असा का बोलत आहे. तुझ्या आयुष्यात काही घडलं आहे का?” तो अपसेट होऊन तिला म्हणतो ” होय, आणि आता मला कोणीच नको मी एकटाच बरा आहे खूप सुखी आहे”. त्याच्या आयुष्यात खूप काही घडलं आहे हे कळल्यावर ती विषय बदलते आणि ते दोघे दुसऱ्या विषयावर बोलू लागतात आणि ती त्याचा कोमजलेला चेहरा परत फुलवते..
” सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला! रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?” तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत असे. तो नकळत तिला बोलून जातो. “तू खूप चांगली आहेस… तुझ चांगलच होईल…” पण ती मनातल्या मनात म्हणत असे, “माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील” कारण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती. त्याला कळलं नव्हतं की ती निष्पाप त्याच्यावर प्रेम करायची. तिच्या मनात एक आशा होती कधी तरी तो तिचा विचार करेल. कधी तरी त्याला तिच्या भावना समजतील. तिला नेहमी वाटायचं आज न उद्या त्याला माझं प्रेम कळेल आणि मी माझं प्रेम व्यक्त करेल. असेच २-३ वर्ष निघून जातात. ती अजूनही त्याला तशीच call – sms करत होती. ती त्याची वाट पाहत होती, तिच्या मनात कुठेतरी आशा होती. की तो पण तिच्यावर प्रेम करेल. गणेशोत्सव चालू होते. ७ दिवसाचे बाप्पा त्यांच्या गावी निघाले होते. ती आनंदात गणपती विसर्जनाला निघाली होती. तिच्या मोबाईलवर सारखे call येत होते. समुद्रावर पोहचल्यावर परत तिला एक call आला तिने तो call receive केला आणि ऐकलं,
“असलं कसलं तुझं आंधळ प्रेम तू फसलीस तुला फसवलं “
ती पुर्णपणे घाबरली होती “का काय झालं ?”
“अगं तू ज्याच्यावर प्रेम करतेस तो married आहे….” हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती स्तब्ध होते. एका आडोश्याला होताना तिच्या पायात काच रुतते पायातून रक्त वाहते आणि हे तिला माहितच पडल नाही. ती तशीच स्तब्ध होती. तेवढ्यात तिचे मित्र आणि आई शोधत येतात. तिच्या पायाला पाहून तिची आई ओरडते “अगं पायात काच गेली आहे आणि तुझं लक्ष कुठे आहे” आई मग पायातून काच काढते. पण तिचं हृदय त्या काचे प्रमाणेच तुटल होत तशीच जाऊन ती समुद्राच्या काठी बसते कोणाला डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून त्या पाण्यात भिजून आपले अश्रू लपविते. त्या रात्री तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ती त्याला call करते डोळ्यातले अश्रू गिळून ती त्याला बोलते.
“ह्या पुढे मला कोणत्या ही प्रकारचा contact करू नकोस”
तो खूप गोंधळून गेला होता ही अचानक अशी काय बोलते म्हणून
“अगं काय झालं ”
ती ” तू खूप काही गोष्टी माझ्यापासून लपवल्या आहेस”
त्याला तिच्या बोलण्याचा अर्थ कळतो परत ती त्याला बोलते ” तुला माहित आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करते”
तो म्हणतो ” हो मला माहित आहे ”
ती shock होते “काय”
तो ” हो मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतेस आणि मी ही तुझ्यावर प्रेम करतो.. पण ते कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि कधी व्यक्त ही. मला तुला फसवायचं नव्हतं आणि मला तसं करता नाही आलं असतं. म्हणून मी तुला काही बोललो नाही. मी पण तुझ्यावर खरं प्रेम केलं मला ही तुला बोलायचं होतं पण मी घाबरत होतो की कदाचित हे सगळं समजल्या नंतर तू माझी मैत्री ही तोडशील म्हणून मी तुला काही बोलत नव्हतो. मला निदान तुझ्याशी निव्वळ मैत्री तरी ठेवायची होती. मी तुला कधी मिळवू शकत नव्हतो. पण मला तुला गमवायचं पण नव्हतं. म्हणून मी गप्प होतो. नशीब पण कसे आहे बघ ना जेव्हा वेळ होती तेव्हा माझ्यासोबत प्रेम नव्हतं आणि जेव्हा प्रेम आहे तेव्हा माझ्यासोबत वेळ नाही. पण मी देवाकडे एकच प्रार्थना करतो तुझा पुढचा जन्म फक्त माझ्यासाठी असू दे” आणि तो शांत होतो. तिला हसावे कि रडावे तेच कळतं नव्हते शेवटी ती त्याला बोलते.” आज मी हारून पण जिंकली आहे “आणि call ठेवते आजही ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात फरक एवढाच की ते प्रेम फक्त त्यांच्या स्वतः पुरत असतं. तिने आता त्याला call – sms करणे सोडले आहे. पण तो महिन्यातून – पंधरादिवसातून १-२ call करून तिची विचारपूस करतो…
Marathi
“वेलेंटाइन दिवस” किंवा “संत वेलेंटाइन दिवस” हा एक असा दिवस आहे जो जगभरात १४ फेब्रुवारी ला साजरा केला जातो. इंग्रजी बोलणाऱ्या बहुतेक देशांमध्ये हा एक पारंपरिक दिवस आहे. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाचा इजहार वेलेंटाइन कार्ड????, फूल???? किंवा मिठाई आणि चोकॉलेट्स???? देऊन करतात.
Valentine डे साजरा करावा किंवा करू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. “खरं प्रेम करणारे प्रत्येक दिवस #प्रेम???? दिवस म्हणून साजरं करतात”. खूप कमी लोकांना हे शक्य होतं. पण ९९% लोकांच्या आयुष्यात असं नाही होत. प्रेम करणं आणि प्रेम निभावणं यात खूप अंतर आहे. त्याचं किंवा तिचं रागावणं ????तुम्हाला सहन करता आलं पाहिजे. प्रेमात संयम हवा, समजूतदारपणा हवा. जर समोरच्या व्यक्तीचा कोणत्या गोष्टीला नकार असेल तर तो तुम्ही मोठ्या मनानं मानायला हवा. जर आपल्या चुकीच्या वागण्याने तुमच्या प्रिय व्यक्तीस जर त्रास झाला असेल तर sorry बोलण्यास वर्ष लावू नका????. कधी कधी तुमची चूक जरी नसली तरी sorry बोलण्यात काही हरकत नाही????.
जसं म्हणतात लग्न ही आयुष्यभराची commitment असते; तसंच खरं प्रेम ही एक अशी commitment आहे जी पुढे त्या प्रेमी युगुलांना पवित्र अशा समजल्या जाणाऱ्या लग्न या नात्या मध्ये रूपांतरित करायची असते. इथं मग प्रश्न येतो arranged marriage करणाऱ्यांचा!! प्रेम विवाह असो किंवा arranged, दोन्ही खेपेस समंजसपणे प्रेम टिकवून ठेवून ते अजून वृद्धिंगत कसे करता येईल याचा विचार करणे हे जास्त महत्वाचे. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक दिवस प्रेम दिवस साजरा करायचा प्रयत्न करा.
प्लिज, परत ये ना एकदा | Marathi Romantic Stories
Marathi Romantic Stories |
हृदयाला स्पर्श करणारी प्रेमकथा…
तो बसची वाट बघत उभा असतो. बस आल्यावर बसमध्ये चढतो आणि टिकीट काढतो. बस चालू झाली आणि तो आठवणीच्या प्रवाहात मागे वाहू लागला. त्यावेळी तो ऑफिसला जायचा. रोजचा त्याचा प्रवास बसने व्हायचा. तेव्हा ती हि त्याचवेळेची बस पकडायची. अशीच रोजची त्यांची झालेली ओळख मैत्रीच्या रुपात हळूहळू खुलत होती. अशाच एका वेळीस ती थोडी उदास वाटली. त्याने तिला विचारलं… “काय गं काय झालं आज अशी उदास का वाटतेस तू?” ती म्हणाली, काही नाही रे उद्या सकाळी आम्ही ५, ६ दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार आहोत.. त्याने तिला विचारलेले कि तू उदास का वाटतेस पण हे ऐकून तो स्वत: पण उदास झाला होता.
पण त्याला आनंदही झाला होता कि ती आपल्यासाठी उदास झाली आहे. तो तिला म्हणाला, “अगं मगं उदास होण्याचे काय कारण आहे त्यात?” ती म्हणाली, अरे मी ५, ६ दिवसांसाठी जाणार आहे आणि आता आपण ५, ६ दिवस…. असं म्हणून तिने तिचे शब्द आवरले. जाऊ दे… तुला काहीच वाटत नाही आहे ना ? तो म्हणाला, मला… मला कशाला काय वाटेल ? किती आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही गावाला जावा आणि लग्न Enjoy करा… त्याला तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घ्यायचे होते.
चेहऱ्यावर खोटे हास्य दाखवून ती त्याला म्हणाली, चल बाय माझा स्टॅाप आला. ती तिच्या डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. तो हि खूप उदास झाला होता. पण जाता जाता तिचा हसरा चेहरा पाहावा म्हणून तो आनंदाचं अवसान आणत म्हणाला, “Happy Journey” ती हसली, पण अश्रू लपवत होती आणि ती बसमधून उतरली. दुसऱ्यादिवशी त्याचे ऑफिसला जायचे मन नव्हते. घरी राहून पण तिचीच आठवण येईल. ऑफिसला गेल्यावर कामात वेळ तरी निघून जाईल म्हणून तो ऑफिसला जायला निघतो. तसा तो फारच उदास असतो. तो बसस्टॅापवर जातो आणि पाहतो तर काय… ती बसस्टॅापवर उभी असते. त्याला आनंदही होतो पण स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तो तिला विचारतो, “अगं तू लग्नाला जाणार होतीस ना ?” ती म्हणते, “नाही गेली रे”… “का गं ?” “असचं नाही जावसं वाटलं म्हणून नाही गेली..” त्या क्षणी त्याला असं वाटतं कि ती आपल्यासाठीच नसेल गेली. त्याला खूप आनंद झाला होता. बस आली दोघे बसमध्ये चढले तो तिला पाहतच बसला होता. ती मात्र शांत बसली होती. असेच दिवस उलटत गेले. तिचं नंतर बसस्टॅापवर येणे कमी झाले होते आणि आली तरी शांत असायची. काही बोलायची हि नाही. त्याने अनेकदा तिला शांत राहण्यामागचं कारण विचारलं पण काही नाही असं बोलून तिने ते टाळले. त्याला नंतर असे वाटू लागले कि “तिला माझ्याकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबुली पाहिजे असेल”.. कदाचित मला जे तिच्याबद्दल वाटते तेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असेल….
तिचा वाढदिवस येत होता त्याने ठरवलं तिच्या वाढदिवसाच्यादिवशी मी तिला सांगून टाकीन माझ्या मनातलं… तो तिला सांगतो “तुझा वाढदिवस येतोय तेव्हा आपण कुठेतरी जाऊया का ?” ती बोलते, “ठीक आहे जाऊया.” तिचा वाढदिवसाचा दिवस येतो. दोघे बसस्टॅापवर न भेटता दुसरीकडे भेटतात. तो तिच्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छा घेऊन जातो. ती समोर येते. तो तिला म्हणतो, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आज खूप सुंदर दिसतेस तू…” ती लाजते आणि Thank You बोलते.. तो तिला म्हणतो, “आदिती मला तुला काही तरी सांगायचं आहे.” ती म्हणते, “सांगं ना..” तो म्हणतो, “आदिती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” आणि फुलांचा गुच्छा तिला देतो. ती त्या फुलांचा गुच्छा घेते आणि म्हणते “आदित्य माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे”.. आदित्य तिला म्हणतो, “तू माझ्याशी लग्न करशील का ?” आदिती त्याला म्हणते, “नाही..” “का ग? प्रेम करतेस मगं लग्न का नाही करणार ?” ती खाली मान घालते आणि त्याला म्हणते, “नाही करू शकणार आणि तिकडून निघून जाते.” तो तिचा हात पकडतो पण ती हात झटकून तिकडून निघून जाते. तो विचारात पडतो. का आदिती अशी वागली ? लग्नासाठी होकार का नाही दिला. जर असंच करायचे होते मगं प्रेमही का केले माझ्यावर.. त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते. त्याची उत्तरे त्याला तिच्याकडून पाहिजे होती. तो तिच्या मागे मागे जातो पण ती त्याला दिसत नाही. तो खूप उदास होतो. त्याचे डोळे पाण्याने भरून येतात. नंतर तो घरी जातो.
दुसऱ्यादिवशी तो बसस्टॅापवर जातो पण ती येत नाही. असेच ४, ५ दिवस निघून जातात. ती येतच नाही. तो ती का येत नाही हे बघण्यासाठी तिच्या घरी जातो. तिने तिच्या घरचा पत्ता त्याला आधीच सांगितलेला असतो. तो तिकडे जातो आणि तिकडे जाऊन त्याला शॅाकच लागतो. तिकडे गेल्यावर तिच्या फोटोला हार लागलेला असतो. तो तिच्या घरच्यांना विचारतो, “हे काय हिच्या फोटोला हार का लावला आहे ?” तेव्हा तिचे घरचे बोलतात, “आम्ही २ महिन्यापूर्वी लग्नाला जात असताना आमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात आम्ही जखमी झालो पण आदितीचा तिकडेच मृत्यू झाला.” हे ऐकून तो बोलतो कि, “हे असे कसे होईल आदिती तर ४, ५ दिवस झाले फक्त आली नाही आहे म्हणून मी तिला पाहण्यासाठी इकडे आलो आहे.” घरातल्यांना असं वाटत कि हा वेडा आहे कोण तरी ? ते त्याला बोलतात कि हेच सत्य आहे. तो जोरात आदिती असं ओरडतो आणि खालीच बसतो. तेवढयात बसचा ब्रेक लागतो आणि तो भानावर येतो. आज त्या गोष्टीला ५ वर्षे झाली. तरीही त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत असतात तो ते अश्रू पुसतो. बसमधून उतरतो. त्याला असे वाटत होते. माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली, “ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुलीसाठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती.” ” जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर”… पण तेच ऐकायला तर तिचा जीव माझ्यात अडकून राहीलेला होता…. आदिती.. प्लीज परत ये ना एकदा….
Online मी ही असतो | Love Story in Marathi
Love Story in Marathi |
Online ती ही असते, Online मी ही असतो
Online ती ही असते, Online मी ही असतो.
बोलावसं तिला ही वाटतं, बोलावसं मला ही वाटतं.
परंतु बोलत ती ही नाही, बोलत मी ही नाही.
Last seen माझे ती ही सतत पाहत असते,
Last seen तिचे मी ही सतत पाहत असतो.
मॅसेज पाठवावा मला ही वाटतं,
मॅसेज पाठवावा तिला ही वाटतं.
परंतु पाठवत ती ही नाही, पाठवत मी ही नाही.
प्रत्येक स्टेटस अपडेट माझे तिच्यासाठी असतात,
प्रत्येक स्टेटस अपडेट तिचे माझ्यासाठीच असतात.
वाचत ती ही असते, वाचत मी ही असतो.
स्टेटस वाचुन वाटतं बोलावं भरभरुन एकमेकांशी,
परंतु ती ही बोलत नसते आणि मी ही बोलत नसतो.
Online प्रेम हे कदाचित असचं असतं,
एकमेकांचे प्रोफाईल पिक्चर पाहताच प्रत्येक स्टेटस मधून बहरत असतं.
कधीतरी बोलेल ती कधीतरी बोलेन मी,
याच आशेवर ते फक्त आणि फक्त विसंबलेलं असतं.
एक अनोळखी नातं – पतीपत्नी | Marathi Pre Katha
एक जमवले गेलेले नाते नवरा-बायको म्हणजेच पती-पत्नी.. पूर्वी कधी एकमेकांना पाहिले ही नसते. आता जन्मभर एकमेकांसोबत एकत्र राहणार आधी अनोळखी मग, हळूहळू होत जाणारी ओळख, हळूहळू होत जाणारे स्पर्श मग येणारे रुसवे, फुगवे, हट्ट, भांडण, अबोला.
हळूहळू घट्ट होत जाणारी वीण, मग एकजीव तृप्तता लग्न मुरायला थोडा वेळ लागतो. हळूहळू मूरत जाते, एकमेकांना नीट ओळखले जाते, वृक्ष वाढत जातो, वेल बिलगते, घट्ट फुले-फळे येतात. नाती घट्ट होतात हळूहळू एकमेकांशिवाय करमत नाही. वय वाढत जाते, ओढ वाढत जाते, एकमेकांवर अवलंबून राहणे वाढत जाते, एकमेकांशिवाय चुकल्या चुकल्या सारखे होते, नंतर मनात हळूहळू भीती वाटत राहते..
“ही गेली तर मी कसा जगू ”
“हा गेला तर मी कशी जगू ”
इतके एकमेकात गुंततात आणि स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व विसरून जातात किती अजब नाते कोण कुठले एक जमवले गेलेले नाते नवरा-बायकोचे.
छोटीशी सुंदर लव स्टोरी | Small Love Story in Marathi
एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावर रागावून बसला, तिने समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काहीच ऐकून घेत नव्हता, शेवटी रागाने ती ही म्हणाली..”मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेन तर काय करशील ?”
तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील ?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील ?
कोणाच्या आसवांना टिपशील ?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील ?
कोणाच्या ओठांवर हसू फ़ुलवशील ?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील ?
बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील, समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहिल. ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल, ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील, सांग तेव्हा काय करशील? कामात बुडवून जरी घेशील स्वत:ला माझी आठवण येताच मोबाईलवर लक्ष नकळत जाईल, पण तो वाजणार नाही तुला काहीतरी चुकल्यासारखे नक्की वाटॆल…सांग तेव्हा काय करशील?
मी नसेन तर, तुला चित्रपट रटाळ वाटेल, सुंदर धुनही बेकार वाटेल, पुस्तकही नाराज वाटेल, मनातून नक्की तळमळशील.. दिवसभर दुसऱ्यांच्या चाणाक्ष नजरेपासून लपशील, उगाचं किनाऱ्यावर माझी वाट बघशील…संध्याकाळी हुर-हुरशील, माझ्या आठवणींने बेचैन होशील…मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील, गर्दीतही एकटा राहशील, पुन्हा पुन्हा मागे पाहशील, मी नजरेस पडणार नाही, हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील आणि तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील. कुठेतरी तू लाख स्वत:ला रमवशील, दुसऱ्यांमध्ये स्वत:ला हरवशील, नवीन नात्यांना जोडशील.. पण खरच सांग “काय मला विसरू शकशील???”
हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी भरून आले, आणि तिला त्याने जोराची मिठी मारली , तो म्हणाला, “तुझे शब्द मला इतके भयानक टोचत होते जणू मी शेवटचे श्वास मोजत होतो, तुला हरवण्याची कल्पना इतका त्रास देत होती, तर तू खरच नसल्याने मी प्राणहीन देह सारखे होऊन जाईन गं! काहीहि होऊ दे पण आपण नेहमी सोबत राहू, एकमेकांच्या मिठीत हे आयुष्य घालवू, खरचं हृदयापासून तू मला हवी आहेस, आणि एक सांगू” ती बोलली काय.. तो म्हणाला ” Sorry, I Love you”..
कॉफी आणि बरचं काही | Coffee aani Barach Kahi Marathi Katha
त्याला ती एका पार्टीत भेटली खुप सुंदर होती. साहजिकच तिच्या मागे खुप जण होते. ती सुंदर होती, बुध्दिमान ही होती. सर्वांनाचं हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाचं जवळीक साधु देत नव्हती. तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या ‘कॉमनमॅन’ सारखा. त्याला तर त्याचे मित्र ही भाव देत नव्हते. मग ती मुलगी तर सोडूनच द्या.. त्या पार्टीत तिचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती! पण आपण धाडस करायचं, असं ठरवून, सारं बळ एकत्र करून त्यानं तिला विचारलं, ‘तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?’ तिला ‘नाही’ म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, ‘हो’ म्हणावसं वाटलं. ती ‘हो’ म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोपऱ्यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेना.. तो खुपच नर्व्हस झाला होता आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं ती सुध्दा अवघडली. “उगाच आली आणि याला हो म्हटलं,” असं मनात आलं तिच्या. कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेहऱ्याने टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, ‘थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय.’ सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले आणि ती सुध्दा.. वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना – “कैसे कैसे लोग आते है!” अशा अर्थाचा चेहरा ही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला. ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच “पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?” ”
माझं लहानपण समुद्रकाठी गेलं…” शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला… “सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत घरात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही आणि ते समुद्रकाठचे घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणाच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते…” हे सगळं तो भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला म्हणून तिचं ह्र्दय ही भरून आलं.
किती हळुवार होत त्याच मन. मग ती ही बोलली आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल तिच्या स्वप्नांबद्दल खरचं खुप छान डेट झाली ती. मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहिले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता, संयमी होता, हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं. चार- चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठ ही टाकायची त्या कॉफीत. अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी. काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
“माझी प्रिये, मला माफ कर. आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो. पहिल्यांदा आणि शेवटचं. आयुष्यभर ही खंत मला वाटत राहिलं. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही… केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने. प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरममध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती. त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं. खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती पण मला तु खुप आवडतेस… आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी पीत राहिलो. आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही. प्लीज – मला माफ करशील?” स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं.. म्हणून स्वप्नं पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे..
गोष्ट तिची त्याची आणि पावसाची | Marathi Love Story
उन्हाळा सरतो आभाळात काळे ढग जमू लागतात. उन्हाची झळ कमी होते. गार वाऱ्याची झुळूक मन उल्हासित करते. मग सहाजिकच तिला घेऊन डोंगर दऱ्यात, गार वाऱ्यात, पावसाच्या धारात जावं असं त्याला वाटतं. त्याचं हे असं आभाळासारखं भरून आलेलं मन तो तिच्या जवळ मोकळं करतो. ती ही त्याच्या सुरात सूर मिसळते, भरून आलेल्या आभाळाखाली पाऊस होऊ पाहते. नंतर मित्र मैत्रिणीं सोबत डोंगर दऱ्यात जाऊन पाऊस पाहण्याचा बेत ठरतो.
ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी सारे जमतात. हा आला तो आला ती आली आणि ती ही आली पण माझी ती कुठे आहे? तो बेचैन.
काय करावं?
मग तिला फोन करावं सुचलं, तिचं कारण नेहमीचचं. बाबा नको म्हणाले.
तो हिरमुसला.
आता कशाला जायचं पावसात?
ती नाही सोबत, मग कसं चिंब होता येईल आपल्याला रिमझिमणाऱ्या धारात ?
कोणाच्या काळ्याभोर केसातून ओघळणारं पाणी घेणार आपण ओंजळीत ?
आपल्या वाफाळलेल्या चहाच्या कपातला घोट आपण कोणाला देणार ?
आपल्या प्लेट मधली गरम भजी खाताना कोण भांडणार आपल्याशी ?
शी ! जाऊच नये आपण मित्रांसोबत. असे असंख्य विचार त्याच्या मनात येतात. पण सगळ्यांच्या आग्रहासमोर काहीच चालत नाही. मग तो जातो त्यांच्या सोबत. तो जातो खरा त्यांच्या सोबत. धापा टाकत सगळे डोंगर माथ्यावर पोहचतात. पण कसला पाऊस आणि कसलं काय.. सगळीकडे लख्ख ऊन. त्याच्या पोळलेल्या मनाला चटके देणारं. ऐन पावसाळ्यातही डोंगरमाथ्यावर चक्कं रखरखतं ऊन.
त्याला वाटतं ती सोबत नाही म्हणुनचं पाऊस आला नाही. पण घरच्यांची परवानगी घेवून ती उशिरा का होईना डोंगरमाथ्यावर पोहचते. आणि ती जेव्हा दूर वाटेच्या वळणावर त्याला दिसते तेव्हा त्याच्या ओठांवर तर हसू फुलतचं पण आकाशातला ढगांचं रूप घेवून आलेला घननिळा हसू लागतो. टपोऱ्या थेंबांच रूप घेवून तिला स्पर्शु पाहतो आणि रिमझिमत बरसतो. मग जे स्वप्न रंगवले ते पूर्ण होतात. केसातून ओघळणार पाणी घेणारं, चहाच्या कपातला घोट पाजणारं, आणि भजी घेताना भांडणार. अशी गोष्ट माझी तिची आणि पावसाची.
जीवापाड प्रेम करणारा | Lover of life Story in Marathi
होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप प्रेम करायचा. म्हणतात ना शोधणाऱ्यांना देव ही मिळतो. तसेच त्याने तिला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने तिला मिळवलं होतं. दोघेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे. तिचं जरा जास्तचं होत. पण काय करणार दोघांची ही भेट होणं शक्य नव्हते. कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला. फोन वर सवांद तसे दररोजचेच. पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे. पण एक दिवस पूर्ण नूरच पलटतो. त्याला अचानक रक्ताच्या उलट्या होतात.
त्याला डॉक्टर कडून समजतं की त्याला कर्क रोग झाला आहे आणि माझ्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत. तो तिला त्याचा रोग समजू देत नाही. कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो आणि तिच्या वाढदिवशी त्याला तिला पाहायचे असते.
तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात आणि त्याला कळून चुकलेले असते की आपली वेळ जवळ आली आहे. तो मनात विचार करतो की तिच्या वाढदिवशी आपण तिला शेवटचं पाहायचं आणि मगचं आपण आपले प्राण सोडायचे. सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट झाली होती. तिच्या कॉलेज मध्ये फंक्शन असल्यामुळे आपण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते… तो तिला शेवटचं विचारतो की तुला यायचं आहे की नाही. कसला ही विचार न करता ती त्याला नाही सांगते. वाढदिवसाचा दिवस उजाडतो.
ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात. हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ती त्याला विचारते काय करतोयस आणि हा शेवटी एवढचं म्हणायला जातो. तुझी वाट पा….. आणि जीव सोडतो त्याचे वाक्य पूर्ण झाले नव्हते. जेव्हा तिला कळतं की तो आता या जगात नाही राहिला त्या दिवसापासून ज्या ठिकाणी त्याने तिला भेटण्यासाठी बोलवलं असतं त्याच ठिकाणी ही प्रेमवेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते…फक्त ह्याच आशेने की तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल…पण म्हणतात ना…डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो. पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही..
तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही | Marathi Romantic Stories
त्या दोघांच बिनसलचं होतं गेले काही दिवस तो काहीही बोलला तरी ती त्याचा वेगळा अर्थ काढायची.. तो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण. ते भांडण मिटवायचं म्हणून तो तिला सिनेमाला घेऊन गेला. पण ती गप्पच होती, शांत होती, काहीचं बोलायला तयार नव्हती. तिचा चेहराचं सांगत होता की, तिचा निर्णय झालेला होता.. ते घरी परत जात होते. तो गाडी चालवत होता.
शेवटी न राहुन ती त्याला म्हणाली “मला वाटतं.., हे असं रेटण्यात आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही.. मला वाटतं आपण आपापल्या वेगळ्या वाटांनी जावं.. मी तसा निर्णय घेतलाय.. यापुढे आपण न भेटनचं योग्य. ते ऐकून त्याला धक्काच बसला.. त्याने गाडी स्लो करत रस्त्याच्या एका बाजूला नेऊन थांबवली त्याचे डोळे पाण्याने डबडबले, त्याने खिशात चाचपून पाहिलं. एक कागदाच चीटोर तिच्या हातात देत डोळे पुसले आणि ती चिट्ठी उघडून वाचणार तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली.. थेट यांच्या गाडीवरच येऊन आढळली..
त्या अपघातात ‘तो’ जागीच ठार झाला आणि तिला मात्र कीरकोळ जखम झाली. हातात ते चीटोर तसंच होतं ते एकदम उघडून तीन पाहिलं तर त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होत ‘तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही, तू सोडून गेलीस तर त्याक्षणी मी मरेन…!’ तो खरंच त्याक्षणी मेला होता.. प्रेम असं ही असतं जे मागू ते देऊन मोकळ होतं. मागायचं काय, मरणं की जगणं… हे प्रेम करणाऱ्यांनाच ठरवावं लागतं.
थोडी Touchy आणि थोडी lovely प्रेमकथा | Romantic story marathi
ती : यार मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.
तो : हा बोल?
ती : तु मला विसरून जा.
तो : काय? पागल झालीस काय? काय बोलतेस हे? मी तुझ्याविना राहणार कसा याचा विचार केलास तू ? यार I can’t live without you. Please असे नको बोलू.
ती : Sorry यार पण विसर मला आता. कधीच message नको करू मला. please bye.
.
.
( मध्यरात्री )
.
.
ती : झोपला नाहीस काय?
तो : नाही अजून
ती : Ok Bye..
तो : Bye..
.
.
.
( काही मिनिटानंतर )
.
.
.
ती : अजून पण नाही झोपलास ?
तो : नाही, पण तु तरी कुठे झोपली आहेस अजून.
ती : हो, मला झोप नाही येत म्हणून.
तो : का …?
ती : ( रागात ) तु मला Good night नाही बोलला अजुनपर्यंत खुप वेळांपासून विचार करते की, आता बोलशील पण तु आहेस की बोलतचं नाही.
तो : ओके बाबा, Sorry Good Night झोप आता. . :’)
ती : OK Good Night ..
.
.
( परत काही मिनिटानंतर )
.
.
ती : आता पण नाही येत झोप जसे रोज बोलतो तसे बोल ना Good night. मग झोप येईल बहुतेक.
तो : ओके पिल्लू, Good Night I Love You So Much
ती : बस बस… फक्त Good Night बोलण्यास सांगितले होते I Love You नाही.
तो : ओके बाबा Sorry तो मनामधे विचार करतो,
( पागल इतकं पण नाही समजत तुला, माझ्या “I Love You” शिवाय झोपू शकत नाहीस, मग माझ्या शिवाय आयुष्य कसे काढशील? )
प्रेम असावे तर कृष्ण आणि राधा सारखे | Pratilipi marathi love story
रुक्मिणी ने जेवणा नंतर श्री कृष्ण यांना दुध पिण्यास दिले. दुध जास्त गरम असल्यामुळे ते त्यांच्या हृदयास लागले आणि त्यांच्या मधुर वाणीतून “राधे” नाव बाहेर पडले.
हे ऐकून रुक्मिणी म्हणाली की,
“प्रभु ! असे काय आहे राधे मातेत?, जे तुमच्या एक एक श्वासात त्यांचेच नाव आहे. मी पण तर तुमच्यावर खूप प्रेम करते, परंतु तुम्ही मला कधीच हाक मारत नाही”
तेव्हा श्री कृष्ण म्हणाले की,
“ रुक्मिणी तुम्ही कधी राधा ला भेटले आहात का?”
(आणि श्री कृष्ण मनातच हसू लागले)
दुसऱ्या दिवशी रुक्मिणी राधा ला भेटण्यास त्यांच्या राजवाड्यात गेली.
त्यांना राजवाड्या बाहेरच एक सुदंर स्त्री दिसली.
त्या सुंदर स्त्री च्या चेहऱ्यावर तेज पाहून रुक्मिणीला वाटले हीच राधा असावी आणि ती तिथे जाऊन त्या स्त्रीच्या पाया पडते. तेव्हा ती स्त्री तिला विचारते की, “तुम्ही कोण आहात ?” तर ती म्हणते, “मी रुक्मिणी आणि ती तिचे येण्याचे कारण सांगते”. तेव्हा ती स्त्री म्हणते की, “मी तर राधा मातेची दासी आहे. राधा माता तुम्हाला या राजवाड्याच्या सात दरवाज्या नंतर मिळेल.” रुक्मिणी ने सात दरवाजे पार केले आणि प्रत्येक दरवाज्यावर एक सुंदर स्त्री बघून त्यांनी विचार केला की त्यांच्या दासी इतक्या सुदंर असतील तर, त्या स्वतः किती रूपवान असतील. जेव्हा त्या राधा मातेच्या कक्षात पोहचल्या तेव्हा त्यांनी बघितले की एक तेजस्वी असलेला चेहरा जो सूर्या पेक्षा जास्त चमकत होता. अत्यंत रूपवान असलेल्या राधा मातेचं त्यांना दर्शन झाले.
रुक्मिणीने त्यांचे चरण स्पर्श केले. तेव्हा त्यांनी पाहिले की राधा मातेच्या शरीरावर छाले पडले होते. त्यांनी राधा मातेला विचारले. “तुमच्या शरीरावर हे छाले कुठून आले.” तेव्हा राधा माता म्हणाली की, “माता तुम्ही काल श्री कृष्ण यांना दुध पिण्यास दिले आणि ते गरम असल्यामुळे त्यांच्या हृदयात लागले आणि त्यांच्या हृदयात नेहमी माझाच वास आहे. त्यामुळे ते गरम दूध मला लागले आणि माझ्या शरीराला छाले पडले.” रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी आले. ही प्रेमकहाणी आपल्याला अशी शिकवण देते की, नेहमी सगळ्यांच्या हृदयात रहा.
प्रेम करा पण प्रेमात Timepass नको | Marathi pratilipi love story
तो – I Love You
ती – फक्त एका अटीवर हो बोलेन.
तो – अट सांगून तर बघ.
ती – जर आयुष्यभर साथ देणार असशील तरच हो बोलेन.
तो – अगं राणी ही काय अट झाली का, मी तर सर्वस्व तुझाचं झा लोय गं, मला आता माझं उरलेलं आयुष्य तुझ्या सोबतचं काढायचं आहे.
(ती निर्भान होऊन त्याचा शब्द न् शब्द ऐकत होती, तिला विश्वास बसत नव्हता की कुणी तिच्यावर सुद्धा इतकं प्रेम करणार आहे, तिने एक ही क्षण न घालवता त्याला हो बोलून टाकलं, दोघे एकमेकांसोबत खुप खुश होते वेळ पण छान जात होता, गप्पा टप्पा, भेटी- गाठी, रूसवा-फुगवा, जे प्रेमात असतं ते सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं की अचानक तिला एक प्रश्न सारखा सतावू लागला, त्याने पण तिच्या मनातला अस्वस्थपणा बरोबर हेरला)
तो – काय गं पिल्लू काय झालं माझं काही चुकलं का?
ती – नाही रे तुझं काहीच नाही चुकलं.
तो – मग तू इतका विचार कसला करत आहेस, दोन दिवस झाले पाहत आहे मी तू खुप टेंशनमध्ये आहेस.
(त्याचे हे शब्द ऐकून तिच्या डोळयातून चटकन पाणी आले व ती बोलू लागली)
ती – तुझ्या घरचे मला Accept करतील ना रे… ..
तो – अगं बस एवढचं कारण आणि तू एवढं टेंशन घेतलं आहेस मी आजच बोलेन घरच्यांशी.
(एवढं बोलून तो निघून गेला, ती त्याच्या पाठमोरी आकृतीकडे पाहतच राहीली )
तो – आई बाबा मला तुमच्याशी खुप महत्वाचं बोलायचंय.
वडील- काय बोलायचंय.
आई – अरे बोल ना बाळा काय झालं.
तो – माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय….
(हे ऐकताच त्याच्या वडिलांना त्याचा खुप राग आला, त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या आवेशातच त्यांनी त्याच्या जोरात कानाखाली मारली, त्याची आई मध्ये आली व बोलू लागली)
आई – अरे तुला कळतंय का तू हे काय बोलतो आहेस, तुझी हिंमत झालीच कशी आमच्याशी असं स्वत:च्या लग्नाबद्दल बोलायची, हेच संस्कार दिलेत का आम्ही तुला, कोण कुठली मुलगी पसंत केली आहेस कुणास ठाऊक….
(“कोण कुठली मुलगी पसंत ……केली आहेस कुणास ठाऊक” हे त्याच्या आईचे शब्द त्याच्या कानावर पडताच त्याला राग अनावर झाला)
तो – आईईईईई…..! मला हवं तेवढं बोला पण प्लीज तिला नका काही बोलू, खुप खुप खुप चांगली आहे गं ती खुप प्रेम करते ती माझ्यावर….
(हे ऐकताच त्याची आई स्तब्ध झाली, तिला कळून चुकलेलं की त्याची काहीच चुक नव्हती तरीही आपण त्याला बोलत आहोत, पण त्याचे वडील काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते)
वडील- तू काहीहि बोललास तरी आम्हाला हे पटलेलं नाही, आता तू हा विषय काढून टाक डोक्यातून.
तो- बाबा जर हेच वाक्य मला जर बहिण असती आणि तिला वापरलं गेलं असतं किंवा तिला जर या परिस्थिती सामोरं जावं लागलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं…
(हे ऐकून त्याचे वडील त्याच्याकडे पाहतच राहिले, त्याने ही लढाई जिंकली होती, त्याने होकार मिळवला होता, त्याच्या आई वडिलांनी मुलीला न पाहता लग्नासाठी परवानगी दिली होती. आता तिची बारी होती घरी सांगायची, त्याआधी दोघांनी भेटायचं ठरवलं.)
ती- मला खुप भीती वाटत आहे रे, खुप कडक आहेत माझे बाबा, मला मारतील ते मी जर हा विषय काढला तर…
तो- मग काय करायचं ठरवलं आहेस.
ती- तू ये ना प्लीज माझ्या घरी, तू सुरूवात कर मग मी सांभाळून घेईन सगळं.
तो- PROMICE.
ती- हो रे बाबा PROMICE.
तो- ठीक आहे मी येतोय उद्या तुझ्या घरी, तू फक्त तयार रहा OK.
ती- OK..
(ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला, त्याने सगळी परिस्थिती तिच्या वडिलांना सांगितली तिच्या वडिलांचा रागाचा पारा चढला, तळपायाची आग मस्तकात, तिला जोरात हाक मारून बाहेर सगळ्यांसमोर बोलवण्यात आलं, ती थरथर कापत होती, दरदरून घाम आलेला, तिची अग्निपरीक्षा तर नव्हती पण त्यापेक्षा कमी पण नव्हती, ती बाहेर आली सर्वांसमोर, तिला विचारण्यात आलं की हा मुलगा जे बोलतो आहे ते खरे आहे काय, तिला फक्त हो किंवा नाही हे उत्तर द्यायचं होतं, त्याने त्याची कामगिरी एकदम चोख बजावली होती आता तिची बारी होती, तिने त्याच्याकडे पाहिले तो आशाभूत नजरेने तिच्याकडे पाहत होता बहुतेक त्याला कळून चुकलेलं की ती भितीपोटी माघार घेईल, वातावरण खुप तापलेलं होतं, सगळे तिच्या उत्तराची वाट पाहत होते, ती बोलू लागली) …
ती – बाबा खुप विश्वास आहे ना तुमचा तुमच्या लेकिवर, तर मग माझं पण हे कर्तव्य बनतं की माझ्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगावी जर मी तुम्हाला हे नाही सांगितलं तर मी तुमचा विश्वासघात केल्यासारखं होईल. बाबा तो जे जे बोलत आहे ती एक न् एक गोष्ट खरी आहे, हो प्रेम करते मी त्याच्यावर आणि तुमची परवानगीने मला लग्न करायचंय त्याच्याशी, प्लीज बाबा एकदा सकारात्मक पणे विचार करा आमच्या नात्याबद्दल आणि हो तुमच्या पद्धतीने त्याची कसोटी घ्या पण प्लीज एकदा त्याचा विचार करा…..
(तिच्या घरचे सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते अन् ती बेभान होऊन आपल्या प्रेमाची बाजू मांडत होती, आणि तो आनंदाश्रू ढाळत तिच्याकडे कौतुकाने पाहत होता, त्याला गर्व वाटत होता की एका खुपच जबाबदार व समजुतदार मुलीशी तो प्रेम करत होता) यानंतर काय…. अहो काय होणार तिचे वडिलांनी काहीच प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले व काही वेळांनी परत आले व तिच्याकडे पाहून एक मस्त स्माईल दिली, तिनेही जराही विलंब न करता बाबा अशी मोठी किंकाळी मारून बाबांना जोरात मिठी मारली…. मित्रांनो आता हे सांगायला नको की त्यांच लग्न झालं, प्रेम करायला सोपं आहे पण ते निभवायला वाघाचं काळीज लागते.
प्रेयसीत बायकोला बघा | Romantic story in Marathi
Romantic story in Marathi
|
फेसबुक वर Chat करणारी प्रेमिका भेटेल पण, प्रत्येक मिनिटाला तुमची काळजी करणारी बायकोसारखी प्रेयसी नाही.
हॉटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण, तुम्ही घरी येई पर्यंत जेवणासाठी वाट बघणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण, तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमच्या बाईक वर मागे बसून तुम्हाला घट्ट आवळून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण, तुम्ही प्रवासात असताना जेवले का म्हणून विचारणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमचे हातपाय दुखेल एवढी बेधूंद होऊन तुमच्या सोबत नाचणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण, कामावरुन थकून आल्यावर तुमचे हातपाय दाबून देणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमच्या बरोबर ज्युस पिणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण, तुम्ही ऊन्हातून आल्यावर माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
तुमच्या पैशाने खरेदी करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण, पैशाला पैसा जोडून काटकसरीचा संसार करणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
बरा होशील ना लवकर ? असं म्हणणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण, तुम्हाला ठेच लागली म्हणून डोळे भरुन येणारी बायको सारखी प्रेयसी नाही.
भेटायला यायला तुला किती वेळ लागेल? असं विचारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण, तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून उंबरठ्यावर उभी राहून वाट पाहणारी बायकोसारखी प्रेयसी नाही.
मी, माझी BIKE आणि ती | Romantic Love story in Marathi
Romantic Love story in Marathi |
ज्या दिवशी मी माझी Bike Book केली, सर्वात अगोदर मी तिलाच फ़ोन करून सांगितले. तिला सुरुवातीला मस्करी वाटली कारण लहानपणी मी तिला नेहमी सांगायचो की मी पुढच्या वर्षी Birthday ला Cycle घेईन, पण Birthday वर Birthday येऊन गेले पण माझी Cycle काही आली नव्हती. ती माझी चेष्टा करायला लागली होती. मी म्हणालो मग आता माझी Bike आल्यावर बघच तू.
शेवटी तो दिवस आला. धनतेरसच्या दिवशी मी माझी Bike घेऊन आलो. Bike आणल्यावर मी सर्वात अगोदर तिलाचा फ़ोन करून सांगितले आणि विचारले की Long Drive ला कधी जायचे आपण. ती म्हणाली जाऊ रे, इतकी काय घाई आहे. पण तिने आवडीने पेढे मागवून खाले
होते..
एक दिवस अचानक ती मला Area मध्ये भेटली.. मी तिला Bike वर बसायला सांगितले. ती माझ्या Bike वर बसली. Area मधूनच Round मारत असताना खूप ओळखीचे लोकं आम्हा दोघांना बघत होते. पण मी परवा केली नाही. Bike चालवताना तिला बोललो एक गोष्ट सांगू का? ती म्हणाली हो बोल ना…. मी म्हणालो, “माझ्या Bike वर बसणारी तू सर्वात पहिली मुलगी आहेस…..” ती एकदम खुश झाली आणि मला बोलायला लागली की, “तू आणि तुझी Bike खूप Lucky आहेत, कारण मी तुझ्या Bike वर बसणारी पहिली मुलगी आहे म्हणून ना…” आणि मी Lucky तर होतोच कारण मला तिलाच माझ्या Bike वर बसवायाचे होते. पण मुद्दाम मी तिला बोललो अरे मला माझे शब्द तरी पूर्ण करु देत…. मी म्हणालो, ” माझ्या Bike वर बसणारी तू सर्वात पहिली मुलगी आहेस, असे मी माझ्या Bike वर बसणाऱ्या प्रत्येक मुलीला बोलतो.” तसाच तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. ती चिडली माझ्यावर आणि मागे बसून माझ्या डोक्यावर टपल्या मारायला लागली. पाठीत बुक्के मारायला लागली. तिचा तो निरागसपणा माझ्या मनाला अजून भावून गेला. पण मी तिला बोललो नाही की ” अगं वेडे तूच पहिली मुलगी आहेस माझ्या Bike वर बसणारी, कारण तेव्हा मला काहीच सुचले नाही. मी तिचा चेहराच पाहत बसलो होतो.
तब्बल 2 महिन्याने आमचा तो Long Drive चा दिवस उजाडला. तारीख होती 20 डिसेंबर. त्या दिवशी नकळत का होईना एक अशी विचित्र घटना घडली की तो दिवस आयुष्यात कधीच मला विसरता येणार नाही. त्या दिवशी आम्ही दोघे समुद्रकिनारी फिरायला गेलो. माझ्या मनात विचार होताच की आज काही झाले तरी हिला सांगूनच टाकायचे की मी तिच्यावर प्रेम करतो ते. फिरता फिरता Beach वर वाटले की बोलून टाकू का एकदाचे? पण याच प्रश्ना बरोबर अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरायला लागले.. काय बोलू? सुरुवात कशी करू? कसे बोलू? ती माझ्यावर रागवणार तर नाही ना….? माझ्याशी बोलणे बंद तर नाही करणार ना….? माझ्यावर रूसणार तर नाही ना….? प्रेमाच्या आधारी मी माझ्या मैत्रिणीला गमावणार तर नाही ना….?
या सगळ्या प्रश्नात अडकून गेलो आणि दिवस कसा निघून गेला कळालेच नाही. माझे बोलायचे नेहमी प्रमाने राहून गेले. Beach वरुन आम्ही दोघे घरी जायला निघालो. निघताना मी माझे दोन्ही हात सोडून Bike चालवत होतो. तितक्यात अचानक एक गावामधून काही गाई रस्त्यावर आमच्या समोर आल्या आणि क्षणात आमच्या दोघांचे Accident झाले. मला क्षणभर काही सुचलेच नाही माझे हात-पाय थरथर कापत होते. काही कळलेच नाही की, अचानक हे काय घडले. मी माझी Bike सोडली आणि धावत-धावत तिला उचलण्यासाठी गेलो. ती रस्त्याच्या मधोमधच पडली होती. तिला उचलले. तिच्या पायाला मुका मार लागला होता. तिला नीट चालायला ही जमत नव्हते. ती रडकुंडीला आली होती. तिच्या हातावर सुद्धा काही घाव झाले होते. तिचा एक हात मी माझ्या खांद्यावर टाकून तिला Bike पर्यंत घेऊन आलो. मी तिला म्हणालो घाबरू नकोस आपण डॉक्टर कड़े जाऊया. मी Bike Start केली आणि तिला बसायला सांगितले. पण तिला Bike वर चढायला ही जमत नव्हते. मी Bike वरून उतरलो. Bike Stand ला लावून मी तिला उचलून घेतले आणि मागच्या Seat वर बसवले आणि आम्ही दोघे निघालो. दवाखाना शोधत खूप फिरलो पण Sunday असल्याने सर्व दवाखाने बंद होते. नशिबाने एक हॉस्पिटल खुले भेटले पण तिथे डॉक्टर आला नव्हता. तिला Bike वरून उतरवले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. नर्सने तिला चेक केले आणि दोघांना मलम-पट्टी केली. नर्स बोलायला लागली की तिला Admit करावे लागेल. आज डॉक्टर येणार नाहीत उदयाच पूर्ण Checking होईल आणि Report मिळेल. मी तिला बोललो Admit व्हायला पण तिने नकार दिला आणि बोलली जर डॉक्टर येणार नसतील तर कशाला? उदयाच जाईन मी डॉक्टर कड़े… आता आईला काय उत्तर देऊ? काय झाले? कसे झाले? काय सांगू तिला? मी तिला परत फ़ोर्स केला की जर जास्त Pain होत असेल तर Admit हो. मुका मार लागला आहे तुला, आणि जर Facture असेल तर? मी करतो तुझ्या आईला फ़ोन आणि सांगतो खरे-खरे. पण ती काही ऐकतच नव्हती. मग आम्ही दोघे निघालो हॉस्पिटल मधून. मी एका Chemist च्या दुकानात Bike थांबवली. तिथून एक Pain-Killer Spray घेतला आणि काही Cotton पट्ट्या घेतल्या आणि तिला घेऊन खाड़ीवर घेउन गेलो. तिला Bike वरून उतरवले आणि तिला घट्ट पकडून चालत खाडीच्या कट्ट्यावर घेउन गेलो. या दरम्यान सगळी येणारी जाणारी माणसे, Couples, मुलांचे क्रिकेट, फूटबाल खेळायला आलेले Groups सगळे आमच्याकडे बघत होते. मी जगाची परवा केली नाही कारण त्या क्षणी मला तिची परवा होती. तिला मी कट्ट्यावर बसवले आणि Spray मारून अर्धा- एक तास तिच्या पायाची मालिश करत होतो. तिला त्या असह्य वेदना सहन होत नव्हत्या म्हणून मी तिची हलक्या हाताने मालिश करत होतो. मालिश केल्यानंतर तिचा पाय थोडा फार Move करायला लागला होता. तिला थोडेफार चालायला जमत होते. नंतर मी तिला घरी सोडले.
हा दिवस मी आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि कदाचित ती पण नाही. त्या दिवशी पहिल्यांदा ती माझ्या इतक्या जवळ आली होती. तिचा तो स्पर्श आज ही माझ्या मनात कायम आहे. आणि त्या दिवशी वापरलेला Spray आजपर्यंत मी वापरला नाही. आजही मी तो Spray माझ्या Medicine Drawer मध्ये जपून ठेवला आहे. ही तर पहिली आठवण होती मित्रांनो, अजून खूप आठवणी त्या Spray सारख्या माझ्या मनात लपवून ठेवल्या आहेत.
माझ्या अबोल भावना | Pratilipi marathi prem katha
Pratilipi marathi prem katha |
असं वाटतं तिला बोलून टाकावं…
मनातलं वादळ शांत करावं…
पण भीती एकच…
माझी थोडी घाई करण्याची…
आणि ती दूर जाण्याची…
हल्लीच कुठे आमची भेट झाली आहे…
मनात तिची एन्ट्री अगदी थेट झाली आहे…
मला सांगायचं आहे तिला..
कि आयुष्यभर तुझा हात माझ्या हातात हवा आहे…
खूप प्रामाणिक हृदय आहे माझं.. जरी माझा चेहरा तिच्यासाठी नवा आहे…
भीती वाटते
पुन्हा एकदा प्रेमात पडून break up होण्याची… म्हणून हिम्मतही होत नाही आता या प्रेमवीराची…
म्हणून समजून घे मला कि का नाही मनातलं आणू शकलो या ओठांवर… पण प्रयत्न नक्की करेन… पुन्हा एकदा भेटल्यावर…
तसं तिलाही माहित आहे… माझ्या मनात काय आहे… फक्त आयुष्यभराची साथ हवीये… या emotional सागराला…
खूप नशीबवान समजेन मी स्वतःला…
जर तिचं प्रेम असेल माझ्या साथीला…
इतकच सांगायचं आहे मला कि खूप प्रेम आहे या हृदयात … जे प्रामाणिक पणे तिच्या स्वाधीन करायचं आहे… आणि ही कविताच मदत करेल… माझ्या अबोल भावना तिला कळवायला…
तो पावसात आणि ती त्याच्या प्रेमात | Marathi love katha
तो???? आणि ती???? दोघेही एकाच ऑफिसमध्ये कामाला असतात…
त्याच्याकडे रेनकोट असतो..
पण ते तो बॅगेतच???? ठेवतो आणि भर पावसात☔ उगाच भिजतो…
कारण त्याला माहित असतं कि त्याला पावसात भिजताना पाहून ती त्याला स्वतःच्या छत्रीत ????नक्कीच घेईल…
आणि पुढचं काय ते तुम्हाला इथे सांगायची गरज नाही…
ही तर नेहमीची ट्रिक झाली…
आता एक नवीन ट्रिक????…
पाऊस ☁☔जोराचा पडतोय..
पण ती निघायच्या आधी तो तिची छत्री???? लपवून ठेवतो..
तिला छत्री काही केल्या सापडत नाही…
आता ती या विचारात आहे कि घरी???? कसे जायचे..
तो येतो आणि तिला स्वतःचा रेनकोट देऊ करतो…
ती आधी नाही म्हणते पण शेवटी ती तयार होते…
आता दोघेही???? पावसात आहेत..
दोघेही भिजत आहेत…
तो पावसात आणि ती त्याच्या प्रेमात????…
टीप:
१. पावसात जरासे भिजल्यामुळे सर्दी-ताप ज्यांना होतो त्यांनी जरा जपून..????
२. छत्री लपवून ठेवणे हे चुकीचे आहे पण प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असतं असं तुम्ही कुठेतरी वाचलेलं असेलच…????
एक निस्सीम प्रेम | Sad love story in marathi
आज मी एका गडबडीत आहे, कारण माझा आज वाढदिवस आहे, मी कामावरुन आज थोडं लवकरच आलोय. रोज ती मला CST वर भेटते ना आणि मग आम्ही तेथुन मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो.
ती एक अकांउटंट असल्या कारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते साडेसात अशी असते आणि मी मॅकेनिकल इंजिनियर असल्याने मी ही याच वेळेत रीकामा असतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो. तेव्हापासुन आमची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मी CST वर पोहोचलोय, रेल्वे अशी समोर येऊन थांबली, आज तिला प्रपोझ करायचं हे आधीच ठरवलं होतं मी, रेल्वेतुन उतरताना मी तिला पाहीलं आज तिला पाहताच जीव खालवर होत होता भीतीने, तिने माझ्यासाठी एक फुलांचा गुच्छा आणला होता, ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छा देत म्हणाली Many many happy Returns of the day Sachin.. मी तिला म्हणालो, थँक्स ती म्हणाली अरे थँक्स कसलं आलं त्यात, आपण कॉलेज फ्रेंडस आहोत ना, मग असं थँक्स म्हणायचं नाही हं…
मी : हो. मला तुला काही विचाराचंय.
ती : हो मग विचार ना…
मी : पण मला पहिले तु वचन दे की काही झालं तरी तु माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तु जशी रोज भेटत असतेस तशी रोज भेटत राहशील.
ती : अरे आज तु असं का बोलतोयस….
मी : ते कळेल तुला पण पहिले मला वचन दे….
ती : बरं दिलं वचन.. मी काही झालं तरी भेटत राहीन तुला
मी : ठीक आहे, हा गुच्छा तुझ्या हातात धर, मी गुच्छा तिच्या हातात दिला आणि, मी तिच्यासाठी आणलेला एक गुलाब बाहेर काढला, आणि तो दोन्ही हातात धरुन मी पुढे केला आणि म्हणालो, तु मला कॉलेजमध्ये असल्यापासुनच आवडायचीस, पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगु शकलो पण आता सांगतोय, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, तु माझं प्रेम स्वीकारशील का ? त्यानंतर एक अलगद हात माझ्या खांद्यावर येऊन पडला, अरे सचिन हे फुल घेऊन तु इथे काय करतोयस…? माझा 3rd year मधला एक क्लासमेट समीर तिथे आला होता, कदाचित तो खुप वेळ आमच्याकडे बघत असावा, अरे मी तर इथे हिला…. (मी जिकडे बघत होतो तिथे कोणीही नव्हतं) अरे इथेच होती ती कुठे गेली. माहित नाही रे.. तो म्हणाला OK ठीक आहे. शांत हो बस इथे…
मीः का..?
तोः सांगितलं ना एकदा मी बस म्हणुन आलोच मी,,
(तो थोडा वेळ कुठेतरी गेला, माझी नजर तिलाच शोधत होती, ती कुठे दिसत नव्हती तो नंतर तिथे आला आणि मला चल म्हणाला मी काहीही न विचारता त्याच्या मागे गेलो, त्याने मला CST च्या एका कोपऱ्याला नेलं, तो म्हणाला हे समोर जे लिहीलंय ते एकदा वाच, तिथे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या नागरीकांची लिस्ट होती, आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं ते वाचुन माझे डोळे पाणावले, मी आत्ताच जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं, यावर माझा विश्वासच बसत नव्हता, मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवुन रडु लागलो त्याने मला सावरलं आणि तो बोलु लागला. मी एक प्सायकॅट्रीस्ट आहे सचिन, आणि मघाशी तुझे ते एकटेच असे हातवारे करणं बघुन मला तु मनोरोगी असल्याचा संशय आला. म्हणुनच तर तुला मी तिथे बसवुन, इथल्या काही अधिकाऱ्यांकडे तुझी चौकशी केली, त्यांनी मला सांगितलं कि तो वेडा आहे, आणि रोज इथे येत असतो. त्या बाजुच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितलं कि तीन वर्षापूर्वी तु जेव्हा त्या मुलीला फुल देत होतास, तेव्हा अचानक एका मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटुन, भिंतीत घुसली, त्यातुन रक्ताच्या एका थेंबाचा ओघळ येत होता त्या भिंतीवरुन कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटुन न जाता त्या मुलीच्या हृदयातुन आरपार गेली होती, तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता, दहशतवाद्यांनी CST वर केलेल्या हल्यात तुझ्या समोर, तुझ्या मिठीत तिने डोळे मिटले.. याचा तुला मोठा धक्का बसला, आणि तेव्हापासुनच तुला वाटतंय की ती जिवंत आहे आणि तुला दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे असंच तुला वाटतंय….
समीरने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्या मनावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो. जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो, समीर तिथे आला आणि त्याने मला बेड टी देऊन morning विष केलं आणि तो म्हणाला आजपासुन तु वर्षभर इथेच राहुन माझी ट्रिटमेँट घेशील, पुर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथुन जाऊ देणार नाही मित्रा.. मी होकारार्थी मान हलवली, कारण मला त्यानं सांगितलं की मी मानसिक रोगी आहे आणि तो मला या रोगातुन बरं करु शकतो….
आज एका वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे. तेच गुलाबाचं फुल घेऊन. नाही तसं काही नाहीये मी पुर्ण बरा झालोय.. मला माहिती आहे ती आज येणार नाही. आज तिचा स्मृतीदिन आहे, हे फुल तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणलंय एक आठवण म्हणुन.
गोष्टीतले प्रेम | Romantic story to read in Marathi
कदाचित ही गोष्ट फारच जुनी आणि प्रत्येकाने ऐकलेली असावी, पण ज्या ज्या वेळी ती ऐकावी त्या त्या वेळेला मनाला चुटपूट लावून जाणारी. असेच काहीस घडले प्रियाच्या आयुष्यातही, प्रिया खूप हुशार, खूप बोलणारी, मन मिळावू आणि खुप सुंदर, तिचे हसणे एवढे मोहक की दु:खही पळून जाणारे, वडिलांच्या निधनानंतर स्वतःला खुप मोठी समजायला लागली होती. तिच्या चाणाक्ष बुद्धीची कदाचित कल्पनाही करता येणार नाही पण, समोरच्या व्यक्तीच्या मनी काय आहे हे त्याला पाहताच ओळखणारी, घरच्या परिस्थितीने गांजलेली पण, तरीही आकाशाला झेप घेणारी स्वप्ने पाहणारी अशी ही प्रिया सर्वांनाच हवी हवी असणारी.
प्रिया कॉलेजमध्ये असताना शांतच असायची त्यामुळे तिला कोणी तिचे कॉलेजचे मित्र मैत्रिणी जास्त ओळखत नव्हते, पण कॉलेज संपल्यावर आणि तिच्या वडिलांच्या निधनानंतर ती तिच्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणीबरोबर फोन वर गप्पा मारू लागली होती कारण फोन वर बोलून ती स्वतःचा विरंगुळा करत होती. असेच एकदा सोशल नेटवर्किंग साइट्स वरून तिची ओळख, तिच्याच कॉलेज मधला मित्र आदित्यशी झाली, आदित्य खूप प्रेमळ, खूप समजंस आणि खूप साधा, चांगुलपणाचा तो एक मूर्तिमंत उदाहरण होता.
कॉलेज मध्ये शांत असणारी प्रिया आता आदित्यशी फोन वर तासनतास गप्पा मारत होती, ज्या ज्या वेळी त्यांना वेळ मिळे, त्या त्या वेळी ती दोघे फोन वर बोलत होते, त्यांच्या गप्पा एवढ्या रंगायच्या की त्यांना वेळेचे आणि भुकेचे भानही नसायचे. असेच एकदा आदित्यने प्रियाला मन आणि प्रेमाची गोष्ट सांगितली, आदित्य तिला सांगतो. ” मन आणि प्रेम हे दोघे जिवलग मित्र असतात त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते, एके दिवशी ती दोघे बागेत खेळायला जातात आणि लपाछपी खेळायला सुरुवात करतात. लापाछपीच्या त्यांच्या खेळामध्ये राज्य प्रेमावर येते आणि मन लपायला एक काटेरी झुडूप निवडते, मन एका काटेरी झुडुपामागे लपल्या मुळे प्रेमाला जास्त संशय येत नाही कारण त्याला असे वाटते मन एवढी नाजूक आहे की, ती काटेरी झुडुपामागे लपुच शकत नाही. म्हणून प्रेम प्रत्येक काठेरी झुडुपाला काठीने मारत असतो. प्रेम मनाला खूप शोधतो आणि शेवटी तो त्या काटेरी झुडुपामागे येतो. पाहतो तर काय त्याची मन विव्हळत होती, तिचे डोळे रक्ताने माखलेले होते, प्रेम खूप घाबरतो. खूप आरडा ओरडा करतो, पण प्रेमाची मदत करायला कोणीच पुढे येत नाही, शेवटी प्रेम मनाला घेवून डॉक्टर कढे जातो.. डोळ्यात काटे गेल्याने मन आंधळी होते, मनाचे डोळे जातात, म्हणून मग प्रेम मनाला आपले डोळे देते आणि म्हणूनच प्रेम आंधळे असते आणि त्यानंतर मन आणि प्रेम खूप सुखाने राहतात.. प्रियाला तशी ही गोष्ट नवीनच होती, तिने पहिल्यांदा ऐकली होती..पण ही गोष्ट ऐकून भावूक प्रिया स्तब्धच झाली होती आणि ह्या गोष्टीनंतर ती आदित्यच्या केव्हा प्रेमात पडली हे तिला देखील कळले नाही, आता मात्र प्रियाला फक्त आदित्यशीच बोलावेसे वाटत होते,, तसा आदित्य तिचा कॉलेज मित्र.. पण तरीही त्या दोघांनीही एकमेकांना पाहिलेले नव्हते.
कदाचित त्यांच्या रोजच्या फोनवरच्या बोलण्यामुळे आदित्यलाही प्रिया आवडायला लागली होती, असेच एके दिवशी प्रिया आदित्यला आपल्या मनाच्या भावना फोनवरच व्यक्त करते तिला वाटले, आदित्य ही तिच्यावर प्रेम करतोय पण आदित्यने तिला नकार दिला पण, तरीही आदित्य प्रियाला म्हणाला, ”मला तुला एकादा मिठीत घ्यायचंय”, दुसऱ्याच दिवशी आदित्यच्या मित्राची लग्नाची पूजा असते, आदित्य प्रियालाही आमंत्रण करतो. तसेही आदित्यला भेटण्यास प्रिया उत्सुक असते, प्रिया नटून थटून आदित्यच्या मित्राच्या पूजेला जाते वाटेतच ती आदित्यला भेटते, खूप खुश होते. त्याला पाहून तिच्या मनात काहूर माजतो पण एक विलक्षण भीती ही तिला जाणवत होती, पण आदित्यला पाहून ती त्याच्याकडे ओढली जात होती कदाचित आदित्यचेही हेच झाले होते प्रियाची सुंदरता व मोहकता पाहून तो ही त्याच्या मनाला नाही आवरू शकला आणि ते दोघे समुद्रावर, फिरायला जातात, पाहताच क्षणी ते दोघे एकमेकांचे झालेले होते, प्रत्येक प्रेमी युगुलांप्रमाणे तेही प्रेमाच्या, बाहुपाशात वचनबद्ध होतात.. आज प्रिया खूप खुश होती, तशी आदित्यची अवस्था पाहण्या जोगी नव्हती आदित्य ही खूप खुश होता, शेवटी अती रात्र झाल्यामुळे ते आपापल्या घरी निघतात, दुसऱ्या दिवशी प्रिया आदित्यच्या फोनची आतुरतेने वाट पाहत होती आणि आदित्यचा फोन येतो प्रिया खूप उत्सुक होती त्याच्याशी बोलण्यात, कारण आता त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालेले होते.. पण ज्यावेळी आदित्यचा फोन येतो तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते, आदित्य प्रियाला म्हणतो, “माझे खूप प्रेम आहे, अगदी जीवापाड प्रेम करतो मी तुझ्यावर, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत” त्याचे तो तिला कारण ही सांगतो आदित्यच्या मोठ्या भावाचे, म्हणजेच जितेंद्रचे सोनाली नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम होते त्यांचे प्रेम अगदी लहानपणापासून होते ज्या वेळी जितेंद्र त्याच्या आई वडिलांना ही गोष्ट सांगतो तेव्हा समाजाच्या विचाराने त्याच्या आईला हृदय विकाराचा झटका येतो त्यामुळे त्यांचे लग्न नाही झाले, आणि ह्या मुळे आदित्य ही प्रियाशी लग्न नव्हता करणार.. तरीही आदित्य आणि प्रिया एकमेकांना भेटत होते, फिरायला जाणे चित्रपट पाहणे हे त्यांचे नेहमीचे झाले होते.
प्रिया आणि आदित्यच प्रेम दिवसेंदिवस बहरत होते आणि एके दिवशी आदित्यच्या बाबांनी आदित्य चे लग्न ठरवले, ती मुलगी आदित्यच्या गावाची होती आदित्य ने ही त्या मुलीला होकार दिला. आता मात्र आदित्य प्रियाला टाळू लागला होता तो तिच्याशी तुसडेपणाने बोलत होता पण, त्याचा काही परिणाम प्रियावर होत नव्हता, ती रडत असे भांडत, असे पुन्हा त्याला फोन करून त्याच्याशी बोलत असे. लग्न ठरल्यानंतरही प्रिया आणि आदित्य एकमेकांना भेटत होते, तेच नाते, तेच प्रेम त्यांच्यामध्ये आजही होते, जस जशी आदित्यच्या लग्नाची तारीख जवळ येत होती, तस तसे प्रियाचे प्रेम फक्त वाढतच चालले होते प्रियाला आता आदित्य शिवाय राहणे खूप कठीण होवून बसले होते आणि एकेदिवशी तिला आदित्यच्या लग्नाची तारीख समजते प्रियाला खूप त्रास, होत होता म्हणून ती कसला ही मागे पुढे विचार न करता आदित्यला लग्नापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्यामुळे ती आदित्यच्या आणखीणच जवळ गेली. आदित्यने लग्न मोडावे म्हणून ती आदित्य ला विनवणी करू लागली पण घरच्या परिस्थितीने, गांजलेल्या आदित्यच्या हातात काहीच नव्हते, कारण एका बाजूला त्याचे आई बाबा तर एका बाजूला त्याची प्रिया, लग्नाचे दिवस जस जसे येत होते तस तसे प्रिया आजारी पडू, लागली होती पण तरीही ह्याचा आदित्यवर काही परिणाम होत नव्हता आणि शेवटी आदित्यच्या लग्नाचा दिवस उजाडला, आता मात्र सगळे प्रियाच्या आणि आदित्यच्या हाताबाहेर गेलेले होते, प्रिया खूप रडत होती काय करावे तिला सुचत नव्हते आणि जे होवू नये तेच घडले अति रडल्यामुळे आणि अति विचारामुळे प्रियाचा ब्रेन हेमरेज झाला आणि ती गेली. पण शेवटच्या क्षणालाही प्रिया आदित्य ने तिला सांगितलेल्या, मन आणि प्रेमाच्याच गोष्टीचाच विचार करत होती, कारण तिला तिच्या प्रेमाने अर्धवट साथ दिली होती. तिच्या मरणाने आदित्यची अवस्था पाहण्यास किंवा तो खुश आहे की दु:खी हे पाहण्यास ती राहीली नाही. तिने तिच्या घरच्यांचा आणि ह्या जगाचा कायमचाच निरोप, घेतला होता, कारण गोष्टीतल्या प्रेमाची तुलना तिने तिच्या आदित्यशी केली आणि आदित्यचे प्रेम तिला खोटे वाटले. पण, तरीही प्रियाला शेवटच्या क्षणी सुद्धा तिचे मरण आदित्यच्या बाहुपाशात व्हावे असेच वाटत होते, आणि शेवटची ती इच्छाही पूर्ण करण्यास आदित्य अपयशी ठरला होता.
प्रेम हे जात आणि धर्म बघत नाही | Romantic love story in marathi language
आपण नेहमी प्रेमकथा वाचतो आणि आपल्याला ती प्रेमकथा वाचून आनंद सुद्धा होतो. कारण आपण ती प्रेमकथा वाचत नसून जगत असतो. आयुष्यात सगळ्यांना कोणावर तरी प्रेम होतेचं आणि अशा व्यक्ती वर जी नेहमी आपल्याला आपलीशी वाटते. तिच्या सुखासाठी आपण काही ही करायला तयार असतो. तिच्या आनंदामध्येच स्वतःचा आनंद समजून जगत असतो. प्रेमात कधीही आपण जात किंवा धर्म बघत नाही.
जोयाच्या वडिलांचे बदली त्यांच्या गावातून दुसऱ्या शहरात झाली होती. म्हणून जोयाचे अॅडमिशन त्या नवीन शहरात करण्यात आले. पण काही कारणावरून परत जोयाच्या वडिलांचे बदली त्यांच्या गावीच झाली. पण जोयाचे अॅडमिशन इथे झाले होते. तर आता जोयाच्या शिक्षणासाठी काय करावे हा प्रश्न त्यांना पडला. तर जोया म्हणाली की, “मी येथे आत्या कडे राहते एक वर्ष आणि पुढच्या वर्षी परत आपल्या गावी येते”. मग तिच्या वडिलांनी जोयाला तिच्या आत्याकडे सोडले. कॉलेजचा पहिला दिवस होता. जोया कॉलेजला गेली. तिथे तिने खूप साऱ्या मैत्रिणी बनवल्या. तिच्या वर्गात एक साईराज नावाचा मुलगा होता. तो तिला चोरून चोरून बघायचा. त्याला तिचे नाव माहित नव्हते. ती जेव्हा कॉलेजला यायची तेव्हा तो तिची वाट बघत गेट जवळ बसायचा. जेव्हा ती घरी जायची तेव्हा ही तो गेट जवळ तिची वाट पाहायचा. जोया त्याच्याच वर्गात आहे हे त्याला माहित नव्हते.
एक दिवस त्याला माहित पडले की ही मुलगी त्याच्या वर्गातलीच आहे. तेव्हा पासून तो सगळे lecture बसायचा. तो तिलाच बघत राहायचा. एक दिवस हे जोयाला कळाले की हा मुलगा आपल्याला बघत असतो. तिला भीती वाटायला लागली. म्हणून ती दुसऱ्या दिवशी पासून गुरखा घालून यायला लागली. साईराज बिचारा तिची वाट पाहत होता. पण त्याला कुठे माहित जी गुरखा घालून आहे तीच जोया आहे. असे खूप दिवस झाले. जोया त्याला नेहमी बघायची की तो माझीच वाट पाहत आहे. तिला वाईट वाटले. ती दुसऱ्या दिवशी पासून गुरखा घालून यायचं बंद झाली. जेव्हा साईराज ने जोयाला पाहिले तर त्याला राहवले नाही तो तिला जाऊन म्हणाला की, “एवढे दिवस तू कॉलेजला का नाही आलीस” ती म्हणाली की, “मी यायची, पण गुरखा घालून यायची” तो म्हणाला, “ का गुरखा का तू मुसलमान आहेस का?” ती हो म्हणाली. तेव्हा त्याला खूप भीती वाटली की मी जिच्यावर प्रेम केलं ती दुसऱ्या धर्मातली होती आणि हे माझ्या घरी कधीच चालणार नाही. तेव्हा तो तिथून निघून गेला. जोयाला वाईट वाटले की हा असा अचानक का निघून गेला. ती एकदम कासावीस झाली. खूप दिवस तो कॉलेज ही आला नाही. कदाचित तिला त्याच्याविषयी काही तरी वाटत होते.
एक दिवस तिने त्यांच्या मित्रांना विचारले तेव्हा ते म्हणाले की तो गावी गेला आहे. जेव्हा तो कॉलेजमध्ये आला तेव्हा ती जाऊन त्याला म्हणाली की, “एवढे दिवस तू कुठे होतास आणि त्या दिवशी अचानक निघून का गेलास?” तो काहीच म्हणाला नाही आणि तिथून निघून गेला. ती धावत त्याच्या मागे गेली आणि त्याला म्हणाली की, “मला तुझ्याशी काही तरी बोलायचे आहे. आज संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर मला पाठच्या गार्डन मध्ये भेट मी तुझी वाट पाहीन”. नंतर ती तिथुन निघून गेली. दोघेही एकाच वर्गात असून सुद्धा त्यांनी एकमेकांना पहिले नाही. जोयाला वाटत होते की तो येणार नाही तरी सुद्धा आपण जाऊन तिथे वाट बघूया. कॉलेज सुटले आणि ती गार्डन मध्ये जाऊन त्याची वाट पाहू लागली.
एक तास होऊन गेला होता अजून सुद्धा तो आलाच नव्हता. तिने विचार केला की आता निघायला हवे. जेव्हा ती तिकडून घरी जायला निघाली तर समोरच तो उभा होता. त्याला बघून तिला खूप आनंद झाला. ती धावत त्याचा कडे गेली आणि म्हणाली की, “एवढा उशीर का झाला.” तो म्हणाला की “तुला काही तरी बोलायचे होते ना ते आधी बोल.” ती म्हणाली की, “मला माहित होते तू मला कॉलेज चालू झाल्यापासून बघत होतास. वर्गात पण lecture चालू असताना सुद्धा मलाच बघायचा. मला भीती वाटायला लागली म्हणून मी गुरखा घालून यायची. पण तू माझी एवढा आतुरतेने वाट पाहायचा आणि मी तुला दिसायची नाही हे तुझ्या डोळ्यातले विरह पाहून मला खूप वाईट वाटले आणि दुसऱ्या दिवशीपासून गुरखा नाही घालायचे असे ठरवले. पण ज्या दिवशी तुला कळले की मी मुसलमान आहे तर तू तेव्हापासून मला बघायचे सोडून दिले आणि अचानक तू तुझ्या गावी गेलास. मला खूप वाईट वाटले कारण मला तुझी सवय झाली होती आणि तू अचानक बदललास आणि तू यायच्या आधी मला असे वाटले की तू नाही येणार म्हणून मी निघून जात होते पण तू आलास. कदाचित मी तुझ्यावर प्रेम करू लागली आहे. मला तुझे नाव सुद्धा माहित नाही आहे. तरीही तू मला आवडायला लागला आहेस. माझे बोलून झाले आहे मी जाते आता. मला माहित आहे मी दुसऱ्या धर्माची आहे आणि आपले लग्न कधीच होऊ शकणार नाही. काळजी घे”. ती जाण्यास निघते तेव्हा साईराज तिचा हात पकडतो आणि बोलतो “आता मी काही बोलू.” तेव्हा ती खाली मान घालूनच हो बोलते कारण तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला दाखवायचे नव्हते.
तो म्हणतो “अगं वेडी, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तेव्हा तर मला तुझे नाव आणि तुझा धर्म सुद्धा माहित नव्हता. तरीही सुद्धा मी तुझ्या प्रेमात पडलो. जेव्हा मला माहित पडले की तू मुसलमान आहेस तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्या आई वडीलांना समजवले की माझे प्रेम आहे आणि तुझ्या गावाची माहिती काढून तुझ्या घरी गेलो. तेथे तुझ्या आई वडिलांना विनंती केली की मला तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि हे तिला सुद्धा माहित नाही. त्यांनी लगेच परवानगी दिली नाही. त्यांनी मला सांगितले की जर माझी मुलगी तुझ्यासोबत सुखाने राहील तर आमची काही हरकत नाही. फक्त एकच अट आहे तिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असावे. त्यासाठीच मी जेव्हा इथे परत आलो तेव्हा तुझ्याशी काहीच बोललो नाही. कारण मला तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम निर्माण करायचे होते आणि आज तू स्वतः मला भेटण्यास बोलवले आणि हो मला माफ कर मी एक तास उशिरा आलो, पण तुझ्यासाठीच. त्याने त्याचा खिशातून एक सोन्याची रिंग काढली आणि एका पायावर खाली बसून तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला Will You Marry Me. जोया खूप रडायला लागली आणि तिने त्याला मिठी मारली आणि म्हणाली की हो आणि अल्ला या जन्मा नंतर जितके जन्म मला देईल ते तुझ्यासोबत घालवेन हे वचन मी तुला देते.
प्रेम हे दिसण्यावरून नाही तर मनावर होते | Marathi romance katha
Marathi romance katha |
प्रेम हे कधी रूप, रंग आणि कोणतीही कमी बघत नाही. प्रेम खरं तर मनावर होतं. प्रेम ठरवून करता येत नसलं तरी एखाद्या सोबत ठरवून आयुष्य जगता येतं.
प्रसन्नाला कविता लिहण्याचा खूप छंद होता. ती तिच्या कविता सोशल मिडीयावर पोस्ट करायची. तिच्या कवितांना खूप Likes मिळायचे. तिच्या कविता होत्याच खूप भावनिक की कोणीही त्या कवितेत भावून जाईल. तिच्याच एका सोशल मिडीयावरील सागर नावाच्या मुलाला तिच्या कविता खूप आवडायच्या. जेव्हा जेव्हा ती तिच्या कविता पोस्ट करायची. तेव्हा तेव्हा तो ती कविता त्याच्या एका बुक मध्ये लिहून ठेवायचा.
तिच्या या कवितांमुळे ती त्याला खूप आवडायला लागली. त्याने तिला कधीच पाहीले नव्हते. तो नेहमी तिच्या कवितांवरून तिचे रूप मनात रंगवायचा. एवढी सुदंर कविता लिह्णारी किती सुंदर असेल असे तो विचार करायचा. तो तिच्या प्रत्येक कवितांच्या पोस्ट वर कमेंट करायचा. एक दिवस त्याने तिला मॅसेज करायचे ठरवले. त्याने हिम्मत धरून तिला सोशल मिडीयावर Hi हा मॅसेज केला. प्रसन्ना ने त्याचा मॅसेज पाहिला आणि तिने सुद्धा रिप्लाय दिला. मग त्याने तिला सांगितले की, आपण अतिशय अप्रतिम कविता पोस्ट करता. एक विचारायचे होते, ह्या कविता तुम्ही स्वतः बनवता का?” तिचा रिप्लाय हो आला. नंतर तो म्हणाला की, खरचं तुम्ही खूप भावनिक कविता लिहता आणि मला तुमच्या कविता खूप आवडतात. तिने धन्यवाद रिप्लाय दिला आणि ती ऑफलाईन गेली. अशाप्रकारे तो नेहमी तिला मॅसेज करायचा. दोघे ही एकमेकांशी खूप बोलायचे.
सागर गॅलेरीत बसून त्याच्या बुक मध्ये लिहलेल्या तिच्या कविता वाचत होता. तिने अजून कविता पोस्ट केल्या आहेत का हे पाह्ण्यासाठी तो सोशल मिडीयावर ऑनलाईन आला. त्याला दिसले की प्रसन्ना पण ऑनलाईन आहे. तर त्याने तिला मॅसेज केला “काय करतेय? “तिने रिप्लाय केला” काही नाही आणि तू” त्याने विचार केला की आपण इतके दिवस झाले हिच्या सोबत बोलत आहोत. तर तिचा फोन नंबर मागायला हवा. मग त्याने धाडस करून तिचा फोन नंबर मागितला. तिने देण्यास नकार दिला. पण ती त्याच्यावर रागवली नाही ती म्हणाली की, “आपण येथे मॅसेज वरच बोलू”. तेव्हा सागर ओके रिप्लाय करतच होता की चुकून त्याचा फोन हातातून सटकला आणि गॅलेरीतून खाली पडला. जेव्हा तो खाली फोन आणायला गेला तेव्हा त्याचा फोन खूप खराब झाला होता. तो फोन रिपेरिंगसाठी घेऊन गेला तर तेथील दुकानदाराने त्याला, “हा फोन १५ दिवसानंतर रिपेअरिंग करून मिळेल” असे सांगितले.
त्याने होकार दिला आणि घरी आला. प्रसन्ना त्याच्या रिप्लायची वाट पाहत होती. तिला वाटले याला नंबर नाही दिला म्हणून हा रागवला असणार. ती त्याला मॅसेज करत राहिली. पण याचा फोन खराब झाला आहे हे तिला माहित नव्हते आणि सागरला काही कारणासाठी गावाला जावे लागले. दोन दिवस झाले मॅसेजचा रिप्लाय आला नव्हता. तिला खूप वाईट वाटले तिला वाटले की सागर तिच्याशी कधीच बोलणार नाही. म्हणून तिने त्याला मॅसेज करायचे सोडून दिले. १० दिवस झाले होते. तिला करमत नव्हते कारण तिला सवय झाली होती त्याच्याशी बोलायची. तिने त्याला मॅसेज केला आणि तिचा नंबर दिला आणि ती म्हणाली की, “हा घे माझा नंबर, तुला राग आला आहे म्हणून तुला दिला, पण प्लीज माझ्याशी बोलत जा. सवय झाली आहे मला तुझ्याशी बोलायची” तरी त्याचा रिप्लाय येत नाही.
सागर गावावरून येतो आणि फोन रिपेअरिंग झाला का हे पाहण्यासाठी जातो. तर तो दुकानदार त्याला म्हणतो की, फोन कधीच रिपेअरिंग केला होता. त्याने फोन घेतला आणि तिचे मॅसेज पाहिले. त्याला कळले होते की हिचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे तो तिला मॅसेज न करता कॉल करायचे योग्य समजून तिला कॉल करतो. पण तिने त्याचा फोन असेल म्हणून कट केला आणि फोन वर मॅसेज केला की, “मी घरी असते म्हणून फोन वर नाही बोलू शकत.” तर त्याने ही ठीक आहे हा रिप्लाय दिला.
मग दोघे ही फोनवरच मॅसेज करून एकमेकांशी बोलयचे. त्याने त्यांच्यामधील झालेला गैरसमज दूर ही केला. दोघेही एकमेकांशी मॅसेजवर खूप बोलायचे. त्यामुळे एक ही दिवस त्यांना एकमेकांशी बोलल्याशिवाय जायचा नाही. एक दिवस सागरने तिला भेटायचे असे ठरवले. त्यांच्या बोलण्याबोलण्या मध्ये त्याने तिला विचारले की, “प्रसन्ना आपण इतके दिवस झाले एकमेकांशी बोलत आहोत, मला एकदा तूला भेटायचे आहे. तुझा आवाज ऐकायचा आहे.” तिने या प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही. खूप वेळ मॅसेज नाही आला. सागरने परत मॅसेज केला की, “सांग ना गं” तिचा रिप्लाय आला की “आपण असंच नाही बोलू शकत का? भेटणे महत्वाचे आहे का?” तो म्हणाला, “असे नाही आहे, तरी पण एकदा तुला बघायचे आहे. तुझा आवाज ऐकायचा आहे.” तर ती म्हणाली की, “एक Promise करशील? ” तो हो म्हणाला. ती म्हणाली की, “मी जेव्हा तुला भेटायला येईल आणि तेथे तुला काही कळाले, तरी तू आपली ही मैत्री तशीच ठेवशील ना?” तो म्हणाला, “अगं वेडी असं का बोलतेय” ती म्हणाली, “आधी तू सांग” मग तो म्हणाला, “हो, मग उद्या भेटूया का?” ती हो म्हणाली. मग त्या दोघांनी भेटण्याची वेळ आणि ठिकाण ठरवले.
सागर खूप आनंदी होता. आपण प्रसन्ना ला प्रत्यक्ष भेटणार आहोत. दोघांनी ही एकमेकांना कधी बघितले नव्हते. त्यामुळे एकमेकांना कसे ओळखावे हे कठीण होते. सागर ने त्याचे काही फोटो सोशल मिडीयावर टाकले होते. त्यामुळे प्रसन्ना त्याला ओळखेल हे त्याला माहित होते. ज्या ठिकाणी भेटायचे ठरले होते त्या ठिकाणी सागर जाऊन तिची वाट पाहत होता. समोरून एक मुलगी येत होती, कदाचित तीच प्रसन्ना असेल असे त्याला वाटले. ती डोळ्यासमोर आली आणि तिने इशाऱ्याने Hi केले. त्याने सुद्धा तिला इशाऱ्याने Hi केले. दोघेही एका ठिकाणी बसले तेव्हा सागर तिच्याशी खूप बोलत होता. ती फक्त Smile देत होती. त्याला असे वाटले की हीला ऑड वाटत असेल म्हणून आपल्याशी बोलत नसेल. पण सागर बोलतच राहिला आणि अचानक त्याने पहिले की प्रसन्नाच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने तिला विचारले की का रडत आहेस. ती काही बोललीच नाही. त्याने विचारले की मी कुठे चुकलो का? तरीही ती काहीच बोलली नाही. तिने त्याच्या हातात लेटर दिले आणि तेथून निघून गेली.
तो ते लेटर तिकडेच वाचत होता. त्यात असे लिहले होते की, “सागर मला माफ कर मी आपल्या मैत्रीच्या नात्यात फसवणूक केली आहे. मी तुझ्याशी खूप खोटं बोलली आहे. खर सांगू तर मला बोलता येत नाही. लहानपणापासून मी मुकी आहे आणि हेच मला माझ्या आयुष्यातला कमी पणा वाटतो. मी तुझी मैत्रीण नाही बनू शकत हे सत्य मला स्वीकारायला हवं. मला नाही करमणार तुझ्याशिवाय पण मला माहित आहे. तुला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तू स्वतः आपलं मैत्रीचं नातं तोडशील. मला जास्त त्रास होण्यापेक्षा मीच तुला माझे खरे सत्य सांगून आपले मैत्रीचे नाते तोडते. जमेल तर मला माफ कर.” हे वाचून त्याला खूप वाईट वाटते. तो तिला मॅसेज करतो की, “तू जिकडे आहेस तिकडून परत ये, मी अजून इथेच आहे. जोपर्यंत तू येणार नाही. तोपर्यंत मी इथेच राहीन तुझी वाट बघेन”.
ती हा मॅसेज बघून परत मागे येते आणि त्याच्या समोर उभी राहते. तो बोलतो ” तू बरोबर समजलीस मला, तुझे हे सत्य ऐकून आपल्यातलं हे मैत्रीचे नाते संपवणार आहे.” तिच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती जाण्यास निघते. तेव्हा तो बोलतो, “आणि हे मैत्रीचे नाते तोडून मला तुझ्यासोबत प्रेमाचे नाते जोडायचे आहे. मला तुझ्यातला हा निरागस पणा आवडायला लागला आहे. काय झालं जर तू बोलत नसलीस, मला तुझे मन बघून तुझ्यावर प्रेम झाले आहे. खरंतर मी तुझ्या कवितांचा आधीपासून वेडा होतोचं आता तर तुझ्या मनाचा ही वेडा झालो आहे. जरीही तू माझ्याशी ओठाने बोलू शकली नाही तरी तुझ्या मनाने तू माझ्याशी बोलू शकतेस, मग सांग होशील का माझ्या आयुष्याचा पार्ट”. ती हे सगळं ऐकून त्याला मिठी मारते आणि त्याला कळते की हीला सुद्धा माझ्या आयुष्याचा पार्ट व्हायचा आहे” पुढे तो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला तिच्याच कवितांचा संग्रहाचं पुस्तक गिफ्ट करतो आणि म्हणतो की, “आता सगळे तुझी कविता वाचतील”.
माझं ही तुझ्यावर खूप प्रेम आहे | Short love story in marathi
Short love story in marathi |
जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस…
मी म्हणालो…” माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे…”
तू विचारलंस “ते काय असतं ..?”
आठवतंय..?
मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो
“मी तुझ्यावर खूप प्रेम करतो…”
तू म्हणालीस…”मला एकटी तर नाही ना सोडणार..?”
आणि अलगद माझ्या मिठीत विरघळलीस…!!
३५ व्या वर्षी …
जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो.. तू आणि मी सोबतचं डिनर केलं.. मी तुला जवळ ओढून म्हणालो…”I love you…!!”
तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस..” I know that..” पण सकाळी मुलांचा पेपर आहे…
उशीर नको व्हायला आता जास्त…आता झोपू यात लवकर…!!
माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे पार्टी मध्ये गुंग असताना,
मी हळूच म्हणालो…”I love you very much ”
तू हसत हसत म्हणालीस …”माहित आहे अगदी २० वर्षा आधी पासून माहित आहे..”
आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस…!!
तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो…
आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो. “छान दिसतेसं आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो, तू मला खूप आवडतेस…आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे…”
तू मला बाजूला सारत म्हणालीस…”ते ठीक आहे हो…!! पण सगळं व्यवस्थित अरेंज झालाय ना..?”
मी आत ७५ वर्षाचा..,
आराम खुर्चीवर बसून, आपला जुना अल्बम बघत होतो…,
तू स्वेटर वीणत होतीस नातवांसाठी मी म्हणालो “माझं तुझ्यावर अजून ही तितकचं प्रेम आहे ..!”
आणि तू म्हणालीस, “माझं पण तुझ्यावर आजही तितकचं प्रेम आहे जितकं तुला होकार देताना
होतं..”
माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला… डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते कारण आज इतक्या वर्षांनी तू स्वतः म्हणाली होती तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून…!!
फक्त प्रेम पुरेसे नसते. कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असतं… त्याला ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात.. “हो माझं पण तितकचं प्रेम आहे तुझ्यावर जितकं तुझं माझ्यावर आहे, म्हणून जेव्हा पण संधी मिळेल तेव्हा सांगायला चुकू नका.”
लग्न म्हणजे काय असतं…! | Marathi love story
तो कितीही वेंधळा असला तरी
त्याला सांभाळून घ्यायचं असतं…!!
तिने कसाही स्वयंपाक केला तरी
त्याला “मस्त” म्हणायचं असतं…!
लग्न म्हणजे काय असतं…!
क्रिकेटमध्ये कितीही interest नसला तरी
त्याच्यासाठी ते enjoy करायचं असतं…!!
तुळशीबागेत जायचा कंटाळा आला असला तरी
तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं…!!!
लग्न म्हणजे काय असतं…!
तो कितीही “म्हातारा” झाला तरी
त्याला चिरतरूण भासवायचं असतं…!!
“मी जाड झालेय का…?”
या वाक्याला कधीही “हो” म्हणायचं नसतं…!!!
लग्न म्हणजे काय असतं…?
दोन्ही घरच्या नात्यांना
आपुलकीने जपायचं असतं…!
वेळप्रसंगी आपल्या इच्छांना
हसत हसत विसरायचं असतं…!!
थोडक्यात काय…???
लग्न म्हणजे काय असतं…???
छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये केलेलं compromise असतं…!
कारण “we will grow old together”
असं एकमेकाला केलेलं promise असतं…!!
लग्न हे सुद्धा अंदाजावर जन्म घेणारेच नाते असते…!
तिथली आकडेवारी ही चुकायचीच…!!
पण आपला साथीदार हा इतकाही वाईट नाही, हे जितक्या कमी वेळात जाणून घ्याल, तितक्या जास्त वेळाचा सुखाचा संसार पुढे आपली वाट पाहत असतो….!!!!!!
शब्दांच्या चकमकीत नाती मारली जातात…!
शब्दांची ओंजळ बनवा…!
थोडंसं गळेल पण तुटणं टळेल…!!
लग्नानंतर खरंतर आपल्या जोडीदाराला मिठीत ठेवण्यासाठी धडपड व्हायला हवी,
पण इथे ‘मिठीत’ नाही तर ‘मुठीत’ ठेवण्यासाठी धडपड चालू असते…!!!
संसार हे मुठीचे नाही तर मिठीचे प्रकरण आहे हे ज्यांना कळले,
ते संसारात जिंकतात…!
नाती मुठीत घुसमटतात, मिठीत फुलतात…!!
हेच आहे का या प्रेमाचे संकेत | Marathi stories online
प्रेम काय असतं आणि प्रेमात कसे पडतात हे मला माहीत नव्हते, प्रेम हा मुळात माझ्या जीवनाचा विषयच नव्हता म्हणून मला त्यात पास होण्याची भीती नव्हती. पण एक दिवस मी तिला पाहिले. तिच्या विषयी वेगळी भावना मनात निर्माण झाली. ती भावना कसली होती हे मला माहित नव्हते. तिचे अबोल हसणे मला सारखे बघावेसे वाटायचे. ती दिसली नाही तर मन कासावीस व्हायचं. ती समोर येण्याच्या आधी वेगळाच सुगंध आजूबाजूस दरवळायचा कदाचित तिच्या येण्याचा संकेत असावा.
उगीच तिची वाट पाहत बसणे मनाला आवडायचे. ज्या दिवशी ती नाही यायची तेव्हा मन तिलाच शोधायचे. वेगळीच भीती मनात वाटायची आणि ती समोर आली की मन फुलून यायचं. असे वाटायचे की तिच्या प्रत्येक सुख दु:खात भागीदार व्हावे. तिच्या प्रत्येक हसण्याचे कारण मी बनावे.
एक इच्छा झाली तिला जवळून पाहण्याची. तिचे निरागस डोळे, आणि तिचे कोमल हसू पाहण्यास मन आतुर व्हायचे. तुझ्या सोबत आयुष्य काढायचं आहे. तुला एकदा मिठीत घ्यायचं आहे. तुझ्या सोबत एक स्वप्न रंगवले आहे मी, एक छोटसं घरटे असावे त्यात तू आणि मी बाकी कोणी नको. मला सांगशील का हेच आहे का या प्रेमाचे संकेत.
एक लहानशी अशी | Cute Love Story in Marathi
Cute Love Story in Marathi |
बालवाडीचा वर्ग सूरू असतो..
वर्गात भाषण चालु असते..
एक मुलगा स्टेज वर येतो..
तो भाषण सुरु करण्याआधीच,
एक छोटी मुलगी दोन्ही हात कानावर ठेवते..
शेजारची मैत्रीण तिला विचारते,
तू कानावर हात ठेवून कान कशाला झाकलेस गं ??
मुलगी अले येली, तो समोल बोलणाल आहे ना….. तो माझा बोयफ्लेंद आहे..
आणि भाषण सुलू कलन्या आधी तो बोलतो
my dear sisters an brothers..
मग तो माझा भाऊ झाला असता ना येली..
प्रेम इथेच थांबत नाही | Sad love stories in marathi
आजच्या युगातील प्रेम हे दिसण्यावरून होते हे नक्कीचं. पण त्या व्यक्तीचा स्वभाव बघून ही प्रेम होते हे जरा कमीच आहे.
सीमा आणि समीरचे छान चालू होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. दोघं ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. ते दोघं एकत्र शाळेमध्ये असल्यापासून मित्र होते आणि त्यांच्या कॉलेज वर्षामध्ये त्यांना एकमेकांवर प्रेम झाले आणि आता सुद्धा डिग्री कॉलेज मध्ये एकत्र आहेत. सीमा समीरच्या करीयर बाबतीत जरा जास्त सिरीयस होती. कारण तिला वाटत होतं की त्याने प्रेमामुळे करीयर त्याग न द्यावा. म्हणून ती त्याला नेहमी त्यांच्या भविष्याबाबत सुचवायची.
दोघांना ही पुढे डिग्री मिळते दोघेही छान मार्कांनी उतीर्ण होतात. आता दोघांनी ठरवले होते की आपल्या नात्याबद्दल घरी सांगावे आणि लग्न करून सेटल व्हावे. दोघे ही घरी सांगतात. दोघांचे आई वडील ही राजी होतात. आता फक्त बाकी होतं ते जॉब बघून सेटल व्हायचं.
पुढे समीरला एक जॉब ऑफर येते. तो खूप खुश होतो आणि तो इंटरव्यू करिता जॉबला जातो. त्याला जॉब ही मिळतो. सगळ सुरळीतपणे चालू होतं. पाच सहा महिने उलटून जातात. त्याने त्याच्या लग्नासाठी सेविंग सुद्धा केली असते. आता फक्त बाकी होतं ते लग्न ठरवायचं.
तो सीमाला खूप काही बोलतो आपण असे घर घेऊ आपण तिथे दोघेच राहू आणि विकेंडला आईबाबा कडे येऊ मग तुझे आई बाबा आणि माझे आई बाबा आणि आपण दोघं मस्त विकेंड एन्जोय करू. हे ऐकून सीमा ही खुश होते. तिला ही तसेच हवे होते.
पण एकदिवस समीरला बॉस बोलवतात त्याला कामासाठी बाहेरगावी जावे लागेल असे बॉस त्याला सुचवतात. तो ही घरच्यांची आणि सीमाची परवानगी घेतो आणि बॉसला होय असं उत्तर देतो. एक महिन्याकरिता बाहेरगावी जाणार आहे म्हणून तो तिला एक पूर्ण दिवस वेळ देतो. त्या दिवशी ते लोकं एका समुद्र किनाऱ्यावर जातात आणि समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले असतात. समीर सीमाला म्हणतो, “मला एक महिना सुद्धा एक वर्षासारखं वाटतं आहे गं. आपण लहानपणापासून सोबत आहोत आणि मी तुझ्यापासून एवढे दिवस लांब जाईल अशी वेळ सुद्धा आली नव्हती कधी.” सीमा म्हणते, “अरे यात वाईट का मानून घेत आहेस, फक्त एक महिनाच ना.. नंतर परत आपण एकत्र राहणार आणि आता तर लग्न ही होणार आहे आपलं. मग आपण एकत्रचं राहणार.. हो ना आता मस्त एक स्माईल दे. मग तो तिच्या मांडीवर डोक ठेवून थोडावेळ तेथे झोपी जातो. सीमा त्याची केसं कुरवाळत त्याला म्हणते, “की उद्या मी नाही येणार तुला सोडायला.. कारण मला रडू येईल तुला जाता वेळी बघताना.. तू जेव्हा येशील ना इंडियामध्ये तेव्हा मी तुला इथे या बीच वर भेटेन. Promise कर तू पहिला मलाच भेटायला येशील. तो म्हणतो, “हो”
तो एक महिन्यासाठी जात होता, म्हणून त्याने तेथील सीम नाही घेतले. तो तिथून एका मित्राच्या फोन वरून घरची आणि तिची खबर घेत होता. पण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो खूप व्यस्त असल्याने त्याला घरची आणि तिची खबर काही घेता आली नाही. जेव्हा तो इंडियात आला तेव्हा प्रथम तो समुद्रकिनारी गेला तिला भेटण्यासाठी. ती तिथे त्याची वाट बघत बसली होती. तो आला आणि पाठून तिचे डोळे मिटले.
ती, “आलास, किती उशीर मी किती वाट बघतेय तुझी.. मला जायचं आहे ना उशीर होईल..”
तो, “सॉरी गं पिल्लू… कशी आहेस मला माफ कर मी गेले सात दिवस तुझ्याशी बोललो नाही.”
ती, “असू दे तू आलास ना आता काही टेन्शन नाही..”
तो, “तू नक्की रागवली नाही ना… हशशSS मला वाटला तू भरपूर रागवली असणार..”
ती, “नाही रे मी का रागवू तुझ्यावर..”
तो, “पिल्लू तू थांबशील का इथे जरा वेळ, मी माझे सामान घरी ठेवून येतो पटकन आणि आईबाबांना फक्त चेहरा दाखवून, लगेच येतो… तू थांब मग आपण खूप बोलू…
ती, “हो..
तो घरी जातो तेव्हा घराला कुलूप असते.. तेव्हा त्याला बाबांचा फोन येतो..
बाबा, “कुठे आहेस आलास का ?
तो, “हो तुम्ही कुठे आहात ?
बाबा,” सीमाच्या घरी तू ये लवकर इथे.
तो,” हो आलोच.
( तो सामान बाजूच्या काकींकडे देतो आणि जातो. )
तिच्या घरी जाताचं सगळे शांत होते.. मला वाटलं मला काही तरी Surprise मिळणार आहे. जरा पुढे गेलो तर आई रडत रडत मला मिठी मारते.
आई, “सीमा आता आपल्यात नाही राहिली..”
तो, “काय आई ?? हो का.. बस आता.. थट्टा पुरे झाली.. मी आत्ताच तिला भेटून आलोय. अजून ती माझी वाट पाहत आहे तिकडे.. मला तुम्हाला भेटून परत जायचे आहे तिकडे..
( घरातील सगळे आश्चर्य होतात…. समीरच्या आईला कळले होते की आता आपल्या मुलाला खूप जोराचा धक्का बसलेला आहे म्हणून तो असे काही तरी बोलत आहे.. सीमा चे अंतिमसंस्कार बाकी होते. त्याचं क्षणी हॉस्पिटल मधून सीमाची बॉडी घरी आणली जाते.. समीर पाहत्या क्षणी रडू लागतो.. तो आईला सांगतो की मी आत्ताच तिला भेटून आलो आहे आई.. ती समुद्रकिनारी माझी वाट पाहत आहे.. आईला त्याचे दु:ख बघवत नाही.. ती त्याला सीमा सोबत काय झाले ते सांगते..)
आई, “काल जेव्हा सीमा अंघोळीला जात होती तेव्हा पाणी गरम करण्यासाठी तिने हिटर टपात टाकले होते.. तेव्हा अचानक लाईट गेली.. लाईट गेल्यामुळे सीमा हिटर काढत होती. जेव्हा तिने हिटर हातात घेतले तेव्हा अचानक लाईट आली आणि त्या हिटरचा शॉक तिला लागला आणि ती थोड्या दूर वर उडून पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला आणि ती तेथेच मरण पावली.
(हे सगळं ऐकून समीर खूप दुखावला. त्याला कळून चुकले होते की ती मरून सुद्धा माझ्यासाठी तेथे आली होती.. तो धावत परत त्या समुद्राकिनाऱ्यावर जातो. त्याला ती तेथे दिसते आणि एक मस्त स्माईल देते. तो धावत जातो तिच्याकडे. त्याच्या मागे लगेच त्याचे आईबाबा आणि सीमाचे आईबाबा येतात.)
तो, “नको ना जाऊ मला सोडून.. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी तुला ठाऊक आहे ना..
ती, “माझ्यासोबत इथे बस आधी…
(तो बसतो…)
ती, “ हो मला माहित आहे.. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही.. म्हणून तर मी देवाशी ही लडणार आहे. त्याला म्हणेल माझ्या पिल्लूला पाहण्यासाठी मला महिन्यातून एक दिवस देत जा. नेहमी मी तुला इथेच मिळेल.. महिन्याच्या अखेरी तू मला इथे भेटायला येत जा…
तो, “मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय…. नको जाऊस मला सोडून प्लीज. नाही तर मला ही घेऊन जा तुझ्यासोबत..
ती, “असं नाही बोलायचं… आईबाबांना कोण सांभाळेल. त्यांच्याकडे आता फक्त तूच एक आधार आहे आणि माझ्या आईबाबांना ही सांभाळशील ना.. मला वचन दे..
तो,” हो.. मी त्यांना सांभाळीन..
ती, “ चल मग मी निघते..
तो, “ पिल्लू थोडा वेळ थांब ना… मला तुझ्या कुशीत एकदा झोपायचे आहे…
ती, “ ते शक्य नाही… मला घायचे असले तरी मी नाही घेऊ शकत तुला कुशीत.. मी निघू आता..
तो, “ पिल्लू निघते नाही बोलायचं येते बोलायचं… तू येशील ना इथे मला भेटायला..
ती, “ हो
( ती त्याला गोड स्माईल देते आणि निघून जाते… हा नेहमी तिला महिन्याच्या शेवटी भेटायला जायचा. त्याला तिची सवय झाली होती…समीर आता मानसिक रोगी झाला होता.. त्याला तिची सवय झाली होती.. महिन्याचे सर्व दिवस तो एका कोपऱ्यात तिचा फोटो घेऊन बसायचा आणि वेड्यासारखा वागायचा.. पण महिनाअखेर आली की तो बरोबर त्या समुद्रकिनाऱ्यावर जायचा… ती त्याला भेटायला यायची… अजून पर्यंत कोणी तिला पाहिले नव्हते तो एकटाच बडबड करत बसायचा.. डॉक्टर ही म्हणाले होते.. जोपर्यंत ती त्याचासोबत असेल तोपर्यंत तो चांगला वागेल आणि नंतर तो परत त्याच्या त्याच अवस्थेत येईल. कारण त्याचा एकटेपणा त्याला त्या आजाराकडे खेचून घेऊन जातो. जेव्हा ती त्याचासोबत असते तेव्हा तो त्याचा एकटेपणा विसरून परत नॉर्मल होतो. )
कोण म्हणते मेल्यानंतर ही प्रेम अधुरे राहते सीमा आणि समीरचे प्रेम अजून ही तसेच आहे.
एक होते वेडे प्रेम | Marathi prem story
Marathi prem story |
मी एका मुलीवर खुप प्रेम करत होतो, आता पण करत आहे आणि मी तिला प्रपोजही केला होता. तिचा होकारही मिळवला. जवळपास आमचे 3 ते 4 महिने, रिलेशनशीपमध्ये होते, चांगले चालले होते, कॉल वर बोलणे, मेसेज करणे सगळे अगदी आनंदात चालले होते..
पण,
काही चुकीच्या गैरसमजामुळे आमचे अचानक ब्रेकअप झाले..
आणि ब्रेकअप च्या वेळी मी तिच्यासाठी,
एक छोटीशी मनवेधक कविता केली..
“गैरसमज करुन नाते, कधी तोडू नकोस,
जर नसेल विश्वास कुणावर,
तर त्याला आपलंही करु नकोस..
“खुप दुःख होते मनाला, जेव्हा जवळची व्यक्ती दुरावते,
हात जोडूनी आहे, कळकळीची विनंती तुला..
“पुन्हा कुणावर खोटे प्रेम करुन, त्याच्या भावनेशी तु खेळू नकोस..
“जात आहेस मला तु सोडून, माझ्या जगण्याची तु आसही करु नकोस..
“पुन्हा करणार नाही खरे प्रेम कुणावर,
आईची शपथ घेऊनी सांगतो,
पुन्हा माझा उदासलेला चेहरा,
स्वप्नातही पाहण्याचा विचार करू नकोस..
“आयुष्य जगायचे होते फक्त तुझ्यासाठी,
ह्या आयुष्यालाच संपवण्याची वेळ आली तुझ्या पायी…
“शेवटची भेट आहे ही आपली,
मला पुन्हा भेटण्याचा तु प्रयत्नही करु नकोस पिल्लू..”
“आयुष्य तुम्हाला कोणतंही वचन देत नाही पण काही व्यक्ती देतात…
काही व्यक्ती म्हणतात…
‘मी तुझ्यापासून कधीच दूर जाणार नाही’….खोटं
काही व्यक्ती म्हणतात…..
‘शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझीच / तुझाच राहणार’…..खोटं
काही व्यक्ती म्हणतात……
‘माझ्यासाठी तूच सर्वस्व’…..खोटं
आपल्या जीवनात असे कित्येक प्रेमळ खोट्या गोष्टींचे वचन काही व्यक्तींकडून आपल्याला मिळते…. पण, ‘जेंव्हा तुम्हाला समजते की आपल्याला दिलेले वचन खोटे आहेत’ तेंव्हा आपण स्वतःला कसे सावरतो त्यावरच आपलं पुढील जीवन आधरित असतं….
जशी पण आहे तुझीच तर आहे | Romantic marathi message
( रात्रीचे 12 वाजता )
तो : Hiiiiiii.
ती : Hello बाबू.
तो : कशी आहेस पिल्लू ?.
ती : बिलकुल माझ्या शोना सारखी, एकदम मस्त.
तो : मग, माझ्या पिल्लूने जेवण केले ?
ती : नाही बाबू, आज मन नाही करत जेवण करायला, म्हणून नाही केले.
तो : अच्छा, जेवायला कधी मन होतं तुझं ?.
ती : असे का बोलतो आहेस शोना, रोज तर जेवण करते आणि तू सांगितल्यापासून 3 चपाती खाते नाहीतर 2 पण नीट खात नव्हते.
तो : चल, जास्ती नौटंकी झाली तुझी आताच्या आता जाऊन जेवण करून ये.. ओके ?.
ती : काय… वेडा झाला आहेस काय.. इतक्या रात्री जेवण ? आता तर किचनमध्ये पण नसेल काही खाण्यासाठी.
तो : मला काही नाही माहित, बस तू जेवण करून ये नाहीतर मी नाही बोलणार तुझ्याशी.
ती : ओय.. असं नको ना बोलु थांब मी चेक करते.. बहुतेक बिस्कीट नाहीतर दुसरे काही असेल तर खाईन ओके.
तो : हम्म्म.. गुड गर्ल..
( 5 मिनीटांनंतर ).
ती : हो.. झाले माझे जेवण पूर्ण च्या पूर्ण 5 बिस्कीट खाले.
तो : बस 5 ? okkk Gn Sd Tc.. Bye
ती : शोना रागावतोस कशाला ? नेहमी ब्लॅकमेल करत असतोस मला, अच्छा थांब.. अजुन खाऊन येते आज तर मला मोटु बनवूनच सोडशील..
( 5 मिनीटांनंतर ).
ती : हे घे आता पूर्ण 10 बिस्कीट्स खाल्लीत, आता खुश ?.
तो : हां ना आणि तू औषध घेतली की नाही?.
ती : सॉरी शोना परत विसरले.
तो : मी आता तुझ्याशी नाहीच बोलणार..
ती : आव्व्.. तु चिडतोस तेव्हा पण किती क्युट दिसतो.
तो : ओह हो.. तु पागल नही सुधरेगी.. टेढी है पर मेरी है.
ती : हो रे.. जशी पण आहे तुझीच तर आहे.
उद्या कधीच येत नाही नेहमी येतो तो आज | Prem Katha in Marathi
दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रिण. कॉलेजपासून दोघेही एकत्र. मग नकळतच मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. आवडत तर होते पण स्वतःहून बोलायला कोणी तयार नाही.. त्याला वाटायचं तिला आपल्या मनातलं समजलं तर ती असलेली मैत्री सुद्धा तोडून टाकेल….आणि तिला वाटायचा की मी स्वतःहून विचारलं तर तो म्हणेल की, आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत…गैरसमज होईल.. दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते, पण बोलायला तयार नाही… एकदा तिने तिच्या मैत्रिणीला सहज कॉल केला. ती हॉस्पिटलमध्ये अॅड्मिट आहे. असं तिला समजलं ती लगेच तिला भेटायला गेली. रूमच्या आत जाताच तिला एक अनोळखी माणूस दिसला. पण तरीही ती गेली तिच्यापाशी व विचारपूस करू लागली…. तेव्हा तिला समजलं की तिच्या मैत्रिणीला कॅन्सर झाला होता. ती काही दिवसचं जगणार होती.. दोघीही रडत होत्या. नंतर मग थोड्या वेळाने तिने तिला त्या माणसाविषयी विचारलं… कोण…? कुठला…? मी कधी याला पाहिलं नाही… ती उदास नजरेने त्याच्याकडे पाहते… आणि बोलते “हा आम्ही लहानपणापासूनचे फ्रेंड्स..”
एकत्र लहानाचे मोठे झालो नंतर घर बदलले जॉब वेगळा सगळं वेगळं झालं. पण मैत्री तशीच होती… आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचो, पण आम्ही कधी भावना व्यक्त केल्याच नाही. दोघेही घाबरायचो. पण नंतर आमच्यातला दुरावा वाढतच गेला. पण एकदा मी ठरवलं की आज त्याला सगळं सांगून टाकायचं. तेव्हा मी त्याच्या घरी गेले. पण तिथे समजलं की त्याचं लग्न ठरल आहे… मग मी स्वतःहुनचं काही सांगितलं नाही… वेळ लागला पण मी स्वत:ला सावरलं.. निदान तो, त्याच्या आयुष्यात सुखी आहे हेच समजून मी जगत होती. आज मी त्याला हे सत्य सांगितलं तर बोलला की तो ही माझ्यावर प्रेम करत होता. पण बोलला नाही आणि आज बोलला तर आयुष्यच उरले नाही माझ्याकडे… असं वाटत की त्या वेळेस जरा हिंमत करून मी त्याला विचारलं असतं.. तर प्रेमाचे काही क्षण तरी नशिबात आले असते… आज प्रेम आहे तर क्षणच अपुरे आहेत आमच्यासाठी…
हे सर्व एकूण ती खूप टेन्शन मध्ये येते… ती लगेच तिच्या त्या मित्राला फोन करते… भेटायला बोलावते…. तो येतो…. ती त्याला घट्ट मिठीत घेते आणि म्हणते… “तुझं माहीत नाही मला…. पण मी खूप प्रेम करते तुझ्यावर” तो सुद्धा मग थोडा हसतो आणि म्हणतो “मी पण”
मित्रांनो आयुष्यात असं काहीच करू नका की पुढे जाऊन तुम्हाला वाटेल “कदाचित हे केलं असतं तर…
असं बोलला असता तर… असं करायला हवं होतं..” कारण जेव्हा तुम्हाला असं वाटेल तेव्हा कदाचित तुमच्या कडे वेळचं नसेल. उद्या कधीच येत नाही नेहमी येतो तो आज…. म्हणून आजच्या दिवसातचं मनसोप्त जगा…
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असचं करायचो | Gavakadeche Prem Story
यात्रेदिवशी तेवढं देवाला नैवेद्य घेऊन जायचो,
नदीवरच्या पुलावर तिची वाट पाहत असायचो,
????ती यावी म्हणून आधीच देवाला नवस बोललेलो असायचो,
ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो????,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असचं करायचो ????..
???? ती जेव्हा नदीकाठी यायची,
कमरेवर कळशी आणि मैत्रीण सोबत असायची,
आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो,
मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..
तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो,
???? नवरा भावबंद असल्यासारखं घोड्यासमोर नाचायचो,
????तिनं बघावं म्हणून जोरात उड्या मारायचो,
ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो????,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..
मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा,
????आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो,
बघून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची,
मग रात्री नुकताच विचार करत झोपायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..
शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,
????आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो,
????????कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो,
तिचं लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..
तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो,
रानामधी जाऊन सरीच्या अंकुराशी बोलायचो,
दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत राहयचो,
????मनामधी तेव्हा खरंच फार रडायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो..
ती सोळाव्याला आली की तिला जाऊन भेटायचो,
कसं आहे सासर सारी विचारपूस करायचो,
नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो,
आणि मग तेव्हा तिच्या मनातलं प्रेम आम्ही समजायचो,
गावाकडचं प्रेम बघा आम्ही असंच करायचो????
ही प्रेम कथा वाचून डोळ्यातून अश्रू नाही आले तर नवलच | Heart Touching Love Story in Marathi
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्याच जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच रोमॅटींक. तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायचं काय ? खिशात तर दिडक्या नाहीत.. शेवटी न राहवून त्याने तिला रंगीत कागदाची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुश होती.. तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेक्षा नव्हती. तो जे देत होता त्यात ती समाधानीच होती.. तसाही तो सामान्य होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं काहीही त्याच्यात दिसत नव्हतं पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते.. पण एक दिवस सगळा नुरच पलटला.. ती म्हणाली, “तुझ्याबरोबर आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल.. काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे..? काहीच नाही.. मी परदेशी चालले आहे.. पुन्हा कधीच परत येणार नाही.. तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा- तुझा संबंध इकडेच संपला.
“ती कायमची निघुन गेली आणि हा मोडून पडला. संपलच जणु काही. सर्व काही संपले त्याच्यासाठी.. दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ओसरून संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या.. त्याने ठरवलं, ’तिने पैशासाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पैसे कमवुन दाखवायचे. इतके की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहीजे. ’पुढे.. या जिद्दीने पेटुन उठ्ला तो.. झोकुन दिलं स्वतःला.. कष्ट केले.. राब राब राबला.. मित्रांनी मदत केली. चांगले लोक भेट्ले.. त्याचे दिवस पलटले.. तो खुप श्रींमत झाला.. स्वतःची कंपनी उभारली.. पैसा, नोकर, चाकर, गाड्या, मान सगळं कमवलं. विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला.. उभा राहीला.. जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला.. पण तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती.. ती सोडुन गेल्याची.. तिनं नाकारल्याची.. आपल्या गरीबीचा अपमान केल्याची.. तिच्यावरच्या प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली होती..
एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता.. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.. गाडीच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं.. भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.. त्याने गाडी थांबवली आणि नीट पाहीलं.. हे ’तिचेच’ आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली.. त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होतं.. त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पाहावी.. त्यांनी आपली गाडी पाहावी.. आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा.. असं त्याला मनोमन वाटतं होतं.. तिला धडा शिकवण्याच्या अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलो आहोत हे त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहतात.. हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातो. “..पाहतो आणि कोसळतोच..” तिचाच फ़ोटो.. तसाच हसरा चेहरा.. कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं हा सुन्न झाला. धावतच गेला कबरीकडे.. तिच्या आईबाबांना विचारलं काय झालं ते सांगा. ते म्हणाले “ती परदेशी कधीच गेली नाही. तिला ‘कर्करोग’ झाला होता.. तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देऊन ती गेली.. तू संतापुन उभा राहशील.. जगशील यावर तिचा विश्वास होता.. म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले आणि ती गेली..
rem katha in marathi
( माझा ब्रेकअप होऊन चार दिवस झाले होते… तो मला सोडून गेला होता… माझे आयुष्य आता विखरले होते.. त्याच दिवशी माझी मैत्रिण मला भेटायला आली होती.. ती माझा उदास चेहरा बघून तेव्हाच म्हणते चल आपण जरा बागेत फिरून येऊ. मग मी तिच्यासोबत जाते. आम्ही एका बाकावर बसून बोलत असतो. )
ती, “ कशी आहेस खूप दिवसानंतर भेटत आहोत आपण ?
मी, “ हो गं, मी मजेत आहे तू कशी आहेस.. ?
ती, “ एकदम मस्त.. मग काय चालले आहे जीवनात… ?
मी, “ विचारू नकोस गं, खूप वाईट दिवस चालले आहेत सध्या..
ती, “ अच्छा.
( तिला माहित होते तिच्यासोबत काय झाले होते ते.. म्हणून तिने विषय बदलला आणि आमच्या लहानपणाच्या वार्ता चालू झाल्या.. त्यात मी खूप खुश झाले होते आणि काही वेळाकरिता मला त्याची आठवणचं झाली नाही.. नंतर माझ्या मैत्रिणीने मला सहजच एक प्रश्न विचारला )
“सगळ्यात जास्त काय करायला आवडतं गं तुला….??? ”
मी म्हटलं, “स्वप्न पाहयला..
यावर ती हसू लागली..
वेडी आहेस का? कोणाला स्वप्न बघायला कसे आवडू शकते ?
मग मी ही हसले आणि म्हणाली अगं खरंच.. मला स्वप्नं पाहयला खूप आवडते..
ती विचारते,“ का असे वेड्या सारखे बोलत आहेस तू ?
मी म्हणाले,” कारण ती एकच जागा उरलीये आहे माझ्याकडे जिथे तो अजुनही भेटतो मला अगदी न चुकता….!!
ती म्हणते, “ साथ नाही दिली तुला त्याने विसरून जा त्याला..
मी म्हणाले,” ते शक्य नाही… खूप जीव जडला आहे त्याच्यावर माझा.. आता जरी तो माझा नाही राहिला. तरी मी शेवटपर्यंत त्याच्यावरचं प्रेम करत राहील.
( हे सगळं बोलत असताना माझ्या डोळ्यात पाणी येत होते.. डोळे पुसण्यासाठी मी हळूच पाठी वळले तिला कळू नये म्हणून… आणि बघते तर तो समोर उभा होता.. माझ्या डोळ्यातले पाणी हळूच गालावर आले होते… ते अश्रू त्याने ही पाहिले होते.. त्याचे ही डोळे पाणावले होते… मनात येत होते की सगळे प्रश्न त्याच्यासमोर मांडू.. की काय चुकी होती माझी… ? तितक्यातच मिठी त्याने मारली आणि हळू आवाजात म्हणाला,” नाही राहू शकत गं तुझ्याशिवाय.. हिम्मत नव्हती तुझा सामना करायची म्हणून तुझ्या मैत्रीणीकडे विनवणी केली… तुझ्या मनातील माझे स्थान पाहून मी पस्तावलो.. एका हिऱ्याला मी गमवून बसणार होतो.. मला माफ कर.. आणि त्याचे हे ऐकून मी सगळे विसरून परत एकदा त्याची झाले.. )
तू माझ्या वर प्रेम करतोस का ? | Do you love me in Marathi
एके दिवशी देव पृथ्वीवरच्या प्रेम करणाऱ्या दोन जीवांसाठी एक खुर्ची पाठवतो. ती खुर्ची खूप खास असते. कारण त्या खुर्चीवर बसून माणूस जर खर बोलला तर त्या खुर्चीवरचा हिरवा दिवा पेटणार असतो.. आणि जर त्या खुर्चीवर बसून माणूस जर खोट बोलला तर त्या खुर्चीवरचा लाल दिवा पेटणार असतो.. मुलगा त्या खुर्ची वर बसतो..
मुलगी : तू माझ्यावर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो.
( लगेच लाल दिवा पेटतो )
मुलगा घाबरतो..
मुलगी : घाबरू नकोस. देवाची काहीतरी चूक झाली असेल ही खुर्ची बनवताना.. आपण परत एकदा प्रयत्न करून बघू..
मुलगा परत एकदा त्या खुर्ची वर जाऊन बसतो…
मुलगी : तू माझ्या वर प्रेम करतोस का ?
मुलगा : हो मी तुझ्यावर प्रेम करतो.
( लगेच हिरवा दिवा पेटतो )
काही कळलं का तुम्हाला ?
जेव्हा तो मुलगा पहिल्यांदा त्या खुर्चीवर बसला तोपर्यंत तरी त्या मुलाचं त्या मुलीवर खरं प्रेम नव्हत… पण जेव्हा त्याने त्या मुलीचा आपल्यावर असेलला विश्वास पाहिला आणि तो तिच्यावर खरं खुर प्रेम करू लागला…. यालाच म्हणतात प्रेम…
एक नाते असे ही.. | Relationship Story in Marathi
विष्णूला काही सुचत नव्हते काय करावे.. कसा बसा तो सीमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता… नवीनचं थाटलेला संसार आता थोडा विखरला होता.. सीमाला अचानक रक्ताच्या उलट्या चालू झाल्या होत्या… विष्णू ने तिला अॅडमीट केले… त्याला ही सुचेना काय करावे.. प्रेमविवाहामुळे विष्णूच्या घरचे ही रुसले होते आणि सीमाच्या घरचे ही.. मदत कुठून मागावी कळत नव्हते.. घरासाठी लोन काढले होते त्यामुळे सॅलेरीचे पैसे ही हफ्ता भरण्यासाठी जात होते.. त्याच्या हातात उरले होते ते फक्त प्रेम आणि विश्वास… काय करावे आपल्या बायकोसाठी.. हॉस्पिटलमध्ये उभा राहून तो तिलाच पाहत होता… ती शांत झोपली होती.. अचानक डॉक्टर बाहेर आले, त्यांनी विष्णूला कॅबिनमध्ये बोलावून घेतलं.. विष्णू गेला.. तेथे एक मुलगी ही बसली होती.. डॉक्टर तिच्याशी सवांद करत होते.. त्या मुलीचा नवरा हॉस्पिटलमध्ये सिरीयस होता… डॉक्टर तिला सांगत होते की तिच्या नवऱ्याकडे आता जास्त वेळ उरला नाही तुम्ही त्याला भेटून घ्या.. नंतर डॉक्टरांनी विष्णूला बोलावून घेतले..
डॉक्टर, “ सीमाच्या पोटात गाठ झाली आहे.. ती लवकरात लवकर काढली नाही तर तिला वाचवणे शक्य नाही..
विष्णू हे ऐकून मनात दुखी होतो.. आणि मानत भरलेला श्वास बाहेर टाकून डॉक्टरांना विचारतो..“ डॉक्टर आता काय होईल ?”
डॉक्टर, “ तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फीज भरा आम्ही ऑपरेशनची तयारी करतो..
विष्णू, “ तिला काही होणार तर नाही ना डॉक्टर..
डॉक्टर, “ आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करू.. तुम्ही लवकरात लवकर फीज भरा तशी आम्हाला ऑपरेशनची तयारी करायला..
विष्णू, “ साधारण किती फीज भरावी लागेल.
डॉक्टर, “ १००००० रुपये भरावे लागतील..
विष्णू ठीक आहे म्हणून कॅबिनच्या बाहेर येतो…
विष्णू बाहेर खुर्चीवर डोक्यावर हात देऊन बसला होता. एवढे पैसे कुठून आणावे हे विचार करत होता.. त्याने मित्रांना फोन करून पैसांची मदत मागीतली होती. पण कोणीही तयार नव्हते. कॅबिनमध्ये जी मुलगी होती तिने विष्णूची व्यथा ऐकली. ती मुलगी विष्णूच्या बाजूला जाऊन बसली… ती विष्णूला धीर देत म्हणाली, “ की होईल सगळे नीट तुम्ही काळजी करू नका, माझा नवरा आता सिरीयस आहे.. मला ही सुचत नाही काय करावे.. बघा ना कसं असतं, माझ्या नवऱ्याकडे पैसे खूप आहेत पण आयुष्य कमी आहे आणि तुमच्या बायकोला बरं करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत.. हे आयुष्याच संघर्ष असचं असते.. जे हवं असतं तेच आपल्याला भेटत नाही..” ती बोलत राहते आणि तो फक्त ऐकत राहतो आणि तो काहीच बोलत नाही.. नंतर ती निघून जाते.. विष्णूला अजून ही समजतं नसतं काय करावे.. तो बायकोच्या रूममध्ये जातो.. ती शांत झोपली असते.. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.. तिला जाग येते..
सीमा, “ कुठे होतास कधीपासून, मी इथे एकटीच होती ना..
विष्णू, “ अगं बाहेरच होतो.
सीमा, “ मला काय झालंय, काही सिरीयस गोष्ट नाही आहे ना..
विष्णू, “नाही गं, तू झोप शांत मी आलोच.
सीमाची व्यथा पाहून विष्णू आतून खूप रडत होता.. त्याला काय करावे सुचत नव्हते.. नंतर डॉक्टर समोरून आले ते म्हणाले आम्ही ऑपरेशनच्या तयारीला लागतोय.. तुम्ही इथेच बसा..
विष्णू चकित झाला.. पैसे कोणी भरले विचारात पडला.. तो काउंटरवर जातो. त्याला तिकडे कळते की एक मुलगी त्याच्या नावाने पैसे भरून गेली आहे. विष्णूला ती कॅबिन मधली मुलगी आठवते. तो काउंटरवर असलेल्या मुलीला विचारतो, “ज्यांनी पैसे भरले त्यांचा नवरा याच हॉस्पिटल मध्ये अॅडमीट आहे ना, त्यांचा रूम नंबर सांगाल का ते कुठे आहेत.. “ती म्हणते हो.. ते ३ नंबरच्या रूम मध्ये आहेत.. सीमाच ऑपरेशन चालू असते. विष्णू त्या मुलीच्या नवऱ्याला बघायला जातो.. जेव्हा तो त्या रूम मध्ये जातो. बघतो तर काय ? तिचा नवरा या जगात राहिला नव्हता.. ती मुलगी ही त्याचा हातात हात देऊन बेड वर डोकं ठेऊन होती.. विष्णू ने तिला धीर देण्याचा विचार केला. त्याने तिला ताई हाक मारून बोलवले. समोरून काही उत्तर आले नाही.. विष्णू घाबरला.. तिला उठवायला गेला तेव्हा त्याला कळून चुकले होते की ही सुद्धा जग सोडून गेली होती.. विष्णूच्या डोळ्यात पाणी आले.. तो धावत जाऊन डॉक्टरांना बोलवायला गेला.. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले… तिचा नवरा अर्धा तास अगोदर जीव सोडून गेला आणि ती २५ मिनिटाअगोदर. दोघेही सोबत गेले होते.. विष्णू खूप दुखी झाला होता.. तेव्हा त्याला कळले की सीमाचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले आहे.. तो खुश होता पण मनात त्या मुलीचे आणि तिच्या नवऱ्याचे दु:ख होते. विष्णू सीमाला घरी घेऊन आला.. त्याने हॉस्पिटलमध्ये काय घडले ते सगळं सांगितलं.. सीमाला ही हे ऐकून वाईट वाटले.. सीमा म्हणाली, “असेही एक नाते जुडले तुमच्यात..”
खरे प्रेम करणाऱ्यांसाठी फक्त | True Love Story in Marathi
सगळेजण शाळेच्या संमारभांची तयारी करत होते. कारण खुप वर्षानी सर्वजण एकञ, मिळणार होते पण तो तर खास करुन तिची वाट पाहत होता, कारण तो तिला 15 वर्षानंतर भेटणार होता, पण भीती पण वाटत होती की तिला आमंञण मिळाले असेल का ?? संध्याकाळ झाली सर्व मिञमैञींणी जमा झाले पण ह्याच्या नजरा माञ दरवाज्याजवळच होत्या. कदाचीत देवालाही त्या दोंघाना एकमेकांना मिळवायचे असेल. त्याच दिवशी ती तिच्या घरी येते. कारण तिच्या आईची तब्येत ठीक नसते व म्हणून ती तिच्या नवऱ्यासोबत येते. तेव्हा तिला संमारभ आहे हे समजते. मग तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरुन ती त्या संमारभामध्ये येते..
तिचे नाव निधी.. सर्वात सुदंर दिसत होती व रगांने गोरी असल्यामुळे तर ती अजुनच सुदंर दिसत होती. हा तर तिला पाहतच राहिला व त्याला त्याच्या लहानपणाची आठवण येऊ लागली कसे ते शाळा सुटल्यावर आंब्याच्या झाडाखाली भेटत असे व तिथे दोघे बसून गप्पा मारत असे व गिटार बरोबर गाणी बोलून तिला खुश करत असे. पार्टीची सुरुवात होते हा नेहमीसारखा हातामध्ये गिटार घेऊन…
तुने मेरे जाना कभी नही जाना,
इश्क मेरा दर्द मेरा आशिक तेरा…
भीड में खोया रहेता है…..
अजुनही निधी त्याच्यावरच प्रेम करत असते व ती सुद्धा गायला सुरुवात करते….
अकेले… अकेले…
रेह गयी बिन तेरे यु अकेले…
मै तडपू… या मै तरसू… या चली आऊ में पास तेरे…
इतनी तन्हाई है जिंदगी… खो गयी…
बाते करने सारी… आ रही हु… तुझसे ही…
मेंने मेरे जाना अब है जाना…
इश्क तेरा दर्द… दर्द तेरा…
तू जो गया… हाल ये मेरा रेहता है…
दिल ये मेरा खुद से ही तन्हा रेहता है…
त्या राञी दोंघाना ही झोप लागली नाही. ते दोघ दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागले कधी एकमेकांना भेटतात असे झाले होते भेटण्याचे ठिकाण नेहमीचे आंब्याचे झाड. हा अगोदरच तिथेच तिची वाट पाहत होता. निधी माञ घरातुन खोटे बोलून आली होती.
ती, “कसा आहेस ?
तो, “मी आहे गं व तु येणार या आशेवरच अजून जगत आहे. ते जाऊ दे तुझा नवरा कसा आहे आणि तु खुश तर आहेस ना ?
ती, “खुप प्रेम करतो रे तो माझ्यावर व मी पण करते पण काय माहिती मनामध्ये फक्त तुझाच विचार येतो रे… खुप प्रयत्न केला तुला विसरण्याचा, पण नाही जमले मला.. खुप उशीर विचार केल्यानतंर दोघे ही घरातून पळुन जाण्याचा विचार करतात.. पळून जाण्याचा दिवस ठरला. तो गाडी घेऊन तिची वाट पाहत होता. निघताना माञ तिने तिच्या नवऱ्याला सांगितले की मी आता तुझ्याबरोबर राहू शकत नाही, कारण माझे पहिले प्रेम मी नाही विसरु शकतं…
नवरा, “मला माहित होते की हे असे होणार, कारण पार्टीच्यावेळी तु त्याच्याकडे ज्या नजरेने पाहत होतीस तेव्हा मला कळाले व नतंर तुझ्या मित्रमैत्रीणींकडून समजले. पण मी विचार केला की तो तर तुझा PAST होता व मी PRESENT मध्ये जगणारा माणूस आहे. मला वाटले की या दिवसामध्ये मी तुला इतके प्रेम देईल की, तुला त्याची आठवणच येणार नाही. माझे अश्रु पापण्याच्या आड लपवून तुला नेहमीच सुख देण्याचे मी ठरवले होते. खरे म्हटले आहे प्रेमापेक्षा मैञी श्रेष्ठ असते जा गं जा तु खरचं जा Please आणि खुप खूश रहा तिथे,
अमर तिची वाट पाहत होता ती येताच तिला Are You Ok. असं म्हणाला..
ती, “Yes fine.
गाडीमध्ये बसल्यावर तिला अचानक तिच्या नवऱ्यासोबत जे काही क्षण घालवले ते आठवले आणि ती रडु लागली व तिने त्याला सांगितले की Please Stop The Car.. मला माझ्या घरी परत सोड कारण मी माझ्या नवऱ्याला नाही सोडू शकत..
अमर तिला घेऊन गेला व नवऱ्याला पाहताच तिने त्याला मिठी मारली व त्याच्या मिठीमध्ये ती रडु लागली अमर माञ रडतच राहिला, त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज होती तो घरी जातो. समोर त्याला त्याची आई दिसते. तो त्याच्या आईला मिठी मारतो आणि रडत रडत आईला म्हणतो, माझे पहिले प्रेम अपुर्ण राहिले मी नाही समजावू शकलो तिला… आई पण मी खुप खुश आहे. कारण तिला खरंच खुप चांगला जीवनसाथी मिळाला आहे आणि तो तिच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो आई.
एक निस्वार्थ रोपटं | Selfless Love Story in Marathi
माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानेही बरेच उद्योग केले. पोरींना भरपूर त्रास दिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे बुडवले. “फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहिले. दर महिन्याला त्याच्या अंगावर नवा शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. “जन्माला आलोय तर फुल एन्जॉय करणार, प्रेमात नाही पडणार’ त्याने त्याच्या बाईकरवही “आय हेट गर्ल्स’ असंच लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळे लाडातच मोठा झालेला. शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचे त्याला तसं काही सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता, पण खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा. पण… पण आज त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कुठल्या कुठं पळून गेलंय. तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती. कसलाही विचार न करता त्याने तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं. ती होस्टेलला राहायला होती. सहा महिने तो तिच्या मागे लागला होता.
त्याने खरं प्रेम केलं होतं. त्यामुळे त्या मुलीनेही होकार दिला. त्याचा स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला, तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता. त्यामुळे त्याने प्रेमाविषयी त्यांना काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.
तो तिच्यासोबत नेहमी खडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच फिरायला निघाले तेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत पाण्याची बाटली होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथं चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा मारत बसायचे.
एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळे त्या दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच. त्यामुळे नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोहचल्यावर फोन कर असं सांगून त्याने फोन ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्याने फोन केला पण कुणीच उचलला नाही. घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात धरून त्यानेही परत तिला फोन केला नाही. दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी मला समजलं, तिचा अपघातात मृत्यू झाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच सुचत नव्हतं. खूप धाडस करून मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो. जागेवरच खाली बसला अन् मोठमोठ्यानं रडायला लागला. आवरणार तरी कसं त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न करता त्याने गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन् आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण काही उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्याने स्वत:ला सावरलं. तो तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही तिच्या बाबांना भेटलो अन् अर्ध्या तासात माघारी फिरलो.
मला वाटलं, आम्ही घरी येतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्याने गाडी थांबवली अन् एका झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता अन् झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा स्वभावही बदलला आहे. एखाद्या शांत मुलाप्रमाणं तो वागतोय.
त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीच माहिती नाही. तो घरात काही बोलतही नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो अन् उशीत तोंड खुपसून रडतो. तो म्हणतो, “ते झाडच आता माझं सर्वस्व आहे. त्या झाडाच्या पानाफुलांत मी तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं म्हणतात; पण मी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगीन, की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची “लव्ह स्टोरी’ माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही. खरं प्रेम असेल, तर ही निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.”
प्रेम ही भावना | Story of love in Marathi
प्रेम ही भावना स्वर्ग ही जिच्यासमोर जणू काहीच भासत नाही
तो. . . वय २५.. तसा मुळचा मुंबईचा पण शिक्षणासाठी पुण्यात जोश्यांकडे राहायचा
ती. . . वय २२.. नृत्य शिकायची आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच रहायची
तिचा नकार पण तो तिचं मन वळवण्याच्या प्रयत्नात आज ही तिच्या पाठी घराजवळ पोहोचतो पाठीमागून तो येतच असतो शेवटी हतबल होऊन
ती, “तुला नक्की हवंय तरी काय?”
तो, “तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं हवंय तरी काय.”
ती, “माझं लग्न ठरलंय निर्णय झालाय.”
तो, “तू आनंदी आहेस? नक्की?
हुम्म्म ती होकारार्थी मान हलवते.
तो मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात त्यांचा गैरसमज आणि डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि फुटतो.. गालावरचा हात तसाच राहतो. बाबा तिच्या जवळ येतात आणि दोघे ही नजरे आड होतात. तिला अखेरच बघत तो नाहीसा होतो. अंधार पडू लागतो रस्त्यात समोरून येणारी गाडी त्याला अस्पष्ट दिसते, अंगावर येणारा प्रकाश एक निमिष आणि मग सर्वत्र अंधार दोन महिने उलटतात फासे हळू हळू पालटू लागतात. दोन दिवसावर लग्न. पण ती गेले दोन दिवस त्याचाच विचार करतेय. तिलाही कळत नाही असं का होतंय. त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती. आता दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही कॉलेजमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता. जीवाचं काही बरं वाईट तर करून नाही ना घेतलं. ती फार बैचेन झाली शेवटी जोश्यांकडे पोहचते. त्याचा मोठा अपघात झाल्याच कळत. ती त्याचा नंबर घेते. घाबरत घाबरत त्याला फोन लावते रिंग वाजते फोनही उचलला जातो तो तिचा आवाज ओळखतो. ती रडत असते. रडत रडत बोलत असते त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात. धूसर धूसर अनेक प्रश्न ठेऊन जातात. तो काहीच बोलत नाही. दोघेही भावनाविवश होतात. तो फोन ठेऊन देतो. ती फोनकडे बघत राहते. तो बोलला का नाही. दोन दिवसावर लग्न आता तिला सगळं असह्य होत चाललंय. त्याला भेटण गरजेच आहे. कोणत्याही परिस्थितीत ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते. त्याच्या घरी पोहचते तो आताच पुण्याला निघाल्याच कळत तातडीने पुण्याची रेल्वे पकडते सीट जवळ येते आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही. तो समोर असतो काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात. तो एक कागद घेतो त्याचावर काही तरी गिरवतो आणि तिच्या हातात देतो.
हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक,
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक,
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द,
कळतील तुला का ते बोल निशब्द,
भान हरपते कंठातील शब्द कंठात पोहचणार का?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का?
कागद निसटतो आणि दोघ एकमेकांना मिठीत घेत.
पुढच्या मार्गाला लागतात मित्रांनो प्रेम ही भावना स्वर्ग ही जिच्या समोर जणू काहीच भासत नाही.
तुझी परवानगी न घेता | Prem kahani marathi
अजून आठवतो तो पहिला दिवस. त्या दिवशी मी तुला प्रथम पाहिलं होतं. कपाळावर थोडे पुढे आलेले मऊ, सरळ केस, शांत नजर, शिडशिडीत बांधा, उमदं व्यक्तिमत्त्व..! आमच्या शेजारी राहणाऱ्या तुझ्या नातेवाईकांकडे तू आला होतास. तासाभराने निघून गेलास. हुरहूर मागे ठेवून… त्या वेळी माझी गत अगदी ‘काय बाई सांगू, कसं गं सांगू?’ या गाण्यातल्या मुलीसारखी झाली होती.
तुझं दुसरं दर्शन मला दिवाळीच्या दिवशी झालं. तू पुन्हा शेजारीच आला होतास. त्या दिवाळीत मी मात्र अचानक आलेल्या पावसात जणू चिंब भिजले होते. त्यानंतर तू परदेशात गेल्याचं समजलं. आनंद झाला खरा! पण तुझं दर्शन दुर्लभ होऊन बसलं. ओळख वगैरे तसंच राहिलं. तुझ्यापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. पृथ्वी गोल आहे. त्यामुळे परत भेट होईल, या आशेवर होते मी! आणि खरंच एक दिवस तू अचानक समोर आलास. तुला पाहून माझ्या हृदयाची धकधक थांबली जणू. मी काय बघते आहे, करते आहे, शोधते आहे, मलाच कळत नव्हतं.
तुझ्या नजरेतून माझी ती स्थिती सुटली नसेल. पण काय करू, माझा स्वत:वर ताबाच राहिला नाही. मी विरघळून जातेय, असंच वाटलं मला. हे सगळं माझं एकटीचंच गुपित होतं आजवर. मी कुणालाच त्याचा पत्ता लागू दिला नाही. आजच मी हे सगळं सांगतेय. अरे, तुझ्या नकळत किती आणि काय काय शेअर केलं मी तुझ्या बरोबर, काय सांगू? देवळातली शांतता, पहाटेचा गार वारा, समुद्रकाठचा सूर्यास्त, विजा कडकडताना पडणारा पाऊस, डोंगरमाथा आणि बोटीवरचा डेकसुद्धा! गाढवा (हे प्रेमाने हं!) किती रात्री जागवलंस मला. सगळीकडे माझ्या आसपास असतोस. पण खराखुरा नसतोसच. देव सगळीकडे आहे, पण दर्शनाला देवळात जातातच ना? तसंच समज. तुझ्या अस्तित्वाने सगळं सुगंधी होत जातं. तुझ्याशी जोडलेलं हे नातं मी असंच जपणार आहे. तुझी परवानगी न घेता. चालेल ना? सोनेरी क्षणांचा सोबती असूनही अनभिज्ञ असलेला. खरोखर गाढव, एक नाही शंभर.
कबुतर जा जा जा कथा
“एके दिवशी सकाळी प्रेयसी,
“कबुतर जा जा जा …. पहले प्यार कि पहली चिट्ठी साजन को दे आ ”
हे गाणं म्हणतं होती !!!
प्रियकर :- खरचं आजही असं कबुतर पाठविता आलं तर काय मजा येईल ना !!
प्रेयसी :- ओह्ह खरचं असं झालं तर
तो माझ्या आयुष्यातील सर्वात Romantic क्षण
असेलं !! ( असं ती सहज बोलून गेली )
त्याच दिवशी संध्याकाळी एक सुंदर पांढर कबुतर एक
चिट्ठी घेऊन आलं, ……….
त्यात लिहिले होतं, ” असंच खरं प्रेम करत रहा “
“कबुतर चिट्ठी घेऊन आलं” ह्यावर तिचा विश्वासचं
बसतं नव्हता, तिने प्रियकराला फोन केला व त्याबद्दल आनंदाने विचारलं
प्रियकर :- काय ? झोपेत आहेस का ? स्वप्न पडले का ? अग कबुतराचा जमाना गेला …स्वप्नातून बाहेर ये !!
प्रेयसी :- मी मजाक करत नाहीये इथे येऊन बघ !!
( प्रियकर तिथे येतो व बघतो….त्यावर त्याचाही विश्वास बसत नाही कि आजकालच्या जमान्यात असं कसं झालं ? )
तेवढ्यात तिथे ते पांढर कबुतर पुन्हा येतं व त्या दोघांच्या हातात एक चिट्ठी देऊन जातं !! त्यात लिहिले असतं,”माझेही तिच्यावर असंच जीवापाड प्रेम होतं, पण घरच्यांनी मान्य केलं नाही, हे सहन न होऊन बिचारीने आत्महत्या केली, आज मी मोहब्बते च्या शाहरुख खान सारखं तिच्यासाठी सगळीकडे फिरत आहे, व प्रेम नेहमी जिवंत रहावे म्हणून
तुमच्या सारख्या प्रेमी युगलांना मदत करत आहे…..म्हणून पहिल्या चिट्ठीत “असंच खरं प्रेम करत रहा” असे लिहिले !!
मी कोणी मानव नसून मी खरंच कबुतर आहे व हि माझी कहाणी आहे !!!
एका मुलाची कथा | A boy’s story in Marathi
मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहयचो. ती माझी “बेस्ट फ्रेंड” होती. मला ती खरंच खूप आवडायची. पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हतं आणि ते मला माहित होतं. वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या मी तिला दिल्या ती गेली तिला मला सांगायचं होतं बरचं काही पण जमलच नाही “माहित नाही का…..? कॉलेजला असताना माझ्या फोन वर call आला… तिचाचं होता तो … ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती आणि ती मला सांगत होती तिचं ज्याच्यावर प्रेम होतं त्याने कसा त्रास दिला तिला… तिने मला भेटायला बोलवलं होतं मी तिला भेटायला गेलो…. मी तिच्या समोरच बसलो होतो मी तिच्या डोळ्यात आणि अश्रूकडे पाहत बसलो होतो… २ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचं होतं… मी
तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चित्रपटाची तिकीट काढली… पण तिने मला म्हटलं मी झोपते.. तिने म्हटलं “बरं वाटलं तू माझ्यासाठी इथे आलास…” खूप वेळा शांत उभे होतो… मग मी निघालो… आज हि मला म्हणता नाही आलं कि माझं तिच्यावर किती प्रेम आहे … माहित नाही का???
सिनियर वर्षाला आमच्या कॉलेज मध्ये prom_night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एकाजोडीत जायचं ती माझ्या locker जवळ आणि म्हणाली…. माझ्या सोबत कोणी नाही आहे… तू माझ्या सोबत येशील… माझ्या सोबत हि कोणी नव्हतं… आम्ही दोघांनी “बेस्ट फ्रेंड्स” ह्या नात्याने जाण्याचा निर्णय घेतला … prom NIGHT ला सगळं काही नीट झालं.. आम्ही दोघे निघालो… मी तिची वाट पाहत होतो… ती तेवढ्यात आली… तिने माझ्याकडे बघून एक smile दिली आज हि नेहमी सारखं तिला काही बोलू शकलो नाही.. पण मी खुश होतो… कि ती खुश आहे… दिवसा मागून दिवस गेले… आठवडे लोटले किती तरी महिने गेले तिला काही बोलण्या आधीच graduation चा दिवस आला … मी तिला पाहिलं … तिने नवी साडी नेसली होती…. खूप छान दिसत होती.. माझं तिच्या वर एकतर्फी प्रेम होतं पण काय करणार तिला जमत नव्हत ना आमची शेवटची भेट होणार होती… ती समोरून आली… मला तर काही बोलताच आलं नाही… तिने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला … आणि म्हणाली “आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे..” बघाना गंमत… आज ही जमलं नाही बोलायला काही वर्षांनी मी लग्नात आलो होतो… आणि ते लग्न होतं तीच ..तिचं दुसऱ्यासोबत लग्न ठरलं होतं.. माझं प्रेम मला कधी व्यक्तच नाही करता आलं…पण तिला मैत्रीचं नात जास्त पसंत होतं आणि मी ते निभावलं….”तू आज हि माझ्या सोबत आहेस” असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत.. हो म्हटले ..आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्यावर प्रेम आहे..
खूप वर्षांनी… मी आमच्या शाळेत एकदा गेलो …तिथे आमच्या वर्गातले सगळे जण आले होते…ती हि… तिथे प्रत्येकाने आपली लहानपणी लिहिलेली पत्र ठेवली होती….मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं… आणि वाचायला लागलो…7th:”वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो… . किती वेडा आहे हा मुलगा.. “college_year:” ला मी त्याला खोट सांगितलं कि माझा ब्रेकअप झाला तरी हा वेडा माझ्यासाठी आला prom_night” ला.. आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्यावर प्रेम आहे…. मी वाट बघतेय मला त्याला सांगावस वाटतंय कि माझं हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे…graduation_year: ला “किती लाजाळू आहे. हा साडीत पाहून काही बोलला नाही” marriage_day:”आज माझं लग्न आहे… माझं त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील….. हे सगळं वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला… आणि त्याने पाहिलं तर समोर ती ही आज रडत होती….कारण दोघांना असीम प्रेम पण जमलं नाही व्यक्त करायला.. यामुळे जे काही होईल ते होऊ द्या पण प्रेम व्यक्त करायला शिका.
शेवटी तो आला नाही | Prem kahani in marathi
कॉलेजमधले बी. कॉमचे शेवटचे वर्ष कॉलेजची ओव्हरनाइट ट्रीप होती. शेवटची असल्यामुळे वर्गातले सर्व जण आले होते. ती ही… दिवसभराच्या दंगामस्ती नंतर रात्री कॅम्पफायर भोवती सगळे जमले. रात्र झाल्यामुळे पडलेल्या मस्त थंडीत कॅम्पफायरची उब हवीहवीशी वाटत होती.
त्या उबेत अंताक्षरी चांगलीच रंगली नेहमी बुजरी बुजरी असणारी ती ही गायली मला उगाचंच वाटत होते की ती आपल्याकडे बघून गात आहे, रात्र चढायला लागली आणि हळू हळू, सगळे पेंगुळायला लागले आणि एक एक जण झोपायला जायला लागले. हळू हळू सगळेच गेले मी ही गेलो मग झोपयला कसल्या तरी हुर्हुरीने मन अस्वस्थ होते, काय ते नक्की कळत नव्हते गादीवर पडलो होतो पण झोप येईना…
उगाचच कूस बदलून झोपायचा प्रयत्न करत होतो… तेवढ्यात बाहेर कसली तरी चाहुल लागली म्हणून बाहेर आलो. पाहतो तर ती एकटीच कॅम्पफायर शेजारी निखारे न्याहाळत बसली होती. डाव्या हातावर भार देऊन, दोन्ही पाय मागे दुमडून एकटक निखारे न्याहाळत, कसल्यातरी विचारात दंग… धीर करून मी पुढे गेलो, तिच्या बाजूला येऊन उभा राहिलो, तिला अजून माझी चाहुल लागली नसावी, इतकी ती विचारात दंग होती. आजपर्यंत ती आणि मी दोघंही एकटे असताना कधीच बोललो नव्हतो “काही प्रॉब्लेम? ” मी विचारले.. एकदम दचकून तिने माझ्याकडे पाहिले.. बारीकसे हसून म्हणाली “नाही. काही नाही “मग इथेच अजून..?” “सहजच” तिच्या बोलण्यातल्या सहज सुलभते मुळे रीलॅक्स होऊन मी तिच्या शेजारी बसलो… तिला न्याहाळत… मोकळे सोडलेले तिचे केस वाऱ्याचे निमित्य करून, तिच्या गालाशी खेळत होते. वाऱ्याच्या झुळकिने निखारे फुलले की त्याचा लाल उजड तिच्या चेहऱ्यावर पडत होता, त्याच्याशी ते केस लपंडाव खेळत होते,
त्या लाल उजाडात तिचा सुंदर चेहरा अधिकच, मोहक दिसत होता. मधूनच आपल्या उजव्या हाताने, ती ते वाऱ्याने झुळझुळणारे केस सावरून कानामागे सारत होती, मी आता तिच्या अगदी जवळ बसलो होतो. अनाहूत पणे माझा हात तिच्या चेहऱ्यावर झुळझुळणाऱ्या त्या केसांकडे गेला. पण मी तो आवरला. घड्याळ बघायचं नाटक करून हात मागे घेतला. पुढे पसरलेले पाय दुमडून छातीशी घेतले, गुडघ्याला मिठी मारून, हनुवटी गुढग्यावर ठेवून तिच्या चेहऱ्यावरचा तो लाल प्रकाशाचा लपंडाव न्याहाळत राहिलो. आदितीने पण आता आपले केस मागे बांधले. आदिती दोन तीन महिन्यांपूर्वीच आमच्या कॉलेजमध्ये आमच्या वर्गात आली आणि सरळ सर्वांच्या मनात रूजली. आदिती रूजली पण रूळली मात्र नाही. ती कोणात, फारशी मिसळत नसे किंवा कोणाशी फारसे बोलतही नसे, तिला कॉलेजला सोडायला बहुदा तिचे वडील आणि तिला घ्यायला भाऊ येत असे. तिच्याशी बोलायचा, मी एक दोनदा प्रयत्न केला पण फारशी दाद नाही मिळाली. नाही म्हणायला आमच्या कंपू बरोबर कॅंटीनला आली ती तीन चार वेळा आमच्या बरोबर, मिसळ खायला पण आमच्यात ती कधी मिसळली नाही. एक दिवस आमचा कंपू असाच कॉलेजच्या आवारात, टवाळक्या करत होता. अचानक सर्वजण शांत झाले आणि माझ्यामागे बघू लागले. काय आहे रे मागे असे म्हणत मी मागे बघितले तर मागे आदिती होती. मी काही म्हणायच्या आत ती म्हणाली “मला तुझी अक्कौंट्सची वही पाहिजे. “माझी अक्कौंट्सची वही. हो तुझी वही असे म्हणत तिने मी रोज जी एकमेव फुल्लस्केप नोटबूक कॉलेजला आणत असे ती माझ्या हातातून घेत मी यायच्या आधी काय काय झाले ते पाहिजे होते असे म्हणत निघून गेली.
दोन तीन दिवसांनी वही परत आली. मी ती वही बघायच्या आत आमच्या कंपूने ती ताब्यात घेऊन तिचे, डीसेकशन केले, कुठे काही मेसेज वगैरे सापडतोय का, बघायला पण त्यांना काहीही नाही मिळाले. मी दाखवले नसले तरी मी ही तेच करायला खूप खूप उत्सुक होतो. त्यामुळे घरी गेल्या गेल्या मी पण वहीचे संपूर्ण डीसेकशन केले पण कुठेही काहीही सापडले नाही. नाही म्हणायला शेवटच्या दोन तीन पानानवरच्या, ग्राफीटी मध्ये माझ्या लुनाचा नंबर आणि त्या खाली काही तरी अगम्य भाषेतील मजकुराची भर पडली होती, पण हे कंपूपैकी कोणाचे तरी काम असेल, म्हणून मी जास्त लक्ष दिले नाही…“मला आवडतोस तू खूप” शांततेचा भंग करत अचानक आदिती म्हणाली… मी दचकून तिच्या कडे बघून “काय….? असे जवळजवळ ओरडलोच… वाचले नाहीस का…? “तुझ्या वहीत मागच्या पानावर लिहले होते मी… लुंनाच्या नंबरच्या खाली ते तू लिहले होतेस…? सतोडवआ असे काही तरी होते ते? हो, उलटे वाच उर्दू सारखे. असे म्हणत ती उठली आणि चला आता झोपूयात गुडनाइट असे म्हणत ती मुलींच्या डॉर्मेटरी कडे गेली.. आता थंडी चांगलीच जाणवू लागली होती… विझत्या, निखर्यान वर फुंकर मारून मी ते चेतवायचा प्रयत्न केला, आवाक झालेला मी तसाच पाठीवर आडवा, होऊन आकाशाकडे बघत विचार करू लागलो व्हॉट नेक्स्ट…?आता पुढे काय आणि कसं…? विचारात किती वेळ गेला कळलं नाही पण अचानक..
आवाज आला, ए दगडा झोपायचं नाही का तुला..? चलं आत अरविंद. दुसरे कोण..? कंपुतला माझा सगळ्यात जवळचा मित्र… त्याच्या दर्डावण्यामुळे मी त्याच्या, बरोबर आमच्या डॉर्मेटरी कडे निघालो. जाता जाता त्याने विचारलं काय म्हणत होती ती…? कोण…? मी साळसूद पणे विचारले आदिती मला माहितीये ती पण होती इथे बराच वेळ. “काही नाही रे विशेष” असे म्हणून विषय झटकून मी आत खोलीत येऊन डोक्यावरुन पांघरूण घेऊन झोपेचे नाटक केले. ट्रीप परत आली, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, कॉलेज परत सुरू झाले. तेच रूटीन आमचे आणि आदितीचे. भराभरा दिवस गेले, फाईनल परीक्षा सुरु झाल्या आणि संपल्या सुद्धा शेवटच्या पेपर नंतर आम्ही सगळळे कंपू पेपर डिसकस करत येत होतो तेवढ्यात अरविंद कानात कुजबुजला आदिती येतीये, मी सगळ्यांना घेऊन सटकतो, तू आज तरी काही तरी सीरियसली बोल तिच्याशी मी आणि आदिती चालत गेटकडे निघालो. काय ठरवलयंस पुढे? आदितीने विचारले काही नाही नोकरी बघतोय… बहुदा सीए पण करीन. त्याविषयी नाही विचारलं आदिती म्हणाली आमच्याकडे मला स्तळ बघतं आहे.. माझ्यासाठी दोन तीन महिने फक्त मी हे पुढे ढकलू शकेन, त्या पेक्षा नाही…चल बाय दादा आलाय असे म्हणत, ती मोटारसायकल वर आलेल्या तिला घ्यायला तिच्या भावा बरोबर निघून गेली. मी सुन्न होऊन नुसताच उभा होतो. काय म्हणाली..? अरविंद दुसरे कोण? काही नाही रे खोट बोलू नकोस, मी तुझ्या वहीतलं वाचलंय तिने लिहलेले तू वाचलंस? हो तुझ्या लूंनाच्या नंबर खाली तिने काय लिहिले , होतं ते मला माहिती आहे अरविंद म्हणाला मी तिचा पत्ता काढलाय, आपण तिच्या घरी जाऊयात मी बोलेन पाहिजे तर तिच्या वडिलांशी पण be serious atleast now. माझ्याकडे ह्या रत्नाच कोंदण नाही रे अरविंदा. मी अरविंदाला म्हणालो… मूर्ख आहेस, अरे रत्नांच कधीच म्हणणं नसतं सोन्याचंच कोंदण पाहिजे म्हणून चांदीत पण रत्न सेट होतात, अगदी उत्तम रित्या जास्त विचार नको करूस. hmm माझ्या ट्रेडमार्क उत्तरावर तू म्हणजे ना असे म्हणत तो चिडचिडत निघून गेला, पण घरच्या जबाबदाऱ्या आईचे आजारपण आणि दोन बेडरूमच्या फ्लॅट मध्ये राहणारे आम्ही सहा जण ह्या परिस्थितीत अजून पाच सहा वर्ष तरी लग्नाचा विचार करणं शक्य नव्हते हे मी अरविंदाला कसे समजाऊ…?
बघता बघता रिजल्ट आले रिजल्ट बघायला कॉलेज वर गेलो. माझ्या रिजल्टचा प्रश्नच नव्हता माझा फर्स्ट क्लास ठरलेला होता पण मला तिला बघायचे होते. लिस्ट मध्ये तिचे नाव होते, पण ती आसपास कुठेही नव्हती.. तिचे लग्न झाले. अरविंद दुसरे कोण..? तिचे लग्न झाले आणि त्यामुळे ती नाही दिसणार तुला आता इथे मला दिसली होती लग्नानंतर, आमची नजरा नजर झाली, खूप आतुरतेने बघितले रे तिने माझ्याकडे…दगडा…
तू असे नको होतेस करायला. हे सगळे कालपासून का आठवते आहे येवढ्या त्रिव्यतेने..? गेल्या तीस पस्तीस वर्षात दहा वेळाही न आठवलेली ही गोष्ट काल पासून सतत का भेडसावतीये..? बाबा तुमचा फोन ह्या आवाजाने दचकलो. माझी मुलगी हातात फोन घेऊन उभी होती कोण ग..? अरविंद काका काय रे अरविंदा..? असे म्हणे पर्यंत अरविंद म्हणाला आजचा पेपर बघितलास..? त्याचे वाक्य संपताय तो पर्यंत समोर पडलेल्या वर्तमांपत्रावर नजर गेली.. द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण आज पर्यंतच्या आयुष्यात कधीही रडलो नव्हतो आई गेली तेव्हा सुद्धा ,उर भरून आला होता, अश्रु डोकावले होते पण कधी बाहेर पडले नव्हते आज प्रथमच, एक अश्रु सगळ्यांची नजर चुकवून समोरच्या चहाच्या कपात पडला. खास काही माझ्या वाचनात आलेले खास काही..
ब्रेकअप….एक प्रियकर.. | Break up story in marathi
“यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज आला…
मला खुप बरे वाटले….
मी विचार केला,
कालचे भांडण ती विसरली असेल पण माझ्या विचारांचा चक्काचूर झाला कारण तो ब्रेकअपचा मेसेज होता..
ते वाचल्यावर मी जास्त मनावर दडपण न घेता लगेच,
रिप्लाय केला: चालेल….
तिला माझा रिप्लाय बघून हेच वाटलं असणार की मला काहीच फरक पडत नाही, तिच्या जाण्याने….
पण,
तिला काय माहित….
माझी काय हालत झालेली, मनातून मी खुप खचलेलो..”रडू तर येत होत… डोळ्यात मात्र दिसत नव्हत… चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत…” एवढा वेळात तिचा एकही रिप्लाय आला नाही, म्हणून मी झोपण्याच्या तयारीत होतो….
तेवढ्यात पुन्हा एक मेसेज माझ्या इनबॉक्स मध्ये आला, लिहिले होते कीः
“प्रेम हे एका धनुष्याच्या बाणासारखा आहे… तो बाण सरळ समोरील व्यक्तीच्या ह्रदयाचा वेध घेतो. हा बाण ह्रदयात घुसताना काहीच वाटत नाही, पण काढताना मात्र अतोनात यातना देऊन जातो..”
तिचा मेसेज वाचुन कळले की तिला खुप दुःख झाले आहे….
पण, तिला झालेल्या, यातना मलाही झाल्याच होत्या…
म्हणुन मी लगेच रिप्लाय केलाः
“प्रत्येकाच्या जीवनातून प्रेमाचा बाण एकदाच धनुष्यातून सुटतो, माझ्याकडुन सुद्धा सुटला.. पण तो निष्फळ ठरला… एकदा सुटलेला बाण कधी पुन्हा येतो का..?”
त्यानंतर तिचा कधी कॉल, मेसेज रिप्लाय नाही आला आणि मी सुद्धा तसा प्रयत्न कधी केला नाही…
कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून…
तात्पर्य: प्रेमाच्या त्या बाणाला नेहमी ह्रदयात जपुन ठेवा कारण, काढण्याचा प्रयत्न केला तर मिळतात त्या फक्त यातना…!!!!!”कोणाला इतकी पण वाट बघायला लावू नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…
“निष्पाप मनात नेहमी तुझं ‘मागणं’ येतं,
अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं,
भिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी..”
मी तुझ्या शिवाय जगूच शकत नाही”
“मी तुझ्या शिवाय जगूच शकत नाही” या सारखे प्रेमातले दुसरे चुकीचे वाक्य नाही.
एक गोष्ट सांगतो, मग बघा पटतेय का माझे म्हणणे, “एक राजा होता, त्याला एक सुंदर मुलगी होती. राजाचे आपल्या मुलीवर खूप प्रेम होते. एकदा ती राजकन्या एका राजकुमारच्या प्रेमात पडली. तिने हि गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. राजाने तिला विचारले कि, “किती प्रेम करतेस त्याच्यावर?” ती म्हणाली, “मी त्याच्या शिवाय जगूच शकत नाही.” राजाने त्यांच्या प्रेमाची परीक्षा घ्यायची ठरवले. त्याने त्या राजकुमाराला बोलावून घेतले. राजकन्या खुश झाली. पण राजाच्या मनात काही वेगळेच होते.
राजकुमार आल्यावर राजाने सैनिकांना आदेश दिला कि, “ह्या राजकुमाराला आणि राजकन्येला एकत्र एकमेकांच्या मिठीत एका खांबाला घट्ट बांधून तळघरात डांबून ठेवा, अन्न देवू नका.” राजकन्या आणि राजकुमार आश्चर्यचकित झाले. पण आता एकमेकांच्या मिठीत राहायला मिळणार म्हणून “खूप खूप” खुश झाले. त्यांनी एकमेकांना मिठीत घेतले, आणि सैन्निकांनी त्यांना बांधून तळघरात कोंडले. पहिल्या दोन तासात दोघांनीही एकमेकांना नजरेत पाहून एकमेकांना बरेच काही सांगून घेतले, पुढच्या दोन तासात एकमेकांच्या मिठीत सुखी संसारची स्वप्ने बघितली,
“आपण हे करू, आपण ते करू, हे घेऊ, ते घेऊ आणि बरेच काय काय…….” पुढच्या तासात तळघरातल्या गरमीने दोघे पण घामाघूम झाले. घामाने चीपचीप झालेली त्यांची शरीरे ओलीचिंब झाली. मिठीत असल्याने जरा जास्तच गरम होऊ लागले, आणि बांधल्यामुळे लांबही होता येत नव्हते. उपाशी पोटात कावळे ओरडत होतेच. हळू हळू दोघांची चीड चीड वाढली. “जरा हात बाजूला कर न, मला गरम होतंय.”
“अगं, मग मी काय थंड हवेत मजा करतोय का? मलाही गरम होतंय”
“आधीच गरम होतंय, त्यात तू डोकं फिरवू नको हा”.
“मी डोकं फिरवतोय?”
“जरा शांत रहा रे उभे राहून राहून पाय दुखतायत माझे.. तुला काय?”
“मी काय मग सिंहासनावर बसलोय का? उगाच बोलत बसू नको. मला जरा शांत राहु दे. गप्प बस जरा. किती बोलतेस तू….” थोड्या वेळापूर्वी स्वर्ग वाटलेली मिठी नरका पेक्षा जास्त त्रासदायक वाटू लागली.
“बाजूला हो रे… काढा मला कोणातरी इथून बाहेर”
“मला पण काही जास्त मजा नाही येतंय तुझ्या मिठीत. तुझे तोंड बघायची पण इच्छा नाहियेय माझी”
“मला तरी कुठे इच्छा तुझे थोबाड बघायची.”
थोड्या वेळाने राजा तळघरात आला आणि दोघानाही विचारले कि,
“आता काय म्हणणे आहे तुमचे?”
दोघेही एकाच स्वरात एकत्र जोरात ओरडून म्हणाले, “सोडा आम्हाला,एक क्षण पण सोबत जगू शकत नाही आम्ही.”
मित्रांनो मी प्रेमाच्या विरोधात नाहीयेय,
“सुंदर जगायचे तर कोण न कोणाची साथ हवीच” पण कोणा शिवाय कोणाचेही काही अडत नाही. दूर गेल्यावर हूर हूर होते मनाची…. मान्य आहे. पण वेळेसोबत सगळे ठीक होते.
देव जन्माला घालताना पण एकटा जीव जन्माला घालतो, आणि मरताना एकटाच जीव घेऊन जातो.
शेवटी ती माझी झाली
प्रियाने आज मला भेटायची इच्छा व्यक्त केली, तिथेच जिथे, आम्ही कायम भेटतो…
ती आली थोडी दुःखी दिसत होती…
मला म्हणाली, आदित्य मला माफ कर पण, आपलं लग्न होऊ शकणार नाही….
काय…? (मी आश्चर्याने म्हणालो)…
हो हे खरंय, तुझी जात वेगळी आहे…
माझे आईवडील याला कधीच, परवानगी देणार नाहीत…
आईवडील आणि पुर्ण जगाविरुद्ध, जाऊन तुझ्याशी लग्न करण्याची माझ्यात हिमंत नाही…
असं, म्हणुन ती रडत निघुन गेली, या मुलीही किती diffrent असतात ना…
त्यांचं दुःख डोळ्यातुन अश्रुवाटे बाहेर पडतं पण आमचं काय..?
मी तर तिथेच विचार करत बसलो..
चार वर्षाची आमची रिलेशनशिप अशी कशी तोडु शकते ती..?
माझी पापणीही न हालतेल्या त्या डोळ्यात पाणी भरले होते, पण जगाच्या लाजेने तेही बाहेर येत नव्हते…
मी ते सगळं दुःख मनात, बांधुन चालु लागलो, चालता चालता एक टेकडी आली जिथे जोराचा वारा सुटला होता…
कोणीही नव्हतं तिथे, मला जोरात ओरडावसं वाटत होतं… कोणाचीही परवा न करता मी, जोरजोरात ओरडु लागलो खुपच जोरात, जवळजवळ दहा मिनिटे, मी ओरडत होतो… मला हे कळलंच नाही की माझं ओरडणं रडण्यामध्ये कधी बदललं… थोड्या वेळाने माझे डोळेही मोकळे झाले आणि मनही, मग मी ठरवलं मी तिच्या आयुष्यात, माझ्यामुळे कसलाही त्रास होऊ देणार नाही, माझी जी ही मदत तिला तिचं पुढचं आयुष्य सावरण्यासाठी लागेल ती मी करेन, काही दिवसांनी तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवल्याची बातमी मला कळली, मी मोठ्या मनाने तिचं अभिनंदन केलं मला ती थोडी निराश दिसत होती पण तिचे घरचे खुप आनंदी दिसत होते…
मी तिच्या लग्नकार्यात मोठ्या हिरीरीने सहभागी व्हायचं ठरवलं, कल्पनाने एक मित्र म्हणुन, तिच्या घरच्यांशी माझी ओळख करुन दिली, आणि तिच्या भावी नवऱ्याशीही तिने माझी ओळख करुन दिली, तो खुपच सज्जन मुलगा वाटला त्याला पगार भरभक्कम होता त्यामध्ये प्रियाला तो कदाचित सुखी ठेवु शकेल…लग्नकार्यात कार्यरत असलेल्या नातलगांनी आणि मी कामे वाटुन घेतली… लग्न उद्याच होते पण हळदीचा कार्यक्रम आज होता, नवरा मुलगा परगावचा असल्याने त्यांना मोठा प्रवास करावा लागणार होता, मुलाला घेऊन यायची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती…
मी वेळेवर नवऱ्या मुलाला घेऊन तिथुन निघालो, दोन वाहनांमध्ये मिळुन एकूण चौदाजण आम्ही होतो…
गाड्या वेगात असताना एका ट्रकने नवऱ्या मुलाच्या, वाहनाला जोराची धडक दिली…
खुपच जबर अपघात झाला, सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने आमच्या वाहनाला त्याची धडक बसली नाही…
सर्वांना वेळेवर हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केलं गेलं, अपघातात एक जण मृत आणि एकुण चार जण जबर जखमी झाले होते…
जखमींमध्ये नवरा मुलगाही होता…
बाकीच्यांची condition control मध्ये होती पण नवऱ्या मुलाची condition अजुन देखील चांगली नव्हती…
रक्त खुपच वाहुन गेल्याने शरीरात रक्ताची खुपच कमतरता झाली आहे, O + या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता होती, सुदैवाने माझा रक्तगट, हाच असल्याने मी माझं रक्त देण्यास परवानगी मिळवली… माझ्या या निर्णयाने काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं… सर्व टेस्टस नंतर माझं रक्त देण्यास योग्य आहे, अशा, निष्कर्षाप्रत ते पोहेचले, एका बेडवर मी आणि एका बेडवर प्रियाचा भावी नवरा दिपक अशी स्थिती होती… माझं रक्त बाटलीत जमा होत होतं, आणि तेच त्याच्यापर्यँत सलाईन, पाइपद्वारे पोहोचवलं जात होतं विचार करता करता मला, तिथे थोडी झोप लागली.. जेव्हा मला जाग आली तेव्हा दिपकला केव्हाची शुद्ध आली होती….आणि प्रियाही तिच्या आई वडीलांसोबत केव्हाची तिथे आली होती.. तिने माझे खुप आभार मानले, काही दिवसांनी दीपक पुर्ण बरा झाला त्याला डिस्चार्ज मिळाला आणि एक दिवस… दिपक कल्पनाला घेऊन माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला लग्न करशील का हिच्याशी…?
मी वेगळ्याच अविर्भावात म्हणालो, “अरे काय बोलतोयस तु..?”
होय खरं तेच बोलतोय, हॉस्पीटलमध्ये जेव्हा तुझं रक्त मला चढवलं जात होतं तेव्हा मला शुद्ध आली,प ण त्यावेळेस तुला झोप लागली, होती झोपेत तुझ्या तोँडात सारखं प्रियाचं नाव येत होतं….
थोड्या वेळाने कल्पना तिथे आली तेव्हा मी तिला, तुमच्याबद्दल विचारलं…
खुपच force केल्यावर तिने मला तुमच्या प्रेमाबद्दल सांगितलं, मला खुपच वाईट वाटलं… मी दोषी, असल्यासारखं मला वाटत होतं दुसऱ्याच प्रेम हिरावुन घेऊन, आपला संसार थाटण्याइतका स्वार्थी मी नक्कीच, नव्हतो, आणि प्रामुख्याने त्याचं ज्याने माझा जीव, वाचवलाय, म्हणुन मी ठरवलं की काही करुन तुम्हा दोघांचं लग्न लावुन द्यायचं….
मी तडख प्रियाच्या घरी गेलो, तुम्हा दोघांविषयी सगळं सांगितलं, तुम्हा दोघांच्या लग्नाबद्दल आग्रह धरला…
वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे ते लग्नाला परवानगी देत नव्हते, पण मी त्यांना पटवुन दिलं की लग्न, करताना समोरच्याची नवरा बायकोच्या नात्यावर असणारी, निष्ठा, त्याचं प्रेम पहावं, जात, कुळ, धर्म या फक्त मानने न मानने,
यावरच अवलंबुन असणाऱ्या गोष्टी आहेत ज्या कधीही आयुष्याला पुरत नाहीत… मग त्यांनीही तुमच्या लग्नाला मोठ्या मनाने परवानगी दिली…
बोल आता, करशील कल्पनाशी लग्न…? पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी मी होकार दर्शविला, आणि दिपकने मला छातीशी धरलं, प्रियानेही दीपकला मिठी मारली….
दीपकचे आभार कसे मानावे हे आम्हा दोघांनाही त्यावेळी कळलंच नाही, पण आज आमचं जे लग्न होतंय ते फक्त दिपकमुळेच… आमच्या सुखी संसाराचा पाया, खऱ्या अर्थाने दीपकनेच रचला……
आयुष्यभर आपली lovelife सावरण्यासाठी दीपकसारख्याच मित्राची वाट पहात असतात…. तो काही येत नाही, येते ती ही बातमी येते की इतकी दिवस जिच्यासंगे आपण relationship मध्ये होतो, तिचं दुसऱ्यासंगे लग्न ठरलंय.. दिपकसारखी पात्रे फक्त कल्पनेतच असतात रियल लाईफमध्ये, तुम्हा स्वतःलाच दिपक व्हायचंय मित्रांनो, आणि आपल्या, lovelife ला married life मध्ये convert करायचंय…..
माझं काही राहून गेलं
आज मला अतिशय अस्वस्थ वाटत आहे म्हणून मनातील विचार कागदावर लिहावे असे वाटते म्हणून मी हे लिहित आहे.. आज आठ ते दहा महिन्यात घडलेल्या इतिहासाची पानं मला जागवत होती.. आजचा निरोप अटळ होता. तो घेतला, पण मनाला परत येता येत नव्हतं. आपली फक्त तोंड ओळख होती.. कॉलेजला आल्यानंतर प्रथम तुलाच बघितलं.. नंतर कळले कि तू माझी जुनियर आहेस..फ्रेशेर्स पार्टी पासून तुला पाहत होतो अन तुझ्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन केव्हा बदलला ते कळलेचं नाही.. तुझं येणं तुझं जाणं हवहवंस वाटू लागलं.. तू एखाद्या दिवशी दिसली नाही तरी चुकचुकल्या सारखे वाटायचे.. तुझी काळजी वाटायची.. माझे मन प्रेमात पडल्याचा स्वीकार करत नसले तरी अंतर्मनात तुझ्यासाठी गुंतल्याचा भास होत होता. तू फार कमी बोलायचीस.. मला मात्र आवडत होतं तुझं असं अबोल राहणं. तुझ्यात खरच एक वेगळेपण जाणवायचे. तुझ्या इतकं सोज्वळ कुणी नव्हतं… त्याच क्षणाला मला तुझ्याशी एक ऋणानुबंध, रेशीमगाठ बांधावीशी वाटली. मला नूतन कॉलेजचे वातावरण छान वाटू लागले. त्याचे श्रेय फक्त तुलाच.. मी मात्र नेहमी तुझ्याशी बोलायचं निमित्त शोधायचो. अशातच एक निमित्त आलं तुझ्या वाढदिवसाचं.. त्या दिवशी तुझ्याशी बोलणं झालं… वर्षभर कदाचित मी चूकलो ही असेल तुझ्या बाबतीत. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी वर्षभर त्रास दिल्याबद्दल मी माफी मागितली. पण माझे अंतर्मन मला हे सांगत होते कि माझे तुला त्रास देणेही गोडच होते.. त्यात तुझ्यासाठी आपुलकी आणि जिव्हाळाच होता. त्रास द्यायचा आणि वरती विचारायचं “तू नाराज नाही ना”, “तुला राग नाही ना” पण तरी मी अजून क्षमादान मागतो आणि खर्या भावनेचं नेहमीचं मोल असतं जर का तू स्वच्छ भावनेनं जाणलं असतं.
माझं मन तुझ्याजवळ मोकळे करावे असे मला खुपदा वाटले..पण तशी वेळच येत नव्हती.. अखेर २ मे २००७ आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस. निरोपाची वेळ जवळ येत होती तशी तशी माझी हृदयाची धडधड वाढली होती.. आजपर्यंत जे वाटले नव्हते ते त्या दिवशी प्रकर्षाने जाणवले. आजचा सूर्य मावळला कि तू मला दिसणार नाही किंवा कधी दिसशील? या विचाराने मन बैचेन झाले होते.. स्वत:च्या नकळत तुझ्यात इतकं गुंतलो कि त्याच्यात बाहेर येता येत नव्हतं.
कदाचित तुला पुसटशी कल्पनाही नसेल कि आपल्यावर कुणीतरी जीवापाड प्रेम करतंय. पण बरीच वेळ निघून गेली होती. कॉलेजच्या शेवटच्या दिवसानंतर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपल्यात दुरावाच वाढणार होता. त्या दिवसापसुन तुझे जग आणि माझे जग वेगळे असणार होते.. तू “नाही” हा शब्द अगदी सहज बोलून जाते हे माहित असल्यावरही मी तुला १ मे ला धाडस करून तुझ्याशी बोललो.. पण त्या दिवशी तू तुझ्या मनाचा कौल व्यवस्तीत नाही दिला.. तुलाच स्वता:ला सांगता येत नव्हतं. तुही प्रेम करत होती माझ्यावर..पण मनातलं गोड गुपित कोण सांगेल ना.. म्हणून मी धाडस केलं होतं..
असो प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते त्या त्या वेळी त्या व्हायला पाहिजे.. तुझं मन जर मोठं असेल तर एवढी एकच गोष्ट स्वीकार “कुणीतरी होतं माझं, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं.. माझी आठवण ठेवणारं. तुझ्यावर प्रेम केलाय अगदी निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनं..पण कधी एकटं असतानाच्या भेटी, कधी सगळे एकत्र असतानाच्या भेटी..त्यात सगळ्याच्या नजरा चुकून एकमेकांना पाहणं..
तू हे कोणते पाश निर्माण केलेत. तू तुझ्या न दिलेल्या कौलवर ठाम रहा. मला मात्र तुझ्यावर प्रेम आहे हे कधीच विसरता येणार नाही.. आणि प्रत्येक वेळी मी सुचकच बोलत होतो जेणेकरून तुला माझ्या भावना कळाव्यात. तुझ्यावर असलेले माझे वेडे प्रेम मी तुला समजाऊ पाहत होतो. वेड्या अपेक्षेने तुझ्याकडे पाहत राहिलो. कळतनकळत तुझ्यात खूप गुंतलो. अखेर एक निरोपाचा क्षण आला आणि आपल्याला कायमचा दूर करून गेला. शेवटच्या क्षणी मात्र खूप त्रास झाला आणि आजची होतोच आहे. त्या दिवशी इतकच कळले कि निरोप जर अटल असेल तर कुणात जास्त गुंतू नय. “गळा दाटून येणे” किवा “भरून येणे” हे शब्द मी फक्त कथा कादंबऱ्यात वाचले होते. पण त्या दिवशी या गोष्टी मला जाणवल्या. आज तुही तुझ्या घरी, मी ही माझ्या घरी… खरं सांगू अद्यापही माझं मन तू ज्या बेंचवर बसत होती तिथेच रेंगाळतय. नूतन कॉलेजचं प्रिमायसेस आठवला कि जिकडे पाहावे तिकडे तूच दिसतेस.
आज मात्र मी घेतलेल्या तुझ्या काळजीची मला खूप आठवण येत होती. माझी सदभावना तुझ्याप्रती खरी होती. तू मला मनापासून आवडली होती हे त्या क्षणांचं सत्य आहे. तूच राज्य केलास माझ्या क्षणाक्षणावर… त्या शेवटच्या दिवशी खूप बोललो पण अजूनही असे वाटते कि तुझ्याशी खूप बोलायचे बाकी आहे.. कॉलेज मध्ये माझं काहीतरी राहून गेलंय हा विचार मला आजही छळत आहे.. आजचे हे लिखाण खूप अस्वस्थ असताना लिहित होतो.. कुणाचा ‘नाही’ हा शब्द मनाला अतिशय वेदना देऊन जातो. पण अजूनही असं का वाटत असावं कि तुझ्या मनाचा कौल व्यवस्तीत नाही दिला…
पुन्हा प्रेमात पडणार नाही | Sad Love Story in Marathi
अखेर तो दिवस उजाडला जेव्हा तिचा एक मेसेज माझ्या मोबाईलवर वादळासारखा येऊन धडकला..
“अभी आपण यापुढे फक्त फ्रेन्ड्स राहू, मला तुझ्याबरोबर या रिलेशनशिपमध्ये नाही रहायचंय”
मी ड्यूटी वर होतो लंच टाइममध्ये मेसेज वाचला आणि वाईट वाटण्यापेक्षा राग आला. सरळ मोबाईल स्वीच ऑफ केला आणि लंच आटोपून कामाला लागलो. कामात तिचा विचार कटाक्षाने टाळला. ड्यूटी संपवून घरी आलो तर बाईसाहेबांचे १२ मेसेज, मी सरळ सरळ इग्नोर केलं आणि फ्रेश होण्यासाठी गेलो. फ्रेश होईपर्यंत तिचे भरपूर मिस्ड कॉल येऊन गेले. खरंतर माझी ही दूसरी गर्लफ्रेंड, मी तसा खूप एकपत्नीव्रता सॉरी एक गर्लफ्रेंडव्रता खो खो आहे. पहिले रिलेशन 4 वर्ष आणि दूसरे रिलेशन फक्त 4-5 महिने. पहिले ब्रेकअप झाल्यानंतर कधी प्रेमात पडायचे नाही अशी प्रतिज्ञा केली पण “दिल तो पागल है, दिल दीवाना है” अशा अनेक उक्तिंप्रमाणे माझ्या दिलाने मला धोखा दिला आणि जे नको होतं तेच झालं. मग काय दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ मेसेज, कॉल चालू झाले. दिवसाला १५-२० सेल्फी, एकमेकांसाठी ५-६ गाणी, २-३ तास वीडियो कॉल चालू झाले. प्रत्येक long distance रिलेशनशीप प्रमाणे..
सगळे सोशल नेट्वर्किंग साईट्स आमचे अड्डे बनले. पण शेवटी तिच्या मनात काय आले काय माहिती एके दिवशी अचानक सगळे संपले. मला वाईट वाटले पण मी स्वतः लाच गंडवत होतो कुल रहायचा प्रयत्न करत होतो, मला काही फरक पडत नाही असे मलाच दाखवून देत होतो मग whats app आणि fb वर पोस्ट्स वाढल्या, dp status दर दोन दिवसाला बदलून तिलाही दाखवून देऊ लागलो की मला काही फरक पडत नाही, मला दुसरी मिळाली वैगेरे वैगेरे पण तसे काही नव्हतेच मला खूप एकटं वाटत होते शेवटी लॅपटॉप उघडला आणि आफ्टर ब्रेकअप चेकलिस्ट तयार केली.
1)तिचे सगळे फोटो डिलीट- डन
2) तिचा नंबर डिलीट- डन
3) तिला सगळीकडे ब्लॉक केलं- डन
4) आमचे सगळे convo डिलीट केले- डन
5) परत जिम लावली – डन
6) दररोज ओवर टाइम केला
तरी नॉर्मल व्हायला एक महिना तरी गेला. पण यातून एक गोष्ट कळाली जगात जितके यशस्वी माणसे आहेत ते सिंगल का आहेत. ब्रेकअप झाल्यानंतर मी स्वतःला वेळ द्यायचा कमी केला आणि कामात जास्तीत जास्त बिझी राहू लागलो. दोन आठवड्यात महिन्याचे काम पूर्ण केले बॉस पण खुश झाला. बिझी राहण्यासाठी जिम जॉईन केली. पुस्तके वाचू लागलो. मित्रांना खूप दिवसातून वेळ दिला ते पण खुश झाले. एकंदरीत सुरुवातीचा त्रास सोडला तर हे ब्रेकअप खूप काही शिकवून गेले. मुली आपल्या निर्णयावर ठाम नसतात हे आणखी एकदा पटले. मी तिला ब्लेम करत नाही पण नकोच होत तर पहिला कशाला रिलेशनशिप मध्ये रहायचे. आमच्यासारखी इमोशनल पोरं पण असतात. असो आता कंपनीमध्ये एक खूपच क्युट मुलगी पण मी ब्रेकअपमध्ये आहे. त्यामुळं आता इथून पुढे नो गर्ल्स.
आधी मूवीमध्ये ब्रेकअपची गाणी बघून मस्त वाटायंच. असे रस्त्याने स्लो मोशन मध्ये sad मूड मध्ये चाललोय आणि बॅकग्राउंड मध्ये sad songs दाढ़ी वाढलेली. पण तसे काही झालेच नाही असो पण ब्रेकअप के बाद चा हा वेळ कायम लक्षात राहील.
माझी सखी
आज ऑफिस मधून लवकरचं निघाले.. दुपारी आलेल्या एका फोनने फार भावूक झाले मी. माझ्या एका मैत्रिणीचा फोन होता परत त्या आठवणी ने मन भिजून गेलं.. बरं नाही वाटत असे सांगून निघाले ऑफिस मधून, सरांनी जरा नाराजीने परवानगी दिली.
घर ऑफिसपासून लांब, ट्रेनने स्टेशनला उतरून नंतर रिक्षा करून कसेबसे घरी आले. मला लवकर आलेले बघून आईने काळजीने विचारले “काय झालं, बरं नाही वाटंत का ? आज लवकर आली आणि चेहरा असा का केला आहेस ?
“काही नाही गं असचं जरा लवकर आले” मी म्हणाले आणि लगेच बाथरूम मध्ये जाऊन चेहरा पाण्याने धुतला, आई ने जर डोळ्यातलं पाणी बघितले असते तर आणखी प्रश्न विचारले असते. फ्रेश होऊन आतल्या खोलीत आले आई ने केलेला चहाचा कप समोर टेबलवर होता, चहा घेता घेता परत एकदा मोबाईल चेक केला प्रियाचा MASSAGE होता. तिने मला व माझ्या दुसऱ्या मित्र मैत्रिणीला तिच्या गावी बोलावलं होते,
प्रिया आणि मी एकत्र कॉलेजला होतो. माझी सर्वात जवळची मैत्रीण, एकदम टोम बॉय बिनधास्त, हसरी आणि हसवणारी, श्रीमंत घराण्यातली आणि मी शांत, लाजाळू, देवभोळी (चुकीच वागाल तर किंवा वाईट बोललं तर आपली पुण्याई कमी होते, लोक नाव ठेवतील असा समज आई ने दिलेला ), घरची आर्थिक परिस्थिती ठीक. विरुद्ध स्वभाव पण तरीही अगदी जिवलग मैत्रीण. कॉलेज संपवून पुढे ती तिच्या पुढच्या शिक्षणासाठी U.S ला निघून गेली, तेव्हा दोघी गळ्यात पडून फार रडलो, हसलो.
तीन वर्ष तिथे राहून ती परत आली लग्नासाठी आणि त्याचेच निमंत्रण तिने दयाला फोन केला .
“मी जाणारचं नाही, असे मनाशी पक्के केले आणि मोबाईल ठेवला. परत राहून राहून त्याच आठवणी ने मन जखमी होत होते. ऑफिस मधून बाहेर पडल्यावर ते घरी पोहचेपर्यंत तीच मन दुखवणारी आठवणी
आठवणी या अशाचं असतात
कधी हसवतात, तर कधी रडवतात.
आठवणी या अशाचं असतात
शरीर इथे तर मन त्या तिथे झोके घेत असते.
आठवणी या अशाचं असतात
मनाच्या कप्यात बंद झालेल्या हळूच बाहेर डोकावणारी .
आठवणी या अशाचं असतात
त्या परत करता हि येत नसतात..
जेवण करून परत आतल्या खोलीत आले. आई स्वयंपाक घरातील काम आवरत होती. बाबा बाहेरगावी गेले होते म्हणून, मी दोघीच अंथरून घालून लगेच पाठ टेकवली. मला लवकर झोपलेली पाहून का कुणास ठाऊक आईने जवळ येऊन डोक्यावरून हलकेच हात फिरवला, काय नवल त्या स्पर्शात मन आतून दाटून येत होतं डोळे पाणावले तसे कुस बदलून अश्रुंना मोकळे केले. अश्रुचं ना असचं असतं एकदा का वाट दिली का ते वाहतच जातात आणि परत त्याच आठवणी…
आठवणीत तुझ्या…
रस्ता क्रॉस करायचा होता…. जोशी काका, त्यांचा मुलगा आणि त्यांची सुन रस्त्याने चालले होते. रस्ता तसा नेहमीचाचं पण गाड्या भरधाव अशा सुसाट धावायच्या की सिग्नल लागला नसेल तर रस्ता क्रॉस करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचे लक्षण होते. जयेश ने आरतीचा हात धरला अन “बाबा चला लवकर, सिग्नल लागला” असे ओरडून ते दोघे धावले. पार रस्ता ओलांडून दुसऱ्या रस्त्याला चालू सुद्धा लागले, आरतीने मागे वळून बघितले अन तिने जयेशला मागे खेचले, “अरे थांब, बाबा तिथेच आहेत. साठीकडे झुकलेल्या जोशी काकांसाठी हा रस्ता नवीन नव्हता. सहा महिन्यांपूर्वी ते गावी रहायला गेले होते परंतु त्यांचे अवघे तारुण्य या मुंबईत गेले होते…
आता वार्ध्यक्याचे (खरे तर निवृत्तीनंतरचे) आयुष्य त्यांना त्यांच्या पत्नीसोबत घालवायचे होते, तिला तिच्या हक्काचा वेळ द्यायचा होता या विचाराने ते दोघे म्हणजे जोशी काका आणि जोशी काकू गावी शिफ्ट झाले होते.. परंतु म्हणून काही या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ते रस्ता क्रॉस करणे विसरले होते?… कसं शक्य आहे? जयेश विचार करत होता, आणि त्याने पुन्हा रस्ता क्रॉस केला आणि बाबांना घेऊन आला..
रात्री नेहमीप्रमाणे जेवणे उरकली. आरती ने आरुषला झोपवले आणि जयेशकडे वळली, “आरुष झोपलाय, जाऊया आता तरी, बोलूया का बाबांशी?” “अगं रात्रीचे अकरा वाजले आहेत, झोपतील ते आता, उद्या बोलू” “नाही जयेश, जागे आहेत ते. तुझा उद्या कधीच उजाडणार नाही, प्लीज आज काय ते नक्की करायलाच हवं” शेवटी नाखुशीने तो तयार झाला. जोशी काका ग्यालरीमध्ये आरामखुर्चीत बसले होते… आकाशातील ताऱ्यांकडे बघत.. नकळत काहीतरी बोलत होते.
जणू काही त्या ताऱ्यामध्ये कोणीतरी असल्यासारखे. जयेशने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते तंद्रीतून जागे झाले, “अरे बाळांनो तुम्ही जागे आहात.. झोपा जा… ऑफिस नाही का उद्या… आरु झोपला वाटते..?” नकळत त्यांनी एका हाताने डोळे टिपले, दोघांच्या नजरेतून ते काही सुटले नाही. “उद्या शनिवार आहे सुट्टी आहे आमची, म्हणूनच मुद्दाम आज तुमच्याजवळ आलो आहे… काय गप्पा मारता त्या ताऱ्याशी… ?… ते एवढे लांब… मिलो दूर, त्यांच्याशी रात्रभर बोलता. आज आमच्याशी बोला ना काय बोलत असता त्यांच्याशी?” आरती भडाभडा सगळं बोलून गेली…
जोशी काका वेळ न दवडता बोलले, “आज वेळ आहे ना तुमच्याकडे, आज तुमच्याशी बोलतो आणि आरती, मी न ह्या ताऱ्याशी नाही गं बोलत, मी ‘हिच्याशी’ बोलत असतो…. तिला या ताऱ्यामध्ये पाहत असतो…” हे दोघे थोडे घाबरले, बाबांची मानसिक अवस्था ठीक तर आहे ना ? असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर उमटला, वडिलांनी ते ओळखले आणि बोलले, “घाबरू नका, तुम्हाला एक लव स्टोरी ऐकवू का?” “बाबा?” हे दोघे आश्चर्याने एकदमच बोलले…. पुढे जोशी काका आठवणीत रमले आणि बोलत गेले आणि हे दोघे ऐकत गेले….
“तुमची आजची पिढी हि प्रेमविवाहाला जास्त मानणारी… वयात आलो नाही तर तुम्हाला गर्ल फ्रेंड नाहीतर बॉय फ्रेंड हवा असतो… काय एवढं वेगळ बोलायचं असतं तुम्हाला जे तुम्ही आई वडिलांशी शेअर नाही करू शकतं? बरं ते जाऊदे … सख्खी भावंड तरी आहेत ना तुमच्याच वयाची…? मग जनरेशन ग्याप चा प्रश्न येतो कुठे? बरं जाऊदे मला तुम्हाला फैलावर नाही घ्यायचं रे… फ़क़्त थोडंस वेगळं प्रेम जे मी अनुभवलं त्याची प्रस्तावना किंवा कल्पना तुम्हाला यावी… म्हणून बोललो…” या दोघांनी सुटकेचा श्वास सोडला..
“एक वेगळीच गम्मत असते रे लग्न करून त्या बंधनात अडकून मग आयुष्याच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करण्यात, त्याच्याशी जुळवून घेण्यात…. तुझ्या आई बरोबरचा माझा संसार ३५ वर्षांचा.. खूप गोष्टी अनुभवल्या आम्ही एकत्र.. सुख, दुःख… कितीतरी ऋतू कसे बदलून गेले…. आता सगळंच संपल्यासारखं वाटतंय रे… तिची आणि माझी पहिली भेट… तुझ्या मावशी आजीने सुचवलेलं स्थळ.. तिच्या घरी गेलो, मी पाहिलेलं हे तिसरं स्थळ असेल बहुतेक… यावेळेस पहिले पत्रिका जुळवली आणि मग भेटीचा कार्यक्रम आखला होता… खरं तर कांद्यापोह्यांचा अन चहाचा. ठरवून लग्न करण्यात हा मात्र एक तोटा असतो बरं का… म्हणजे मुलींसाठी लग्न जुळलं तर ठीक नाही तर उगाचच खर्च आणि मुलांसाठी सुद्धा… अरे मुलीच्या घरी जाण्या-येण्याचे भाडे नाही का प्रवासाचे?” हा हा हा जोशी काका अचानक हसायला लागले ..
पुन्हा सुरुवात “तिच्या घरी पोहोचलो साधारण ५.३० वाजता संध्याकाळी. पावसाळ्याचे दिवस होते.. त्यामुळे गरमागरम पोह्यांची अपेक्षा होती.. आपले काही नियम कळतंच नाहीत, म्हणजे नुसते पोहे खाऊन पूर्ण स्वयंपाक करता येतो कि नाही हे कसे ठरवायचे बरे? आणि खरंच ती मुलगी (उपवर वधू) बनवत असेल का ते पोहे? पण यावेळचे पोहे चांगले निघावेत अशी खूप अपेक्षा होती, तुझ्या आईचा फोटो खूपच आवडला होता रे.. अपेक्षेप्रमाणे आणि फोटोपेक्षा खूप जास्त सुंदर दिसत होती ती प्रत्यक्षात, ती मोरपंखी रंगाची साडी, त्याचा तो जाडा काठ, तिची लाजेने खाली झुकलेली नजर, कपाळावरची टिकली, लांब सडक केस आणि त्यात घातलेला तो मोगऱ्याचा गजरा… काय सुंदर दिसत होती ती..” आरती खुदकन हसली.. “बाबा इज ब्लशिंग…” जयेशलाही गम्मत वाटली. काका बोलत होते, “तिने बश्या ठेवल्या पण त्यात पोहे नव्हते… गोड शिरा होता अन त्याबरोबर चहा नाही काही तर कॉफी होती. हे मात्र नवीन होतं. असं का? याचा खुलासा पुढे होणाऱ्या प्रश्नोत्तरात तिला करणारच हा निर्धार, मी केला होता. एकमेकांची तोंड ओळख होण्याइतके विरुद्ध पार्टीनी (आम्हा दोघांचे आई वडील आणि इतर उपस्थिथ मोठे मान्यवर ) एकमेकांना प्रश्न विचारून झाले होते.
त्यांची मनासारखी उत्तर देऊन तोंडी परीक्षेत आम्ही पास झालो होतो हे त्यांच्या चेहऱ्यावळून कळालं होतं. त्यात माझे मामा बोलले “मग त्यांना बोलुदे थोड सविस्तरपणे, आपण जाऊया आतल्या खोलीत.” देवा केव्हापासून हे ऐकायचं होत मला… त्या अधिरेपणाची, घाईची मजाच वेगळी… आता आम्ही दोघेच होतो, एकटे.. तिची नजर खाली आणि माझी तिच्या चेहऱ्यावर… पहिले विचारलं, “हा शिरा कॉफी काय प्रकार आहे? कांद्यापोह्यांचा कार्यक्रम असतो ना?” तिला हा प्रश्न अपेक्षित होता बहुतेक. ती म्हणाली, “माफ करा, थोड स्पष्टच बोलते.. आमच्या घरच्यांनी तुमची माहिती काढली होती, त्यांना तुम्ही आधीच आवडला होतात.. त्यामुळे मी हि होकारच दिला होता. तुम्ही माझ्या भावी आयुष्याचे जोडीदार व्हावे असं वाटत होतं आणि म्हणूनचं आपल्या नात्याची सुरुवात तिखट अशा कांद्यापोह्यानी न होता गोड शिऱ्याने व्हावी.. म्हणून शिरा आणि नात्यात फ़क़्त गोडपणाच राहतो अस शक्यच नाही म्हणून सोबतीला कॉफी थोडीशी कडवट.. पुढच्या प्रवासात सुख आणि दुःख येणारच ते तर आयुष्य आहे.. ते आपण दोघे एकत्र मिळून सांभाळून नेऊ आणि लग्नाच्या व संसाराच्या वादळ वाटेला सामोर जाऊ हेच सांगायचं होतं…” तिचं मराठी भाषेवरच प्रभुत्व अफाट होतं पण त्याबरोबरच तिची भावनिकता जुडली होती आणि खंभीरपणे आलेल्या संकटाला एकजुटीने सामोर जायची तयारीही… त्या तेवढ्याशा ५-६ ओळीनी तिने माझं हृदय जिंकून घेतलं. तिच्यावरच्या संस्कारांची जाणीव झाली आणि आमच्या लग्नाची सुपारी फोडूनच आम्ही परतलो. कुमारी भैरवी विष्णू बर्वे, सौभाग्यवती भैरवी उमाकांत जोशी झाली. आमच्या लग्नाचे सनई चौघडे वाजले आणि ती माझ्या आयुष्यात कायमची आली.
एक नोकरी सोडली तर माझ्याकडे स्वतःच असं म्हणवून घेण्यासारखं काहीच नव्हत. वडिलोपार्जित दोन खोल्यांचं चाळीतलं घर. मी मोठा माझ्या मागे दोन बहिणी, एक भाऊ तो तसा लहानच होता. म्हातारे आई वडील. हिच्या घरची परिस्थिती तशी म्हणायला गेलं तर माझ्यापेक्षा उत्तमच. पण पाण्यात साखर विरघळावी तशी हि आमच्या घरात नांदू लागली. आमच्यातलीच एक बनून. सगळ्यांनाच आपलंस केलं तिने.
लग्नानंतर म्हणावा तसा एकांत आम्हाला कधी मिळालाच नाही. गप्पा गोष्टी- गुजगोष्टी असं बोलणं हिला नेहमीच खटकायचं.. “अहो… असं काय … आई अण्णा काय म्हणतील…?” या प्रश्नावरचं आमची गाडी अडकायची. त्यातूनही मी काहीना काही मार्ग काढायचोच. माझ्या ऑफिसची वेळ तशी ठरलेलीच, तरीही कधी कधी लवकर सटकायची संधी मिळायची, १ वा २ तास. त्याकाळी मोबाईलची सुविधा नव्हती, मोबाईल काय आमच्या घरी तर साधा MTNL पण नव्हता, मग मी शेजाऱ्यांकडे फोन लावायचो, हिला बोलवायचो ती ही यायची (काहीतरी बहाणा करून) मग आम्ही घरापासून थोड्या दूर असलेल्या बागेत जायचो, गप्पा मारायचो… मज्जा यायची. विवाहित असून देखील असं लपत छपत आमचं प्रेम बहरायचं. “कोणी बघितलं तर काय म्हणेल…?” अशी तिची हुरहूर कायम असायची… पण तिच्या चेहऱ्यावरही आनंद बहरून यायचा, आपल्या हक्काचा नवरा सोबत आहे, त्याचा अभिमान स्पष्ट दिसायचा तिच्या चेहऱ्यावर….
पावसाळ्यात आमचं कौलारू घर गळायचं… बिचारीची खूप दमछाक व्हायची सगळं घर साफ करताना… प्लास्टिक लावलेलं असायचं, तरीही कुठेतरी काहीतरी राहायचचं… मी खूप वैतागायचो “अहो रडायचं कशाला…बाहेर जाऊन आपण भिजू शकत नाही ना… मग इथेच आनंद लुटा ना …” खूपच सकारात्मक दृष्टीकोन असायचा तिचा… टपटप गळणाऱ्या घरात पावसाचा आनंद कसा लुटता येणार..? मग आमची शाब्दिक चकमक व्हायची… पाऊस कशाला येतो? तिथपासून नळाला, शेतीला पाणी कोण देणार? असं कुठल्या कुठे बोलण जायचं… पुढे तुझा जन्म झाला… तिच्या ड्युटीत आणखीन भर पडली… तिचा पगार काही वाढला नाही मात्र मातृत्वाचे प्रमोशन मिळाले हे समाधान तिला आनंद देत होते…
भैरवीच्या जबाबदाऱ्या दिवसेन दिवस वाढत गेल्या… गृहप्रवेश करताच आईने घराच्या तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे दिल्या… मोठ्या सुनेकडे सारी सूत्रे सोपवली. मी माझी सगळी कामे तिला देऊन टाकली… अंघोळीच्या टॉवेल पासून, रात्रीच्या जेवणापर्यंत… आई होतीच पण घरच्या वाहिनीकडे जास्त लाड व्हायचे म्हणून तुझ्या आत्या आणि छोटे काका तिच्याकडेच धावायचे… केसांना तेलाने मालीश करून घेताना त्यांच्याबरोबर मी हि कधीतरी माझा नंबर लावायचो…
गौरी गणपती, घटस्थापना, दसरा, दिवाळी… सगळे सण सुरळीत पार पडले. दोन्ही बहिणींच्या (माझ्या) लग्नात तिने लगबगीने काम पाहिले… खर्चाचे मोज माप नीट बसत नव्हते.. सोन्याच्या दागिन्यांना तेव्हाही तेवढाच जोम होता जो खिशाला परवडत नव्हता… पहिलीच्या लग्नात तिने स्वतःचा चपला हार मोठ्या मनाने भेट दिला… दुसरीच्या लग्नातही तीच गत… यावेळेस तिने हातातल्या पाटल्या दिल्या.. माझं मन खात होतं, एकीकडे बहिण तर दुसरीकडे बायको… “अगं माफ कर गं मला, आपण नंतर देऊयात ना ? एवढी काय घाई आहे दागिन्यांची, तिच्या सासरकडचे पण मागत नाही आहेत काहीचं….” तेव्हा ती म्हणाली होती, ” माझं लग्न झालं कि तुमच्याशी… मी मिरवले माझ्या लग्नात दागिने घालून आता यांना मिरवू दे कि, नंतर हवे तर मला करा दागिने आणि हो, आईंनी दिलेले तुमचे खानदानी तोडे आहेत कि माझ्या हातात…” तिचा समंजसपणा नेहमीच भारावून टाकायचा…. तिचं मन खूप मोठ्ठ होतं…
आज-कालचे दिवसंच वेगळे… नाती, सण, उत्सव या गोष्टी आनंदाने साजऱ्या करण्यापेक्षा त्यात चढाओढच जास्त वाटते… सगळी कडे बाजारीकरण झालंय… पार्ट्या वाढल्या आहेत… ते प्रेम, नाजूक संवेदनशीलता कुठेतरी हरवली आहे. माझ्या हिचा वाढदिवस…. कामाच्या व्यापात एखाद्या वर्षी विसरलो असेनही तर तिने त्यासाठी घर डोक्यावर घेतलेलं मला कधीच आठवत नाही… तिच्या केसात एखादं गुलाबचं फुल नाहीतर फार फार तर मोगऱ्याचा गजरा घातला कि आमची स्वारी भयंकर खुश… तेच तीच गिफ्ट… तिच्यामुळेच तर पैसा जुळत गेला…
पुढे दिवस बदलत गेले, दिवसांबरोबर परिस्थितीही बदलत गेली.. माझ्या प्रमोशनमुळे पगारात भर पडली.. गाठीला पैसे जोडून जोडून एका घराची दोन घरे केली. आमचा संसार फुलत गेला.. छोट्या भावाचेही लग्न झाले… पण त्याला व त्याच्या पत्नीला एकत्रित कुटुंबात अडकायचे नव्हते, रोज वाद होण्यापेक्षा दुसरे घर आनंदाने तिने दिराच्या नावे करायला लावले.. पैसा, जमीन-जुमला यापेक्षा सतत तिने नात्यांना आणि प्रेमाला जास्त जपले. मात्र नोकरीच्या कचाट्यात सापडलेल्या मला तिला मनसोक्त वेळ देताच आला नाही… माझी भावंडे, आई – वडील मग तू.. तुमचं सगळं करण्यात तिचा वेळ जायचा. आता रिटायरमेंट नंतर तिच्याशी गप्पा मारायचं ठरवलं तर तीच सोडून गेली… मला आयुष्यात शेवटपर्यंत साथ देणार होती ती… आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर अशी कशी एकटीच गेली ती…? किती एकटा पडलोय मी? तिला मी नेहमी म्हणायचो, “आपण म्हातारे झालो ना कि मी माझ्या जबाबदारीतून मोकळा होईन, तू हि होशील… मग फ़क़्त आपण दोघे… किती तरी गप्पा मारू, आपला आयुष्याच्या प्रवासावर एकत्रितरीत्या फेरफटका मारून येऊ… मस्त फिरू…” पण काहीच जमलं नाही रे; सारं गणितचं चुकलं. आम्ही गावी शिफ्ट झालो… एका रात्री असेच गप्पा मारत बसलो तर अचानक म्हणाली, “अहो माझ्या छातीत दुखतंय…” आणि बस्स… संपल सगळं, तिने डोळे मिटले… ते कायमचेच… हृदयविकाराचा झटका असा कसा रे…? मला काही बोलूचं दिल नाही… ” जोशी काका हमसाहमशी रडू लागले…
आईच्या आठवणीने जयेशचेही डोळे पाणावले. आरतीने दोघांना सावरलं… पण आपली सासू किती चांगली होती, याच्या जाणीवेने तिचाही उर भरून आला. काका थोडे सावरले. पुढे बोलू लागले, “दहा दिवसांपूर्वी देशमुखांच्या घरी गेलो होतो… तुला आठवत असतील देशमुख काका… इथून दोन इमारती सोडूनचं राहायचे, आपल्या घरी यायचे… पण आता तोही नाही” जयेश बोलला, “ते वारले…?” “नाही रे, कुठल्या तरी वृद्धाश्रमात रवानगी केली आहे त्याच्या मुलाने आणि सुनेने…” त्याची बायको होती, नातवंडांना सांभाळायची, त्याला एवढं नाही जमत… सासू गेली, गरज संपली… मुलांसाठी केअर टेकर ठेवली… पण या म्हाताऱ्याला कोण सांभाळणार? तोही खचूनच गेला होता बायको गेल्यावर… चिडचिडा झाला होता… म्हणून धाडल घरापासून दूर त्याला….” “बाबा, पण तुम्हाला हे सगळं कसं माहित?” जयेशने विचारलं, “अरे त्याच्या घरी गेलो होतो, तो नव्हता पण ती केअर टेकर होती ना… तिने सगळं सांगितलं… वरून सल्लाही दिला,”तुम्ही देखील मनाची तयारी करून ठेवा आजोबा…” जरा जास्तच वाईट वाटलं रे.. हि असती तर मी इथे परत आलोच नसतो रे… तू कशाला घेऊन आलास मला?… मी तिथे तिच्या आठवणीत रमलो असतो… आता तुम्हाला उगाचच माझी अडगळ…” त्यांचा एकुलता एक मुलगा आणि त्यांची सून एकमेकांकडे बघतचं राहिले… आई बाबांच्या आयुष्याचा प्रवास इथे येऊन नवीन वळण घेईल तेही आपल्या विरुद्ध हे त्यांच्या ध्यानी मनीही नव्हते, तरीही जयेश सावरून म्हणाला, “बाबा काय बोलताय? तुम्ही माझे जन्मदाते आहात, मला एवढचं ओळखलत?” आरती तर रागाने उठून निघून गेली ती गेलेली पाहून जोशी काकांनी मुलाकडे प्रश्नार्थक नजरेने पहिले… जणू ते म्हणत होते कि मी ‘तिचा..’ जन्मदाता नाही ना ? थोडा वेळ गेला… रात्रीची शांतता जाणवू लागली…
त्या शांततेचा भंग करत आरती परत आली… जणू काही तिने वडील आणि मुलगा यांच्यामधील मूक संभाषण ऐकलं होतं..काहीतरी दाखवत म्हणाली, “तुम्ही माझे जन्मदाते नाहीत… पण माझ्या मनात तुमच्याबद्दल तेवढाच आदर आहे जेवढा माझ्या सख्या जन्मादात्यासाठी आहे. तुम्हाला मी माझे दुसरे वडील मानते… बाबा…तुम्हीचं आज मला परकं केलंत….” ती देखील रडू लागली.. रडतच पुन्हा म्हणाली,” हे पहा… ह्या घराच्या चाव्या आणि हे तोडे… आई गेल्या पण माझ्या अंगावर सगळ्याची जबाबदारी टाकून गेल्या… मी त्यांची जागा कधीच घेऊ शकणार नाही पण तसं प्रामाणिक आणि समंजस वागण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि जगातील सगळीच लोक सारखी नसतात ना? तुम्ही अडगळ कशी होऊ शकता? तुम्ही आमच्यापेक्षा जास्त उन्हाळे – पावसाळे पाहिले आहात… तुमचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला हवेच आहेत… आज जसा विचार केलात ना तसा पुन्हा कधी कल्पनेत पण नका करू…” जोशी काका समाधानाने म्हणाले,” चुकलो मी पोरी… खरंच जोशी घराण्याला सुना ह्या फारच गुणवान मिळतात… भाग्यंच हे… आता मी निश्चिंत आहे…” तिघांचे डोळे भरून आले… आणि हसतच,” शुभ रात्री” म्हणत ते झोपायला गेले.
जयेश तर आरतीवर खूप खुश होता त्याला त्याच्या बायकोचा खूप अभिमान वाटत होता. तो म्हणाला, “आरती आज बाबा आईला खूप खुश होऊन सांगत असतील तुझ्याबद्दल… तशीही ती त्यांना स्वप्नात रोज भेटतच असेल.” आरती म्हणाली, “बाबांशी बोललो म्हणून खूप बरं झालं नाहीतर ते नको नको ते विचार करून आजारी पडले असते. मानसिक दृष्ट्या खंगले असते… त्यांच्याशी दररोज थोडं बोलायला हवं… ते एकटे नाहीत याची जाणीव करून द्यायला हवी….”
काही दिवसांनी.. रस्ता क्रॉस करायचा होता. जोशी काकांबरोबर आरती आणि जयेश होते. आरतीने त्यांचा उजवा हात पकडला होता तर जयेशने डावा हात. तिघांनी मिळून रस्ता क्रॉस केला… खरंच मन किती विचार करत असतं… जर आपल्याच माणसांशी थोड मोकळेपणाने बोललो तर नातं कसं सदा प्रफुल्लीत राहतं आणि सतत बहरत आणि फुलत जातं…. हो ना?
तर मित्रांनो तुम्हाला या Marathi Love Story कशा वाटल्या ते कंमेंट करून नक्की सांगा. आशा आहे तुम्हाला या Marathi Prem Katha वाचून प्रेमाबद्द्दल जाणून घायला मदत झाली असेल.
हे देखील वाचा
20 Greatest Real Life Love Stories from History